तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हापिसातील विविध सिनीयर लोकांचा वैयक्तिक प्रेमाच्या, मैत्रीच्या आणि शत्रुत्वाच्या गप्पांमधे गेलेला वेळ = सुमारे ५० एपिसोड, प्रत्येक एपिसोड मधे किमान १० मिनीटे = ५०० मिनीटे
हापिसातील विविध सिनीयर लोक अ‍ॅक्च्युअल कामाबद्दल बोलण्याचा वेळ = ५० पैकी ४-५ एपिसोड्स, त्यात सुमारे १० मिनीटे = सुमारे एक तास
त्यातील इतक्या मोठ्या कंपनीतील काम म्हणून विश्वासार्ह वाटेल असे काम कोणीतरी करण्याचा एकूण वेळ = सुमारे दहा मिनीटे*

* यात एफएम व इतरांनी सरांना चहा, कॉफी, ग्रीन टी देणे हे धरून.

ईशानेही अजून राजनंदिनी साडी डिपार्टमेण्टच्या एकाही कामाला हात लावलेला दिसत नाही.

सर नसताना ईशा "मॅम" सायनिंग ऑथोरिटी? ते ही लग्नाआधीच? आणि लग्नानंतरही किस खुशीमे? हा फॅमिली-रन बिझिनेस आहे का? तसे असेल तर बोर्ड मीटिंग वगैरे काय वेळ जात नाही म्हणून का?

या विक्याला स्वतःचे औषध स्वतः घेता येत नाही का? त्याच्या गोळ्या मायराच्या केबिनमधे आणि ती अलार्म लावून देणार!

मधे इथेच कोणीतरी लिहीले होते ना? या अनेक सिरीज मधे ऑफिस मधले काम म्हणजे फाइल्स, अपडेट, कॉण्ट्रॅक्ट, बस. ईशाने आजच्या भागात निदान पहिला बॉल टाकला कामाचा. "फाइल मधे अपडेट करा. तू साडीचे अपडेट दे. शेवटच्या पानावरच्या डीटेल्स कडे लक्ष द्या. मॅम हे डीटेल्स बरोबर आहेत?" साडीचे कसले आले आहेत अपडेट? आणि कॉर्पोरेट ऑफिस मधे जिन्याखाली स्टार्टअप सारखी जागा दिली आहे राजनंदिनी साडी डिपार्ट्मेण्टला, मोठ्या दुकानाच्या बाजूला आपल्या गावाकडच्या मुलाला छोटा स्टॉल लावून देतात तशी?

मोठमोठ्या कंपन्यांमधे एखादा सिनीयर व्हीपी आणि एखादा डिपार्टमेण्ट हेड यांचे पटत नाही असे आपण अनेकदा वाचतो. ते किती चपखल दाखवले आहे! असेच होत असेल. म्हणजे सीईओ ला औषध कोणी द्यायचे याबद्दल या लोकांचे लिफ्टसमोर आणि इतर ज्यु. कर्मचारीवर्गासमोर वाद होत असतील.

या सगळ्या गोंधळात निमकराचे पात्र मात्र कन्सिस्टंट आहे. त्याचे संवाद आणि त्याचा अभिनय दोन्ही या स्वभावाचा माणूस रागात असताना, वैतागलेला असताना जसा वागेल तसेच तो वागतो. टिल्लू ला सुनावतानाही तो अवाजवी डॅशिंग वगैरे होत नाही.

एपिसोड संपतानाचा ईशाचा "बास. तुम्हाला हे शोभत नाही" संवादही जमला आहे.

हे कॉर्पोरेट ऑफिस आहे की पुण्यातली सारसबाग(पुण्यातला सारसबागेचा उल्लेख केला आहे कारण सुभा आणि बाळ पुण्याचे आहेत,पुणेकरांनी रागावू नये.)
तर बागेत असल्यासारखे हातात हात घालून सगळ्या ऑफिसस्टाफसमोर विस बाळाला घेऊन काय जातो,कॉफी काय घेतात,बाळ हेड आहे ना,मग स्वत:कशाला खुर्ची सोडून स्टाफला काम सांगायला जाते(अशी आयती मिळालेली खुर्ची सोडायची नसते,याचे धडे दिले नाही वाटत विस ने,मग विसच्या सांगण्यावरून मायराला झापते काय,गोळ्या काय हिसकावून घेते,मिहीर आणि सपना ला काय ,काम नाही का म्हणून बोलते,(अग मग तू काय करत आहेस),तो जरा उ्रमटपणा वाटला तरी मायराला झापलेल बघायला आवडल.बाळ स्टरेट ड्राईव्हच मारायला लागल आहे,असो आणि कहर म्हणजे लिफ्ट मधून जाव लागण्याइतका विसचा मजला (केबिनचा हं,बौध्दिक नाही,तो बाळामुळे पार धुळीला मिळाला.)नेमका कुठे आहे? आणि कॉनफिडन्सच दाखवायचा आहे ना बाळाला ,मग मायराला काम सांग ना,गोळ्या वगैरे काय, भलतच आणि काय विस यावर म्हतो प्यार की ताकद,मग ही ताकद ईबाबांसमोर हातात हात घालून चालत त्याच्या घरी दाखवा ना.
काय ते ऑफास,ते काम अशक्य आहे.
पण काल टिल्लूंचा डायलॉग जाम आवडला"निमकर,तुमचे जावई तुमच्यापेक्षाही वयाने मोठे आहेत का हो"
पण झेंडेनी तलवार एकदम म्यान का केली कळल नाही.

UP Happy हो इतके दिवस एकाच फ्लोअर वर आणि एका मोठ्या हॉल मधे सगळे काम चालत होते. आता अचानक बहुमजली झाले, एक रिस्पेशनिस्ट आली आहे. आणि ते हातात हात वगैरे जरा जास्तच झाले आहे.

