Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुभा छान दिसला.>>>>>>> ho
सुभा छान दिसला.>>>>>>> ho Khup Chan Ekdam mast... Romantic Disala khup...
Isha madhye pan improvement disatey...Subha Kadun Halu Halu shikat asel.. Friday chya episode madhye pan Ticha performance more than OK hota....
बाळ किती उद्धटपणे बोलत होती
बाळ किती उद्धटपणे बोलत होती विस ला - अर्ध्या वयाच्या मुलीसोबत फिरायची लाज वाटते का, गुडघे दुखतात का इ इ>> त्यानं म्हणायला हवं होतं...1/3500 पट बरोबर फिरायची लाज वाटते.
आजच्या भागात दोघेही छान
आजच्या भागात दोघेही छान दाखविले आहेत.
बाळ किती उद्धटपणे बोलत होती विस ला - अर्ध्या वयाच्या मुलीसोबत फिरायची लाज वाटते का, गुडघे दुखतात का इ इ>> ते तर मालिका सुरु होताना प्रोमो दाखव्त होते तेव्हा त्यात हेच बोलत होती.
स्लॅम्बुकात विधूर लिहिले असते तरी चालले असते कि... ती काहीही माहीत नसताना सुद्धा मागे लागलीच होती हे विसला कळायला हवे होते.
त्या जाळिंदरने नंदिनीला मारले असणार आणि मग तिचा पुनर्जन्म म्हणजे इबाळ अवतरले असणार. तसेही राजनंदिनी साडीचा खपही कमी झालाय तर तो वाढवायचे महान कार्यही करायचे आहेच.
इबाबा लगेच लग्नाला परवानगी देणार नाहीत. मग हिला पौर्णिमा/अमावासेला/अष्टमीला झटके येतील त्यामुळे घाबरुन तेही मान्यता देतील. मग लग्न. दिपीका-रनवीरच्या लग्नापेक्षा भारी लग्न कराय्चे असे एकदा विस म्हटला होता. पण त्याहीपेक्षा जास्त प्रेक्षणिय काय असेल तर झेंडेंचा 'हैदौस नाच'.
इबाळाचा वावर त्या घरातल्या लोकांना सेम नंदिनी सारखा वाटणार. २-४ वेळा Déjà vu होणार मग त्यांची खात्रीच होणार कि.... हिच ती! तिच ही!
आता जाळी पुन्हा काहितरी वाईट करायला जाणार पण यावेळी इबाळ तसे होऊ देणार नाही. ते दोघे मिळून जाळीला धडा शिकवतील.
मागे एकदा 'तुमच्या वडिलांनी
मागे एकदा 'तुमच्या वडिलांनी सुरू केलेली पहिली कंपनी म्हणजे राजनंदिनी साडी' असं आईसाहेब म्हटल्याचं आठवतंय..
केड्या आणि शर्वरी विसरलेत का हा डायलॉग?
अतिशय विस्कळीत, असंबद्ध,
अतिशय विस्कळीत, असंबद्ध, धेडगुजरी आहे ही मालिका... पूर्ण निराशा केली आहे...
शिकाऊ लोक जसं असंख्य चुका करतात तशातली गत वाटते
केवळ ८.३० चा स्लॉट मिळाला तर दाखवा काहितरी
फा, तुमचाया सगळ्या पोस्ट्स
फा, तुमच्या सगळ्या पोस्ट्स एकत्र करून बनलेला मेसेज व्हाॅएपवर मिळाला. जोरदार व्हायरल झालाय.
