Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
FarenD यांनी "मी कुटून राहिले
FarenD यांनी "मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको बघावं"
१ पुडी मसाला कुटून 1 टेंडर मिळवून 300 करोडचा बिझनेस केला राधिका ताईंनी.. स्लीवलेस ब्लाउज घातला की झालं बिझनेसवूमन ..
XML मराठी >> क्लास
XML मराठी >>
क्लास
उद्याच्या महाएपिसोड चे
उद्याच्या महाएपिसोड चे स्क्रिप्ट नुकतेच हाती लागले आहे

बेरकीपणे रोखून बघत:
सर, तुम्हाला मला काही सांगायचंय का? ... बोला ना सर... सांगा ना ... मनातले सगळे बोलून टाका... बोलताय ना सर...माणसाने जीवनात कसे ... माझे बाबा म्हणतात... सांगताय ना सर... तुम्हाला नक्कीच मला काही तरी सांगायचंय ..
सुभा अजूनही संभ्रमितपणे बघणार ... ईबाळ सुप्रसिद्ध "विचारमग्न झाल्या सारखा पण मक्ख चेहरा" .. आणि बॅकग्राऊंड ला वाजणार ...
"मनीचे गुज तू ....सांग नाआआ रे.... तुलाआआ पाहते रे ...."

लोल मेधावि
लोल मेधावि
मायराला राजनंदिनी साडी चे डिपार्टमेण्ट चे पद न मिळाल्याचे केवढे नाट्य.
काय मिळाले नाही? सरंजामे ग्रूप च्या १३ कंपन्या. त्यातील एक फॅब्रिक कंपनी. त्यातील एक प्रॉडक्ट. त्याची हेड.
मायरा कोण आहे? या १३ कंपन्या कंट्रोल करणार्या कॉर्पोरेट ऑफिस मधली एव्हीपी व सीएओ ची राइट हॅण्ड
या कंपनीचा ऑर्ग चार्ट बघायला पाहिजे. एफएम सर्वात टॉप वर असेल.
"मनीचे गुज तू ....सांग नाआआ
"मनीचे गुज तू ....सांग नाआआ रे.... तुलाआआ पाहते रे ...." >>>
तुम्ही आख्खा एपिसोड लीक केला असावा. यापेक्षा सहसा काही नसतेच एका एपिसोड मधे
आता "महा" मधे जरा असू शकेल.
आता "महा" मधे जरा असू शकेल >>
आता "महा" मधे जरा असू शकेल >>> फारएण्ड, ते तुमच्या साठी ठेवलंय
फारएण्ड.....बाळ आणि मायरा
फारएण्ड.....बाळ आणि मायरा तमाशा जुगलबंदी...सॉल्लिड
पम सरंजाम्यांना आणि झेंडेना ढोलकीवाले केल तर.
म्हणजे बाळ त्या कपटी हास्याने विचारेल,"सांगा की हो सर मनातल"
मग अचानक सवालजबाब इसरून सरंजामे बेअरिंग पकडून गातील
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका लावू गाठोड बांधायला,,येऊ असा कसा मी नांदायला हो ,येऊ असा कसा मी नांदायला
मग बाळ भोकाड पसरून स्टेजवरून खाली आणि झेंडे पार्टीचा विजय.
फारएण्ड, ते तुमच्या साठी
फारएण्ड, ते तुमच्या साठी ठेवलंय >>>
निमकर ला पहिल्यांदा कोणीतरी निमकर "साब" म्हंटल्याचा आनंद मात्र सच्चा वाटला.
आज मायराजी सर्व चाहत्यांच्या मनातील वाक्य बोलल्या - "अशी ट्रॅजिडी क्वीन बनून काय फिरतीयस!"
