तुला पाहते रे.. (कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

Submitted by किल्ली on 31 January, 2019 - 06:45

तुला पाहते रे..
(कधीपासूनच आणि का पाहते रे.. )

कोणी (मालिकेला, सुभाला, केड्याला) कितीही नाव ठेवली तरी ही मालिका पाहून तिची पिसे काढणं हे काम माबोकर करणारच!

हा तिसरा धागा , पिसं काढणार्‍यांना समर्पित!!!

पिसं काढते रे ...
होउन जाऊ दे रे!!!

ह्या आधीची चर्चा इथे आहे:
https://www.maayboli.com/node/68143

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

योग.. अत्यंत कहर..
जयदीप यापूर्वी देखील अशा भयानक कल्पना राबवत असे ना.. मग आत्ताच आईसाहेब ईशाला का झापत होत्या

खूप मिटींगा झाल्या. मस्त झाल्या म्हणजे काय?
Submitted by मेधावि on 15 February, 2019 - 21:25 >>>> म्हणजे,
१. क्लाएंटने सरंजामेंच्या कंपनीबरोबर धंदा बंद करण्याचा निर्णय घेतला नाही
२. क्लाएंटचे सदस्य केस उपटत, वाटेत खळ्ळ-खॅटॅक करत काचेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडले नाहीत
३. जयदीप मार न खाता सगळे कपडे + हाडे सुरक्षित ठेवून मीटिंग रूम / केबिन मधून बाहेर पडू शकला
४. आम्हाला किमान पातळीचे सामान्य ज्ञान आणि ओंजळभर अक्कल असलेला माणूस एकदा तरी मीटिंगसाठी द्या ही मागणी घेऊन वि सं यांच्या केबिनवर आलेला मोर्चा थोपवायला सिक्युरिटी बोलवावी लागली नाही
५. यापैकी सर्व घडले

गायत्री दातारला आत सहन करण खरच अशक्य आहे.आजतर काय तो ड्रेस होता.अनारकली टाईप असताना चुडीदार ऑर लेगिन्स एवजी प्लाझो.गबाळी दिसत होती आणि चेहर्यावर मख्ख भाव.बाई,नीट रड तरी,पसर भोकाड हव तर
तरी अजून लाजली नाही.कदाचित उद्या ऑफिसमध्ये लाजायच असेल.
मायराचा रोल अजूनही कळत नाही.

खंडेलवाल कंस्ट्रक्शन आहे ना? मग राजनंदिनी साड्यांच्या बिजनेसशी याचा काय संबंध?
अमुकतमुक ग्रुप्स ऑफ ईंडस्ट्रीज हा काय प्रकार असतो ? वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग का? मग इकडे राजनंदिनी साडी व्यतिरिक्त कसलीच कामं होताना दिसत नाहीत.

मिटींगा करणं म्हणजे रेव्हेन्यु आणणं वाटलं की काय त्या तुझ्या सरंजाम्याला. Happy (जळ्ळं मेल्याचं लक्षण, लग्न म्हणजे काय शिणिमा वाटला काय त्या तुझ्या गोणेश्वराला च्या चालीवर)

अमुकतमुक ग्रुप्स ऑफ ईंडस्ट्रीज हा काय प्रकार असतो ? वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग का? >>> हो साधारण तसेच. त्यात काही गोची नाही. तेथे तो एक बॅनरही असतो ना नेहमी - कार्स, पाइप्स वगैरे दाखवणारा?

मात्र गोची ही आहे, की अशा ग्रूप ऑफ कंपनीज च्या हेड ऑफिस मधे त्या त्या कंपन्यांच्या बिझिनेस ची इतकी डीटेल चर्चा, त्यातील डीलर्स वगैरेंबरोबर मीटिंग्ज वगैरे सहसा होत नाही. हेड ऑफिस ला सहसा खूप हाय लेव्हल काम चालते. हाय लेव्हल म्हणजे काहीतरी भारी अशा अर्थाने नव्हे - तर सर्व कंपन्यांबद्दल एकत्रित रीत्या घेतले जाणारे निर्णय, एखादी कंपनी जर नीट चालत नसेल तर काय करायचे याची चर्चा वगैरे. यात दाखवतात त्यावरून ही ४०-५० लोक असलेली एक छोटी कंपनी वाटते.

पूर्वी एकदा ईशा बरोबर विक्या एका फॅक्टरीत गेलेला दाखवला होता. तो एपिसोड थोडासाच पाहिला होता. त्यामुळे माहीत नाही कसली फॅक्टरी होती ती.