थॅन्क्स मेधावि. तो फेबुवर मी
थॅन्क्स मेधावि. तो फेबुवर मी एक १० पॉइण्ट्स्ची लिस्ट करून पोस्ट केला होता. कोणीतरी तेथून कॉपी केला असावा
व्हॉअॅ वरचे कोणी अशी मेहनत घेतील ही शक्यता कमी आहे
असा फिरत असेल तर मलाही येइल परत बहुधा
बाळ किती उद्धटपणे बोलत होती
बाळ किती उद्धटपणे बोलत होती विस ला - अर्ध्या वयाच्या मुलीसोबत फिरायची लाज वाटते का, गुडघे दुखतात का इ >>>. मलातरी तीने तसे चिडविने आवडले, अन ते ऊद्धट नाही वाटले , चालते की ईतके एका कपलमध्ये
स्पेशल एपी म्हणुन बघीतला कालचा भाग, त्यात ईशा छान दिसत होती अन सुभा अती म्हातारा, अगदी ईशाची दया यावी असा
महाएपिसोड आला नाही यप
महाएपिसोड आला नाही यप टीव्हीवर अजून.
त्याआधीचा भागः
चाळीवर नवीन पाटी लागणार असे दिसते
"आमचे येथे मोठमोठ्या कंपन्यांच्या बिझिनेस सिच्युएशन्स्वर उपयोगी पडणार्या गोष्टी सांगून मिळतील"
- ईशा निमकर
(आजचे स्पेशल डील - एका गोष्टीवर एक चकली मोफत)
ती मायरा काय जाम पकली असेल ईशाला. जरा कोठे आशेचा किरण दिसला, जरा कोठे ते सरांच्या समोरचे फेक हास्य दाखवते त्याऐवजी दिलखुलास हसली, की ही समोरून टपकते स्लो मोशन मधे. ईशा समोरून जाताना मायरा व झेंडे दोघांचे चेहरे एकदम टॉम अॅण्ड जेरी मधे टॉम च्या समोरून त्याचे खाद्य घेउन जेरी गायब होतो तेव्हा त्याचा चेहरा होतो तसे.
अरे वर्किंग डे आहे ना आज? आधी प्रेमातील गोंधळामुळे ईशा घरी, आता सरांनी समजावल्यावर पुन्हा घरी. ही काम कधी करणार? आणि ते डिपार्टमेण्ट हेड वगैरे काय झाले?
पण महाएपिसोडची उत्सुकता वाढवायला आधीचा एपिसोड संपवताना "सेट अप" चांगला केलाय.
इशा प्रोमोत जास्त सुंदर दिसली
इशा प्रोमोत जास्त सुंदर दिसली होती कालच्यापेक्षा. त्याने मॅरी मी? विचारले तेव्हाही मस्त भाव दिले.
अबोल....जेव्हा प्रेमाचे सिन्स
अबोल....जेव्हा प्रेमाचे सिन्स असतात ना तेव्हा बाळ उत्साहीच असत.काल नाही का स्वत:च विचारल स्वत:ला की सर मला मनातल सांगणार आहेत का? कसं तयार होऊन गेल.बनेलपणाचा अर्क आहे.
मी म्हणे ग्रुहीत धरल होत की तुमचा काही भूतकाळ असेल
अरे,म्हणजे तुपारे ने हा अलिखित नियम केलि आहे की काय की 45 वय अहलेल्या माणसाला काहीतरी लपवण्यासारखा भूतकाळ असतोच.
तेव्हा बर बाळ चुरुचुरु बोलत,कशा सगळ्या इच्छा पूर्ण करून घेतल्या बाळाने.
पण मायरा समोर काय होत.बहुतेक मुद्दाम इनोसंट असल्याच सरांसमोर दाखवायच ,मग विकू येइलच ते डोळे पुसायला.
पण बाळ एवढ नटून जात होत तर ईबाबांना जराही संशय नाही आला.
अतिशय विस्कळीत, असंबद्ध,
अतिशय विस्कळीत, असंबद्ध, धेडगुजरी आहे ही मालिका... पूर्ण निराशा केली आहे...>>> अगदी खरे... अति गाजावाजा केलेला कालचा एपिसोड म्हणजे कशाचा कशाला मेळ नव्हता ... दोघांच्या अभिनयात chemistry तर सोडाच थोडे देखील कॉ-ऑर्डिनेशन नाही .. ती इशा सतत बधीर चेहऱ्याने भलतीकडेच बघत होती
.. काल तर किती स्कोप होता अभिनयाचा ... अनेक तरल भाव एक्सप्रेस करता आले असते .. ते character च इतके बालिशपणे लिहिलंय ..माणूस इतके जीवाभावाचे बोलतोय .. आणि म्हणे मी प्रेसेंट उघडू का? गम्मत केली म्हणे .. काहीही.

