तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा _/\_ Lol

शेजारी राहुनही रुपालीला निमकरांचं लग्न झालंय हे माहित नसतं ये जम्या नही.
बाकी स्टोरी जमलीये. प्रत्येक खरेदीवर एक राजनंदिनी साडी हवी आहे का वाली आयडीया इशाच्या सगळ्या आयडियांइतकीच भारी आहे Happy

शेजारी राहून रुपालीला लग्नाचं कळत नाही कारण पुष्पा त्यांना "अहो निमकर" अशी हाक मारत असते.... परफेक्ट लाॅजिक आहे फा. नंतरच्या महाएपिसोडात अत्यंत नाट्यमय प्रकारे ह्या रहस्याचा उलगडा करू आपण. मग पुढल्या भागात मधे.....मग इशाचं बाबा कोण थ्रेड चालू करू. आणि मग पुष्पाचं चाळीतलं बालपण कसं गेलं वगैरेपासून सुरु करून टाकू.....त्यात जबरदस्त फ्लॅशबॅकनं माहीमकरांना पण घेता येईल. आधी पायांवर कॅमेरा....वर सरकत सरकत....हातातल्या टमरेलापर्यंत...आणि मग क्लोजप मधे ठाॅक ठाॅक....:)

ए मध्येच एक पुष्पाचे वेट लॉस व मेक ओव्हर वर १० एपिसोड टाका बरे का. निमकर रुपालीत गुंतल्याने चेव येउन ही वजन कमी करते.
साडी स्लीव्ह्लेस ब्लाउज मोकळे सोडलेले सरळ केलेले केस, वागण्या बोलण्यात सॉफिस्टिकेशन. मग तिला पण एव्हीपी मह्णून विक्या जॉब देतो.
कारण तिला अ‍ॅब्सोलुट ली स... स्के जुलिम्ग वगैरे नीट म्हणता येते. मेल अलाइन करता येते. व तिने हेलिकॉप्टर रिपेअर करायचे पण शिकून घेतले आहे. मग विक्या इशाला वैतागल्याने ही ऑप्शन ओपन आहे का ते तपासतो. मग निमकर वैतागून पोथी वाचत बसतात. पण पुष्पा दो चुटकी सिम्दूर की कीमत तुम क्या जानो विक्रातं जावईबाबू म्हणून परत येते घरी.

मग प्रेक्षक सुखाने नांदू लागतात.

बघा ना सर, हे माबोकर
आपली किती खिल्ली उडवतात ..
पण काळजी करू नका सर, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना सर.. सगळ नीट होईल :
:विचित्र गोन्धळात पडलेली भावली:

काल रुपाली चा अभिनय बघुन .. सुभाला हिच माझी खरी ईशा वाटलं असावं
बनेल इनोसंस नव्ह्ता वाटत तिच्या अ‍ॅक्टिंग मधे

काल ईशा किती ऑर्डिनरी दिसत होती त्या गाऊन मधे..... अगदीच रद्दी!
म्हणजे ठीके गरीब दाखवली आहे..पण ग्रेस फुल आणि सुंदर तरी किमान दिसायला हवी ना हिरॉईन?
सुबोध ने खोटी खोटी अ‍ॅक्टींग पण कमाल दाखवली....

प्रेक्षकांना विश्वासात घेऊन इ आणि रु ची अदलाबदली करायला सांगायचं का? फार फार मजा येइल. मस्त खेचाखेची झाली काल. सुबोधला मनापासून आनंद झाला असेल.

पाढरी-काळी दाढी फक्त जगात दोनच व्यक्तिना शोभुन दिसते एक अमिताभ आणी दुसरा क्लुनी बाकी सगळे कळकट्ट पारोसे वाटतात.>>>>> प्लिज ऍड थाला अजित....

सुबोध ने खोटी खोटी अ‍ॅक्टींग पण कमाल दाखवली.. >>>>>> ++++++११११११११

पण रुपालीला ईशाने विसने प्रपोज केल्याच सान्गितल नाही का? घरी नाही निदान ऑफिसमध्ये तरी सान्गू शकली असती. हिने रविवारी ईबाळाला नटूनथटून जाताना बघितल नाही का? Uhoh

तो ज्योतिष 'नरपिशाच्च आला' वगैरे बडबडत होता. ज्योतिष आहे की मान्त्रिक? यावरुन सिरियल सुपरनॅचरल वळणावर ( नन्दूच भूत) जाणार आहे अशी खात्री पटायला लागली आहे थोडी थोडी.

