तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारएण्ड......good observation.eka hatane piyano.. >>> योग ने लिहीले आहे. मी अजून पाहिलेला नाही तो भाग. इथे यप टीव्ही नावाची एक सर्विस्/अ‍ॅप आहे. त्यात एक दिवस उशीरा येतात हे भाग. काल रात्रीपर्यंत तरी नव्हता.

नशीब हे नाही विचारलं: सर, हे हेलिकॉप्टर खरे आहे? ऊडते? >>>
ईबाबांनी खरे तर विस ची समजूत काढायला हवी आहे.. अभी भी वक्त है, संभल जाओ..ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू.. >>> Lol हे जबरी आहे

सॉरी योग,तुमच नाव वाचल नाही.पण पुन्हा एकदा गुड ऑब्जरवेशन.आणि फारएण्ड..थँक्स ,चूक सुधारल्याबद्दल.
निमकर बाबा मात्र माणूस जेंटलमँन आहे.तिथे गोंधळ न घालता परत आले.चाळीत परत येताना विकूपेक्षाही यंग दिसत होते.
निमकर आई असत्या तर हेलिपँड बघून त्यालाच विमान समजून हर्षवायू होऊन ओरडल्या असत्या "अग बाई,निमकर,हे बघा विमान,मी जाते आता लंडनला."

सुभा ईशाच रोमँटिक बोलणं म्हणजे शब्दबंबाळ.. बाबांचा अभिनय छान .. रुद्रम मध्ये पण छान होते ते

चाळीत परत येताना विकूपेक्षाही यंग दिसत होते. >>> Lol

ते एक कॅरेक्टर जनरली सेन्सिबल लिहीले आहे, त्या कलाकाराने कामही चांगले केले आहे. नाव कोणाला माहीत आहे का?

ही सिरीज इतकी डोक्यात बसली आहे की परवा काशिनाथ घाणेकर चित्रपटात त्याची पहिली बायको तिच्याकडे आलेल्या पेशण्ट्स्ना "कारखानीस ना?" विचारते तेव्हा "मायरा कारखानीस?" असे आपोआप डोक्यात आले.

मनीमोहोर.....केड्या म्हणजे माझ्या नवर्याची बायकोमधला केडी,शनायाचा इरसाल मित्र. खरे नाव अभिजित गुरु.ती त्याला केड्या म्हणत असते
त्या आणि ह्याही मालिकेचा स्रिक्प्ट रायटर.समिधा गुरु माहित असेल तर तिचा नवरा. >>>UP धन्यवाद

इथले कमेंट्स वाचायलाच आले फक्त... म्हटलं एपिसोडपेक्षा त्याच भारी असणार!!! Proud
सगळ्यांनी पिसे काढलीच आहेत ऑलरेडी. Lol

१. इशाने एकदाही विस ची बायको कशाने गेली ते काही विचारलं नाही (बहुतेक लेखकाचंच काही ठरलं नाहीये ती कशी मेली. पुढे जेव्हा कधी काही संदर्भ येईल तेव्हा बघू असं म्हटला असेल)
२. जालिंदर बिर्याणी खाऊन ठार झाला की काय? महाएपिसोड बघतान्ना तो मधेच टपकेल असं वाटून गेलं. Proud
३. तुम्ही मला एकटं पाडलं सर डायलॉग नंतर इबाळ एकदमच निघून जाते ते काही कळलं नाही. बहुतेक तो तसा सो कॉल्ड 'ट्वीस्ट' दाखवायचाच असेल. तो काही जमला नाहीये. ती परत आली तर आधी बोललेल्याचा काही मागमूस नाही. कोरी पाटी. असंच (जरा बाथरूम ब्रेक) घेउन येते तशी आली. मज्जा म्हणून. अरे काय? त्यामानाने श्री-जान्हवी प्रपोज तरी बरंच बरं झालं होतं.
४. ते गुडघेदुखी डायलॉग तर कहरच. वर सग्ळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आगाऊच वाटले.
५. बाकी ती बोर्ड मिटींंग, फाईल, अलाईनमेंट, प्रेझेंटेशन, आजच्या मिटींग्स लिस्ट एकदा लॅपटॉवरून मेल केलेल्या, एकदा डायरीत लिहिलेल्या, सुभाचं घरगुती कॉलरवाल्या टी-शर्ट वर ब्लेझर घालणं हे सगळंच अचाट आहे.