बहुधा मी पाहिलेला पहिलाच भाग असेल. तेथून परततानाच बहुतेक ईशा सरांच्या खांद्यावर डोके ठेवून डुलक्या मारत होती. तेव्हा हे प्रकरण काही वेगळेच आहे व रोज बघायला हवे असेल लक्षात आले Happy

बहुधा मी पाहिलेला पहिलाच भाग असेल. तेथून परततानाच बहुतेक ईशा सरांणच्या खांद्यावर डोके ठेवून डुलक्या मारत होती>> ह्या अवघ्या सीनचे सोने केले कणेकरांनी. Happy

गायत्री दातारला आत सहन करण खरच अशक्य आहे.आजतर काय तो ड्रेस होता.अनारकली टाईप असताना चुडीदार ऑर लेगिन्स एवजी प्लाझो.गबाळी दिसत होती >>>>>> बरेच वेळा घातलाय हा ड्रेस,

गायत्री दातारला आत सहन करण खरच अशक्य आहे.आजतर काय तो ड्रेस होता.अनारकली टाईप असताना चुडीदार ऑर लेगिन्स एवजी प्लाझो.गबाळी दिसत होती >>>>
अगदी यक्क झाले बघून !!!

>> बरेच वेळा घातलाय हा ड्रेस,
टॉप हाच असतो पण लेगिन्स आणि वेगवेगळ्या ओढण्या असतात .आजचा प्लाझो मधला अवतार तर भिकार कपडेपटाची परिसीमा होती. एवढी मोठी सिरिअल आणि या रिपीटेटिव्ह टॉप बद्दल खरंच गम्मत वाटतेय .

सुबोधचा जुना लुक परत आणत आहेत असं वाटतंय. पांढरी दाढी वाढवायला घेतलेली दिसते. बायाबापड्या खूष होत्या जुन्या केशभूषेवर.

गायत्री दातारला आत सहन करण खरच अशक्य आहे.आजतर काय तो ड्रेस होता.अनारकली टाईप असताना चुडीदार ऑर लेगिन्स एवजी प्लाझो.गबाळी दिसत होती
<<हो ना..काहीतरीच वाटत होतं ते..तिला नीट अभिनय जमत नाही तर कमीतकमी कपडे तरी चांगले द्यायला हवेत म्हणजे आपल्या बापड्यांच्या डोळ्याला तेवढच बर वाटल.. आणि एवढ्या मोठ्या उद्योगपतींनी बायको आहे आणि तेचतेच dresses घालते..
market मध्ये तुला पाहते रे pattern चा ड्रेस आलाय म्हणे Lol म्हटल नको रे बाबा तेव्हा मला तुमच्या सगळ्यांची आठवण आली Happy

ईशाला मिळालेली सर्वात मोठी दाद, किंवा घरचा आहेर. लग्न झाल्यावर काही दिवसांतच सर्वात "हॅप्पी पीरियड" विचारल्यावर विक्या "सध्या" न म्हणता "बाळपणीचा काळ सुखाचा" म्हणतोय.

त्या घोटाळ्यात चूक ईशाची हे जगातील कोणत्या लॉजिक ने लागू होते कोणास ठाउक. ईशाचीही अडचण आपण समजू शकतो. घरातली सगळी सिक्रेट्स जेव्हा प्रेक्षकांना सांगायची आहेत तेव्हाच ती तिला कळणार आहेत.

जयदीपबाबतही सरंजामे कंपनी ला आपण कसा दोष देणार? कारण त्यांच्याकडे दोनच पर्याय असतातः एकतर त्याला घरीच बसवायचे, किंवा ऑफिसात बोलावून सर्वाधिकार द्यायचे. काही ठराविक मर्यादित रोल देउन ऑफिसमधे काम करणे हा प्रकार या कंपनीत केला जात नाही.

आईसाहेब इतक्या चिडल्यात की "दे माझी इस्टेट परत!" असे म्हणतात की काय असे वाटले. पण ती अजून दिलेलीच नाही.

'मीटिंग' या प्रकाराचे गुपित थोडे लक्षात आले. हे लोक स्वयंपाक करतात तशा मीटिंग्ज करतात. काल जयदीप ने दोन मीटिंग्ज "उत्तम केल्या"

ईशाबै ऑफिस मधे आल्यात. तेव्हा पुन्हा एकदा होउन जाउ दे प्रेझेण्टेशन्स! मात्र झेण्डेला आणि प्रेक्षकांना सरप्राइज द्यायचे म्हणून एकाच घरातून सकाळी निघून ऑफिस मधे येणार असले तरी सरांना आधी जाउ देउन मग नंतर आलेली दिसते. पण सरप्राइज थेट विक्याच्या केबिन मधे आल्याने ऑफिसच्या मेन एण्ट्रन्स मधून येणे, मग मायरा पासून ते नवीन चम्या/चमी लोकांनी अचंब्याने पाहणे, स्लो मो वॉक, परांजप्यांचे कौतुकमिश्रीत हास्य वगैरे पाच मिनीटे चालणारा सोहळा मिस केला आपण.