ईबाबान्ची चिडचिड परफेक्ट. Happy

फा, अमा तुम्ही अशक्य आहात. Rofl

आणखी एक थिअरी:
ज्योतिष मुलाच नाव 'ग' वरुन सुरु होईल अस म्हणाला. सो, एक डाउट असाही येतो की, सुभा डबलरोलमध्ये असावा. विसचा जुळा भाऊ असावा 'ग' नावाने सुरु झालेल्या अक्षरापासून. नन्दू ही त्याची बायको असावी. तिच्या मृत्यूमुळे 'ग' मनोरुग्ण झालेला असेल. त्याला 'त्या बन्द खोलीत' ठेवल असेल विसने. (विस 'मी पाच दिवस एका रुम मध्ये बन्द होतो' अस नन्दूच्या डेथविषयी सान्गताना ईशाला म्हणाला होता.) सो, विसचा प्लॅन ईशाचे लग्न मनोरुग्ण 'ग' शी लावायचे असेल. 'ग' त्याच्याच वयाचाच असेल. विस ईशाला प्रेमाच्या जाळयात ओढून ऐनवेळी तिच लग्न 'ग' शी लावेल.

दुसरी थिअरी:

'ग' नावाचा तरुणच मुलगा असेल विसचा मनोरुग्ण भाऊ म्हणून. सध्या एका सन्घटनेने ' सिरियल बन्द करा' किव्वा 'स्टोरी बदला' अशी धमकी दिली होती. सो, चॅनलने स्टोरी बदलली असेल.

तिसरी थिअरी:
विसचे खरे नाव 'ग' ने सुरु होत असेल.

वरच्या तिन्ही थिअरीजवरुन जालिन्दरच 'विस हा खोटा माणूस आहे. विश्वासघात आणि विस ची जात एकच आहे' म्हणण खर ठरत.

मला वाटते विसचे खरे नाव 'ग'वरून असेल. सरंजामे नी त्याला दत्तक घेतले असणार.

तो ज्योतिष 'नरपिशाच्च आला' वगैरे बडबडत होता.>>>'कर्णपिशाच्च'

सुलु.......तीनही थिअरीज आवडल्या.पण वासजा जुळा भाऊ पण बाळाचे बाबाच वाटतील आणि त्यात तो मनोरूग्ण असेल तर ऑलरेडी त्या घरात जयदीप नावाचा एक क्रँक आहे .मग विकूचा भाऊ आणखीन एक क्रँक आणि बाळ तिसर क्रँक.सरंजामे पागलखाना होईल.तिसरी थियरी जास्त प्रॉमिसिंग वाटते.विकूच खर नाव ग ने सुरू होत असेल
पण मग बाळाला का फसवेल.कारण त्यात त्याचा हेतू काय?
पण एक गोष्ट जाम खटकली,झेंड्यांनी एकदाही विकूला हा प्रश्न विचारला नाही की तू पास्ट सांगितला का,एवढा ढिसाळ कारभार कसा झी चा.

बाळ सोकावलंय. आपली कसलीच लायकी नसताना केवळ मालकाला गटवून मिळू घातलेल्या अधिकारांचा व सत्तेचा गैरवापर करायला लागलंय.

बाळ सोकावलंय. आपली कसलीच लायकी नसताना केवळ मालकाला गटवून मिळू घातलेल्या अधिकारांचा व सत्तेचा गैरवापर करायला लागलंय.

विक्रांत नाॅर्मल झालाय आता. मस्त धमाल करायला लागलाय. आधी कथा ITU ILU मधे अडकल्यामुळे आख्ख्या जगाचं ओझं डोक्यावर घेऊन फिरायचा. आता ILU चा बोळा निघाल्यामुळे कथेला वेग येईल असं दिसतंय.

बाळाला विसच्या मिठीत बघूनही ईबाबांना बाळाबद्दल विश्वास आहे की आपल बाळ विसना फादरफिगर समजते.बिचारे कित्ती भोळे.
बाळ आज कॉन्फिड्न्ट कमी आणि उर्मट वाटत होते.

