Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्ही माझ्यात काय पाहिल? असे
तुम्ही माझ्यात काय पाहिल? असे हो काय करता सर?>> ह्या प्रश्नाचं उत्तर भारी होतं. "काय आवडलं ते सांगता येणार नाही ( कठीणच आहे ते सांगणं) पण ओढला गेलो हे खरं. "
उत्तर समर्पक होतं.
इबाबांचा अभिनय सर्वात सुन्दर
इबाबांचा अभिनय सर्वात सुन्दर झाला महाएपिसोडमधे.
कारजवळ उभे राहुन लेकीचे कारनामे बघतांना गर्भगळीत झालेला बाप, सन्तापाने की शरमेने लालबुंद झालेला चेहरा, विस्कळीत केस, असा विश्वासघात झालेला हतबल बाप ... छान उभा केला त्यांनी!
गाडीतही टिल्लु एकेक गोष्ट सांगुन त्यांचे खच्चिकरण करत असतो तेव्हा रडवेले झालेले ते.. ! खरच अस चाळीतले आयुष्य जगलेला मध्यमवर्गीय, इज्जतीची चाड असलेला .. हे उभे करण्यात यशस्वी झाले ते.
काल सुभा सोफ्यावर बसला आणि
काल सुभा सोफ्यावर बसला आणि ईशा उभी होती तेव्हा मला वाटलं की, ती सुभा बसलाय त्या सोफ्याच्या दांडीवर जाऊन बसते की काय..
बसू शकते की. डोक्यावर
बसू शकते की. डोक्यावर बसलीच्चै तशीही.
सुभा आणि ईशाला एकत्र बघताना
सुभा आणि ईशाला एकत्र बघताना ऑड वाटतं का कुणाला..
म्हणजे प्रेमात वयाची अटं नको वगैरे ठीक पण थोड विचित्र तर वाटतं..
त्यात सुभा आधी ओके दिसत होता सुरुवातीच्या भागात आता .. त्याचे केस फार पांढरे दाखवले आहेत .. इन्फॅक्ट ईबाबांचे पण केस काळे आहेत .. त्यात ईशा चलाख, बनेल वाटतिये त्यामुळे अजुनच ऑड वाटतय ..
अन्जू.....नंदू म्हणजे
अन्जू.....नंदू म्हणजे राजनंदिनी,विकूची पहिली बायको. >>> ओहह, thank u.
मलाक्षतर पहिल्यापासूनच विकू
मलाक्षतर पहिल्यापासूनच विकू आणि बाळ वडील मुलगी वाटत आले आहे.आता सुभा थकलेला वाटतो.
ईबाबांचा अभिनय आणि विस चं घर
ईबाबांचा अभिनय आणि विस चं घर आवडलं बाकी ते वरून दिसणारे विल यू मरी मी छान दिसत होतं . >>>>>> ++++++१११११११
सरंजामेबद्दल ही माहिती ऑफिस मधे लपून राहणे जवळजवळ अशक्य आहे. >>>>> अगदी अगदी ऑफिसमध्ये काय, अगदी मीडियामध्येही लपून राहणे अशक्य आहे आजकाल.
नक्की पुनर्जन्म आणि बदला घ्यायला आली असणार. >>>>>> पण जर असेल तर नन्दू मायराच ऐकून मध्येच माघार का घेते?
बाकी नंदिनी च्या मृत्यू की जाण्याला व्हेग ठेऊन पुढच्या बऱ्याच गैरसमजाना, स्टोरी वाढवायला वाव दिला आहे >>>>> सर, मला खात्री आहे की तुम्ही कधीच माझा विश्वासघात करणार नाही. मी तुझ्यात काय पाहिल ते एक कोडेच आहे. अश्या Dialogues नी तर हिन्टस दिल्या आहेत पुढच्या स्टोरीच्या.
तसं असेल तर ग्रे शेड भूमिका सु भा भारी करेल >>>>>>> हम्म. काल मला अस का वाटल की विसला ईबाबा तिकडे उभे असलेले दिसतात. त्यान्ना बघून विस कनिन्ग स्माईल दिल्यासारखा वाटला.
पण सगळ्या महिला वर्गाचा सुभा सध्या हंक असल्यामुळे झी मराठी अशी रिश्क घेईल का हा प्रश्न आहे. >>>>> हो ना. ईशाच्या प्रेमामुळे विस सुधारला असेही दाखवू शकतात.

शेवटी त्याचही लिमिट संपल असेल ना या बाळाला झेलून. >>>>>> शनिवारच्या एपिसोडमध्ये सुद्दा विस तिला म्हणालेला, 'तुझ्यामुळे माझ्यावर रडायची पाळी आली. '
आज निमकर आपल्या सुकन्येचा सत्कार करणार आहेत.
