तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं आता सर्वांनी लाइफ मधे पुढे काय करायचे ठरवले आहे? Wink मानबा पाहावी की काय? कंपन्यांचे कामकाज कसे चालते याची माहिती धूसर होत चालली आहे. पुन्हा ट्रेनिंग ची गरज आहे.

बरं आता सर्वांनी लाइफ मधे पुढे काय करायचे ठरवले आहे? >> Rofl
तुपारे संपल्यावर आयुष्यात काही रामच राहिलेला नाही असं फिलिंग आलं एकदम. Wink

हो, माझा तर टीव्हीच सुटला.साबा, मन बावरे बघतात ते कानावर पडते. आता फ्रेंडसचे रेकॉर्ड केलेले एपिसोड बघावे म्हणते.

सुलू,खास तुमच्यासाठी.तुम्ही पोस्टमध्ये हे आवडल्याच लिहिल आहे.>>>>>>>> धन्स UP गाण्याबद्दल. Happy

गादाचा नवीन व्हिडिओ:

What's In My Bag - ft. Gayatri Datar

बादवे, ह्या सिरियलचा कन्नड रिमेक आलाय झी कन्नडवर 'Jothey Jotheyalli' ह्या नावाने. झी ५ वर आहे ही सिरियल. फ्रेम टु फ्रेम कॉपी केलीये सिरियलची.

इ-बाळा चे नाटक पाहिले परवा, निम्मा शिम्मा राक्षस. शिरेलीत तरी बरं काम केलं होतं हिने...इतकं बोअर रेझ टु पावर एन केलं आहे गायत्री दातार ने Sad चिन्मय मांडलेकर (नाटकाचा दिग्दर्शक) ने जास्त स्कोप च दिला नाहिये त्या मुळे तिला Lol
महाठोकळी पुरस्कार जाहिर करायला हवा पण हिला...

किल्ले.... खरयं !! बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला Lol Lol
शिरेली चं नाव काय बरं ठेवता येइल मग ? साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अ‍ॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी Lol Lol

कन्नड रिमेक मधली हिरोईन छान आहे पण तो हिरो नाही आवडला. >>>>>> अगदी अगदी. हिरो ठोकळा वाटला. अरविन्द स्वामी हवा होता ( माझा ऑल टाईम क्रश Happy ).

बादवे तिकडे झेण्डेच नाव झेण्डेच आहे.

साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अ‍ॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी >>>>>>>> Rofl

बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला>> झी ला आयड्या देउ नका हो, खरच काढतील आणि आपल्या माथी डब्बल ठोकळेपणा सहन करण्याचं प्राक्तन लिहीलं जाइल Lol

मी घरात एक प्लान राबवला आहे, घरातल्या सीनीअर मन्डळींना तुनळी, आणि इतर अप्स (टी व्ही वर) कसे वापरायचे ह्याची सवय लावली, आता त्यांना तेच आवडतंय.. टाटा स्काय कुणी बघतही नाहीये.. पुढच्या महिन्यात फक्त नेटचा रीचार्ज अस्णार आहे. :एक आनन्दी बाहुली:

@ किल्ली, छान आयड्या आहे. तुम्हाला सगळे अपडेट्स सहजासहजी मिळतील.
भाडिपा चे "आई मी आणि GOT "सारखे होईल.

तयारी ठेवा शास्त्र असते ते. Rofl

बरं Biggrin

झीला हीच मालिका दाखवायची दुर्बुद्धी का झाली. टिपरे, असंभव, आभाळमाया यांच्या प्रिंटी जळून गेल्या काय Angry

@ किल्ली- ही मालिका पुन्हा दाखवणार आहेत म्हणे ~
कालच झी मराठीवर लिस्ट मध्ये तुपारे बघितलं...
@ चंपा~ लिस्ट मध्ये तुपारे बघून अगदी हेच मनात आलं की इतक्या चांगल्या मालिका का नाही दाखवत..

नक्षत्रांचे देणेसारखा सर्वांगसुंदर कार्यक्रम झीवर दाखवला जायचा. तो का नाही परत दाखवत? आम्ही आनंदाने बघू.
पिंपळपान नावाचीही एक छान मालिका लागायची.