तो ड्रेस कायच्या काय होता खरच.....

सुबोध जुना लुक परत आणत आहेत असं वाटतंय. >>>>>> हो.... लास्ट सिन मध्ये. जुना विक्रांत दिसला....... तिच किलर स्माईल...

कौतुकसोहळा होणार आहे आज, सगळे ठरल्य्प्रमाणे विविध भाव दाखवून मग टाळ्या पिटणार आहेत. दुपारची ट्रेनला गर्दी कमी असते म्हणून ईशा मागाहून आली असेल. आता ती ईस्टेट विक्याला मिळेपर्यंत फक्त प्रेझेंटेशन्स.

What ? Isha in "kamit kami kapde
Biggrin तिला अभिनय नीट जमत नाही कमीतकमी, कपडे तरी चांगले द्यायला हवेत अस हवं होतं.. छान निरीक्षण दिपंजली Happy

ओव्हरऑल हा एपिसोड इतका टुकार नव्हता. ईशाचे प्रयत्न बाळबोध असले तरी तिच्या कॅरेक्टरला अनुसरून आहेत. एक दोन सीन्स मधे थोडा स्पार्कही दिसला. सुरूवातीच्या सीन मधे ईशाचे चिमखडे बोल ऐकून झेण्डेकडे बघून हसणारा विक्या - त्याला जरा अभिनय करायला चान्स मिळाला. कारण ते हसणे वरकरणी ईशाच्या बोलण्याला पसंती दाखवणारे होते, तर झेण्डेच्या बाजूने पाहता 'बघ कसे मी म्हणत होतो तसेच झाले' असे दाखवणारे.

अर्थात तेवढाच स्पार्क. बाकी कार्यालयीन कामकाज म्हंटल्यावर येणारी मजा व मसाला होताचः-

ईशा आज ऑफिसला आली हे ती सरांच्या केबिन मधून बाहेर आल्यावरच लोकांना कळालेले दिसते. ती आत अचानक अवतरली होती की काय कोणास ठाउक? तो कालचा राहिलेला सोहळा आज होतोय बहुधा. हे ऑफिसही वेगळे दिसते आधीपेक्षा.

मायराला नवीन कोणत्या कारणाने राग-आश्चर्य व्यक्त करावे कळत नव्हते. कारण सरांना ईशाने पटवले. नंतर तीच कंपनी चालवणार हे सरच म्हंटले. हे सगळे आधीच होउन गेले. त्यामुळे आज ती ऑफिस मधे आल्याने काय वेगळे झाले माहीत नाही. पण ईशा समोर असली की मायराने एक रागीट चेहरा करायचा (व घरी सॉन्याने तो तुसडा चेहरा करायचा) हा सिरीज चा बेसिक रूल आहे. प्रसंग रिलेव्हंट असो वा नसो.

"ईशा आता तिच्या केबिन मधे बसून पुढचे काम करायला सुरूवात करेल" - आता विक्या रनिंग कॉमेण्टरी करणार की काय तिच्या हालचालींची? "आता ईशा पाणी प्यायला कॅफेटेरियात जाईल", "आता ईशा लाजेल" वगैरे वगैरे?

परांजपे म्हणतायत इतक्या लहान वयात इतकी उडी घेतली आहेस. कधी? विक्यानेच तिला धरून बसवले होते ना राजनंदिनी साडी विभागावर? नंतर काही नवीन उडी वगैरे मारली का ईशाने? लग्नाची रजा संपल्यावर परत जॉइन होणे हीच ती उडी का? बहुधा 'सतत अ‍ॅप्रूव्हिंग चेहरा करून आशीर्वादपूर्वक बोलायचे" ही परांजप्यांची गाइडलाइन दिसते. मग हे लोक स्वतःच कल्पना करून संवाद म्हणत असावेत.

सीईओ च्या बायकोला ऑफिसमधे आत्मविश्वास मिळवून देण्याकरता उत्तम उपाय म्हणजे सीईओ ने तिला हाताला धरून ऑफिसभर फिरवणे.

नशीब सरांना त्या खुर्चीत बसायला सांगण्याचे कारण आदर वगैरे आहे. मला वाटले ही त्यांच्या पायाशी बसणार की काय? एकूण वागणे तसेच आहे. (वास्तविक खरे कारण एसी मधे खुर्चीचे लेदर खूप गार पडते. मग त्यावर ४-५ मिनीटे कोणी बसले की नंतर बसणार्‍याला बरे पडते - हेच असावे Happy )

एकेक सीन आणखी स्लो होउ लागला आहे. संवाद म्हणून झाले, प्रेक्षकांवरचा इम्पॅक्ट ओसरला. "अरे समजले आम्हाला तुमचे कौतुक. पुढे चला" असे आपण म्हंटलो तरी हे लोक त्याच सीन मधे रेंगाळत एकमेकांकडे बघत बसतात. गाण्यांमधे, कथांमधे एक "ठहराव" असतो असे वेळीअवेळी आपण वाचतो. तो हाच असावा.

