तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्हा सूतक नव्हते का...>>> अगदी ssss हेच मला काल बघता बघता लक्षात आलं .. गुच्छ पाठवल्यावर अगदी सुतक आठवलं .. आणि ती जोगतीण स्वतःहून म्हणाली ओटी भर .. पण त्या आधी शितू ने आणूनच ठेवलेली ओटी ची तयारी .. तेव्हा कोणालाच सुतकाची आठवण नाही !!!!???

स्ने ल म्हणते की>> स्नेल !! Lol Lol

जाळ्या नंदूला बुके पाठवतो>> हे दाखवलं का ?..
आता शितू ला खरं काय ते कळणार आणि तिने भांडं फोडू नये म्हणून विस तिचा खून करणार का ?
अजून विस वर झाडलेली गोळी झेंडे ना झेलायची आहे .. शिवाय अजून जाळ्याला जेलात पाठवायचं ना ?

बा दिग्दर्शका आणि एडिटरा , इथे तरी क्रम नीट ठेवा .. नाहीतर शितू चा खून आधी आणि नंतर शितू भेटायला जाते गुच्छ वाल्याला असं दाखवू नका म्हणजे मिळवलं !!!

@UP>>>> प्रोमो पाहिला.. खीखीखीक्ssss..
... केड्याचा नवा शोध... अष्टमीच्या रात्री पौर्णिमेचा पूर्ण गोल गरगरीत चंद्र असतो... कुठल्या ग्रहावर राहतात काय माहिती??...
अष्टमीच्या रात्री राज नंदिनी चा मृत्यू झालाय... हे आधीच स्पष्ट ठरलंय ना....
Uhoh

जाळ्या नंदूला बुके पाठवतो हे दाखवलं का ?..>>>>>>>>>> हो. जाळयाला भेटली सुद्दा. झेण्डेने ऐकल सगळ.

काल पुन्हा एकदा केडयाने घोळ केला. जालिन्दर ईशाला म्हणाला होता की, 'त्याने स्वतः हुन विसवर विश्वास ठेवून त्याला बिझनेस पार्टनरशिप दिली होती. विसने फसवल त्याला. त्याला रस्त्यावर आणल.' पण विस गजाकडे फक्त जॉब करत होता. आता जालिन्दर नन्दूला म्हणतोय की, त्या मेहता कम्पनीच्या मर्जिन्ग फ्रॉडमुळे त्याच्यावर रस्त्यावर यायची पाळी आलीये. ह्याला गजा कारणीभूत आहे वै वै. केडया आणखी काय काय विसरणार देव जाणे.

नाहीतर शितू चा खून आधी आणि नंतर शितू भेटायला जाते गुच्छ वाल्याला असं दाखवू नका म्हणजे मिळवलं !!! >>>>>> Rofl

स्ने ल म्हणते की "सूतकात फुलं कोणी पाठवली?"...
.. अरे बापरे किती हे घोर पाप असा अविर्भाव.. >>>>>>> नैतर काय? विस नन्दूला बुके देत होता ते बर चालल हिला.

स्ने ल >>>>>>> Lol

.... सुभा एक्टिंग मस्तच... तो काय विचार करतोय हे त्याच्या चेहर्‍यावर लगेचच कळून येते.. >>>>>>> अगदी अगदी काल ते टाळ्या वाजवून विस अस्वस्थता दाखवतो ते छान केल Happy

मग शेवटची २-३ मिन च भेटले का ते दोघे ? >>>>>>>> हो. जालिन्दरने दासाच्या खुनामागे गजाच असल्याच सान्गितल. पण हिचा विश्वास बसला नाही. सो, ' ह्या अमक्या माणसाला भेट. हा तुला गजाबद्दल सगळी माहिती सान्गेल.' बोलून तिच्या हातावर एक कार्ड टेकवतो. झेण्डे सगळ ऐकतो. पुभामध्ये विसला सान्गतो. नन्दू ईशाप्रमाणेच शोधकार्याला सुरुवात करते.

बादवे, फ्लॅशबॅकमध्ये जालिन्दर विसपेक्षा तरुण दिसतो.

