तुला 'का' ? 'पाहता' रे..

Submitted by किल्ली on 10 May, 2019 - 05:57

ggg.jpgतुला पाहते रे..

शितु, सुभा, गादा (गायत्री दातार उर्फ आपलं ई बाळ) आणि ह्या सीरीयल मधील समस्त महान लोकांची कामं पाहुन त्यांची मेहनत सार्थकी ठरवण्यासाठी हा धागा..

आओ ना फिर
उडाओ ना फिर

हा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
२. https://www.maayboli.com/node/68143
३. https://www.maayboli.com/node/68936

gggggg.jpghqdefault.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरुण ई आई कोण करेल?...
बाळाचे बालपण.. त्या अष्टम्या...>>>
मला वाटतंय फ्लॅशबॅकमध्ये फक्त नंदूच दाखवतील.
बाळाला स्वतःच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील की

तरुण ई आई कोण करेल?...
बाळाचे बालपण.. त्या अष्टम्या...>>>
मला वाटतंय फ्लॅशबॅकमध्ये फक्त नंदूच दाखवतील.
बाळाला स्वतःच्या लहानपणीच्या गोष्टी आठवत असतील की

जरी बाळाच बालपण दाखवायचा बिनडोकंपणा केड्यानं केलाच तर पुष्पा भोपळ्यासारखी जाड असेल कि चवळीसारखी बारिक? Wink

दासा ढग प्रस्थान एपि १ व २ पाहिले. पहिला नेहमीसारखाच आचरट....
दुसर्‍यासाठी कोणी गेस्ट डायरेक्टर आला होता/ती का? बर्‍यापैकी सुसह्य होता ब्याद स्क्रीनवर येईपर्यंत.

आज त्या बाळाला नेमक काय एक्स्प्रेशन द्यायच होत कुणाला कळल का? >>>>>
कोणालाही नाही कळला
अर्थ काय ज्याचा
ऐसा अभिनय ई श्या चा
Happy ज्यांना एक्स्प्रेशन दिलं त्या आसानांही नाही कळलं. अशी काय बघतेस माझ्याकडे विचारलं बिचार्‍यांनी !!
त्या म्हणतायत भरपूर पाणी पी.... कशाला कोण जाणे.... तर ओठ ओले करून ग्लास परत दिला.
पाण्याची लेवल जैसे थे...आधी दिलाच अर्धा ग्लास होता.....जे दिलंय ते तरी घटघट पी.... संवादाला रिस्पॉन्स म्हणून.

आज त्या बाळाला नेमक काय एक्स्प्रेशन द्यायच होत कुणाला कळल का?
कारण आज तिचा आधीपेक्षा जास्त मख्ख चेहरा होता.>>>>>>>अग्दि बरोबर.
बहुदा, डायलॉग विसरली का एक्सप्रेशनच विसरली ???
जाम मठ्ठ वाटली, असं ऐकलं होता कि ह्या नाईका स्वतः मालिका बघत नाहीत. ईबाळाने जर स्वतःचा अभिनय बघितला तर तिला कळेल कि 'ती' किती वाईट एक्सप्रेशन देते.

इशाला स्पेशल अभिनय सांगण्यापेक्षा बथ्थड लुक्स दे असं सांगणं सोपं असेल. आता गुंडाळागुंडाळीत नको तो अभिनय अन् नकोच ते संवाद झालं असेल त्या टीमला.

हुश्श, सापडला शेवटी धागा. टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. धन्स किल्लीताई. ईशाने देवघरे चाळ शोधताना जेवढी मेहनत केली नसेल तेवढी मला हा धागा शोधताना करावी लागली. Lol

सो, आईसाहेबान्नी चुकून औषध दिल होत तर.

विस नन्दूला दासाच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टबद्दल सान्गत होता तेव्हा वाटल हा आता तिला आसाविरुद्द भडकावतोय की काय!

गप्पी मासे पाळा, डासांना पळवून लावा >>>>>>>>> Rofl

आता गुंडाळागुंडाळीत नको तो अभिनय अन् नकोच ते संवाद झालं असेल त्या टीमला. >>>>>>>>>>> विसला धडा शिकवायची वेळ येईल तेव्हा हि मुलगी काय करेल ह्याची आता भीती वाटायला लागली आहे.

नविन प्रोमो तर कहर आहे.. जयडु मोठा झालाय.. बाकी लोकं तशीच. पुन्हा वय विसरू एकवेळ पण जयडु रान गेली तेंव्हा लहान होता असं दाखवून झालय ना .. आता मोठा झाला एकदमच?

