भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विकास अतिशय चुकीचं वागतोय. रेवतीला एवढं समजल्यावर, तिच्या प्रश्नांची उत्तरं त्याने द्यायलाच हवी आहेत. सर्व खरं सांगायला हवं.

स्वतः चा भूतकाळ समोर येऊ नये म्हणून ओमच्या मरणाची कामना करणे, त्यासाठी प्रयत्न करणे हे फार वाईट.

विकास परळीकर स्वतःला देव समजायला लागलाय. बाप्पाला वेठीला धरतोय. आता एकेक गोष्टी बाप्पा बाहेर काढेल त्याच्या, ज्या त्याला लपवायच्यात रेवतीपासून.

तो पत्रकार मुलीशी ओळख वाढवणार. पत्रकारावर पण संशय येतोय फोन नं स्पेसिफिक मागितला म्हणून. पण आवाज त्या दिवशी मला विघ्नेश जोशीचाच वाटला.

बापरे डोळ्यातून किती छान अभिनय केला समीर आणि मुग्धाने... Just loved it... चारदा पाहिला हात धरण्याचा scene.... खास एकदम... Young couple पेक्षाही विकास - रेवती ही जोडी खू........प आवडतेय... त्यांच्यातलं प्रेम, राग, रुसवेफुगवे, मनवणं... सगळंच मस्त आहे..

ढोल वाजवतानाचा अभिनय मस्त केला समीरने. अ न कधी कधी बोअर होतात, पण कथा छान सांगतात.

आज ती मित्राची बायको छान व्यक्त झाली, एकदम कुल पण ठाम, आकांडतांडव अजिबात नाही. तिचे डायलॉग्ज छान होते.

पण विघ्नेश जोशीने एकंदरीत मस्करी जी केली त्यावरून मला तोच आहे असं वाटतंय कारण फोन बंद आहे त्यामुळे तिला सांगायचा तो मार्ग आहे, ते काम तो करत होता.

स ध चिडला हे स्वाभाविक होतं पण त्याने वर्मी घाव घातला. त्यामुळे त्याची मानलेली बहिण पण अशी react झाली.

माझ्या मते समीर आणि बबन वर लक्ष ठेवायला त्या समीरच्या मित्राने च कुणाला तरी सांगितलं असावं . विघ्नेश जोशी ने . मुग्धा ला आलेल्या फोन वर चा आवाज त्याचाच आवाज वाटतोय . समीर ला ऑफिस मध्ये त्याच्या पेक्षा जास्त महत्व मिळत हे त्याला खटकत असावं. कदाचित म्हणूनच त्याच्या (विघ्नेश ) बायकोने त्याच्या मनात हे भरवलं असेल त्याच्यावर लक्ष ठेव . त्याची इमेज त्याच्या बायकोजवळ खराब कर . त्याची बायको त्याला सोडून जाईल समीर कोलमडून पडेल कदाचित काहीही करेल आणि जेल मध्ये जाईल आणि सगळा बिझनेस त्याच्या मित्राला म्हणजे विघ्नेश ला मिळेल असा विघ्नेश चा प्लॅन असावा एपिसोड १९ पाहिल्यानंतर ची प्रतिक्रिया आणखीन पुढचे एपिसोड अजून बघितले नाहीयेत Happy

त्या विग्नेशला मात्र त्यांच्या ऑफिस मध्ये नवीन लागलेला पत्रकार माहिती पुरवत असावा किंवा ऑफिस मधलच कोणी तरी कदाचित ती सेक्रेटरी मुलगी

२४ व्या एपिसोड च्या शेवटी मिलिंद ( विघ्नेश ) ची बायको जे काही विकास ला मुलं नसण्यावरून बोलते ते अगदीच भिडलं . सगळ्यांचे अभिनय अतिशय सुरेख आणि डायलॉग तर काय विचारायचेच नाहीत . खूप सुंदर खूप सुंदर. हि मालिका झी मराठी वर का नाही?

हि मालिका झी मराठी वर का नाही?>>>sorry पण झी मराठी कडून आता आपण काहीच अपेक्षा ठेवू नये असं मला वाटतं.. त्यापेक्षा दुसरे मार्ग शोधावे... कारण आपण काहीही दाखवलं तरी भला मोठा प्रेक्षकवर्ग बघतोच अशी त्यांना खात्री आहे... जोपर्यंत त्याच्या मालिकांचा trp कमी होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार म्हणून आपणच बदललं पाहिजे.. मी तर केली आहे सुरवात... झी मराठीवर बहिष्कार Lol त्याहीपेक्षा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी भेलाजी पहावी असं मनापासून वाटतं.. म्हणून हा धागा प्रपंच.. खरंच स्तुत्य आहे ही मालिका...

हि मालिका झी मराठी वर का नाही? >>> नाही ते बरं आहे, झीवाले वाट लावतात. सगळेच लावतात म्हणा पण सोनीने करु नये ही अपेक्षा.

भेलाजी >>> Lol

उशिरा प्रकाश पडला माझ्या डोक्यात.

मिलिंद ( विघ्नेश ) ची बायको जे काही विकास ला मुलं नसण्यावरून बोलते ते अगदीच भिडलं . >>> + १०००
पण barbeque party साठी हे दोघं सुटाबुटात आणि बायका ही चांगल्या डीझायनर साडीत !
असं का बरं . निदार घरी तरी साधे सुटसुटीत कपडे घालावेत की .
त्या श्वेताचे गाल कित्ती गोबरे आहेत .

Pages