तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशीब यांचे व्हिक्टोरिया'ज सिक्रेट सारखे प्रॉडक्ट नाही.>>> Lol

अरे कालपरवापर्यंत जिवाला धोका होता ना सरंजामेच्या? "आपण बाहेर जरा फेरी मारून येउ?" हा ही गाडीतून ते ही सिक्युरिटीशिवाय जाताना मधेच उतरतो रस्त्यात.>> मायरा जाते त्याच्याबरोबर रक्शणासाठी Uhoh

ईशाच्या "राजनंदिनी डिपार्टमेण्ट हेड" पदाच्या पहिल्या दिवशीचे अत्यंत जबाबदारीचे पहिले कामः सपना ने इमेल केलेली फाइल "अलाइन" करून वाडकर मॅडम ना अ‍ॅन्युअल मीटिंग करता प्रिन्ट करून देणे.

हिने बिपिनला सिनेमाची तिकिटे काढायला सान्गितली ती नेमकी कुठल्या सिनेमाची? आणि हा नुसती सिनेमाची टिकटे काढ म्हटल्यावर गेला काढायला. नॉर्मल माणस तिकिटान्बद्दल बोलताना त्या सिनेमाच नाव-गाव तरी सान्गतात. >>> Lol हो तो अचाट सीन पाहिला आत्ताच. अर्थात जे लग्नाचा मुहूर्त "पुढच्या आठवड्यात" म्हणून काढतात ते सिनेमा पाहायला जाताना असे काही करतील यात शंका नाही. पूर्वी दूरदर्शनवाले साप्ताहिकी मधे पुढच्या शनिवारी "एक हिंदी चित्रपट" दाखवू म्हणत तसे हे दोघे "एका चित्रपटाला" जाणार असे दिसते.

आज अ‍ॅन्युअल मीटिंग मधे सपना आणि मिहीरही आहेत. प्रमोशन झालेले दिसते. आणि बाहेरही बरेच चम्या/चमी वाढलेत. त्या मीटिंग मधे सपना वगैरे आहेत. पण ज्या पदाबद्दल खुद मायरा उत्सुक होती ते पद मिळालेली ईशा अ‍ॅन्युअल मीटिंग मधे नाही. हा एपिसोड बहुधा तिला ते डिपार्टमेण्ट हेड बनवतात त्या एपिसोड च्या आधी चित्रित झाला असावा.

शो दुपारचा आहे ही महत्त्वाची माहिती कळाली. अजूनही थिएटर कोणते आणि पिक्चर कोणता काही पत्ता नाही. बट नो वरीज. मुंबई बरीच मोठी असली, तरी सरंजामेची गाडी जेथे दोन मिनीटे थांबते, तेथेच ते थिएटर असते. इतकेच नव्हे तर अगदी दर्शनी भागात बिपिन आणि ईशा उभे असतात.

मायराने सलग सहा वर्षे एकच ड्रेस घालून अवाॅर्ड घेतले का? >>> लोल हे जबरी निरीक्षण आहे Happy

अस जर असेल , तर 'जेम्स' गोळयान्च्या प्रॉडक्ट हेडने रन्गीबेरन्गी, जोकरसारखे कपडे घालून मिटीन्गला यायला हव, नाही का? >>> Lol

वडापाव आणल्याप्रमाणेच औषधही आणली काल.....
हा प्रकार म्हणजे लिहिणार्याच्या आणि डिरेक्ट करणार्याच्या बुध्दिचा नीचांक होता.
अरे सरंजाम्या एवढी बुक शिकलेला ना तू,मग आजार कोणता आहे,त्या बावळटाने काहीतरी सांगितल,आणि आऔषध आणलीस,पँथलॉजि लँब नावाचा एक प्रकार असतो रे,तिथे सगळ्या टेस्ट होऊन मग निदान होत,मग त्या आजाराची औषध दिली जातात
बावळटा आधीच हास्पिटलात खाट बूक करायला सांगितलीस
तुला शुगर आहे हे कळण्याच्या आधीच औषध घेतली होतीस का रे
अरे त्या बाळाला कुठचीही औषध देऊन तिच्या जीवावर उठला असतास की रे तू
अरे मंद माणसा,अकलेच्या खंदका,तुला काही आया बहिणी आहेत की नाही
हे प्रेम नाही बरं का सरंजाम्या,त्य पोरील तुझ्या आऔषधांमुळे काही झाल असत ना,तर ते प्रेम नाही,त्याला बिनडोकपणातून केलेला खून अस म्हटल असत
सरंजाम्या ,कस रे झाला तू ३५०० कोटींचा मालक

तो सुट्टी मागायला आलेला प्युन पण व्हेग बोलला .. का सुट्टी हवी विचारलं तर म्हणाला घरी कोणीतरी वारलय.. माझे काका मामा जवळचे नातलग असं म्हणायच की घरी कोणीतरी वारलय ..

