भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विकास हुशारच आहे. पण एक गोष्ट मला कळली नाही. तो हॅकर, शिंदे, विकास n रेवती जेंव्हा ip adress शोधत जातात त्या निर्जन प्रदेशात तेंव्हा विकास फोन वर बोलत नसतो. मग त्या निनावी फोन करणाऱ्या माणसाला कस कळत की ते गाडीत काय बोलत आहेत ते. तो म्हणतो की अगदी 500 मीटर right मग लेफ्ट करत इथे आलात, हे बोलणं त्याला कस कळेल? कारण त्याने विकासाचा फोन हॅक केलाय असं दाखवलाय आणी त्यावेळी vikas फोन वर बोलत नसतो...

कारण त्याने विकासाचा फोन हॅक केलाय असं दाखवलाय आणी त्यावेळी vikas फोन वर बोलत नसतो... >>> सेम येतंय माझ्या मनात सारखं पण लिहिलं नाही.

त्यापेक्षा गाडीत काही तरी लावलाय camera etc. दाखवायला हव होतं... पण तरी काही लूप होल्स सोडले तर सिरीयल मस्त आहे... नवीन डॉक्टर अजिबात आवडली नाही. अपिलिंग नाहीये ती...

हो इथे सुट होत नाहीये शलाका पवार, तिचं हळू बोलणं वगैरे. बदलायची होतीच तर आधीची होती त्याच वयाची घ्यायला हवी होती, ही एजेड वाटते समीरपुढे.

विहंग फेल झाला बरं झालं. त्याने निवडलेला मार्गच चुक होता. पण तो आता अजून वर खोटेपणा करणार, फेक रिझल्ट सांगणार. कॉलेजात सीसी टीव्ही नाहीयेत का, डमी विद्यार्थी कसे बसू शकतात परीक्षेला.

विहंगला एवढं समजाऊन, पाठीशी घालून, ताकीद देऊनही विहंग खोल गर्तेत बुडतोय, विकासला हा चांगलाच तोंडघशी पाडणार आहे.

बरी शिक्षा झाली विहंगला... कोणीही समजावून सांगण्याच्या आणि समजून घेण्याच्या पलीकडे आहे हा मुलगा... आता येईल अनुभवातून शहाणपण...

शेवटी पाडलंच तोंडघशी विहंगने बाबाला. लवकर घडलं बरं झालं.

तो कॉलेजच्या प्रिन्सिपल रूममधला सीन जबरदस्त होता. समीरने सॉलिड केला तो सीन. एकदम सुरुवातीला माज दाखवणारा समीर, मुलाचे प्रताप कळल्यावर संतापून उठून जातो. जबरदस्त होता तो सीन आणि डायलॉग्ज जबरदस्त होते.

आधीची काय कारणे माहिती नाही पण विकासमुळे जसा त्याच्या वडीलांना एकेकाळी त्रास झाला होता तसा आता त्याला एक बाबा म्हणून होणार, एक अंदाज.

विकास अतिउत्तम बाबा आहे पण अनेक चुका पदरात घातल्याने विहंग चुकीचं वागतो. विहंग तसा वाईट नाही पण चुकीच्या मार्गाने जातो.

एखादा मुलगा माझं अभ्यासात अजिबात मन लागत नाही, असं म्हणतो तेव्हा विकास रेवतीने पण जरा विचार करायला हवा होता. त्याला संगीताची गोडी असेल तर त्या बाबतीत कुठला कोर्स कर किंवा त्याचं विशेष ज्ञान प्राप्त कर अशी मुभा द्यायला हवी होती.

Sony च्या appvr synopsis दिलाय या serial चा त्यात लिहिलंय विहंग अनपेक्षितपणे त्याच्या आजी आजोबांना म्हणजेच तात्या आणि माई ला भेटतो.. आणि त्यांना घरी घेऊन जातो.. सगळ्यांना सत्य कळतं आणि रेवती त्यांना घरीच ठेवून घेते.... कसला भारी होईल नं हा एपिसोड... अन्‌ त्यात समीर चा अभिनय वा वा.. Eagerly waiting for this episode.. नंतर हळू हळू विहंग, विकास अन्‌ तात्या यांच नातं कसं उलगडतं हे बघायला मजा येईल... बाकी या मालिकेत कोणतीही गोष्ट अती ताणून धरत नाहीत म्हणून हे लवकरच पाहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही...

विहंगला फक्त पास हो म्हणलं आहे तरी जमलं नाही. त्याला विकास फक्त graduation कर म्हणतो बाकी त्याने तुला हवं ते कर असं सांगितलं की विहंगला.... मला विहंग अजिबात आवडत न्हवता आता तर खूप राग येतोय त्याचा... खोटारडा... मी बरेच एपिसोड पेंडिंग आहे अजून.. सो लेटेस्ट status नाही माहिती....