काय त्या ठिणग्या .. अर्ध्या वयाच्या मुलीबरोबर/गुडघे दुखतायेत का वगैरे.. "माझा भाऊ रांग लावेल हो हव्या त्या फिटनेस expertsची... ३५०० कोटींचा turnover आहे" असे ठणकावून सांगणारी एखादी बहीण हवीये विसला .. नाही तर काही खरे नाही
बाकी "मुळशी पॅटर्न" पब्लिकला GF ला प्रपोज "मारायला" बऱ्याच आयडिया मिळाल्या काल

अबोल....जेव्हा प्रेमाचे सिन्स
अबोल....जेव्हा प्रेमाचे सिन्स असतात ना तेव्हा बाळ उत्साहीच असत. ... ..........>>>>>>>>>>>>>> ते असत.... पण मी तिच्या expressions मध्ये सुधारणा थोडी दिसली मला पहिल्या पेक्षा.. अस माझ personal मत...
ह्या सिन मध्ये ने मॅरी मी? विचारले तेव्हाही मस्त भाव दिले. जेव्हा मेधावि नि म्हट्ल्या प्रमाणे...
१०९ नवीन मेसेजेस !!!
१०९ नवीन मेसेजेस !!!
धमाल आली वाचायला
एकदाचा पार पडला महा एपिसोड.
एकदाचा पार पडला महा एपिसोड. एक्दम लाल ईश्क स्टाईल! (ईमॅजीन ईबाळ डांसिंग ऑन मोहे रंग दो लाल..!)
अख्या एपिसोड मध्ये ईबाळाच्या प्रश्णांच्या सरबत्तीवर प्रेक्षकांचीच अधिक चिड्चिड झाली असावी.. विस कूल होता. काही ठिकाणी खूपच करमणूक झाली:
सर, हा पियानो आहे ? खरा आहे का? कोण वाजवतो?
विस वैतागूनः टॉमी आणि जिमी (दोन कुत्रे... ).
त्यातही विस ने निव्वळ एका हाताने पियानो वर टायटाल साँग वाजवून दाखवले. कसं काय जमतं बुवा. मला वाटले आता ईबाळ विचारेलः सर, हे तर आपले शीर्षकगीत? तुम्ही बसवलय?
नशीब हे नाही विचारलं: सर, हे हेलिकॉप्टर खरे आहे? ऊडते?
मनापासून वाईट वाटलं विस बद्दल.. किती तो आटापिटा केला प्रपोज करायला आणि बदल्यात काय तर गुडघे दुखी चा टोमणा. हा लेखकाने सुभा वर ऊगवलेला सूड आहे बहुतेक. केड्याला द्राक्षे आंबट!
आता ईबाबा व ईआई चे संवाद काय असतील याची उत्सुकता. ईबाबांनी खरे तर विस ची समजूत काढायला हवी आहे.. अभी भी वक्त है, संभल जाओ..ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू...
ये दो रूपये बडे मेहेंगे
ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू.>>>>>

ते गुढगेदुखी वाला संवाद खट्याळ पद्ध्तीने होणे अपेक्शित असावं.. इशाच्या मुळे ते चिडवणं जास्त वाटलं
तिचं एकुणच कॅरॅक्टर निरागस , खट्याळ करायच असावं (खुप अपेक्शा) पण झालयं बाळ...
>>खट्याळ करायच असावं (खुप
>>खट्याळ करायच असावं (खुप अपेक्शा)
खळ्ळ खट्याक झालय...
