कोकोनट गोलगप्पा फॉर बाप्पा !

Submitted by दीपांजली on 12 September, 2018 - 03:58
golgappa for bappa
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मोदकाचे सारण, पाणीपुरीच्या पुर्या, कोकोनट मिल्क/क्रिम , साखर.
सारणासाठी : फ्रेश नारळ (मी फ्रोजन श्रेडेड कोकोनट वापरला.), गुळाची पावडर (किंवा किसून घेतलेला) ,खसखस, इलायची पावडर , मिक्स ड्राय फ्रुट भिजवून बारीक कापून घेतलेले, भिजवलेले बेदाणे/मनुका.

क्रमवार पाककृती: 

सारणाची कृति काही वेगळी नाही, त्यामुळे अगदी सविस्तर लिहीत नाही पण नेहेमी प्रमाणेच तूपावर थोडी खसखस भाजून नारळाचा कच्चेपणा जाईपर्यन्त परतले, गुळ , ड्राय फ्युट्स घालून मिश्रण घट्ट होईपर्य्नत परतले.
हे सारण आता पुर्यांमधे भरायचे !
त्या आधी सारण थोडे रुम टेंपरेचरला येऊ द्यावे किंवा फ्रिझ मधे ठेवले तरी चालेल .
कोकोनट सॉस साठी : कॅनमधला थिक कोकोनट क्रिम सॉस नीट घोटून घेतला, त्यात साखर आणि इलायची पावडर कुटून घातली, नीट हलवला, हा झाला सारण पुरीचा सॉस तयार !
आता पाणीपुरीची पुरी वरून फोडून घ्या, त्यात प्रथम सारण घाला, बर्यापैकी भरगच्च भरलं पाहिजे, एखादा चमचा सॉसला जागा राहिल इतकं भरा.
आता त्यावर बनवलेला कोकोनट सॉस घाला, सारण पुरी तय्यार !

परवा पाणीपुरीची कोरडी पुरी खाताना साक्षात्कार झाला कि आवरणाची चव बर्यापैकी मोदकाच्या कोटींगच्या जवळ जाणारी आहे, मग काय केला प्रयोग ! माझ्या सारख्या तळण करायचा आळस असणार्या लोकांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी, घरात तळणाचा वास न येता झटपट (हो झट्पट शब्द लिहावाच ) आणि हटके (हा शब्दही लिहितेच) प्रसाद तयार !
(कॉमेंट सेक्शन मधे स्वाती आंबोळेने ‘हटके’ टायटल सजेस्ट केल्याने , आधी दिलेल ‘सारणपुरी विथ कोकोनट सॉस’ टायटल बदललय Wink )

B5EECA72-B0D9-42F4-AF5A-D124B7A0D2BE.jpegB771108D-F1A9-4A5C-99B1-C6AD9D18002E.jpeg

अधिक टिपा: 

* कोकोनट सॉस आयत्या वेळीच घाला, सारण हवं तर आधी भरून ठेऊ शकता !
* सारण भरण्या आधी पुरीचं तोंड नॉर्मल पाणीपुरीपेक्षा ब्रॉड फोडा .
* यात सॉसची खूप व्हेरीएशन्स करता येतील, कॅरॅमल सॉस , चॉकलेट सॉस , सिनॅमन क्रिम , मँगो पल्प इ.
* सारणातही गुलकन्द फ्लेवर, खवा इ. व्हरायटी करता येतील !

माहितीचा स्रोत: 
स्वप्रयोग !
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमा,
हो, तळलेल्या मोदकाच्या आवरणासारखी लागली पुरीची चव म्हणून डोक्यात आलं !
तशीही मी खूप डेलिकसीज वगैरे करत नाही फारश्या, मोदकाच्या कळ्या वगैरे तर जमतच नाहीत मला म्हणून हे ट्राय केलं !
तू म्हणतेस तसं मोदकावर सुध्दा छानच लागेल कॅरॅमल सॉस किंवा कुठलही गोड डिपिंग , केलस तर नक्की फोटो टाक !
एका पुरीवर मी कोकोनट सॉस ऐवजी व्हिपिंग क्रिम सुध्दा लावल होत वरून, ते सुध्दा चांगलं लागलं पण माझ्यासाठी फार गोड चवी एकत्रं आल्या , दिसायला छान दिसत होतं, नेक्स्ट टाइम फोटो काढीन.
स्टफिंगमधे दुधीहलवा / गाजरहलवा सुध्दा छान लागेल आणि क्रिम ऐवजी टिस्पुन आइसक्रिम Happy
सीमंतीनी ,
छान लागेल कि पिनाकोलाडा Wink
पुरी आहे स्टफिंगला जागा आहे, हवं ते टॉपिंग करा , पाणीपुरीच्या पाण्याचं वजन घेते तर पिनाकोलाडा झेपेलच पुरीला Proud

मस्त वाटतंय, पुढच्या चतुर्थी नंतर करुन बघेन, बहुदा मी कोकोनट सॉस नाही घालायची.

मला फार कौतुक वाटतंय या रेसीपीचं

मस्त आयडीया! मात्र इथे पाणीपुरीच्या पुर्‍या अगदीच यथातथा मिळतात. वाँटन कप्स मधे भरुन वर साधी शुगर ग्लेझ आणि चॉकलेट ग्लेझ आलटून पालटून असा प्रयोग करेन.
सशल, तुझी कोकोनट बकलावाची आयडीया फार आवडली आहे.

Pages