पिंपळपानचे नाव मला आठवत नव्हते. त्यातही अनेक सुंदर कथा होत्या. नेहा पेंडसे, मोहन आगाशे, श्रेयस तळपदे, प्रतीक्षा लोणकर यांनी केलेली एक कथा होती. बॅरिस्टर होती. दुनियादारी चांगली होती. प्रतिमा कुलकर्णी यांनी दिग्दर्शन केलेल्या तरल मालिका होत्या. झीला भिकेचे डोहाळे लागले आहेत. चला हवा येऊ द्याचे सुरुवातीचे भाग तरी दाखवा, हजार वेळा तेच तेच दाखवण्यापेक्षा.

केदार शिंदे ची हसा चकट फू नावाची विनोदी मालिका होती. त्यातील बंड्या आणि आण्णा- पँडी कांबळे आणि भरत जाधव आणि जोडीला आतिषा नाईक, अजून लक्षात आहेत. ती संपूर्ण फॅमिलीच चकणी असते.
एकंदरीत झी मराठीला अल्फा मराठीच्या मालिकांचं वावडं आहे असं दिसतंय.

हा हिन्दीतला 'तुपारे" सेम लोकेशन, सेम कपडे. मायरा स्नेहा वाघ झालीये.

https://www.youtube.com/watch?v=_952cX2WzZU&t=54s

स्टार भारत वर लागते हि सिरियल. नवीनच सुरु झालीये चॅनलवर.

Happy थीमही सेम आहे का?

ती ईशाचे काम करणारी हीरॉइन त्या मराठी सिरीज मधल्या "शितली" सारखीच दिसते आहे. एक शुभमन गिलही दिसला Happy

ती शितली आणि तो तिचा वॉचमन वाटावा अशी देहबोली असलेला 'लाखात एक फौजी' आठवून काटा आला अंगावर..!
#लाखातचनाहीतुम्हीतरकरोडोतएक Lol

चला हवा येऊ द्याचे सुरुवातीचे भाग तरी दाखवा, हजार वेळा तेच तेच दाखवण्यापेक्षा.

Submitted by चंपा on 13 April, 2020 - 10:50 >>>

होय पूर्वी छान विनोद असायचे आता जरा जास्तच पांचट जोक्स असतात .

ती शितली आणि तो तिचा वॉचमन वाटावा अशी देहबोली असलेला 'लाखात एक फौजी' आठवून काटा आला अंगावर..!
#लाखातचनाहीतुम्हीतरकरोडोतएक Lol >>>>>>सो फनी .

किल्ले.... खरयं !! बबड्या आणि इबाळ अशी एखादी शिरेल काढा च म्हणा झी ला Lol Lol
शिरेली चं नाव काय बरं ठेवता येइल मग ? साता जल्माचा ठोकळेपणा किंवा ह.म. बने तु. म. बने अ‍ॅक्टिंग न करने के लिये असंच काही तरी Lol Lol

Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 24 September, 2019 - 06:08 >>>>> हा हा हा हा हा हा हा हा हा

थीमही सेम आहे का? >>>>>>> सिरियल बघत नाही सो थीमबद्दल माहीत नाही. पण कुठेतरी वाचले आहे आहे की हिरोचा मोठा का छोटा भाऊ रिकामटेकडा असतो, त्याला बिझीनेस साम्भाळता येत नाही . डिट्टो जयदीपसारख.

खर तर तुपारेच हिन्दी वर्जन झी हिन्दीवर आल होत, 'तेरे बिन जिया जाये ना' नावाने. छोटी सरदारनीचा हिरो त्यात विक्रान्त बनलाय. मी ह्या धाग्यावर सुचवलेली 'जुळया भावान्ची थीम' ह्या सिरियल मध्ये वापरलीये. ( विक्रान्त त्याच्या जुळया भावाला त्या खोलीमध्ये कोण्डून ठेवतो ती थीम)

https://www.zee5.com/tv-shows/details/tere-bina-jiya-jaye-na/0-6-4z525220

Pages