बाकी नंदिनी च्या मृत्यू की
बाकी नंदिनी च्या मृत्यू की जाण्याला व्हेग ठेऊन पुढच्या बऱ्याच गैरसमजाना, स्टोरी वाढवायला वाव दिला आहे >>>>> सर, मला खात्री आहे की तुम्ही कधीच माझा विश्वासघात करणार नाही. मी तुझ्यात काय पाहिल ते एक कोडेच आहे. अश्या Dialogues नी तर हिन्टस दिल्या आहेत पुढच्या स्टोरीच्या. >>>> सारख सारख विश्वास विश्वास... ह्यात च काळबेर आहे
तसं असेल तर ग्रे शेड भूमिका सु भा भारी करेल >>>>>>> हम्म. काल मला अस का वाटल की विसला ईबाबा तिकडे उभे असलेले दिसतात. त्यान्ना बघून विस कनिन्ग स्माईल दिल्यासारखा वाटला.>>>>> मला पण तेच वाटल...
त्या जळिंदरची काॅलर ट्युन पण
त्या जळिंदरची काॅलर ट्युन पण आहे ना? विश्वासघात अन् विक्रांतची जात.
बच्चन गंडल्यासारखा वाटला आज.
सुभा गंडल्यासारखा वाटला आज.
इशाचे बाबा मस्त काम करतायत. आईसुद्धा.
Kon bacchan
Kon bacchan
शनिवारच्या एपिसोडमध्ये सुद्दा
शनिवारच्या एपिसोडमध्ये सुद्दा विस तिला म्हणालेला, 'तुझ्यामुळे माझ्यावर रडायची पाळी आली. ' ?>>>he kdhi zala
आज विकूला पाहून एक गोष्ट
आज विकूला पाहून एक गोष्ट मात्र जाणवत होती की जालिंदर काकांच्या बोलण्यात कुछ तो दम है.विकू आज झेंडेशा जस बोलला ते बघून पास्टमध्ये तो सीधासाधा नक्कीच नाही अस वाटतय.
बाकी आता तर बाळ बँफूटवर गेल आहे आणि विकूलाच लग्नाची घाई झालेली दिसत आहे
निमकर मात्र बेस्ट,आज ईआई पण आवडली.
बाळाबद्दल काही लिहावसच वाटत नाही.
कधी बंद होणार हि सिरीयल?
कधी बंद होणार हि सिरीयल?
कधी बंद होणार ही सिरियल......
कधी बंद होणार ही सिरियल.........अरे एकदम बाऊंन्सरच टाकला.हाहाहा
मी विकू आणि शितुसाठी बघत आहे,तिला येउ दे ना अजून.
तस सुभा म्हणाला होता की लिमिटेड भागांची आहे.फेबपर्यंत संपेल.
सीधासाधा नक्कीच नाही अस वाटतय
सीधासाधा नक्कीच नाही अस वाटतय.
## ## हो आजच्या भागात जाणवलं .. सुभा थोडी व्हिलनस acting करत होता
ईशाच्या प्रेमामुळे विस
ईशाच्या प्रेमामुळे विस सुधारला असेही दाखवू शकतात >>> श्या, हे फार गुळमुळीत होईल.
नंदिनीचे डोळे इशाला दिले
नंदिनीचे डोळे इशाला दिले असणार .. पहिल्यांदा भेटल्यावर त्याला थोडं जाणवलं असणार.. मग त्याने माहिती काढल्यावर इशाला डोळे दिले समजलं असणार.. मग हळू हळू तो तिच्या प्रेमात पडला असणार .. म्हणूनच म्हणाला तुझ्यात काय आवडत ते नाही सांगता येणार..
तुम्ही या सिरीजमधल्या कथेच्या
तुम्ही या सिरीजमधल्या कथेच्या कन्सिस्टन्सीला जरा जास्तच क्रेडिट देत आहात असे नाही का वाटत तुम्हाला?
मला तर असेच दिसते की प्रत्येक एपिसोडमधे ड्रामा तयार करायला जे काही हाती लागेल ते घेउन केला जातो. मग ते आधीच्या घटनांशी कन्सिस्टंट असो वा नसो.
- परवा राजनंदिनी ही ३५ वर्षे आणि सर्वात जुना प्रॉडक्ट होती. आता ती पहिल्या बायकोची आठवण झाली
- ईशा डिपार्टमेण्ट हेड झाली. नंतर पहिले काम काय तर एक वर्ड डॉक्युमेण्ट अलाइन करायचे आणि प्रिन्ट करून वाडकर मॅडमना द्यायचे
- झेण्डेला भीती वाटते तेव्हा जालिंदर येतो. तुपारे-वर्ल्ड मधे threat level एकदम Red होते. लगेच पुढच्या एपिसोड मधे या कसल्याचाही पत्ता नसतो
- सरंजामे चिडलेला दिसतो तेव्हा जयदीप त्याला तू गोळी घेतली का न विचारता एव्हीपी मायराला फोन करून तू याला गोळी दिलीस का असे विचारतो
या सर्व रानोमाळ हरवलेल्या लॉजिक मधून त्यांना वरच्यासारखी स्टोरीलाइन कन्सिस्टंट ठेवणे शक्य वाटते का?
