तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कर्जत चा बंगला पण बदलला की काय.. >>>>>
हो बदलला.... दोन दिवसात.... ती जाताना जुनाच होता. वस्तू / रचना पण नवीन/वेगळ्या आहेत.
पुनर्जन्माच्या खाणाखुणा शोधायची सोय करायपुरती पाठवली होती वाटतं ब्याद माहेरी...

नागीणीने ईशापेक्षा चांगला अभिनय केला असता डसण्याचा. >>>>>
१००...००% सहमत.
काल डॉशी आणि बाकीही बोलताना नॉर्मल बोलली.... नीट भानावर असल्यासारखी....
मग चालताना चेहरा शून्यात / स्मृतिभ्रंश झाल्यासारखा / आजूबाजूच्या जगाची जाणीव हरवल्यासारखा कोरा का करते? या सिच्युएशनला अनावश्यक आहे हे.

ई श्या पेक्षा आणि रानंपेक्षाही....
त्या प्रोमोत कशी बोलतेय पुनर्जन्म आहे सांगताना... १लीतल्या मुलाला पाण्याची वाफ-वाफेचे ढग-ढगाचा पाऊस कसा होतो ते समजावल्यासारखे.

बघून बघून दासाच ढगातून खाली येतील .... व्हा बाजूला दोघीही...तुमच्याच्याने काही होणार नाही...इतक्या कुचकामी असालसं वाटलं नव्हतं....मीच करतो आता काय ते..... म्हण्त

तो पोस्ट मार्टेम रिपोर्ट घेऊन आलेला तरणा माणूस आणि मानसोपचार डॉचा असिस्टंट वेगळे आहेत. नक्की.
एकच माणूस तरी वापरायचा केस रंगवून.. तो जुना एक्स्ट्रा येणार नाही म्हणाला वाटतं...

तो पोस्ट मार्टेम रिपोर्ट घेऊन आलेला तरणा माणूस आणि मानसोपचार डॉचा असिस्टंट वेगळे आहेत. नक्की.
एकच माणूस तरी वापरायचा केस रंगवून.. .>>हो..हे मी पण observ केल.. तरी पण मंद ला कळल की हाच तो माणूस आहे..#कंटिन्युटीच्यानानाची टांग तो जुना एक्स्ट्रा येणार नाही म्हणाला वाटतं... Lol

ते घरातल देवघर पण आता 20 वर्षापुर्वीच...हे लोक खरच किती प्रेक्षकांना गृहित धरतात....

तो रिपोर्टवाला माणूस, डाॅक्टर आणि महामठ्ठ इशा ह्यांचा एकत्रित अभिनयमहोत्सव बघायला मिळाला काल. कुठे फेडतील देव जाणे. रिपोर्टवाला आत्ताही लहानच दिसतोय. त्याचाही पुनर्जन्म आहे की काय? का तेव्हा बालकामगार होता?
ती इशी "हो, हं, बरं " असे उद्गारवाचक शब्द इतके मरतमढ्यासारखे बुळबुळीत म्हणते ना की तिथल्यातिथं तोंड फोडून तिला पहिल्यांदा खणखणीत "ह्होय्य" म्हणायला शिकवावंसं वाटतं.

काल डॉशी आणि बाकीही बोलताना नॉर्मल बोलली.... नीट भानावर असल्यासारखी....>>>>>>>>>> +++++++१११११११ काल तिचा अभिनय चान्गला झाला होता. मागच्या जन्मीचे प्रसन्ग आठवताना नीट एक्सप्रेशन्स दिले चेहर्यावर. स्पेशली आरतीच्या सिननन्तर तिने छान एक्सप्रेशन्स दिले. देवघरात हात जोडताना मख्ख चेहरा नाही केला.

आरती सिनमध्ये दासा वळून नन्दूकडे पाहतात तो सीन टची वाटला बॅकग्राउन्ड म्युझिकमुळे.

असा हा विचित्र प्रकारचा कोणता पुनर्जन्म आहे की आधीच्याच आऊट झालेल्या प्लेयरला नंतर खेळणार्या प्लेयरला येऊन सांगाव लागत आहे की बाई ग,मी म्हणजे तू.आता माझा गेम पूर्ण कर. >>>>>>> हे अस ' स्वप्नान्च्या पलीकडे' मध्ये पाहिल होत.

