तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'कर्णपिशाच्च' >>>>>> हे नवीनच नाव ऐकल पिशाच्चाच.

धन्स UP आणि अन्जूतै. Happy

पण मग बाळाला का फसवेल.कारण त्यात त्याचा हेतू काय? >>>>> केडयाने अख्खी स्टोरीच कनफ्यूजिन्ग आणि इललॉजिकल करुन टाकलीये. विस जालिन्दरविषयी निमकरान्ना सान्गताना, नन्दूविषयी ईशाला सान्गताना खोट बोलतोय असच वाटतय.

मला वाटते विसचे खरे नाव 'ग'वरून असेल. सरंजामे नी त्याला दत्तक घेतले असणार. >>>>> अस जर असेल तर विसने इतकी मोठी माहिती ईशापासून का लपविली तेच कळत नाही. Uhoh कारण जालिन्दरसारख्या बाहेरच्या माणन्साकडून ईशाला विसच्या पास्टबद्दल चुकीची माहिती कळू शकते.

जालिंदर मामांच्या ट्रॅक चं काय झालं.?? आता मागे लागणं सोडलं का? सगळेच विसरून गेले.>> तो अजुन बिर्याणीच खातोय. >>>>> नैतर काय. आणि वरुन तो झेन्डेसाठी 'डॉन को पकडना मुश्किल ही नही, नामुमकीन है' टाईप चिठ्ठी सोडतो.

विक्रांत नाॅर्मल झालाय आता. मस्त धमाल करायला लागलाय. >>>>>>> ++++++११११११ तेवढ ते मेकओवरच मनावर घ्याव त्याने.

विसचा मायरासारख वाग सल्ला भलताच सिरियसली घेतला ईशाने.

,मग मायराला काम सांग ना,गोळ्या वगैरे काय, >>>>>> तिला मायराचा बदला घ्यायचाय विसवरुन रडवल म्हणून. तसही आपण असताना दुसरी कोणी विसवर हक्क गाजवतेय, हे कस सहन होणार बरे ईबाळाला.

हे ऑफिस कमी आणि कॉलेज जास्त झालय. Lol

विसची केबिन सोडून बाकीच्या ऑफिसच इन्टेरियर बदललय का? विसच्या केबिनमध्ये जाण्यासाठी लिफ्ट कधी तयार झाली? आधी फक्त जिना होता तिकडे जाण्यासाठी.

कॉर्पोरेट ऑफिस मधे जिन्याखाली स्टार्टअप सारखी जागा दिली आहे राजनंदिनी साडी डिपार्ट्मेण्टला, >>>>>>>> ++++++++१११११११ तो राजनन्दिनी साडीचा बोर्ड कैच्याकैच आहे.

त्यापैकी तो मनोरुग्ण जुळा भाऊ logic मस्त, त्याच्याशी लग्न करून दिलं की इशाबाई सुधरवतील त्याला, मग खरा व्हिलन विस असेल आणि ते ती prove करेल. तद्दन फिल्मी आहे म्हणा पण यातलं काही इशातैना जमेल असं वाटत नाहीये. >>>>>>>> +++++++ १११११११११

मला उगवल्या मिशा, तेव्हा जन्मली ईशा " मला लागली कवळी तेव्हा जन्मली टवळी >>>>>>>> Rofl

विस पहिल्यान्दाच प्रेमात पडल्यासारख का वागतोय ? ईशाने दिलेल्या आठवणी गोड म्हणे, मग काय नन्दूच्या आठवणी तिखट होत्या?
तो

स्वयंपाक येतो असं वाटत नाही. दिसत नाही. >>>>>> स्वयंपाक नाही आला तर चालेल एकवेळ. तसही तिला सरन्ज्यामाकडे स्वयंपाक थोडीच करायचाय. पण ऑफिसच्या कामाच काय? हिने नक्की कुठल्या कॉलेजमधून बिझनेस मॅनेजमेण्ट ची Degree घेतलीये?