आणि तो प्रोपर्टीचा क्लॅाज झेंडेला माहित नव्हता असं वर्तमानात दाखवून भूतकाळात त्याला ते गजा सांगतोय असं दाखवतात.. केड्या .. काही तरी लाज ठेव की आपण कामाचा (पाट्या टाकायचा) मोबदला घेतोय.

नविन प्रोमो तर कहर आहे.. जयडु मोठा झालाय.. बाकी लोकं तशीच>>>>> हसावं की केड्याला, डायरेक्टरला बुकलून काढावे... निर्बुद्ध पणाचा कळस आहे...
आता जर या मालिकेतील कोणालाही कसलेही अवॉर्ड मिळाले तर खरच धरून मारतील लोक्स...
झोपेत शूट, एडिट करतात... बघत पण नाहीत...
जितक्या पानांची स्क्रिप्ट केड्यानी लिहिली असेल त्यापेक्षा जास्त पानं आपण काढलेल्या चुकांची असतील..
संताप, चिडचिड, Angry Angry Angry

नविन प्रोमो तर कहर आहे.. जयडु मोठा झालाय.. बाकी लोकं तशीच. .......आता मोठा झाला एकदमच? >>>>>>.
तुम्ही कोणीच तो सीन नाही का पाहिला?
या जन्मात क्रिकेट खेळतात तसे त्या जन्मात संत्रं लिंबू पैशापैशाला खेळतात सगळे तो....?
आसा, रानं, सर्जेराव एकीकडे आणि विस, झेंडे, जयडू दुसरीकडे.
खेचाखेचीत जयडूचा तोल जातो आणि विसच्या हातात पाय येतात. तरी खेचाखेची चालूच.
मग तो ताणलेला जयडू पूर्वीसारखा करायचे खूप प्रयत्न करतात. पण होत नाही.
मग काही तांत्रिक मर्यांदांमुळे आम्ही दिलगीर आहोत, प्रेक्षकांनी सहकार्य करावे अशी पाटी येते व सूर्योदय होतो.
मग जयडू मोठाच दिसतो.

सो, आईसाहेबान्नी चुकून औषध दिल होत तर >>>>> सुलू, त्यांनी बरोबरच दिले होते नेहमीसारखे. पण औषध बदलून दुसरे काही ठेवले होते विस-झेंडेनी सर्जेरावाच्या मदतीने. ते दिले गेले इमर्जन्सीमुळे लक्षात न येता.

सर्वोत्कृष्ट पदार्पण-अभिनेत्रीचे पारितोषिक नक्क्क्की आहे सुषमा ताई. लिहून ठेवा.

अंजली_कूल संप्लवित झालात का राग अनावर होऊन?

मग काही तांत्रिक मर्यांदांमुळे आम्ही दिलगीर आहोत, प्रेक्षकांनी सहकार्य करावे अशी पाटी येते व सूर्योदय होतो.
मग जयडू मोठाच दिसतो.>>>>पण अहो हे तुपारेच्या स्टॅंडर्ड साठी फारच लाॅजिकल झालं.. त्यानुसार तांत्रिक अडचणीची पाटीच ५०% वेळ बघितली असती ना आपण.

तो प्रोपर्टीचा क्लॅाज झेंडेला माहित नव्हता असं वर्तमानात दाखवून भूतकाळात त्याला ते गजा सांगतोय असं दाखवतात.. केड्या .. काही तरी लाज ठेव की आपण कामाचा (पाट्या टाकायचा) मोबदला घेतोय>>>नै तर काय..... आजही ती मुळूमुळू स्नेल
बाई आणि लाडे लाडे बोलणारी बिनडोक सो कॉल्ड यशस्वी उद्योजिका ऐकून, बघून चरफडण्या पलीकडे काsssही करू शकले नाही.. म्हणून हा त्रागा

अंजली_कूल संप्लवित झालात का राग अनावर होऊन?>>> हळू हळू सगळ्यांचंच असं होऊ शकतं....
डोकी गहाण ठेऊन कामं करणार्‍या लोकांना आपल्या चिडचिडीने काही फरक पडत नाही हे माहित असूनही
रागच येतो...
कितीही कानाडोळा केला तरी कधीतरी व्यक्त व्हायला हवं ना... सध्या या धाग्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही ठिकाण नाहिये..