सरंजामे चिडलेला दिसतो तेव्हा
सरंजामे चिडलेला दिसतो तेव्हा जयदीप त्याला तू गोळी घेतली का न विचारता एव्हीपी मायराला फोन करून तू याला गोळी दिलीस का असे विचारतो>>>
तो मधुमेहासाठी गोळी घेत असतो ना? कि चिडचिड कमी करायची हँपी पील घेत असतो?
हम्मम्म्म
हम्मम्म्म
कि चिडचिड कमी करायची हँपी पील
कि चिडचिड कमी करायची हँपी पील घेत असतो? >>> लोल.
सुबोध भावे कितीही चांगला असला तरी या सिरीज मधला सरंजामे एकदम rude कॅरेक्टर आहे ऑफिस मधे. याला दुसरे चहा, कॉफी पासून गोळ्या आणून देतात, साधे थँक्स वगैरे सोडा, चेहर्यावरही दखल घेतल्याचे एक्स्प्रेशन नसते.
आता भारतात अमेरिकेइतके सॉरी, थॅंक्यू उठसूठ होत नाही हे खरे, पण इतकेही खूसट नसतात बॉस लोक. किमान चेहर्यावर किंवा बॉडी लॅंग्वेज मधून आभार मानायची पद्धत आहेच की.
या सर्व रानोमाळ हरवलेल्या
या सर्व रानोमाळ हरवलेल्या लॉजिक मधून त्यांना वरच्यासारखी स्टोरीलाइन कन्सिस्टंट ठेवणे शक्य वाटते का? >> केड्या असल्यावर अजुन काय असणार होत, भारतात रस्ता दुरुस्त करायला जसा आधी खणावा लागतो तसा केड्या सगळिकडे खड्दे करुन ठेवतो आणी मग कथा खाचखळग्यातुन नसलेले लॉजिक आपणच लावत पुढे ढकलायची.
सही प्राजक्ता
सही प्राजक्ता
बहुचर्चित महाएपिसोड मधल्या
बहुचर्चित महाएपिसोड मधल्या लपाछपीने तर सगळ हास्यास्पदच करुन टाकल , मालिकेला नक्कि रोमॅन्टिक,रिअल्,करुण ,कॉमेडि नक्कि कोणत्या रसात बुडवुन काढायची हे केड्याच नक्कि ठरल नसल्याने महा बोरिन्ग प्रपोजल झाल ते, इबाळाने वेड घेवुन पेडगावाला जाण्याचा अभिनय करण चालुच ठेवल होत, सुभाचे केस कुणीतरी डाय करा रे, जरा जिम करुन ते पोटही आत घे म्हणाव , पाढरी-काळी दाढी फक्त जगात दोनच व्यक्तिना शोभुन दिसते एक अमिताभ आणी दुसरा क्लुनी बाकी सगळे कळकट्ट पारोसे वाटतात.
अर्रे कळीचा मुद्दा पहिला की
अर्रे कळीचा मुद्दा पहिला की नाही कोणी????
कुठल्यातरी कारणावरून इशा विस ला बोलते," माझे आई बाबा आपल्या नात्याला परवानगी देतील तेव्हा ब्ला ब्ला !"
इतके एफर्ट्स घेते बाळ विस ला स्वतःच्या प्रेमात पाडायला...आणि आता मनासारखं झालं तर हिचं तिसरं च स्टेशन चालू झालं...
काल विस ईबाबांना अमरीष पुरी
काल विस ईबाबांना अमरीष पुरी म्हणाला झेंडेंशी बोलताना.
या सर्व रानोमाळ हरवलेल्या
या सर्व रानोमाळ हरवलेल्या लॉजिकमधून >>> फा
पण आपल्याकडून - `पाचोळ्याप्रमाणे सैरावैरा इकडेतिकडे धावणार्या शंकर्यासारख्या' लॉजिकमधून - अशी उपमा अपेक्षित होती
या सर्व रानोमाळ हरवलेल्या
या सर्व रानोमाळ हरवलेल्या लॉजिकमधून >>>>>फारएण्ड अगदी बरोबर आहे तुमच पटतय.पण ही आशा सुभानेच त्याच्या या मालिकेच्या इंटर्व्ह्यू मधून निर्माण केली आहे.
"माझा रोल यात वेगळा आहे.खरा सरंजामे असा समजूतदार,शांत नाही,काही दिवसांनी खरा सरंजामे समोर येईल.जालिंदर आल्यावर खरच तस वाटल होत.पण केड्या बहुतेक सुभापेक्षा वरचढ ठरला,विनोदी मालिका करायचा चंगच बांधला आहे त्याने.
सुभा ग्रे शेड छान दाखवेल आणि बाळ निदान घाबरण्याचा अभिनय तरी छान करेल अस वाटल होत.सुभा आपल वजन वापरेल आणि केड्या आणि चँनेलला आपल्यावर हावी होऊन देणार नाही,अशी अजून एक भोळी आशा आहे.
तस नाही झाल तर सुभाने मालिकेच प्रमोशन खोटखोट केल असाव.
बाकी सुभा पर एपिसोड ३५००० घेतो अस ऐकिवात आहे,खर आहे का?
Pages