सर नसताना ईशा "मॅम" सायनिंग ऑथोरिटी? ते ही लग्नाआधीच? >>>>> मायराच ईशाला ती ऑथोरिटी देणार होती. पण मायरा तिच्याकडून भलत्याच डॉक्यूमेन्टवर सही घेणार. ईशाच्या बिनडोकपणामुळे (तो आधीच सिद्ध झालाय म्हणा टेन्डर प्रकरणात) कम्पनी बुडू नये म्हणून विसने ती ऑथोरिटी स्वतःकडे घेतली.

मायराचा ईशाला म्हटलेला Dialogue ' काम काय आम्ही करायची. तुम्ही काम नाही केल तर चालेल ईशामॅम. तुम्हाला सगळ फु़कट मिळतय. आमच तस नाहीये ना. ' भारी होता. मायराचे एक्सप्रेशन्स सुद्दा.

हे सगळ वाचून माझा ईशा वरचा विश्वास उडाला ..
मी पुण्याला परत जात आहे Happy
तिथे भेळ खाईन, सारस बागेत >>>>>> सर तुम्ही इथे? हे काय हो सर? Proud

अरे काय भन्नाट आहेत एकेक प्रतिसाद!
आजचा एपिसोड पाहिला नाही तरी इथे वाचून अंदाज येतोय!

एक अजून.. ज्या ज्या वेळी सुभा ईबाळाच्या हातात हात घालून ऑफीसमध्ये सर्वांसमोरून जातो त्या त्या वेळी ईबाळ बाकी कोणाकडेही न बघता फक्त सुभाकडे एकटक बघत जातं... मग ते कधी कौतुकभरल्या विजयी मुद्रेने तर कधी कन्फ्युजड मुद्रेने.
कधी संकोचून नाही की सगळा स्टाफ बघेल म्हणून ओशाळून नाही.

मायरा म्हणते - "ईशाच्या कॅरेक्टर बद्दल लोक बोलायलाच पाहिजेत"

मायराजी इथे दोन बाफ व जवळजवळ १६०० पोस्ट्स आम्ही काय करतोय Wink फक्त ते कॅरेक्टर म्हणजे चारित्र्याबद्दल नसून कॅरेक्टर म्हणजे पात्राबद्द्ल आहे Happy

झेण्डे आता भाई झाला का? पाहिजे तर उचलून आणू?

बाकी आख्खा एपिसोड पाहून नक्की काय झाले या भागात विचार केला तर काहीच नाही. वधूवर सूचक मंडळाला फोन, ईशा कॉफी करते, बास.

तुपारेच्या धाग्यावर लिहित आहे म्हणून माफी असावी.
पण बिग बॉस 2 लवकरच चालू होत आहे .संभाव्य कंटेंस्टंची नावे यू ट्यूबवर आहेत.लिंक शेअर करता येत नाही.
मी बाळासारखी हुशार नाही ना
असो ,तर ती नाव म्हणजे टेपा असतील पण बघून घ्या,बघायला काय हरकत आहे,उसमें क्या है
पण यातल्या काहींना नक्की बिगबॉसच्या घरात बघायला आवडेल.

काॅफी तरी कुठे केली ?

इशा आत्ता आहे त्यापेक्षा अर्धी सुंदर असती आणि आत्ताच्या दुप्पट चटचट असती तरी आवडली असती. कसली मेंगळी आहे ती.

काल झेंडेचा सा. संताप आवडला Happy म्हणे इशाई मला भेंडे म्हणते. तब्येत इशाईसारखी होईल वगैरे.

सुभा पण व्हीलन म्हणून इबाबाला अमरिश पुरी म्हणतो तेव्हा इशानं फारच भारी मंद लुक्स दिले ते आवडले. (ओरीजिनल टॅलेंट लपून रहात नाही. कधीतरी कुठल्या तरी प्रकारे तरी बाहेर येतंच की नाही बघा.)