काल सरंजामे गॅग फेबु लाईव्ह
काल सरंजामे गॅन्ग फेबु लाईव्ह आली होती. विक्रांत इशाचा एक सीन दाखवत होते त्यात (पोहोता न येणार्याला कसं टायर घालून पोहायला पाठवतात तसं) इशाला सपोर्ट म्हणून लाईव्ह सूचना चालल्या होत्या. हातात हात घेऊन चालत चालत या. इशा सरांकडे बघ, आता चेहर्यावर हास्य, आता खूप आनंद, प्रचंड आनंद अशा सूचना चालू होत्या. सरंजामे आतिशय पारोसा, दमलेला, झोपाळलेला दिसत होता.
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका लावू गाठोड बांधायला,,येऊ असा कसा मी नांदायला हो ,येऊ असा कसा मी नांदायला >>>

>>>>>>
>>>>>>
इशाला सपोर्ट म्हणून लाईव्ह सूचना चालल्या होत्या. हातात हात घेऊन चालत चालत या. इशा सरांकडे बघ, आता चेहर्यावर हास्य, आता खूप आनंद, प्रचंड आनंद
>>>>>.
केवढं बोअर असेल हे सगळं..
तिचे भावं बघुन तर डायरेक्टर वेडा होत असेल .. इमॅजिन डिरेक्टर माइकवर..
" अगं हसु .. हसु कळ्तं का हसु??.. थोडं कमी .. च्च.. फारच कमी झालं .. थोडं वाढवं.. अरे देवा कमीच बरं होतं.. "
"बरं आता रडं .. भोकाड नको .. दु:ख दाखवायचय फक्त.. जौद्या विस चे ४ शॉट वाढवा.. त्यालाच सगळं करु दे.. हसु दे रडु दे लाजु दे (विसच्या लाजण्यामागचं रहस्य)"
जौद्या विस चे ४ शॉट वाढवा..
जौद्या विस चे ४ शॉट वाढवा.. त्यालाच सगळं करु दे.. हसु दे रडु दे लाजु दे (विसच्या लाजण्यामागचं रहस्य)" >>>>> हे भारीच होतं

अरे काय तुफान सुटलेत सगळे,
अरे काय तुफान सुटलेत सगळे,
जौद्या विस चे ४ शॉट वाढवा..
जौद्या विस चे ४ शॉट वाढवा.. त्यालाच सगळं करु दे.. हसु दे रडु दे लाजु दे (विसच्या लाजण्यामागचं रहस्य)" >>>
शूटींग बघताना विक्रम जेव्हा
शूटींग बघताना विक्रम जेव्हा जेव्हा "सुबोधदादा, इशाचा हात धर" म्हटल्यावर तिचा हात धरतो तेव्हा इतका यांत्रिकपणे धरतो ना की कथानकात हातात पिशवी धर असं सांगितलं असतं तर तितक्याच प्रेमानं पिशवीही धरली असती.
आई ग....काय तुफान हाणामारी
आई ग....काय तुफान हाणामारी चाललीये इथे ...मज्जानी लाइफ....
जुगलबंदी आणि येऊ कसा कसा मी नांदायला ...बेस्ट....
आणि सुभा लाच करू दे सगळं पण बेस्ट.... सुभाच्या खांद्यावर इ बेबी ,इ आई चे ओझे... मग तो थकला की आईसाहेब संत्री सोलून त्याच्या तोंडात घालणार... तिकडे इ बेबी ने भोकाड पसरलं की निमकर तिच्या तोंडात तिचा अंगठा देतील चोखायला... मग इ आई खुशीने गरागरा डोळे फिरवून गदागदा मान हलवणार...मग बाजूचे झेंडे तिला म्हणतील अहो हलू नका वि स च्या पाठीला त्रास होईल... मग मायरा पण वेळ झाली की वि स च्या तोंडात गोळ्या टाकेल ...मग परत बॅक ग्राउंड ला गाणं "कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे....कोणा कोणा चे ओझे"
एव्हीपी व सीएओ ची राइट हॅण्ड
एव्हीपी व सीएओ ची राइट हॅण्ड >>> कमी आणि पीए जास्त आहे
इशाला शेंबूड पुसायचा रुमाल
इशाला शेंबूड पुसायचा रुमाल द्यावा लागेल अशानं <<<<<
एव्हीपी व सीएओ ची राइट हॅण्ड
एव्हीपी व सीएओ ची राइट हॅण्ड >>> कमी आणि पीए जास्त आहे>>>>
बहुतेक त्यांच्यात एव्हीपी म्हणजे व्हीपी ची पीए असा अर्थ होतो
परवा मीटींगमधे, वही-पेन ऐवजी
परवा बोर्ड मीटिंगमधे, वही-पेन ऐवजी चक्क सगळ्यांकडे लॅपटाॅप होते.