गाण्यात नंदु पुसटशी दिसायला लागलीए का?
Uhoh
कुणाला दिसलं नसलं.,तर तेपण सांगा.नायतर डाकटर गाठयला हवा मला.हि सिरेल बघुन तर आता तेच वाटायला लागलंय.
कंटाळलेली पिंजरल्या केसांची बाहुली.

हो झाला बहुतेक..... या धाग्यालाच नाही इतरत्रही काय काय कधी दिसत होतं / कधी नव्हतं. आता ठीक आहे.

आहे मी आहे .. माबो वर यायला जमले नव्हते २ दिवस...
कालचा भाग कसा बसा (कडू कारल्याच्या भाजीसारखा )गिळला .. आय मिन पळवत पळवत पहिला ... शेवटचे ५ मिनिट पहिलाच नाही .. जेव्हा राजनंदिनी सांगते मी माझी प्रॉपर्टी आईसाहेब आणि जैडू च्या नावावर केली तिथून पुढे नाही पाहिलं ... एकतर महा ssss बोर करत आहेत ... आणि ते बॅकस्लॅश मधे दाखवतायत त्याचा तो फिक्कट फिक्कट कलर बघून बघून जीव कंटाळला माझा ..
डोकी गहाण ठेऊन कामं करणार्‍या लोकांना आपल्या चिडचिडीने काही फरक पडत नाही हे माहित असूनही
रागच येतो...>> तेच होतंय माझं ...
हसावं की केड्याला, डायरेक्टरला बुकलून काढावे...>> कधी जाताय तेवढं सांगा... बांधायला दोरी आणि मारायला हॉकी ची स्टिक आणते सोबत
गप्पी मासे पाळा, डासांना पळवून लावा>>> Biggrin शी !!

कारण आज तिचा आधीपेक्षा जास्त मख्ख चेहरा होता>> हो अगदीच.. मख्ख आणि मंद / त्याही खाली जाऊन मंद्र .. (मंद्र सप्तकाचा अपमान होईल .. तो हि चांगला वाटतो लाखपटीने .. पण तरी )

एकंदरीत काय Angry Angry Angry चिडचिड :शिव्या: :शिव्या: :फुल्या: :फुल्या:

सो, आईसाहेबान्नी चुकून औषध दिल होत तर. >> पण झेन्डेनी ते बदललं होतं अगोदरचसुलू, त्यांनी बरोबरच दिले होते नेहमीसारखे. पण औषध बदलून दुसरे काही ठेवले होते विस-झेंडेनी सर्जेरावाच्या मदतीने. ते दिले गेले इमर्जन्सीमुळे लक्षात न येता. >>>>>>>>>>> ते मी नन्तर लिहिणारच होते, पण सम्पादनाची वेळच सम्पली. त्यात पुन्हा कालचा टेक्निकला प्रॉब्लेम होता.

गाण्यात नंदु पुसटशी दिसायला लागलीए का? >>>>>>> हो मन्या, मला दिसली.

सर्वोत्कृष्ट पदार्पण-अभिनेत्रीचे पारितोषिक नक्क्क्की आहे सुषमा ताई. >>>>>>>>>> काहीही हा, कारवी. मेबी ते खरही होईल. मागच्यावेळी गवरीला मिळाल होत.

जर या सिरियलसाठी कुणाला अवॉर्ड दयायच असेल तर खालील प्रमाणे देता येईलः

आर्या आम्बेकर: सर्वोत्कृष्ट गायिका

अशोक पत्की: सर्वोत्कृष्ट सन्गीतकार

सर्वोत्कृष्ट शीर्षक गीतः ज्याने कोणी लिहिले असेल तो/ ती

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार: जो कोणी असेल तो/ ती

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रुपाली (नाव माहित नाही)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: उमेश जगताप

आणि .............. सुबोध भावे: सर्वोत्कृष्ट खलनायक

बादवे तो बुके कोणी दिला नन्दूला पुभामध्ये? मला तो जालिन्दरने दिल्यासारखा वाटतो, नोटवरुन.

नन्दूच मन जिन्कून विसला प्रॉपर्टी थोडीच मिळणार आहे?

