भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विकासला अजूनही बराच माज आहे. तो त्याच्या बाबांना चुकीचंच समजतोय. त्याचे बाबा रोज एक घास त्याच्यासाठी काढून ठेवतात म्हणजे कठोर असले तरी तेही एक चांगले वडील होते. आता जेव्हा त्याचा मुलगाच तात्यांवर अति प्रेम करेल आणि त्या सर्वांची भेट होईल तेव्हातरी विकासचा माज उतरेल का.

मुक्ता फार गोड, तिचे आणि विहंगचे सीन्स छान असतात.

विकासाला माज आहे? मला तर कधीच तसं जाणवलं नाही... विकास ने घर सोडलं त्याला वेगळी कारणे होती... त्याला रूढी-परंपरांच्या बंधनात जखडून राहायचे नव्हते म्हणून त्याने घर सोडले इतकंच नाही तर विहंगच्या बाबतीत अतिशय उत्तम बाबा होण्याचा त्याने परोपरीने प्रयत्न केला पण जर विकासने घर सोडले नसते तर तो कदाचित आज ज्या पोझिशनवर आहे तिथे नसता त्याच्या वडिलांच्या बाबतीत त्याच्या मनात काही गैरसमज असतील पण याचा अर्थ त्याला माज आहे असे मला तरी वाटत नाही...

विकासाला माज आहे? मला तर कधीच तसं जाणवलं नाही.. >>> कालचा शेवटचा सीन, अजूनही मीपणा आहेच त्याला. मला बरेचदा माज दिसतो त्याच्यात.

त्याच्या बाबा पणाबद्दल मी कधीच टीका केली नाही, तो एक उत्तम बाबा आहे पण जेव्हा शिस्त हवी तेव्हा लाड आणि नंतर टोकाचा तिरस्कार. त्याच्यापेक्षा रेवती एक उत्तम आई आहे, कुठे कसं बोलायचं, वागायचं तिला बरोबर समजतं.

तात्या कठोर आहेत, त्याने घर सोडलं त्याबद्दल आणि तो स्वतः एक यशस्वी वकील आहे त्याबद्दल कौतुक त्याचं. इतक्या वर्षात एकदाही त्याला आईला पण भेटावं असं वाटलं नाही ही आश्चर्याची गोष्ट नाही का. त्याचा मोठा मुलगा बाहेर पडलाय घराच्या तर त्याला इतकं वाटतं तर एक आठ दहा वर्षाचा मुलगा घर सोडून गेला तेव्हा आई वडीलांना कसं वाटलं असेल. एखादा एव्हाना हे समजून तरी गावी निदान आईला तरी भेटायला, माफी मागायला गेला असता.

नुसते आईला काय वाटलं असेल विचार करून काय उपयोग, कृती काय त्याच्याकडून.

कॉलेजमध्ये वरून प्रेशर टाकून विहंगला परीक्षेला बसू देणे हीच मोठी चूक होती तेव्हा बायकोचे ऐकलं नाही त्याने. एखादा माणूस पोझिशनचा माज असल्याशिवाय ह्या गोष्टी करणार नाही. मी, माझी पोझिशन त्यामुळे येणारा माज हा बरेचदा दिसला मला.

एनीवे तो माज, तो मीपणा त्याबरोबर कुटुंबातील सदस्यांवर प्रेम हे आता स ध छानपणे पोचवतो, आधी तो अभिनयात जाम कमी पडायचा असं माझं पर्सनल मत. त्याचे डायलॉग्जपण कधी कधी समजायचे नाहीत.

कदाचित समीर धर्माधिकारी च्या अभिनयामुळे असेल पण मला विकास प्रचंड आवडतो... म्हणूनच तो खूप चुकीचा आहे असंही वाटत नाही त्याचा भूतकाळ त्याच्यासाठी त्रासदायक आहे म्हणून तो नेहमी त्याकडे पाठ फिरवायला बघतो... खरंतर त्याच्या आणि तात्यांच्या गैरसमजामुळे या मालिकेला एक नवीन कथा मिळाली आहे आणि ती खूप appreciable आहे... बाय द वे इथे अजून कोणा कोणाला वाटतं, की विकासला माज आहे??

मला समीर धर्माधिकारी नेहेमी आवडतोचं पण त्याचा अभिनय फारसा नाही आवडत पण आता चांगलं करतोय. स ध होता म्हणून मी सम्राट अशोक सिरीयल पण त्याच्यासाठी बघितलेली, पल्लवी सुभाष एक राणी होती त्यात त्याची. दोघांची जोडी मस्त दिसायची.