बिचारे ईशाचे बाबा!
एकाच रिकाम्या पटांगणात हेलीकॉप्टर त्याच तिथे समोर गाडी, तिथेच बाबा अाणि टिल्लू उभे असतात. ते दोघे उतरतात तेव्हा त्यांना बा-टि दिसत नाहीत. मग इबाळाची पाठ बाबांकडे आणि विस समोर, तरिही त्याला बाबा दिसत नाहीत.

तो टिशर्टवर ब्लेझर जयदीपने घातला असता तर एकवेळ काही वाटलं नसतं कारण तो आहेच विक्षिप्त पण विसंला असे ओंगळवाणे कपडे देण्याचंं एकच कारण असू शकतं, ईबाळाच्या कपड्यांना मॅच करणे.

इतकया वेळा बाळानी विचारूनही तिचयात काय आवडतं ते विसला सांगता आलं नाही यावरून विस ला उपरती होइल की बाळात विषेश काही नाही अशी आशा वाटली होती.. ती शेवटी पोकळच ठरली:(

हे संवाद रोज असतातच या दोघांच्या तोंडी

मायरा
अ‍ॅबसोल्युटली स... (र तोंडात)
डेफिनेटली स....
स, एकदा या मिटींग्स जरा नजरेखालून घालता का?
मी तुम्हाला मेल केलाय स..
स, टूडे इट्स गोईंग टू बी वेरी हेक्टीक स.. ऑल बॅक टू बॅक मिटींग्स
यु हॅव टु बी देअ..स.. ईट्स वेरी इंपॉर्टंट क्लायंट

इबाळ बाबा

अगं इशा, काय झालं बाळा?
अगं पुष्पा, काय बोलतेस तू?
... तसं बरं नाही वाटत नाही का?
मी काय म्हणतो आपण असं केलं तर.

+ बाकिच्या लोकांचे..... सांगा ना सर, ITU, दो रूपये, बाबू, बोलले! Happy

स, टूडे इट्स गोईंग टू बी वेरी हेक्टीक स.. ऑल बॅक टू बॅक मिटींग्स>> असे असेल तेव्हा विस सगळ्या मिटींग्स रद्द करून टाकतो.

इशाने एकदाही विस ची बायको कशाने गेली ते काही विचारलं नाही (बहुतेक लेखकाचंच काही ठरलं नाहीये ती कशी मेली》मेली आहे की जिवंत हे पण नसेल ठरलं. (ती मला सोडून गेली असं म्हणतो तो.

तुफान पोस्ट्स सगळ्याच !!
फक्त ईबाबांचा अभिनय आणि विस चं घर आवडलं बाकी काहीही नाही. घरातल्या लोकांना कुठे हाकलले विस ने? ते गुलाबाच्या पाकळ्या चॉपर इ इ ते लोक परत यायच्या आत साफ करावे लागेल ना त्याला. बाकी ते वरून दिसणारे विल यू मरी मी छान दिसत होतं .

या जगात नाही असं म्हणाला ना? >>> असं असेल तर नक्की पुनर्जन्म आणि बदला घ्यायला आली असणार. तसं असेल तर ग्रे शेड भूमिका सु भा भारी करेल पण ह्या बाईसाहेब कशी करतील काय माहिती.

अन्जू........पुनर्जन्म असेल तर मग नंदूच काय काम?
हो पण ग्रे शेडवाली भूमिका सुभा मस्त करेल.शेवटी त्याचही लिमिट संपल असेल ना या बाळाला झेलून.झी मराठीने जे माथी मारल ते बिचार्याने मुकाट्याने सहन केल इतके दिवस.आता जर श्टोरी 360मध्ये फिरवणार असतील तर उसके अच्छे दिन आयेंगे
बाळाला त्रास द्यायला
पण सगळ्या महिला वर्गाचा सुभा सध्या हंक असल्यामुळे झी मराठी अशी रिश्क घेईल का हा प्रश्न आहे.
बसेरा पिक्चचर आठवतो का कुणाला.त्यात पण असच आहे.
शशी कपूरची पहिली बायको राखी त्याच रेखाशी दुसर लग्न झाल्यावर मेडिकस असँलममधून ठणठणीत बरी होऊन येते.त्यांना एक मुलगी पण असते.शेवटी कोण जात कोण राहत इसरले.