या रविवारी महाएपिसोड आहे ८ वाजता.

हो. जाळयाला भेटली सुद्दा. झेण्डेने ऐकल सगळ.>>> हे केव्हा झालं ? काल ?? पण कालचा भाग बघितला मी... मग शेवटची २-३ मिन च भेटले का ते दोघे ? मला काय आठवत नाही मी कुठपर्यंत पाहिलं काल ... Uhoh आता आज बघते परत...
केड्याचा नवा शोध... अष्टमीच्या रात्री पौर्णिमेचा पूर्ण गोल गरगरीत चंद्र असतो... कुठल्या ग्रहावर राहतात काय माहिती??>> Rofl

प्रोमो मला दिसत नाही.. Sad जाऊदेत मालिकेत दाखवतील तेव्हा बघते... अष्टमीचा पूर्ण चंद्र बघायचं भाग्यच म्हणायला हवं आपलं !! ११८८ वर्षात असा योग्य एकदाच येतो..

तुपारे म्हणजे तुपकट चेहऱ्याच्या नायिकेच्या तुपकट फिसलू अभिनय, आणि त्यात फिसकन घसरून पडलेले,अडकलेले बिच्चारे प्रेक्षक

सुषमा ताई....मी पण तो गोल चंन्द्र पाहिला,पण केड्याने जर ठरवल की नंदूच्या मरणाच बिल विक्याच्या नावावर नाही फाडायच तर हा प्रोमो म्हणजे कदाचित नंदूच स्वप्न असू शकत ना.
केड्याला तसही आपण काय लिहितो हे माहितच नसत.

आज एक मजेशीर गोष्ट झाली. रानं च्या मनातील संशय दूर कसा केला ते विस सांगत होता झेंडे ला. तर झेंडेभाऊ ने बाळबोध पण नेमका प्रश्न विचारला की तुला कसं कळलं की तिचा संशय गेला. तिने न सांगता..
बिचारा विस गडबडून गेला. थोडी टाळाटाळ करून मग सपष्ट शब्दात वर्णन करणे आले.. हीःः
गोड दिसला विस गडबडल्यावर नि झेंडे सुद्धा उत्तर ऐकून वरमले.

भीक नको पण कुत्रं आवर असं झालय आता.. राणं खुपच बोर करतेय.. "जालिंदर साहेब तुम्ही वाट्टेल ते आरोप करताय माझ्या नवर्यावर.".हे वाक्य पण बड बड गितासारखे मऊसुत...कोणी येडा पण विक्याचे कारनामे समजून जाईल पण रान आणि स्नेल ईबाळा चेच वंशज असल्यामूळे त्याना विक्या कुटुंब वत्सल वाटतोय...

रा नं बघितल्यावर इशा चे कास्टिंग परफेक्ट झाले आहे असेच वाटते आहे. डंब फीमेल वन डंब फीमेल टू. स्नेल फीमेल जास्तीच डंब. तिकडे शनाया व तिची आई सुपर डंब. सर्व च डंबल गिरी आहे. त्यामानानी वच्छ्ही छाया शेवंता ग्रेट आहेत. अ‍ॅज कॅरेक्टरस.

वंशज की पूर्वज?..पूर्वज ... Lol भावना समजून घ्या ओ.. आपण नाही का या लोकांच्या अगणित भावना ,लॉजिक समजून घेतो तसे

अष्टमीच्या रात्री पौर्णिमेचा पूर्ण गोल गरगरीत चंद्र असतो... >>>>>
अष्टमी आहे म्हणजे आकाशात चंद्र दाखवायला हवा हे माहीत आहे हे काय कमी अहे का?

या रविवारी महाएपिसोड आहे ८ वाजता. >>>>>>
Happy आणि त्यानंतर माबोवर अपेक्षाभंगाचा महाविस्फोट?

Submitted by UP on 15 May, 2019 - 10:29 >>>>>
अगदीच कृष्णधवल काळातल्या -- अंधारातील, महालाच्या छतावरील, हिरो-व्हिलनच्या मारामारीसारखा जुना प्रकार दिसतोय. हिरो पडतो, कठडा धरून लटकतो, व्हिलन बुटाचा पाय मारून पकड सैल करायला बघतो वगैरे दावणार?