ये दो रूपये बडे मेहेंगे
ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू.>>>>>

हे माझं घोर अज्ञान आहे
हे माझं घोर अज्ञान आहे माहितेय पण केड्या चा लॉंग फॉर्म काय सांगा ना कोणीतरी प्लिज
ये दो रूपये बडे मेहेंगे
ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू.>>>>>

सुबोधचा काॅन्फीडन्स इशा समोर
सुबोधचा काॅन्फीडन्स इशा समोर आली की गडबडतो बहुतेक. तिचा कमरबंद बांधताना लहान मुलीला आजोबा लावतील तसा लावून दिला त्यानं. मी शारुक्क कसा लावेल ते इमॅजिन केलं. इतक्यांदा तो हातात हात द्यायचा सीन...
सर, हे तर आपले शीर्षकगीत? तुम्ही बसवलय?>>महालोल. हे तर आपले बालगंधर्व इस्टाईल.
ये दो रूपये बडे मेहेंगे
ये दो रूपये बडे मेहेंगे पडेंगे बाबू.>>>>

मिंत्रावर राजनंदिनी ब्रॅण्ड आहे खरंच. साड्या आणि ड्रेस मटेरीयल.
मनीमोहोर.....केड्या म्हणजे
मनीमोहोर.....केड्या म्हणजे माझ्या नवर्याची बायकोमधला केडी,शनायाचा इरसाल मित्र. खरे नाव अभिजित गुरु.ती त्याला केड्या म्हणत असते
त्या आणि ह्याही मालिकेचा स्रिक्प्ट रायटर.समिधा गुरु माहित असेल तर तिचा नवरा.
फारएण्ड......good observation
फारएण्ड......good observation.eka hatane piyano..
बाबा लेकीला कौतुकाने शिकवत आहेत अस वाटत होत
बाकी बर्याच ठिकाणी गंडल्यासारखा वाटला.काही प्रश्न अपेक्षित होते बाळाकडून.फालतू प्रश्नांपेक्षा महत्त्वाचे होते
सर,बाकीच्या घरातल्या माणसांना कुठे पिटाळलत?
बाबांनी ऑफिसमध्ये फोन करू नये म्हणून सरंजाम्याच्या ड्रायव्हरचा फोन नाही वापरला बाळाने आणि नंतर तळ चक्क पुढच्या सिन मध्ये गुलाबाच फूल घेतल
नंदू नेमकी कधी आणि कशाने गेली हा तर प्रश्न हवाच होता.पण ते बाळ नको ते प्रश्न विचारत बसल होत.
यातून तिचा निरागसपणा नाही तर मूर्खपणा दिसला.
ते ती म्हणते घर किती छान ..
ते ती म्हणते घर किती छान .. डा. टेबल किती छान .. ते पण हवरटासारखं वाटलं.. विस बापडा प्रपोज करायला बघतोय आणि हीच तिसरच..
वीस आपला बाळापाठीमागे .. बाला बशले इकल.. तुला गम्मत सांगतो करत बसला होता.. आणि बाळ हुंदडत होत..
ते चिडून पळून जाणे आणि वर मज्जा केली म्हणणे अगम्य..
>>ते चिडून पळून जाणे आणि वर
>>ते चिडून पळून जाणे आणि वर मज्जा केली म्हणणे अगम्य..
मला तर वाटले ईबाळ आता म्हणणारः
सर, आता मोठ्याने शंभर आकडे मोजा बघू.. त्या आधी मला शोधून काढलत तर फाऊल हा. . आता असं बघा हं.. (आणि फेमस पॉझ) तुमचं घर एव्हडं मोठं आहे. लपायला जागा शोधायला थोडा वेळ तर लागेलच ना.
नशीब मागू येऊन भॉक नाही केले! कडेलोट झाला असता विस चा.
प्रसंग काय, बाळ करतय काय..
खरे तर एव्हाना रागाने विस त्या हेलिकॉप्टर मधून ऊडून जायला हवा होता, पियानो सकट. आता बस म्हणावं. पिया गेला, पियानो गेला हाती आला टील्लू. पण पुरता फसलाय तीच्या जाळ्यात. बापडा!