कसली मेंगळी आहे ती.>>>>> Lol मेंगळी कसली, गोगलगाय सुद्धा हिच्यापेक्षा फास्ट असेल. हिची, कासव आणी गोगलगाईशी शर्यत लावली तर ही तिसरी सुद्धा येणार नाही. इतकी बथ्थड हिरॉईन झी मराठीच्या इतिहासात पहिलीच असेल.

नुकताच हाती आलेला कस्सं काय वरचा उखाणा..

ईशा काय घेईल बरं उखाणा ?

------------- आता निमकर कुटुंबीयांवर, कधीच येणार नाही संक्रांत
------------- कारण मी पटवलाय आता सरंजाम्यांचा डबल वयाचा विक्रांत Proud

कृष्णाजी Rofl
केड्याने वाचायला पाहिजे हा धागा!

मायरा आणि सिनियर टिल्लूचा डाव त्यान्च्यावरच उलटणार आहे अस वाटतय. ईशाची इतकी बदनामी होईल की वधू वर सूचक मंडळा करुन नकार येईल. कुठेच लग्न जमणार नाही. शेवटी निमकरान्ना तिचे लग्न विसशीच लावावे लागेल. चित भी मेरी, पट भी मेरी- इति ईशा.

संभाव्य कंटेंस्टंची नावे यू ट्यूबवर आहेत.लिंक शेअर करता येत नाही.
मी बाळासारखी हुशार नाही ना >>>>>> लिंक कॉपी- पेस्ट करायची ना. उसमें क्या है

watch from 5.55 to 7.00 >>>>>>> अवान्तर- ओरिजनल अन्ताक्षरी मधल्या आदेश बान्देकरच्या कोटवरील मिशीवाला बो कुणी नोटिस केलाय का? किती फनी दिसत ते. Proud

झेंडे स्व त ओम पुरी असताना इशा चा बाबाला अमरीश पुरी म्हणतात जसे खूप तरुण आहे swaatah >>>>>> झेंडे नाही, खुद्द जावईबापूच आपल्या भावी सासर्यान्ना अमरिश पुरी म्हणतात. झेन्डे फक्त त्यान्ची री ओढतात.

ओरिजनल अन्ताक्षरी मधल्या आदेश बान्देकरच्या कोटवरील मिशीवाला बो कुणी नोटिस केलाय का? किती फनी दिसत ते. >> हो!!!

अरे इतके माबोकर बघतायेत पण ह्याचा trp मानबापेक्षा कमी झालाय असं वाचलं कुठेतरी. इथे माबोवर मानबा शांत असल्याने मला वाटलं की तिचा trp कमी झाला असेल Wink .

अरे नवीन प्रोमो पाहिला का ,कै च्या काहीच.तो झेंडे ईबाबांना त्यांच्या दुकानातून उचलून विसच्या ऑफिसमध्ये आणतो तेही ते कस्टमरला साडी नेसवून दाखवत असताना आणि सांगतो की विस प्रश्न विचारतील त्याची उत्तर द्या ,विस येतो आणि 440 का धक्का
पण ईबाबांचा केविलवाणा चेहरा बघवत नाही.काय खालची पातळी गाठत आहे केड्या.केड्याचा निषेध.

काॅफी तरी कुठे केली ? >>> हो टोटली. नुसतीच तेथे घुटमळून कप इकडून तिकडे हलवत होती. आणि "ईशा साखर शोधते" अशी लिहीलेली कथेतील ओळ असेल तर ही साखर आजूबाजूला कॅलेण्डर किंवा घड्याळ शोधावे तशी शोधते. आता तेथे आत कॅबिनेट्स, ड्रॉवर्स वगैरे असताना साखर काय बाहेर ठेवतील का?

त्यात तेथेही ती इकडेतिकडे बघत असताना दारात उभी असलेली मायरा तिला दिसत नाही. कारण ती मायराकडे बघून तिच्याशी बोलत नसते, त्या मुळे झी सिरीज च्या नियमानुसार तिला ती दिसत नाही.