घरी कोणीतरी वारालय.. माझे काका मामा जवळचे नातलग असं म्हणायच की घरी कोणीतरी वारलय ..>> क्काय?????? हे कहर आहे... Rofl अरे काहीच्या काही डायलॉग आहेत हे. Rofl

बाकी सगळे प्रतिसाद पण कहर आहेत. फुल्ल फटकेबाजी सुरुय इथे. Rofl

घरी कोणीतरी वारालय.. माझे काका मामा जवळचे नातलग असं म्हणायच की घरी कोणीतरी वारलय >>>
त्याला स्क्रिप्टमध्ये तसं लिहून दिलं असेल.. 'कोणीतरी वरल्यामुळे प्यून सुट्टी मागायला येतो' आणि त्याने 'कोणीतरी' च्या ऐवजी काका/मामा/आजी वगैरे म्हणणं अपेक्षित असावं..
पण मी म्हणते एवढ्या अशक्यप्राय अपेक्षा कराव्या तरी कशाला लेखकांनी?? हे दिग्दर्शकाच्या लक्षात कसं आलं नसावं?

"मावशी, 2 कॅपॅचिनो आणा". मावशी होय म्हणते. लोल...

विक्रांतला मायरानं आजवर अनेकदा सांगून झालंय, पण "सर, आजची मिटींग महत्वाची आहे. तुम्ही असायला हवं" म्हटल्यावर तो मनावारुद्ध शाळेत जाणा-या मुलासारखा तणतणत जातो...अरे काय हे. सिईओ ना तू? मालक ना तू?

रुपालीकडे दिलेला हार टिल्लू पळवेल का आता? किती मूर्ख आणि वेंधळी आहे इशा. एरवी गॅससाठी पण पैसे नसतात.....जरा तरी किम्मत हवी ना जोखमीच्या वस्तूंची.

बापरे, आता शराबी सिनेमातला सीन घुसडवतात का?
इन्तहा हो गई, इंतज़ार की
आई न कुछ खबर, मेरे यार की
ये हमें है यक़ीं, बेवफ़ा वो नहीं
फिर वजह क्या हुई, इंतज़ार की, इन्तहा हो...

अर्थात जे लग्नाचा मुहूर्त "पुढच्या आठवड्यात" म्हणून काढतात ते सिनेमा पाहायला जाताना असे काही करतील यात शंका नाही. पूर्वी दूरदर्शनवाले साप्ताहिकी मधे पुढच्या शनिवारी "एक हिंदी चित्रपट" दाखवू म्हणत तसे हे दोघे "एका चित्रपटाला" जाणार असे दिसते. शो दुपारचा आहे ही महत्त्वाची माहिती कळाली. अजूनही थिएटर कोणते आणि पिक्चर कोणता काही पत्ता नाही. बट नो वरीज. मुंबई बरीच मोठी असली, तरी सरंजामेची गाडी जेथे दोन मिनीटे थांबते, तेथेच ते थिएटर असते. इतकेच नव्हे तर अगदी दर्शनी भागात बिपिन आणि ईशा उभे असतात. >>>>>>>>> Lol

अरे त्या बाळाला कुठचीही औषध देऊन तिच्या जीवावर उठला असतास की रे तू
अरे मंद माणसा,अकलेच्या खंदका,तुला काही आया बहिणी आहेत की नाही
हे प्रेम नाही बरं का सरंजाम्या,त्य पोरील तुझ्या आऔषधांमुळे काही झाल असत ना,तर ते प्रेम नाही,त्याला बिनडोकपणातून केलेला खून अस म्हटल असत >>>>>>>> त्याने शितूचा सुद्दा असाच खून केला असेल बिनडोकपणातून. Proud

तुला पाहते रे मधील कलाकारांचे पडद्यामागील काही क्षण | Tula Pahate re Actors Unseen :

https://www.youtube.com/watch?v=YDFLnFHkd9o&t=44s

महाएपिसोड चे शूटिंग:

https://www.youtube.com/watch?v=MXGibzpSN2k&t=99s

Tula Pahate re Sunday Special Episode Live Video On Location:

https://www.youtube.com/watch?v=hEAld1dVpc8&t=307s

ईशा: तुम्ही माझ्यासाठी गुलाबाच्या पायघड्या टाकल्यात सर! (का टाकल्यात सर? सांगा ना सर? तुमच्या मनात काय आहे ते.. मन मोकळं करा... माझा तुमच्यावर विश्वास आहे सर, तुमचाही माझ्यावर विश्वास आहे ना सर?... ब्ला ब्ला.. Lol )

झाला एकदाचा बहुचर्चित एपिसोड. सुभा छान दिसला.
निशाई म्हणते, "अहो मोहन जोशी बघा ना किती छान दिसतायत्" तर कन्या म्हणते, "हुंह्, ...जावई सुबोध अन् हिला मोहन जोशीची पडलिये".