...हाहाहा... मी असं काही लिहिलंय हे विसरूनच गेले होते.. (परत आजचा एपी बघायची मानसिक तयारी करतीय मी)...
... रुपालीचे बाळा बरोबरचे संवाद ("काही" उगीचच टाईपलं) ऐकून मी क्षणभर गंभीर झालेले...
.. बाकी पुढे... ई आई बाबा संवाद ... दवाखाना..इत्यादी प्रसंग मी हळवेपणाने पाहायचा प्रयत्न केला.. पण प्रत्येकवेळी दातार कन्येने मला हसायलाच लावले...
... समजून घ्या सुलू!!!>>>>>>>>> Lol

तो पोस्ट मार्टेम रिपोर्ट घेऊन आलेला तरणा माणूस>>>>>>>> तो सारन्ग कारण्डे सारखा दिसत होता.

Spoiler मध्ये कोणी notice केलं का ???
नंदूपण त्या प्रसिद्ध जादूई कपाटातून प्रगटली

रिपोर्टवाला आत्ताही लहानच दिसतोय. त्याचाही पुनर्जन्म आहे की काय? का तेव्हा बालकामगार होता?>>>>>नहींsssssss!!(दोन्ही कानांवर हात ठेवून किंचाळणारी भावली)

भीती वाटते आहे!!
..... ही वाढीव आयडिया केड्याने उचलली नाही म्हणजे मिळवली!!!!...
... सुभा येईपर्यंत तो काहीतरी फीलर मसाला नक्की शोधत असणार!!!

रिपोर्टवाला आत्ताही लहानच दिसतोय. >>>> लहान दिसतोय पण कानाजवळ पांढरा रंग लावलाय हो थोडुसा....

पण नवीन सरंजामे व्हिलात टेबलावर लाकडी फळे ठेवली होती, माणसे बसली तरच खरी ठेवायला परवडतात बहुतेक.

खणखणीत "ह्होय्य" म्हणायला शिकवावंसं वाटतं >>>>>
"ह्होय्य" म्हणायला शिकवालही पण ....
ह्होय्य ?? ह्होय्य !! ह्होय्य !? ह्होय्य Happy याच्या उच्चारातले फरक शिकवेपर्यंत,
..... ..... .... कालचा गोंधळ बरा होता, म्हणाल तुम्ही

Bdw जयदीप हा विजय गोखले या नटाचा मुलगा आहे..काल channel सर्फिंग करताना सह्याद्री वर हा पिता पुत्राची जोडी दिसली..आता मला बराचसा जयदीप चा आवाज त्यांच्यासारखा वाटतो..खरं नाव आशुतोष विजय गोखले..

अच्छा!
विजय गोखले म्हणजे विद्याधर गोखलेंचे पुत्र ना?

कुणी सुभा- मृणाल कुलकर्णी चा ' अ रेनी डे' पाहिलाय का? ह्याची स्टोरी तुपारे च्या सध्याच्या ट्रॅकशी मिळतीजुळती आहे. ( प्रॉपर्टी प्लॅन, पुनर्जन्म नाहिये चित्रपटात)

सुभा एक भ्रष्ट कॉपोरेट एक्झ्युटिव्ह असतो. पैसे कमावण्यासाठी त्याला कुठलाही मार्ग वर्ज्य नाही. मृणालला त्याचा सगळा भुतकाळ ( त्याने केलेल्या भ्रष्टाचारासकट) स्वप्नात दिसत असतो.

कुठे बघायला मिळेल, तूनळीवर आहे का. प्राईमवर तर नाहीये. >>>>>>>> बहुतेक झी५ वर

विस दोन्ही बायकान्ना एकसारखीच गिफ्ट्स देतो! ते कन्गन त्याने नन्दूलाही दिले होते म्हणे.

हिची एक्टिन्ग हळूहळू सुधरत चालली आहे. फक्त ती सुडाची भावना तिला नीट दाखवता आली नाही.

बादवे, सोनी मराठीवर आजपासून साडेआठलाच कोण होईल करोडपती? चालू होणारे.