विसच वय सिरियल सुरु झाली तेव्हा 46 होत,बाळाच्या स्लँमबुक मध्ये तरी तसच लिहिल होत,पण आज त्याने त्याच वय 42सांगितल.
केड्या टेपा मारतो पण पाटणकरांची शर्वरी पण टेपा लावते.संवाद तूच लिहिलेस ना बाई.

विसच वय सिरियल सुरु झाली तेव्हा 46 होत,बाळाच्या स्लँमबुक मध्ये तरी तसच लिहिल होत,पण आज त्याने त्याच वय 42 सांगितल.>>> >> सही पकडे !
मलाही बघताना आठवलं ४६ वय स्लॅमबूक मध्ये लिहिल्याचं ! आपण प्रेक्षक लक्षात ठेवतोय पण लेखक टीम विसरली आहे Happy

विसच वय सिरियल सुरु झाली तेव्हा 46 होत,बाळाच्या स्लँमबुक मध्ये तरी तसच लिहिल होत,पण आज त्याने त्याच वय 42सांगितल. >>> Happy

या स्पीड ने काही दिवसांनी विक्या ईशापेक्षा वयाने लहान होईल Happy

का "क्युरियस केस ऑफ विक्रांत सरंजामे" अशा काहीतरी मोड मधे ही सिरीज जाणार आहे यापुढे?

इतके दिवस फक्त कॉर्पोरेट वातावरण नकली होते. आता चाळीतील लोकांचेही कायच्या काय वागणे दाखवले आहे. नेहमीचे चाळीतले शेजारी लोक काय कसली पोचपाच नसलेले असतात काय. असे कोणी दुकानात जाउन आचरटासारखे विचारत नाही.

एपिसोडही बळंच पाणी घालत घालत लांबवले आहेत. निमकर, ईशा, विक्रांत हे नॅचरली वेळ काढत आहेत असे न वाटता ही सिरीज लांबवायला पाणी घालत आहेत फालतू सीन्स टाकून असेच दिसत आहे गेले २-३ भाग.

एपिसोड n
..रागावलेले बाबा
...कन्फ्युज्ड आई, ईशा
...गोगलगाय स्पीडने चाळीतून बाहेर पडते.
ट्याम ट्याम टूम टूम म्युझिक. ती ऑफिसची बिल्डिंग.
...ऑफिस ब्रेक रूम मधे उगाच कप्स इकडेतिकडे
... मायरा/झेंडे, मायरा/ईशा, ईशा/सर, टिल्लू वगैरे फालतू सीन
टायटल साँग, संपला एपिसोड

एपिसोड n+1
...सरांच्या केबिन मधे कॉफी
...सर मी काय बोलू?
...सगळे होईल बरोबर
.. तिकडे दुकानात, चाळीत ईशाबद्दल गप्पा
संपला एपिसोड

असला प्रकार चालला आहे.

दुकान रिनोव्हेट केले का? भलतेच दुकान दिसते हे. आणि तो मालक एका भागात त्याला लाथा घालतो, तर दुसर्‍या भागात त्याच्या पाया पडतो.

रस्त्यावरच्या जोडप्यांकडे निमकर जसे पाहात आहेत त्यावरून नक्कीच ते एखाद्या व्हॅलेण्टाइन डे विरोधी सेनेत सामील होणार.

सिरियल सुरु झाली तेव्हा 46 होत,बाळाच्या स्लँमबुक मध्ये तरी तसच लिहिल होत,पण आज त्याने त्याच वय 42सांगितल.>>>
इशाच्या नादी लागून बौद्धिक वय कमी होत चालले असेल..

नवा प्रोमो बघून लेखकाने खूप खालचा दर्जा गाठला असं वाटलं.. ते विनोदी दाखवायचं असेल तर अज्जिबात जमलं नाहीये..

या विषयावर किती नाजूक छान लिहिता दाखवता आलं असतं .. हजारो लोक बघतात कोण कसं घेईल सांगता येत नाही .. अर्ध्याहून जास्त लोक अश्या संबंधाचा मजाक उडवतिल ही मालिका बघून.. किती चुकीचा मेसेज जाऊ शकतो

Pages