मिहीर चा राजीनामा मागे घेणे प्रकरण भर ऑफिसात चालले आहे. ते ईशा अनुभवी नसल्यामुळे असेल असे म्हणून सोडून देउ. पण वाडकर, परांजपे वगैरेंना उद्योग नाहीत काय? चर्चा सुरू झाली, तर आले ऐकायला. अरे बोर्ड मीटिंग मधे उपस्थित राहणारे, थेट सीईओ ला अ‍ॅन्युअल रिपोर्ट देणारे सीनीयर मेम्बर ना तुम्ही? असे ऑफिसमधली रॅण्डम चर्चा ऐकायला रस्त्यावरच्या पब्लिक सारखे येउन उभे राहता?

लोकहो, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद... तु पा रे पाहिल्यानंतर होणार्‍या डोकेदुखी वरची जालीम मात्रा माबो करांचे तुफान प्रतिसाद...
आपले प्रतिसाद वाचूनच लवकरच गा दा अर्थात् सर्वाची लाडकी ई बाळ मालिकेतून गायब होण्याची शक्यता आहे... कारण विसं चा फ्लॅश बॅक track सुरू झाल्यावर इशू बेबी शि तु मध्ये convert करतील... हा फ्लॅशबॅक track संपायला केड्याच्या बुद्धी प्रमाणे वर्षानुवर्ष जातील... मग नंतर वर्तमान काळातील आपली ईशा एकतर सुधारित आवृत्ती असेल किंवा बदललेली असेल... कदाचित् तोपर्यंत आपण मालिका बघणे सोडून दिलेले असेल.. किमान पिसं तरी संपली असतील..

विक्यानं खुर्चीवर बसून केबिनचं उद्घाटन केलं तेव्हा अगदी हेच्च वाटलं. Wink
अशा रितीनं उद्या सुलभ चं उद्घाटन कसं केलं जाईल ह्या कल्पनेनी मौज वाटली. Happy

फारएंड इतकी भारी नाही पण मला पण पुढची कथा सुचली आहे....
आता चालू असलेल्या सुभाच्या कारस्थानी कारवायांना घरची भोळी भाबडी जनता.. (सॉन्या सोडून) बळी जाईल आणि सर्व संपत्ती वि सं कडे येईल... सगळे ईशा सकट बेघर होतील आणि त्यांना चाळीत कडू निमकर आसरा देतील... मग नाश्त्यासाठी पोळीचा लाडू बनवताना आईसाहेब राज नंदिनी पुराण सांगायला सुरुवात करतील... पण तेवढ्यात ती देवी वाली बाई येईल आणि हितच हाssय तीsss, असे काहीतरी अगम्य बोलेल... मग पुढची कहाणी ईशा आपोआपच सांगेल, त्या आधी सु भा चा मी बीमोड करेन अशी शपथ घेईल ...मग शि तु एंट्री... नवीन ट्रॅक चालू....

फार एंड. तुफान पोस्टी. आत्ताच एका भल्या मोठ्या टीम बरोबर फुकेत वारी करून आले. त्यातही मुलुंड ठाणे कळवा पब्लिक तुपारे फॅन आहेत. तर लिहायचे कारण की बाहेर रीसीव्ह करणारे असतात त्यात वोर्सेस्टरशायर क्रिकेट व्हेटरन्स ग्रूप ला रिसीव्ह करायला एक माणूस बोर्ड घेउन उभा होता. ते बघुन तुमची आठवण आली.

आमचे बॉस टीम बरोबरच आले गो एअरला नावाचा बिझनेस क्लास आहे. फक्त पुढची जागा एव्ढेच. व सरांच्याच रो मध्ये एक बाळ कायम रडत बसले होते चार तासाची फ्लाइट. उतरलो स्वतःची ब्याग घेउन सर गेले सुद्धा. नो हँग अप्स. नाहीतर विक्या. प्रॉड्क्ट नॉलेज नाही पान खाउ थापाड्या निव्वळ. कॉर्पोरेट लाइफ बद्दल झीवाले जनमानसात गैरसमज पसरवत आहेत. नो डाउट.

मिहीर चा राजीनामा मागे घेणे प्रकरण भर ऑफिसात चालले आहे. >>>>>>>> तो मिहीर मायराला म्हणत होता, "मला काय वाटत मॅम" वाटल, आता अस बोलतोय की काय, " मी विसची बायको असायला हवे होते."

Pages