राजनंदिनी ची हेड झाल्यानंतर
राजनंदिनी ची हेड झाल्यानंतर चा पहिला दिवस ईबाळाने मुवी प्लान केली आणि एक फाईल ढकलली.
सगळं च हास्यास्पद
>> राजनंदिनी ची हेड
>> राजनंदिनी ची हेड झाल्यानंतर चा पहिला दिवस ईबाळाने मुवी प्लान केली आणि एक फाईल ढकलली.
सगळं च हास्यास्पद>>>>>>>>>>
हो यार .. कामाच काही नाहिच..कसं करु ?? काय करु?? काय करयच असतं .. काहिच नाही
फा, मनावर घ्या एक parody पेज
फा, मनावर घ्या एक parody पेज चालू करा लई पब्लिक मिळेल
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका लावू गाठोड बांधायला,,येऊ असा कसा मी नांदायला हो ,येऊ असा कसा मी नांदायला
मग बाळ भोकाड पसरून स्टेजवरून खाली आणि झेंडे पार्टीचा विजय. >>>>>
ईबाळाच म्हणे विसवर खर प्रेम आहे. खर प्रेम करणारे त्या माणसाच्या वस्तू कशा जपून ठेवतात. हिला साध स्लॅमबुक सुद्दा नीट साम्भाळता येत नाही.
ईशा म्हणते की मी विसशी कुठल्याही बाबतीत अनुरुप नाहीये, ना वयाच्या ना स्टेटसच्या. त्यावर रुपालीने प्रेक्षकान्ची प्रतिक्रिया दिली, ' हे तुला आता कळतय?'
विसशी कठोरपणे वागण्याचा ईशाचा अभिनय बरा होता एकन्दरीत.
हिने बिपिनला सिनेमाची तिकिटे काढायला सान्गितली ती नेमकी कुठल्या सिनेमाची? आणि हा नुसती सिनेमाची टिकटे काढ म्हटल्यावर गेला काढायला. नॉर्मल माणस तिकिटान्बद्दल बोलताना त्या सिनेमाच नाव-गाव तरी सान्गतात.
सुभाचा, बिपिन आणि ईशाला एकत्र बघितल्यानन्तरचा अभिनय क्लासच होता. त्याचे डोळे तेव्हा लाल दिसत होते.
फा, मनावर घ्या एक parody पेज
फा, मनावर घ्या एक parody पेज चालू करा लई पब्लिक मिळेल >>>>>> +++++११११११११
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका
'नेहमाच रानी ,तुमची घाई,नका लावू गाठोड बांधायला,,येऊ असा कसा मी नांदायला हो ,येऊ असा कसा मी नांदायला
मग बाळ भोकाड पसरून स्टेजवरून खाली आणि झेंडे पार्टीचा विजय. >>>
सिम्बा, सुलू_८२ -
(सिम्बा - आधी लिहीलेलेही वाचले होते पण त्याबद्दल लिहायचे राहिले) - तेवढे सातत्य जमेल का नाही माहीत नाही. दुसरे म्हणजे अशी पेजेस फक्त खिल्ली उडवणे याच कारणाकरता असतात सहसा. त्यापेक्षा इथे जेव्हा जे आवडले ते मोकळेपणाने सांगता येते, जेव्हा अचाट प्रकार दिसतात तेव्हा ते बघताना जे डोक्यात आले ते लिहीता येते.