तुपकट चेहऱ्याच्या नायिकेच्या तुपकट फिसलू अभिनय >>>>>>
Sad तूप नाहीये किल्ली.... डालडाही नाही.... गोठलेले पाम तेल आहे. बोट लावून वास घेतला की कळतंय.

बिचारा जालिंदर त्याला एकच काम आहे खर काय ते सगळ्यांना सांगत राहणं आणि स्वतःच त्यांचे बोलणे खाण :फीदी:
आणि विस नंदिनी मेल्यानंतर एवढे दिवस वाट बघत बसला ईशा येईपर्यंत Proud तो तेव्हाच कुणासोबतपण लग्न करू शकत होता ना

बोट लावून वास घेतला की कळतंय.>>> हरे राम !
भीक नको पण कुत्रं आवर असं झालय आता.. राणं खुपच बोर करतेय..>> हो ना !! नैत काय !
बिचारा विस गडबडून गेला. थोडी टाळाटाळ करून मग सपष्ट शब्दात वर्णन करणे आले.. हीःः
गोड दिसला विस गडबडल्यावर नि झेंडे सुद्धा उत्तर ऐकून वरमले.>> हो मला पण आवडला तो सीन Lol
आणि विस नंदिनी मेल्यानंतर एवढे दिवस वाट बघत बसला ईशा येईपर्यंत>> त्याने मनापासून थोडी नंदिनी शी लग्न केलय.. फक्त इस्टेट मिळवण्यासाठी केलंय .. मग हळू हळू सगळ्यांचा काटा काढला .. आणि जेव्हा इशा सारखी बावळट आणि कॉन्फिडन्स नसलेली मुलगी भेटली तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि हिला गंडवणं सोप्प आहे .. हिला बायको करून घ्यायचं कॉन्फिडन्स द्यायचा , विश्वास संपादन वगैरे शिवाय हीच नंदू चा पुनर्जन्म आहे असं भासवायचं (पण योगायोगाने प्रत्यक्षात पण ती खरंच पुनर्जन्म निघाली )मग ऑपॉप आसा तिच्यानावावर प्रॉपर्टी करतील मग ती आपल्या नावावर करून घ्यायची ...

काळ त्या शिरपूरकर च घर दाखवलं त्याच्याकडे पण सेम तसलाच जादूच कपाट होत सेम तेच मॉडेल .. रंग वेगळा .. वेगळ्या दिव्याचा उजेड सोडला असणार .. वेगळ्या रंगाचा जिलेटीन पेपर वापरून .. Wink निर्मात्यांकडे सगळ्याचे २ २ ३ ३ सेट आहेत बहुतेक... Wink

एका सीन मध्ये रानं बेडवर बसते मग विस पण तिच्या शेजारी बसतो ती फ्रेम चांगली दिसली आहे. पण सर्वच प्रसंग कॉपी टू कॉपी जसे इशाबरोबर झाले तेच रानं बरोबर होत आहेत. रादर उलटे घडले आहे. दोघे किती वयस्कर दिसतात. पण अशी गजा सारखी व रानं सारखी आई साहेब सारखी माणसे असतात जगात. जालिंदर वर कोणीच विश्वास का ठेवत नाही. रानं पण इतकी काय भोळसट. तशीच ती राधिका ताई. किती गोड किती सालस परोपकारी.

तुपारे म्हणजे तुपकट चेहऱ्याच्या नायिकेच्या तुपकट फिसलू अभिनय, आणि त्यात फिसकन घसरून पडलेले,अडकलेले बिच्चारे प्रेक्षक>>>>> अरे देवा!!! ज्यांना ज्यांना तूप आवडते त्यांना खावंसं वाटू नये याची चांगली योजना आहे, किल्ली...
... हे वाक्य टंग ट्विस्टर म्हणून गा दा ला वापरायला द्या प्लीज... तेवढीच डायलॉग्ज म्हणण्या आधीची कसरत होईल बाळाची..