'खाली डोक वर पाय' ची अ‍ॅड करायला आलेली ईशा काल बारीक वाटत होती. आवाज सुद्दा बदललेला वाटला. डबिन्ग होत का ते? Uhoh

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रुपाली (नाव माहित नाही)>> बहुतेक सोनल पवार आहे नाव तिचं . हिला मिळायलाच हवा खरंच पुरस्कार .. आणि पुढे कामं पण मिळूदेत चांगली चांगली ..
अवांतर : कलर्स मराठीवर एक मालिका लागते जीव झाला इडापीसा नावाची त्यातली नायिका इतकी आवडते मला.. नवीन आहे बहुतेक पण नाव नाही माहित कुणाला माहित असलं तर सांगा ना .. खूप छान ऍक्टिंग अगदी बोलके आहेत डोळे .. आणि एकंदरीतच हावभाव...
नाहीतर इथे .. नायिकेच्या चेहऱ्याचे हावभाव बघता स्थितप्रज्ञ दगड बरा असं म्हणायची वेळ आलीये ..

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: रुपाली (नाव माहित नाही)>> बहुतेक सोनल पवार आहे नाव तिचं . हिला मिळायलाच हवा खरंच पुरस्कार .. आणि पुढे कामं पण मिळूदेत चांगली चांगली .. >>>>>>>>> ++++++++++१११११११११११

अवांतर : कलर्स मराठीवर एक मालिका लागते जीव झाला इडापीसा नावाची त्यातली नायिका इतकी आवडते मला.. नवीन आहे बहुतेक पण नाव नाही माहित कुणाला माहित असलं तर सांगा ना .. खूप छान ऍक्टिंग अगदी बोलके आहेत डोळे .. आणि एकंदरीतच हावभाव...
नाहीतर इथे .. नायिकेच्या चेहऱ्याचे हावभाव बघता स्थितप्रज्ञ दगड बरा असं म्हणायची वेळ आलीये ..

नवीन Submitted by anjali_kool on 14 May, 2019 - 08:50 >>>>
हो अंजली कूल , मस्त आहे ती. नवीन असून छान ऍक्टिंग करते. फीचर्स छान आहेत तिचे.
मालिकाही छान आहे. या सिरीयल मध्ये झीच्या इतर मालिकेतील कलाकार मिळतील ती अज्याची मामी, आपले मोजो आणि ते सिद्धी (नायिकेचे मालिकेतील नाव) चे वडील सुद्धा छान ऍक्टिंग करतात.

..
अवांतर : कलर्स मराठीवर एक मालिका लागते जीव झाला इडापीसा नावाची त्यातली नायिका इतकी आवडते मला.. नवीन आहे बहुतेक पण नाव नाही माहित कुणाला माहित असलं तर >>>>> विदुला चौगुले....कोल्हापूरची आहे..हुशार आहे.. खूप गोड आहे... जस्ट 10 वी किंवा 12 वी झालीय... पण परीक्षा दिली नाही.. आता रिपीट जुलै/ऑगस्ट मध्ये देईल.. या मालिकेत माझ्या एका नातेवाईक ने छोटेसे काम केलंय... सांगलीत शूटींग सुरू आहे.. म्हणून मला माहितीय...बरेचसे कलाकार स्थानिक आहेत
अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे..

विदुला चौगुले>> हमम आत्ताच पाहिलं नाव गुगलून !
जस्ट 10 वी किंवा 12 वी झालीय>> बापरे ! बरीच लहान आहे की !! चांगली आहे पण पर्सनॅलिटी .. उंच आहे !
आता लोकं मला मारायला धावतील त्या आधी अवांतर आवरते Lol
या मालिकेत माझ्या एका नातेवाईक ने छोटेसे काम केलंय>> अरे वा !

कोणी लक्ष देऊन पाहिलं आहे का ? हल्ली शीर्षक गीतात शितु चा चेहरा क्लीअर दिसायला लागला आहे. पूर्वी धूसर दिसायचा.

काही सीन्स हहपुवा होते.....
जाळ्या नंदूला बुके पाठवतो...
स्ने ल म्हणते की "सूतकात फुलं कोणी पाठवली?"...
.. अरे बापरे किती हे घोर पाप असा अविर्भाव..

या संवादा आधीच्या सीनमध्ये नंदूडी देवी अंबाबाईची ओटी भरते... स्पर्श करते.. तेव्हा सूतक नव्हते का...
... पाठोपाठचे सीन तरी नीट पहा रे...
.... ती वर्तमानातील जोगतीण छोटी असताना शि तु ची मुलगी शोभते.. कै च्या कै कास्टींग
.... सुभा एक्टिंग मस्तच... तो काय विचार करतोय हे त्याच्या चेहर्‍यावर लगेचच कळून येते...

Pages