हा महाभाग (म्हणजे महा-एपिसोड. सुबोध भावे नव्हे) घरगुती असल्याने बरा जमलाय पण केवढा घोळ घातलाय. पाच मिनीटांत सांगायची गोष्ट सांगायल अर्धा तास लावलाय. ते कर्जत चे घर दिमाखदार आहे, इतक्या मोठ्या असामीचे असेल असे.

मायरा अजून हम छोडेगा नहीं जी मोड मधे दिसते.

ईशाने आता गाडीत बसताना तरी गपपणे बसावं ना? तर तेथे दाराशी थबकून "सरांनी मला का बोलावलं असेल? काय काम असेल त्यांचं?" करत बसली आहे.

राजनंदिनी साडी हा ३५ वर्षे जुना प्रॉडक्ट होता ना? मग हा नवीन व्युत्पत्ती अचानक कोठून उगवली? हा नक्की किती वर्षाचा आहे? आणि सरंजामेबद्दल ही माहिती ऑफिस मधे लपून राहणे जवळजवळ अशक्य आहे.

ईशाच्या मागे पळत जायची काय गरज आहे? त्याने सांगितल्याशिवाय तो ड्रायव्हर तिला नेणार आहे परत, की ही लोकल पकडून जाणार आहे? आणि खांबामागे लपून भॉक केल्यासारखी पुन्हा समोर. काय कॉमेडी आहे. आणि खांबाला राउण्ड मारून आल्यावर एकदम चालबाज मधे दुसरी श्रीदेवी येते तसे काहीतरी झालेले दिसते! एकदम काहीतरी खाउन आल्यासारखी बोलायला लागली आहे.

दोन तासाचा भाग दिसतोय. आत्ता फक्त अंगठी पुढे केलेली आहे.

अन्जू........पुनर्जन्म असेल तर मग नंदूच काय काम? >>> नंदू कोण आहे. अहो मी बघत नाही. इथे वाचून असं तसं डोक्यात येतं ते लिहिते लगेच Lol

शशी कपूरची पहिली बायको राखी त्याच रेखाशी दुसर लग्न झाल्यावर मेडिकस असँलममधून ठणठणीत बरी होऊन येते.त्यांना एक मुलगी पण असते.शेवटी कोण जात कोण राहत इसरले. >> शशीने रेखाशी लग्न केले आहे हे कळल्यावर ती परत वेड्याचे नाटक करते आणि घरातून बाहेर पडते.

बसेरा सिनेमा Happy त्यातले गाणे खूप सुंदर आहे....मला आवडते.

राजनंदिनी साडी हा ३५ वर्षे जुना प्रॉडक्ट होता ना?
###
त्यांना हा संदर्भ पुढे कुठे वापरायचा असेल तर म्हणतील की आधी नाव वेगळं होत नंतर बदललं..
बाकी नंदिनी च्या मृत्यू की जाण्याला व्हेग ठेऊन पुढच्या बऱ्याच गैरसमजाना, स्टोरी वाढवायला वाव दिला आहे,,

अन्जू.....नंदू म्हणजे राजनंदिनी,विकूची पहिली बायको.
वेडोबा.....बसेरा पिक्चरच नाव
शेवट असा आहे पिकचरचा,मग नक्कीच शितु भूत किंवा आत्मा नसावी.पण केडँया काहीही दाखवू शकतो.

बाकी ते वरून दिसणारे विल यू मरी मी छान दिसत होतं . >>> ते बघुन वाटलं की बाळ म्हणेल सर, ह्याचं उत्तर मी खाली जाऊन लिहायच का Proud

आणि खांबामागे लपून भॉक केल्यासारखी पुन्हा समोर. >>
अगदी अगदी..
ती समोर आली तेव्हा मी आणि बहीण खरोखरच भॉक म्हणून ओरडलो.. :-p

इबाळ आधी, 'विल यु मॅरी मी.' ला ..'येस आय विल' असे उत्तर देते ना? Uhoh
आणि नन्तर विसमहालात आल्यावर एकदम आईबाबा आठवतात का बाळाला?
तेव्हा " पण सर, माझ्या आईबाबांच्या परवानगीशिवाय मी नाही करु शकणार लग्न.. अस काहीतरी म्हणते ना!

आणि किती ते सरांना शब्दात गुंतवुन त्यान्च्याकडुन वदवुन घ्यायच, " तुम्ही माझ्यात काय पाहिल? असे हो काय करता सर?

Pages