इशाला सरंजामेनी एकटीला बंगल्यावर बोलवलंय ह्याचा अर्थ कळतो का असं टिल्लूनं इशाच्या माय-तातांना विचारलं, तर सांगावंसं वाटलं की ...."वाड्यावर या" चा अर्थ इशाच्या आईला व्यवस्थित माहीतीये रे मित्रा Happy

हा तो महाएपिसोडच का?

इथल्या सर्विस मधे तारखा दिसतात पण हुकू नये म्हणून - तो थिएटर च्या दारात ईशा आणि बिपिन दिसतात आणि समोर गाडीत हे दोघे - त्यानंतर मधे अजून एक नॉर्मल एपिसोड आहे की नंतर हाच महाएपिसोड एकदम?

हा तो महाएपिसोडच का?>> हो हो. विक्रांतची बायको राजनंदिनी, जिच्यावर त्याचं जिवापाड प्रेम होतं, ती काही वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली असं समजलं.
आज विस नं इशाला हेलिकेप्टरमधे लग्नाची मागणी घातली, हि-याची अंगठीही घातली. इशानी चांगली एक्सप्रेशन्स दिली आज...

अजून एक नॉर्मल एपिसोड आहे की नंतर हाच महाएपिसोड एकदम?>>अजून एक आहे ज्यात विस झेंडेपताकाचा भांडाफोड करतो.

फा , प्रत्येक एपिसोड एवढया काळजीपूर्वक बघायची गरज नसते हो !; कुत्र्याच्या शेपटीसारखी तिथल्या तिथे च फिरत असते शिरेल.
शेवटी टिल्लू बाबांना घेऊन आलाच एक्साक्ट लोकेशन वर , raw मधे आहे वाटतंय टिल्लू ! चंबू बाळ किती उद्धटपणे बोलत होती विस ला - अर्ध्या वयाच्या मुलीसोबत फिरायची लाज वाटते का, गुडघे दुखतात का इ इ... लग्नानंतर न जाणो काय काय बोलेल !!

इशाला सरंजामेनी एकटीला बंगल्यावर बोलवलंय ह्याचा अर्थ कळतो का असं टिल्लूनं इशाच्या माय-तातांना विचारलं, तर सांगावंसं वाटलं की ...."वाड्यावर या" चा अर्थ इशाच्या आईला व्यवस्थित माहीतीये रे मित्रा >>> भारी पोस्ट मेधावी

ईशा आज बरीच बरी होती..थोडं थोडं जमायला लागलाय तिला..
एपि पण ओके होता.. सुभा सहीच.. उद्या बाबा बघणार आणि मग गोंधळ सुरू वाटतं

चला म्हणजे नंदूताई जिवंत होऊन परत येणार.सॉलिड आहे केड्या,कशी तिकडली स्टोरी इकडे हळूहळू आणतोय बघा लबाड.
पण निमकर कर्जतच्या घरी जाणार होते ना.मग उद्या हेलीपँडच्या इडे कसे टपकणार आहेत?

आता इशाच्या बाबांच्या पटवापटवीत खूप वेळ जाईल. कथा पुढे न्यायची तर वाजवा म्हणावं लवकर.

इतका रोमॅन्टीक सुभा पाहून वाटलं की त्याच्या अकरा बारा वर्षाच्या मुलाला किती चिडवत असतील ना सगळे, तुझे बाबा उद्या इशाला प्रपोज करणार म्हणून...मुलांना कसं समजाऊन सांगत असतील घरी?

ए सगळ्यांनी माझ कौतुक करा ना,कारण मी कुठल्या आठवत नाही पण एका याच धाग्यातील एका पेजवर टाकल होत की शितुच नाव नंदिनी असेल.
केड्याने शाहरूखवेडापायी मागे राज टाकल
आहे ना मी केड्यापेक्षा हुशार.....हाहा हा

हैदौस नाच. (जरा स्किड्युलिंगसारखंच वाटतंय हे)

हाहा शाब्बास.. up
मायरा ने टिल्लूला पिन मारली आणि टिल्लूने ई बाबांना..
रंगेहाथ पकडलं आहे बाबांनी..
सो निदान एक वाजवतील ईशाला असा अंदाज आहे..

तो प्युन चुलते expire झाले म्हणतो हा.. परत पाहिलं मी कन्फर्म करायला .. कोणीतरी असाच ऐकू आल होतं Proud

<<<चंबू बाळ किती उद्धटपणे बोलत होती विस ला - अर्ध्या वयाच्या मुलीसोबत फिरायची लाज वाटते का, गुडघे दुखतात का इ इ...<<<

अगदी अगदी! मलाही नाही आवडलं ते, ... ते त्याला डिवचल्यासारख बोलत होती.. खोचकपणे!
यडपट ईबाळ!

Pages