महाएपिसोड छान झाला . ईशाचे
महाएपिसोड छान झाला . ईशाचे एक्सप्रेशन्स सुधारतायत हळूहळू.
सुभा आणि गायत्री दोन्ही छान दिसत होते. शुटिन्ग ड्रीम- सॉन्ग सारख केलय.
ईशाची आई जेव्हा 'कुणी घर देता का घर' अस ओरडून बोलत होती तेव्हा वाटल, आता अख्खी चाळ तिच्या घरी लोटेल आणि विचारेल , "अहो, काय झाल ईशाची आई, तुम्ही का ओरडल्या, आम्ही केवढे घाबरलो हो. "
ते अर्ध्या वयाची मुलगी/ गुडघे दुखणे प्रोमो मध्ये सुद्दा बघितल होत. पण तेव्हा ईशा विसला 'तू' म्हणत होती.
पियानो वाजवल्यानन्तर ते दोघे एकमेकान्कडे बघत बसतात, तेव्हा फक्त ईशाचा चेहरा दाखवला, विसचा नाही.
मला अस का वाटतय की विस नन्दूच्या डेथबद्दल काहीतरी खोट सान्गतोय? तो जेव्हा ' ईशा तुझ्यापासून लाम्ब जात आहे. तिला मनव.' म्हणतो तेव्हाही खोटा वाटत होता.
ते चिडून पळून जाणे आणि वर मज्जा केली म्हणणे अगम्य.. >>>>>>> +++++++१११११११
नन्दूचा पुनर्जन्म ईशा आहे अस नाही वाटत, कारण जर असत तर ईशाला बन्गल्यात एन्ट्री मारताक्षणीच 'मला हे सगळ आधी कुठे तरी पाहिल्यासारख वाटतय.' ( करण अर्जून स्टाईल) अस वाटायला हव होत, स्पेशली तो पियानो बघून. पण इथे तर बाईसाहेब ' हे सर्व फक्त पिक्चरमध्येच बघायला मिळायच.' अस बोलल्या. (कपाळावर हात मारणारी बाहुली )
गार्डन छान होत. पण ते खर नाही अस वाचलेल मी इथे.
शेवटचा सीन तर भारी होता. दोघान्चेही एक्सप्रेशन्स छान होते. फक्त ती अन्गठी कैच्याकैच होती.
मायरा आणि टिल्लूची ओळख कुठे झाली?
टिल्लूला ते फोटो दाखवण्यासाठी मायराची परमिशन लागते? मायराने ' सॉरी ईशा' ऐवजी ' सॉरी विस' म्हणायला हव होत.
मला हे सगळ आधी कुठे तरी
मला हे सगळ आधी कुठे तरी पाहिल्यासारख वाटतय.' >>
ते कर्जतच्या देवळात झालं वाटतं ना
महा एपिसोड च्या थोड्या क्लिप
महा एपिसोड च्या थोड्या क्लिप पहिल्या... अस वाटलं आपली झी बाबत जी तक्रार होती की मालिका सुरू होण्यापूर्वी जे प्रिव्हू दाखवतात ते मालिकेत दाखवत नाही हे खोडून काढण्यासाठीच हा एपिसोड होता की काय... इशा पण ते अर्ध्या वयाच्या मुलीसोबत,घुडघे दुखतात का,मोठी माणसं चालतं जात नाही का वगैरे हे सगळं प्रोमोतल सगळं एका दमात भडाभडा बोलली....म्हणजे कधी एकदा हे बोलून टाकतीये अस झालं होतं तिला.... आणि परत खरखर सुरू झाली...मध्ये जरा कमी करत होती खरखर....
आणि हो....महाएपिसोड मधलं सगळ्यात जास्त काय आवडलं तर बेबी च कानातले.... ते सोडून मला काही काही आवडलं नाही बुवा... अगदी सु भा पण नाही...
धमाल मालिका अन् त्याहून धमाल
धमाल मालिका अन् त्याहून धमाल इथले सगळे प्रतिसाद

Pages