राज नंदिनी चा रोल संपला म्हणे!!!, तिने फक्त बारा दिवसच शूट केले आहे.. पूर्ण बातमी वाचा..
'तुला पाहते रे'मध्ये राजनंदिनीबाबत मोठं रहस्य उलगडणार!
https://www.facebook.com/179725075270/posts/10162026189845271/

राज नंदिनी चा रोल संपला म्हणे>>>तरी का होईना .. ईशा पासून थोडे दिवस मुक्तता मिळाली ... इतक्या दिवसात मालिकेला / एडिटर दिग्दर्शक /इशा या कॅरॅक्टर ला शिव्या घातल्या पण इशा ला अजिबात म्हणजे अजिबात मिस केले नाही .. उलट 'बऱ्याच दिवसात मायरा दिसली नाही' असे मात्र नक्की झाले

केड्याला तसही आपण काय लिहितो हे माहितच नसत. >>>>>>> हो ना. आता जालिन्दरला चिपळूण़़करच्या खूनासाठी अटक केली. मागे केडया म्हणत होता की त्याने बायकोचा खून केला होता म्हणून.

बिचारा विस गडबडून गेला. थोडी टाळाटाळ करून मग सपष्ट शब्दात वर्णन करणे आले.. हीःः
गोड दिसला विस गडबडल्यावर नि झेंडे सुद्धा उत्तर ऐकून वरमले. >>>>>>>>>> ++++++++++१११११११११ छान झाला तो सीन. ह्या झेन्डयाला ना सगळ डिटेलमध्ये सान्गाव लागत. उगाच नाही विस म्हणत की, ' तुला सगळ चमच्यान भरवाव लागत.'

पहिल्या खुनानन्तर झेण्डे सुन्न होतो, घाबरतो ते छान दाखवल उमेश जगतापने. Happy

राणं खुपच बोर करतेय.. >>>>>>>> कुल तुरु . ती फारच थोडया दिवसान्ची पाहुणी आहे. तोवर तिला सहन करा. नन्तर बाळाला सहन करायचच आहे.

प्रोमो पाहिला. हे दोघे कठडयावर काय करत होते? टायटॅनिक- टायटॅनिक खेळत होते का? बरोबरच आहे, कारण टायटॅनिक १९९७ ला आला होता. Biggrin

एका सीन मध्ये रानं बेडवर बसते मग विस पण तिच्या शेजारी बसतो ती फ्रेम चांगली दिसली आहे. >>>>>>>>> +++++++११११११११

आणि जेव्हा इशा सारखी बावळट आणि कॉन्फिडन्स नसलेली मुलगी भेटली तेव्हा त्याच्या मनात विचार आला कि हिला गंडवणं सोप्प आहे >>>>>>> तर मग ह्या लॉजिकने त्याने मायराशी लग्न करायला हव होत. कारण ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार असते. राजनन्दिनी असल्याच नाटक सहज वठवू शकली असती ती. तिला जर पैश्याचा लोभ असता तर ती १० वर्ष लग्न न करता थाम्बून राहिली नसती. केव्हाच गटवल असत त्याला.

शिवाय हीच नंदू चा पुनर्जन्म आहे असं भासवायचं (पण योगायोगाने प्रत्यक्षात पण ती खरंच पुनर्जन्म निघाली ) >>>>>>> पण विसला ईशाचे डायलॉग्ज ' मी कुणाच देण ठेवत नाही' ऐकून, तिच वागण, अष्टमीच्या स्वप्नान्नतर दचकण ई. बघून एकदा सुद्दा डाउट नाही आला की कशावरुन ही नन्दू नसेल? पहिल्यान्दा तिला रिक्षात बघितल तेव्हाही त्याला काहीच जाणवल नाही का? Uhoh

बिचारा जालिंदर त्याला एकच काम आहे खर काय ते सगळ्यांना सांगत राहणं आणि स्वतःच त्यांचे बोलणे खाण >>>>>>>>> नैतर काय. तो विचार करत असेल की मी कुठल्या मुहुर्तावर गजासारख्या माणसाला नोकरी दिली? खर तर त्याच चुकलच, नुसत नन्दूच्या सान्गण्यावरुन त्याने गजाला नोकरीवर ठेवायला नको होत.