बोर्ड मीटिंग सरप्राइज! अगदीच
बोर्ड मीटिंग सरप्राइज! अगदीच कौटुंबिक सोहळा करून टाकला आहे. अरे लेको, कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजे कंपनीत ज्यांनी प्रचंड गुंतवणूक केलेली असते त्यांचे प्रतिनिधी असतात. कंपनीच्या सीईओ वर सुद्धा त्यांचा वचक असतो (दर वेळेस तो उठला की हे नोकरासारखे उठून उभे काय राहतात!). त्यांना हे असले प्रकार चालत नाहीत. मोठी फिल्डिंग लावावी लागते मीटिंग मधे कोणी विरोध करू नये म्हणून.
आणि परांजपे तर बोर्डातही आहेत. मग परवा एखाद्या नवशिक्यासारखे त्यांना झेंडेने झापून आपापली कामे करा म्हणून हाकलले, तो सीन फारच विनोदी होता.
पण या कंपनीचा ऑर्ग चार्टच उलटापुलटा दिसतोय.
मीटिंग मधे मायराने ईशाला एकदम मिनि-मायरा करूनच आणले की! ऑस्टिन पॉवर्स सिरीज मधे तो डॉ एव्हिल आणि त्याचा मिनी-मी असतो तशी व्हिलन आहे की काय मायरा आता? तिला तशी पाहिल्यावर तोपर्यंत आनंदात असलेला विक्रांत एकदम अॅवॉर्ड न मिळालेल्या जोई सारखा बोलू लागला
अनाउन्समेण्टनंतर कोणीच काही विचारले नाही. कोण या मॅडम. राजनंदिनी डिपार्टमेण्ट हेड करण्याइतका यांचा काय अनुभव, काही पत्ता नाही. आणि पब्लिक लाँच असेल तर ठीक आहे. पण बोर्ड मीटिंगला साडी विभागाच्या हेड ने तसेच कपडे घालून यायला हवे शालीन वगैरे दिसायला? नशीब यांचे व्हिक्टोरिया'ज सिक्रेट सारखे प्रॉडक्ट नाही.
बोर्ड मीटिंग मधे पाया पडणे तर धमाल. मेलो हसून मी. कॉर्पोरेट कल्चर वर मध्यमवर्गीय व्हॅल्यूज नी आक्रमण केले आहे!
अरे कालपरवापर्यंत जिवाला धोका होता ना सरंजामेच्या? "आपण बाहेर जरा फेरी मारून येउ?" हा ही गाडीतून ते ही सिक्युरिटीशिवाय जाताना मधेच उतरतो रस्त्यात.
शेवटी सर्व गिफ्ट्सची चर्चा होउन "मी सरांना एक गिफ्ट मात्र देउ शकले नाही" ऐकल्यावर हे नक्की कोणत्या दिशेला चालले आहे हे बघायला मी चहा बाजूला ठेवून बसलो. सुदैवाने तसे काही निघाले नाही
फारएण्ड, यू आर ग्रेट!
फारएण्ड, यू आर ग्रेट! व्हिक्टोरिया'ज सिक्रेट काय !!
हे म्हणजे बापू काणेची आठवण करून दिलीत. कार्यवाहाचा आणि कार्याचा काय संबंध? (अंत्येष्टी कमिटीचा कार्यवाह
)
मी मोजून सात की आठ भाग पाहिले असतील या मालिकेचे पण या धाग्यावरचा एकही प्रतिसाद चुकवलेला नाही! महान आहेत इथले प्रतिसाद!!
चालू चंबू बाळ खुशाल खोटे
चालू चंबू बाळ खुशाल खोटे सांगून जाते घरी, तेव्हा बरं सुचतं हिला खोटं सांगायला आणि आव तर असा आणते कि माझ्यासारखी साधीभोळी मीच !! सुमडीत झेंडे आणि मायरा ची वाट लावून निघून गेली त्यांना लुक्स देतादेता. झेंडे इतकं फालतू प्लॅन करेल असं वाटलं नव्हतं.
विस ला कोणीतरी दुसरे कपडे द्या रे 4 दिवस एकच भयाण कॉम्बि घालून फिरतोय बिचारा. ई बाळापेक्षा यालाच लग्नाची घाई झालेली दिसते.
(No subject)
Pages