Sony च्या appvr synopsis दिलाय या serial चा त्यात लिहिलंय विहंग अनपेक्षितपणे त्याच्या आजी आजोबांना म्हणजेच तात्या आणि माई ला भेटतो.. आणि त्यांना घरी घेऊन जातो.. सगळ्यांना सत्य कळतं आणि रेवती त्यांना घरीच ठेवून घेते.... कसला भारी होईल नं हा एपिसोड... अन्‌ त्यात समीर चा अभिनय वा वा.. Eagerly waiting for this episode.. नंतर हळू हळू विहंग, विकास अन्‌ तात्या यांच नातं कसं उलगडतं हे बघायला मजा येईल... बाकी या मालिकेत कोणतीही गोष्ट अती ताणून धरत नाहीत म्हणून हे लवकरच पाहायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही... >>> अरे वा इंटरेस्टींग.

विहंगने घर सोडलं, आता वेग येईल कथेला. आजोबा भेटतील उद्या त्याला.

रेवती अतिशय balanced आई आहे. कसं कुठल्यावेळी वागायचं मुलाशी ह्याबद्दलची तिची मते अतिशय योग्य आहेत. विकासने त्याबाबतीत कधीच ऐकलं नाही तिचं. आधी अति लाड करायचा विहंगचे, चुकीच्या मार्गाने त्याला सेमिस्टरला बसायची परवानगी मिळवली, आता अति तिरस्कार करतो मुलाचा पण हा सुद्धा जबाबदार आहे कारण त्याच्या अनेक चुका पदरात घातल्या त्याने. रेवतीचे डायलॉग्ज फार छान होते.

ती काकू वाईट होण्यासाठी विहंगचे कान भरत असली तरी उलट परिणाम होऊन त्याचं चांगलंच होणार, तो स्वशोध घेणार. काकूला दिलेले डायलॉग्ज पण सुरेख.

प्रीकॅपमधे आजोंबाचं किर्तन चालू आहे तिथे येतो असं दाखवलं आहे. पण पोलीस असतात म्हणून लपतो.

भेट होईल असं वाटतंय आज किंवा उद्या. आजोबांना माहीती असणार सर्व फॅमिली. मुलगा आपला आहे हे माहीतेय त्यांना असं दिसतंय.

एक वर्तुळ पुर्ण होईल, मुलगा घर सोडून गेला आणि त्याचाच मुलगा म्हणजे नातू त्यांच्याकडे आला.

उद्या भेट होईल आजोबा नातवाची.

आजोबा आरती, कीर्तन करत होते तेव्हा विहंग एकरूप झालेला नाद ऐकून. त्याचा ओढा संगीताकडे आहे.

सर्वात उत्तम सेन्सिबल कॅरॅक्टर रेवतीचं लिहीलंय आणि ती उत्तम न्याय देते त्याला. कुठे, कसं, कधी वागायचं हे तिला बरोबर माहीतेय. कुठलाही माजही नाही तिला, वेरी बेस्ट कॅरीड बाय मुग्धा.

विहंग ची acting खरंच छान होती लास्ट 2-3 एपिसोड.... रेवती as usual बेस्ट.... योगिताचा खूप राग आला जेंव्हा विकास विहंग वर चिडलेला n तिला खूप आनंद झाला hota. बाकी मिलिंद पण आवडला मला त्या विहंगच्या fraud epi मध्ये...

शलाका पवार त्याची कौंसीलर वाटते मला, बरोबर बोलते ती. छान दिसते ती या गेटपमध्ये. ती समीरच्याच वयाची वाटते, उलट आधी होती ती समीरपेक्षा लहान वाटायची, ही समंजस वाटते. विहंगच्या आजीने परवा फारच मेकप केला होता, डार्क ब्राऊन लिपस्टीक, अगदी विचित्र वाटत होतं ते. सगळे मिळून सकाळ, संध्याकाळ आणि जेवणाआधी प्रार्थना म्हणतात ते छान वाटतं ऐकायला.

शलाका पवारचे कालचे डायलॉग्ज मस्त होते. तुझ्यातंच दशरथ आणि तुझ्यातंच राम हा विशेष आवडला मला. शलाका उदास उदास जास्त वाटते मला यात मात्र. गोठ मधे खेळकर, हासरी, मिष्कील, उदास अशा सर्व रुपांत होती.

विहंगच्या आजीने परवा फारच मेकप केला होता, डार्क ब्राऊन लिपस्टीक, अगदी विचित्र वाटत होतं ते. >>> मलापण खटकतो मेकअप आणि काजळही. शलाकाचं काजळही खटकतं मला.

राम आणि दशरथच्या एपिसोड मधले संवाद कसले जबरी होते... भारी एकदम... मला ही मालिका टीव्ही वर पाहायला नाही आवडत कारण advertises मुळे disturb होतं... मला ही serial continuously पाहायला आवडते.. Without any disturbance... मस्त link लागते मग...

Pages