तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या झेंडे ला कस कळल की राणं जाळ्या ला भेटणार आहे ते>> ते मला वाटतंय विक्या ने सांगितलं असणार कि हिच्या मागे जा .. हि चाललेय कुठेतरी आणि सांगत नाहीये काय काम आहे .. पण ते आपल्याला दाखवलं नाही

तो रानं चा मोठठा फोटो हात हलवतानाचा किती फिल्मी आहे. अगदी प्रचारासाठी वगैरे असतो तसा. असला घरात कोण लावतं स्वतःचा फोटो.

या केड्याला पुनर्जन्म पण नीट दाखवता येत नाही.
अरे बिनडोक माणसा,ते डिडिएलजे,जब वुई मेट चे ट्रँक दाखवण्याऐवजी जरा कुदरत,मेहबूबा असे सिनेमे तरी बघायचे,जरा काकाजींना बघायच.

या केड्याला पुनर्जन्म पण नीट दाखवता येत नाही.
अरे बिनडोक माणसा,ते डिडिएलजे,जब वुई मेट चे ट्रँक दाखवण्याऐवजी जरा कुदरत,मेहबूबा असे सिनेमे तरी बघायचे,जरा काकाजींना बघायच.

Submitted by UP on 16 May, 2019 - 21:18
>>>>>>

Rofl

अधून मधून मालिकेत डोकावणे सुरू असते..
काल रानं, यंग परांजपे यांना गजा विल्या ला रंगे संभाषण करताना कसं पकडायचं वगैरे सांगत होती.. जितक्या कूल पणे (मठ्ठ, स्तब्ध, निर्वीकार, शून्य अभिनय... वगैरे...) ती संवाद म्हणत होती. म्हटलं अग बाई- तुझा सख्खा नवरा (रीतसर लग्न केलं म्हणून सख्खा!) त्याने तुझ्या बापाला मारलय.. बिझनेस मध्ये झोल करतोय.. जाळी ला बरबाद केलय... तुझ्याच घरी राहतोय.. त्याच्या वि. पुरावे गोळा करण्याचे काम करताना तुला किती दडपण, यातना, त्रास, राग, वगैरे वगैरे होत असेल... काहितरी दिसेल ना चेहेर्‍यावर किंवा आवाजात? कपाळावर एक रेषही नाही.
कॅप्टन कूल नंतर राजनंदिनी चा नंबर पक्का. Proud
यापेक्षा आमचे कडे सौ. व मुली मध्ये गृहपाठाचा संवाद कईक पटीने रंगतो..! स्क्रिप्ट तेच असले तरी नविन ड्रामा अविष्कार दिसतात. Proud

(दामिनी मधला गोविंद अजूनही ओरडतोय.. मिलॉर्ड मिला है तो सिर्फ मख्ख चेहेरा, पर ईंसाफ नही मिला..!)
रच्याकने: या दोन्ही नायिकांना झेलणार्‍या 'संत' सुभा चे पायच धरायला हवे.

अशी किती सारी सिक्रेट्स प्रोमो मध्येच दाखवली ..विसं चे करे रूप पण ..मूर्ख लोकं >>>>>>> नैतर काय

जालिन्दरच्या सेक्रेटरीच सरनेम शिरपूरकर आहे हे स्वतः जालिनेच कन्फर्म केल.

म्हटल , झेण्डे एवढ कौतुकास्पद काम केल तरीही विस त्याची कॉलर का धरतोय, नन्तर कळल प्रेमाने धरत होता. Lol

एवढं जर झेंडे विक्या च दैव बलवत्तर होत की केलेली प्रत्येक काळी कामं लपुन गेली तर मग त्याच दैवाने चांगली कामं केलि असती तरही यशस्वी झालेच असते.. >>>>>>>>>> हो ना. पण त्यान्च्यावर तसे संस्कार नाही ना झाले तसे. आणि दैवाच म्हणाल तर ईशा येईपर्यन्त त्यान्च दैव बलवत्तर होतच, पण आता तेच दैव त्यान्च्यावर उलटेल. शेवटी चान्गली असो किव्वा वाईट, माणसान्ना त्यान्च्या कर्माची फळे भोगावी लागतातच. ( खुप पुस्तकी बोलले का मी?)

खुद्द स्वतःच्या हाताने स्वतःच्या जीवाशी खेळ खेळतात. पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत? सनई चौघडे वाजवून गाजावाजा कशाला करायचा? मग तो गच्चीवरून खाली फेकेल नाहीतर काय आरती करेल? >>>>>>>>> अगदी अगदी आता ईशाने सगळ बघितलय स्वप्नातून, निदान तिने तरी बदला घेताना ही चूक करु नये म्हणजे झाल. हिने आता तरी डोक वापराव एवढीच अपेक्षा.