कुठे बघायला मिळेल, तूनळीवर आहे का. प्राईमवर तर नाहीये.>>> बहुतेक आपलीमराठी वर आहे ..
सुभा एक भ्रष्ट कॉपोरेट एक्झ्युटिव्ह असतो. पैसे कमावण्यासाठी त्याला कुठलाही मार्ग वर्ज्य नाही. मृणालला त्याचा सगळा भुतकाळ ( त्याने केलेल्या भ्रष्टाचारासकट) स्वप्नात दिसत असतो>> हो बरोबर त्यात सारखा पाऊस च पडत असतो .. ..

https://www.inmarathi.com/six-mistakes-in-tula-pahate-re/

यात फक्त वयाचे गुणोत्तर काढताना 6 चुका दाखवल्या आहेत..पण शेवटचे वाक्य खुपच आवडले Lol -->
वास्तविक पाहता पुनर्जन्मासारखा काल्पनिक विषय हाताळायचा असेल तर किमान लेखकाने काळाचे गणित अत्यंत काटेकोरपणे पाळावे ही मूलभूत गरज असते.‘तुला पाहते रे’ या मालिकेत मात्र लेखक-दिग्दर्शकाने लॉजिकचा पुरता बट्याबोळ उडवून टाकला आहे !!

ईशा अभिनय करायला लागल्यापासून धाग्यावर कुणीच येत नाही का? मेबी सुभाची वाट पाहत असतील सगळे.

प्रगती दिसतेय हळूहळू पोरीत. फक्त शेवटच्या भागात आसाशी बोलताना चेहरा मख्ख होत्ता.

वय विसरायला लावणारी प्रेमकथा आहे ही. Lol

खरतर, सिरियलची कधा चान्गली आहे. वेगळी आहे. केडयाने आणि दोन्ही हिरवणीन्नी वाट लावली कथेची. एक सुभाच काय तो सेव्हिन्ग ग्रेस आहे मालिकेत.

विसला पहिल्यापासून व्हिलन नाही दाखवल ते पटतय आता. सुरुवातीलाच विसचा मोटिव दाखवला असता तर ती नायक सुरुवातीला वाईट हेतून नायिकेशी लग्न करतो अशी टिपिकल थीम असलेली सिरियल झाली असती. याआधीही हि थीम शेकडोवेळा पाहिली आहे, सो ह्यावेळी सादरीकरण वेगळ केल. टायटल सॉन्ग मात्र गन्डल आहे. सेम अबाउट टॅगलाईन.

ईशा अभिनय करतेय???
सगळ्यात।मोठी ब्रेकिंग न्युज >>>>>>>> हो. थोडा चेन्ज दिसतोय तिच्यात. शेवटी बदला घ्यायचाय म्हटल्यावर करावाच लागेल ना तिला अभिनय. त्याशिवाय तिला पर्याय नाही म्हणा. Lol

तुरू - लिन्क बद्दल धन्यवाद Happy गेले काही भाग न पाहिल्याने यातल्या काही गोच्या माहीत नव्हत्या.

मुळात विक्याला तिचे वय जाणून घ्यायला त्या पासपोर्ट वाल्या गोंधळाची काहीच गरज नव्हती. त्याच्याच कंपनीत ती कामाला होती. एच आर रेकॉर्ड मधे ती माहिती सहज मिळाली असती.

बाय द वे, विक्याच्या मोटिव्ह मधली लॉजिकल गोची जी होती - की जर त्याला इस्टेट मिळू नये ही अट असेल तर ती राजनंदिनी, ईशा, आईसाहेब कोणाच्याच मार्फत मिळणार नाही - त्याचे काही उत्तर गेल्या काही भागांत आले होते काय? तो सगळा विक्या-व्हिलन वाला ट्विस्ट त्यामुळे फोल होतो.

इशानं जयदीपला "जयडू" म्हणून हाक मारली तेव्हा धडधडलंच. म्हटलं आता त्याचा गालगुच्चा घेते की काय? Happy

अंबाबाईवालीची मुलगी आणि पीरबाबाचा मुलगा...बरेच पुनर्जन्म दिसतात. अशीच चालू राहीली तर प्रेक्षकही घेतील कदाचित.

स. गृ. ऑ. इं ला कोणीही कं. चालवली किंवा नाही चालवली तरी काही ही फरक पडत नाही. आता जयडू बसणारे गादीवर. सर्जेराव किंवा मंदाही चालवू शकले असते. आपण नाॅर्मली गादीवर बसतो तसंच आणि तेवढंच असतं ते.

राजनंदीनीनं बदला घेण्यासाठी परत जन्म घेतला तर डायरेक्ट बदलाच घ्यायचा ना. हौसे हौसेनं प्रेम...लग्न.....हनिमून वगैरे सगळं यथासांग झाल्यावर मग बदला का आठवला? खरं तर बदला घेण्याचीही गरज नव्हती. विक्या घर, जयडु आईसा सगळ्यांना किती चांगल्या प्रकारे सांभाळतोय पाहील्यावर बदला मिशन कॅन्सल करायला हरकत नव्हती.

Pages