ज्योतिष मुलाच नाव 'ग' वरुन सुरु होईल अस म्हणाला. >>>> आणी मला गणेश गायतोंडे च आठवला Lol

चक्क रुपालीसारख्या बेस्ट फ्रेंडला अजून प्रपोजचे कळले नाहीये. Uhoh
जालिंदर मामांच्या ट्रॅक चं काय झालं.?? आता मागे लागणं सोडलं का? सगळेच विसरून गेले.

जालिंदर मामांच्या ट्रॅक चं काय झालं.?? आता मागे लागणं सोडलं का? सगळेच विसरून गेले.>> तो अजुन बिर्याणीच खातोय.

जालिंदर मामांच्या ट्रॅक चं काय झालं.?? >>> ते हिंदी सिनेमातल्या मारामारीसारखं असेल. त्यात कसं १० गुंड असतील तरीही एक एक करून मारायला येतात तसे यातले व्हिलन एकेक करून छळायला येत असतील. सध्या पुन्हा मायराची टर्न आहे Proud याआधी टिल्लू झाले. त्याआधी झेंडे. Proud

तुपारे व मानबा दोन्हीमधे सगळे कलाकार एक नियम पाळतात असे दिसते. तुम्ही जिच्याकडे बघत आहात तीच व्यक्ती फक्त तुम्हाला दिसते. बाजूला दोन फुटांवर तिसरे कोणी येउन उभे राहिले तरी यांना पत्ता नसतो.

काल ईशाचे आई आणि बाबा घरात चिंताग्रस्त होउन बोलत असताना ईशा दारात येउन उभी राहते. ते तिचीच वाट बघत असतात. त्यांची ती खिडकी दाखवली आहे तेथूनही ती येताना यांना नक्की दिसायला हवी. पण ती आत येउन बाबा म्हणेपर्यंत पत्ता नाही. लहान घरांत कोठेही, किंवा मोठ्या घरांमधेही जे मुख्य हॉल मधे बसलेले असतात त्यांना दारात कोणी आले तर तेथे त्यांचे लगेच लक्ष जाते. काहीतरी instinct असावे. इथे तिची आई तर दाराकडे तोंड करून किचन मधे उभी आहे, आणि ईशाची तर ते वाट पाहात आहेत. तरी काही नाही.

परवाचे ते टिल्लू आणि निमकर अगदी समोर उभे असताना सुद्धा ईशा विक्रांत दोघांनाही पत्ता नाही याबद्दल वरती कोणीतरी लिहीलेलेच आहे.

इबाळाच्या घरी काही खाजगी बोलायचं असेल तर दार लावतात. पण खिडकी तर अगदी पॅसेजमधेच उघडते की तिथून नाही का ऐकू जात?

आनंद झालाय वगैरे सूतोवाच करून झाले. नंतर पुढच्या एपिसोड मधे एकदम जेवण होउन झोपायला निघाली मंडळी. आनंद कसला झालाय वगैरे काही संवाद झालेच नाहीत का जेवताना? पेस्ट्रीचे काय झाले शेवटी?

कर्णपिशाच्चाने ग अक्षर दिल्याने ईशाच्या आईला 'ग' ची बाधा होणार का? Happy

एक नवीन मुलगी रिसेप्शनिस्ट म्हणून कधी आली? इतके दिवस ते बाहेर सिक्युरिटी वाले असायचे रोखायला.

रूपाली आणि विक्रांचा केबिनमधला सीन genuinely hilarious आहे. जमला आहे. असे काहीतरी लिहा की लेको.

मात्र एकच ब्लूपर - रूपालीने आणलेली पिशवी म्हणजे ईशा पेस्ट्री घेउन आलेली तीच पिशवी आहे ना?

व्हिलन एकेक करून छळायला येत असतील.>> Lol

मात्र एकच ब्लूपर - रूपालीने आणलेली पिशवी म्हणजे ईशा पेस्ट्री घेउन आलेली तीच पिशवी आहे ना?>>> नाही वेगळी आहे.

ओके Happy

सुभाची मेलोड्रामा अ‍ॅक्टिंग धमाल होती. रूपालीचे संवाद एकदम त्या बटाट्याच्या चाळीतील वासरी लिहीणार्‍या मुलीसारखे होते "प्रेमाचे रहिवासी रूढींच्या पोलिसांना घाबरत नाहीत" वगैरे

Pages