म्हटल , झेण्डे एवढ कौतुकास्पद काम केल तरीही विस त्याची कॉलर का धरतोय, नन्तर कळल प्रेमाने धरत होता. Lol >> मला तर बाई वेगळाच angle दिसायला लागला होता.. >>>>>>>>> मला तर नेहमीच दिसतो. Wink

प्रोमोत दाखवलं की गजा पाटील टेप वर काहीतरी ऐकतो आहे, त्यात राजनंदिनी त्याला सांगतेय कि उद्या पर्यंत मी पोलिसांना सगळे पुरावे देणार. हे अस सांगणारे लोक मला डोक्यावर पडलेले वाटतात. खुद्द स्वतःच्या हाताने स्वतःच्या जीवाशी खेळ खेळतात. पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत? सनई चौघडे वाजवून गाजावाजा कशाला करायचा? मग तो गच्चीवरून खाली फेकेल नाहीतर काय आरती करेल? Uhoh

म्हटल , झेण्डे एवढ कौतुकास्पद काम केल तरीही विस त्याची कॉलर का धरतोय, नन्तर कळल प्रेमाने धरत होता. Lol >> मला तर बाई वेगळाच angle दिसायला लागला होता.. Wink

पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत? >> मूर्खपणाचा कहर.. जुन्या चित्रपटांसारखे.. मैं अब पुलिस को कॉल करुन्गा..

मग तो गच्चीवरून खाली फेकेल नाहीतर काय आरती करेल?>>>>>
असं दाखवलं? बाजीगर चोरलाच शेवटी. (इथल्या काही कमेंट वर नेहमी बाजीगरचा त्या सिनचा उल्लेख यायचा, चोरलीच शेवटी आयडिया)

यापेक्षा आमचे कडे सौ. व मुली मध्ये गृहपाठाचा संवाद कईक पटीने रंगतो..! स्क्रिप्ट तेच असले तरी नविन ड्रामा अविष्कार दिसतात. >>> Lol

पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत? सनई चौघडे वाजवून गाजावाजा कशाला करायचा? मग तो गच्चीवरून खाली फेकेल नाहीतर काय आरती करेल? >>> सही Lol

तुपारे पाहवतच नाहीए आता त्यापेक्षा इकडची माबोकरांनी ओरबडून काढलेली पिसंच वाचायला आवडतात सध्या. Happy
केड्यानी हा धागा एकदा तरी तुपारे संपायच्याधी बघावा.म्हणजे त्याला कळलं तरी त्यानी तुपारे सारखी सिरेल लिहून ट्रकभर माती खाल्लीए. Wink

>>पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत?
नोबॉल..! तर्कसुसंगत प्रश्ण विचारायला मनाई आहे. Proud
खरं तर पोलिसांनीच तीला हा ऊपाय सुचवलाय असं या मालिकेत दाखवणे योग्य ठरेल.

पोलिसांकडे गुपचुप जाऊन गनिमी काव्याने काटा नाही का काढता येत? सनई चौघडे वाजवून गाजावाजा कशाला करायचा? मग तो गच्चीवरून खाली फेकेल नाहीतर काय आरती करेल? >>>>>>
असं काssssही नाही बरं!!!!
खरा उद्देश वेगळाच आहे.. बधिर राज नंदिनी ही पूर्व जन्मातील द मख्ख ईशा आहे हे प्रेक्षकांना (प्राधान्याने माबोकरांना) पटावे म्हणून हा सारा बिनडोक उपद्व्याप...
.... तुपारे खासियत लॉजिक रानोमाळ Biggrin Biggrin :

अगदीच बावळट ही नंदू.तो मारणार हे कळल्यावर कडकडून चावायच आणि धावायच ना.नाहीतर सर्जेरावांना बाहेर उभ करायच.
हे बाळ जाग झाल्याच दाखवल होत,आसा आल्यावर हिची आधीची लिंक तुटली असणार,मग झोपल्यावर पुन्हा तिथूनच कस काय आठवत हिला?
केड्या ,अजब तुझे सरकार.

स्वप्न पॉज करून जागी झाली असेल इष्या

बाय द वे इतकं लांबलचक आणि डिटेल्स भरून स्वप्न पडायला किती दिवस झोपायला लागलं असेल इष्याला..

कालच बायकोचा सशय दुर केलास ना? मग गजा भराभरा दादासाहेबान्चा फोटो कशाला हल्वेल परत सन्शय यायला? काहीही दाखवतात, बाकी नन्दु जितक्या झटकन प्रेमात पडली तवढ्या लवकर बाहेर पण आली वाटत.