आता जालिन्दरला चिपळूण़़करच्या खूनासाठी अटक केली>> असं आडनाव ए का ते ? मला वाटलं शिरपूरकर .. >>>>>> नक्की शिरपूरकर की चिपळूणकर हे मलाही कळल नाही. Lol

राज नंदिनी चा रोल संपला म्हणे!!!, तिने फक्त बारा दिवसच शूट केले आहे.. पूर्ण बातमी वाचा..
'तुला पाहते रे'मध्ये राजनंदिनीबाबत मोठं रहस्य उलगडणार! >>>>>> सम्पणारच ना, त्या शिवाय विस पुढचा प्लॅन कसा करणार? Lol

खर तर प्रोमो मध्ये विस नन्दूला मारतो हे दाखवायला नको होत. ते सस्पेन्स राहायला हव होत महाएपिसोडपर्यन्त. लोकान्ना पूर्ण सस्पेन्स जर कळला तर मग सिरियल बघायची तसदी कोण घेईल?

हो अंजली.. कूल. नाव बहुतेक शिरपूरकर आहे. पण अटकेचा सीन फारच मनोरंजक होता. सी आय डी पेक्षा. वॉरंट न दाखवता तो पोलीस सारखा "खूप पुरावे आहेत" असं आळवत होता.

खर तर प्रोमो मध्ये विस नन्दूला मारतो हे दाखवायला नको होत. ते सस्पेन्स राहायला हव होत महाएपिसोडपर्यन्त. लोकान्ना पूर्ण सस्पेन्स जर कळला तर मग सिरियल बघायची तसदी कोण घेईल? >>> अशी किती सारी सिक्रेट्स प्रोमो मध्येच दाखवली ..विसं चे करे रूप पण ..मूर्ख लोकं

त्या चिपळूण कर ला काय माहीत असतं??एपिसोड बघायची तसदी मी आता घेणार नाही..इथेच लोकांनी उत्तर देऊन उपकृत करावे

काळ त्या शिरपूरकर च घर दाखवलं त्याच्याकडे पण सेम तसलाच जादूच कपाट होत सेम तेच मॉडेल >> bingo..हा सीन काल मी बघीतला फक्त..आणि मला पण ते कपाट दिसले.. जादुच्या कापटाचि महिमा अपरम्पार

ते खून ..पुलिस .. चोरून योगायोगाने बोलणं एकणे ..कंपनी मधून दासा चा फोटो काढुन टाकणे..सगळ्यांशी अरे रावी करणे
सगळ प्रकरण एकदम 70s च्या movies सारखं..आता तर विक्या किती विनयशील दाखवला आहे..तसा दाखवुन पण हळुहळू सगळं आपल्या ताब्यात घेतो हे दाखवता आल असत..त्या झेंडे ला कस कळल की राणं जाळ्या ला भेटणार आहे ते..काहिही म्हणजे काहिही.. एवढं जर झेंडे विक्या च दैव बलवत्तर होत की केलेली प्रत्येक काळी कामं लपुन गेली तर मग त्याच दैवाने चांगली कामं केलि असती तरही यशस्वी झालेच असते.. पण असो..

पण अटकेचा सीन फारच मनोरंजक होता>> यापेक्षा चांगला झाला असता तरच नवल .. तुपारे च्या डायरेकटर कडून एवढी च अपेक्षा होती .. असं वॉरंट न दाखवता न्यायला लागले पोलीस लोकांना फरफटत .. तर बघायला नको .. काही सीन्स/म्हणणं / मतं अप्रत्यक्ष पण दाखवता येतात .. असले फालतू सीन दाखवायची गरज नसते .. पण असो एव्हढी अपॆक्षा यांच्याकडून ठेवावी इतके हे हुशार नाहीत ..
त्या चिपळूण कर ला काय माहीत असतं??>> कि गजा ने ती फाईल फाडून टाकण्या ऐवजी खोटी सही केली कॉँट्रकट वर आणि पोष्टाने पाठवल .. त्या दुसऱ्या मेहता कि कोणाला

Pages