निमकर,तुमचे जावई तुमच्यापेक्षाही वयाने मोठे आहेत का हो>>>>> ओह! असं बोलला टिल्लु? अरेरे! बिचारे निमकर.
मला निमकर बाबांसाठी वाईट वाटतं. Sad

रश्मी,मेधावि,दोन्ही उखाणे आवडले.मस्त.
बाळ सरांना बास ,फिल्मी होतय अस म्हणाल,कित्ती इनोसंट आहे हे बाळ ,याआधी ते जे काय करत होत ते फिल्मी नसून आर्ट फिल्म होती म्हणजे अगदी नॉर्मल रिअलिस्टिक होत तर.

मायराला झापण्याच्या भागात सरांचा शर्ट छान होता. पण दोन बायकांच्यात स्वतःवरून लढाई लावणे. एका एंप्लॉईच्या हातात हात घालून ऑफिसात बागडणे ह्याने जनरल वर्किंग वुमेन बद्दल किती वाइट इंप्रेशान होते हे लेखकास कळत नसावे. सॅड.

नाही..ते ऑफीस मधे हातात हात घालून जाणे .... (तेही अगदी विजयी वीराप्रमाणे...जमाने क्या डरना वगैरे स्टाईलने) जरा अतीच होते....
काय कारण इतका ड्रामा करण्याचं?
विक्रांत सी ई ओ (की एम डी?) आहे ना...मग असे वागणे त्याला शोभते का?
आणि गोळ्या देण्याचे काम मुळात दुसर्‍याला डेलिगेट करायचेच का ? कैच्या कैच!
फारेंड...
"फाइल मधे अपडेट करा. तू साडीचे अपडेट दे. शेवटच्या पानावरच्या डीटेल्स कडे लक्ष द्या. मॅम हे डीटेल्स बरोबर आहेत?" साडीचे कसले आले आहेत अपडेट? आणि कॉर्पोरेट ऑफिस मधे जिन्याखाली स्टार्टअप सारखी जागा दिली आहे राजनंदिनी साडी डिपार्ट्मेण्टला, मोठ्या दुकानाच्या बाजूला आपल्या गावाकडच्या मुलाला छोटा स्टॉल लावून देतात तशी? .... हे मस्त! Happy

मला उगवल्या मिशा, तेव्हा जन्मली ईशा " >> Lol

मला लागली कवळी तेव्हा जन्मली टवळी >> अग्गागा Lol
तुफान आहेत सर्व प्रतिसाद Happy

Mala tar vatate ki Ishach lagnananter khara svabhav dakhvel... Btw, how to type in Marathi from mobile app?

Mala tar vatate ki Ishach lagnananter khara svabhav dakhvel... Btw, how to type in Marathi from mobile app?

इशाचा एकाही कामाला उपयोग नाही. ना घरच्या ना दारच्या न ऑफीसच्या. स्वयंपाक येतो असं वाटत नाही. दिसत नाही. चहा पण नीट ढवळता नाही येत. ना धड घडाघडा बोलता येत. सांगितलेलं पटापटा कळतही नाही. नंतर स्वभाव बदलला तर चांगला फरक पडेल कदाचित. आत्ताचं कौतुक तो सरंजामे सटकल्यामुळे चाल्लय फक्त. तिच्यापेक्षा जास्त काम तर ती सपना करत असते.

काल बाळाला एका एम्प्लॉयीने अहो मॅम हे डिटेल्स चेक करता का असे विचारल्यावर , बाळाने स्क्रीन वर नजर टाकुन आपल्याला ऑफिसात खूप महत्व आहे, आणी आपल्याला खूप काही समजतयं असे हावभाव दाखवले. नंतर मग मायराच्या हातुन औषधाची बाटली हिसकावुन घेणे असे बरेच विनोदी प्रसंग सादर केले.

केड्या आणी सुभा यांनी इथे येऊन जर हा अख्खा धागा वाचला तर त्या दोघांची पात्रे आत्महत्या करतील.

अरे काय एकेक सुटलेत Lol

फारेंड मस्तच Lol

मागच्या पानावर सुलू यांनी लिहिलंय त्यापैकी तो मनोरुग्ण जुळा भाऊ logic मस्त, त्याच्याशी लग्न करून दिलं की इशाबाई सुधरवतील त्याला, मग खरा व्हिलन विस असेल आणि ते ती prove करेल. तद्दन फिल्मी आहे म्हणा पण यातलं काही इशातैना जमेल असं वाटत नाहीये.

जेव्हा ईशा मायरा ला झापुन येते तेव्हा सुभाला तिला अस दाखवायचं होत की "मला सवय नाही असं बोलायची वागायची आणि मी बोलून आले ई. " तिचे डायलॉग तसे होते पण ती भीती , आपण काय करून आलो ना असे भाव अज्जिबात नव्हते..
मुलगी जाम टिपिकल बोरिंग आहे.. नुसतच मोठं हसते पण प्रेमळ भाव नाहीत..
सुभा कूल होत निघाला आहे.. टेन्शन फ्री .. मनातलं बोलून दाखवल्यावर ओझं कमी झाल्यामुळे निवांत ..

हे सगळ वाचून माझा ईशा वरचा विश्वास उडाला ..
मी पुण्याला परत जात आहे Happy
तिथे भेळ खाईन, सारस बागेत
########
Rofl

हे सगळ वाचून माझा ईशा वरचा विश्वास उडाला ..
मी पुण्याला परत जात आहे 
तिथे भेळ खाईन, सारस बागेत>> Rofl

हा किडा कोणाच्या डोक्यात आला ते पाहून आले बरं का मी. Proud

Pages