मला हेच कळत नाही की बाळाला हे संपूर्ण स्वप्न आताच कसं दिसायला लागलं? लग्नाआधी फक्त पाठलागाच्या एखाद्या सीनमध्ये संपायचं.
एकुण सगळाच आनंद (बोंब वाचा ) आहे.. पात्रं, लाॅजिक, नायिका , अंधश्रद्धा पेरलेली कथा, दिग्दर्शन, एडिटींग..
शितुचा बार फुसकाच निघाला. हाईप केला फक्त. दिसायला सुसह्य पण अभिनयाची तीच व्यथा.
अजुनही सुभा हा एकमेव प्लस पाॅंइट राहिलाय.

या दोन्ही नायिकांना झेलणार्‍या 'संत' सुभा चे पायच धरायला हवे.>>>>>+११११११

>>>>>बाकी नन्दु जितक्या झटकन प्रेमात पडली तवढ्या लवकर बाहेर पण आली वाटत.>>>>>>
शिरेल संपवायची घाई झाली ना म्हणून! भावे सराना वेळ असता तर नंदुचे बालपण, हनिमून, पतंग उडवणे वगैरे बरेच काही दाखवायचा वरिजीनल बेत असावा.

शितु पडद्यावर कमी आणि टायटल साँग मध्येच जास्ती वेळ दिसली म्हणजे आजपर्यंत.

आली आली म्हणता म्हणता ढगात पण चालली.

रानं पण तेचतेच कपडे वापरते. खानदानी बिमारी लगती है! दासांचा फोटो पहिल्यांदा लावला तेंव्हा आणि आज फोटोचा इश्यु झाला तेंंव्हा तोच गडद निळा ड्रेस आहे. बहुतेक दोन्ही सीनचं शुटिंग एकापाठोपाठ केलय

करोडपती असून कपड्यात अवाजवी खर्च करत नाहीत असं बघुन सरंजामे कुटुंबाबद्दलचा आदर शतपटीने वाढला! (इथे डोळे गरागरा फिरवणारी बाहुली)

करोडपती असून कपड्यात अवाजवी खर्च करत नाहीत असं बघुन सरंजामे कुटुंबाबद्दलचा आदर शतपटीने वाढला! (इथे डोळे गरागरा फिरवणारी बाहुली)>>>> Rofl
... एक दां एक गां...
अशी अवस्था आहे बिचार्‍या मालीकेची.... सुभा चा पर्डे परवडत नसेल हो... नाहीतर कोण अशा बावळट पाट्या टाकेल...
... अर्थात प्रत्येकी एक एक नाइट ड्रेस परवडायला काहीच हरकत नाही आहे...

एक दां एक गां...>>
ह्यात नेमका अश्लील शब्द कोणता आहे Wink

अगदीच बावळट ही नंदू.तो मारणार हे कळल्यावर कडकडून चावायच आणि धावायच ना.नाहीतर सर्जेरावांना बाहेर उभ करायच. >>>>>>> सर्जेरावान्चाही काही उपयोग झाला नसता. त्याच्यासमोर जरी नन्दूला विसने मारल तरीही तो दहशतीमुळे गप्पच बसेल.

कालच बायकोचा सशय दुर केलास ना? मग गजा भराभरा दादासाहेबान्चा फोटो कशाला हल्वेल परत सन्शय यायला? >>>>>>>> त्याला वाटल असेल, हि काय आता ऑफिसात येणार नाही. पण ईशाची पुर्वज आहे ती. कधीही येते ऑफिसात सरप्राईज दयायला.

अंधश्रद्धा पेरलेली कथा, >>>>>>>>> पुनर्जन्म अन्धश्रद्दा आहे की नाही माहित नाही. मला स्वतला पुनर्जन्माबद्दलचे सिनेमे आवडतात. पण ते परातीत नन्दू दिसणे, जोगवाबाईच भविष्य सान्गणे हे मात्र टु मच होत.

करोडपती असून कपड्यात अवाजवी खर्च करत नाहीत असं बघुन सरंजामे कुटुंबाबद्दलचा आदर शतपटीने वाढला! (इथे डोळे गरागरा फिरवणारी बाहुली) >>>>>>>>>>> अगदी अगदी. उगाच नाही वीस वर्ष विस चरफडतोय, प्रॉपर्टीसाठी भाण्डतोय.

कालचा पूर्ण भाग पाहिला नाही ,पाहवलाच नाही संतापामुळे.विक्याने नंदूला मारल म्हणून नाही तर स्वप्नातून जाग झाल्यावर या मख्ख बाळाचा अभिनय का काय ते पाहून.
एवढा मोठा खून पाहिल्यावर एखादा माणूस इतका थंड प्रतिसाद देईल?
स्वत:शी बडबडत बसेल,खून पाहिला आहेस ग बाई,लग्न नाही.
त्या ईशाला आता मात्र सहन करण केवळ अशक्य
शिरियल आता संपवावी.सुभाची काल परत एकदा कीव आली.बिचारा खरच अडकला .

Pages