आताही मुग्धा आणि त्याची जोडी छान दिसतेय.

मस्त एपिसोड.

ज्या मुलाने आपल्या बापाचा तिरस्कार केला, त्याचाच मुलगा आपल्या आजोबांकडे ओढला जातोय. तात्या त्याला खूप आवडायला लागलेत, त्यांचे विचार पटायला लागलेत. ते आपली कठोर बाजू त्याच्यापासून अजिबात लपवत नाहीयेत तरी तो त्यापलीकडे जाऊन तात्यांना बघतोय.

पुढचा turn कदाचित असा असेल ज्या लोककलेचा त्याग करून किसन्या म्हणजेच विकास घरातून निघून गेला त्याच लोककलेकडे विहंग ओढला जाईल आणि तो त्याचा अभ्यास करेल त्याला कदाचित आधुनिक जोड देईल कारण लोककला जपणारे आजोबा आणि गिटार वाजवणारा विहंग ही संगीतकलेचीच रूपं आहेत.

खरे तात्या कठोर असले तरी दुष्ट नाहीयेत पण मुलाबाबतीत कमी पडल्याने किंवा मुलावर कला लादल्याने त्याच्या मनात ते व्हिलन आहेत.

जेव्हा आपला मुलगा आपण नाकारलेली लोककला घेऊन पुढे येईल तेव्हा विकासचा पार पचका होईल.

आतातरी विकासला जाणीव व्हायला हवी आपण घर सोडून गेलो तेव्हा घरच्यांची अवस्था काय झाली असेल. त्याच्या जागी तो बरोबरही असेल घर सोडताना, तिथे राहून त्याला यशस्वी वकील होता आलं नसतं पण भूतकाळ पार पुसणे हे त्याचं चूक होतं. किमान लग्न झाल्यावर तरी बायकोला घेऊन जायला हवं होतं. शेवटी वळणाचे पाणी वळणाकडेच जाणार. मस्त स्टोरी, मस्त turn, very interesting.

विकासमधला किसन्या हळूहळू जागा होतोय, कुठेतरी त्याला जाणीव होतेय की घर सोडून जाऊन घरच्यांना त्रास देऊ नये. एका दुसऱ्या बाप मुलात समेट करून दिला विकासने तेव्हा जाणवलं. त्यावेळी त्याला दिसलेल्या तात्यांचे डायलॉग्ज मस्त होते.

तात्यांना पण किस्ना आठवतो पण ते त्याची जाणीव कोणाला होऊ नये यासाठी प्रयत्न करतायेत.

विहंगला आज कलर्सवर बघितलं, ज्ञानेश्वर बनला होता किंवा त्याचा भाऊ. तात्या फारच खडूस दाखवलेत. तो रस्त्यावर विकास एका बापलेकाला सल्ला देतो तो सीन फारच लांबल्यासारखा वाटला.

विहंगला आज कलर्सवर बघितलं >>> माझी एक मैत्रीण म्हणाली परवा की तू माझा सांगातीमध्ये विहंग निवृत्तीनाथ होता, ती मालिका लागतेय बहुतेक परत संध्याकाळी कलर्स मराठीवर.

त्याचं नाव श्रेयस राजे, कुठल्यातरी पेपरात वाचलं, काम छान करतो विहंगचं.

तात्यापण विहंगकडून लगेच अपेक्षा करतात अभंग समजण्याची, विहंगपण स्वतः च्या शब्दात ग्रामीण सामान्य विद्यार्थ्यांना समजाऊन सांगताना, अति इंग्लिश बोलतो आणि शहरी उदाहरणे देतो. तो प्रसंग फार फनी झाला.

तात्यांनी आता जास्त भाव न खाता आणि कठोर न होता विहंगला पेटी शिकवावी. त्याची संगीताची ओढ त्याला त्याच्या परंपरेकडे खेचून नेतेय, ज्याचा त्याग बापाने केला तीच कला त्याचा मुलगा पुढे नेणार बहुतेक.

मस्त एपिसोड.

अखेर कठोर तात्या विरघळले. विहंगला शिकवायला तयार झाले.

उगाच नवीन एन्ट्री करतायेत सिरीयलमध्ये, कोण नवीन बाई येणार विकासच्या घरी काय माहिती. ते भारुड होतं त्या देवळापर्यंत पोचतात तेव्हा एकाला आठवतं की तात्यांचं भारुड होतं, खूप गर्दी होती म्हणून तो विकास आणि family ला सांगायला जातो पण ते निघून जातात. पण पुजाऱ्याकडे फोन नं असतो विकासचा, त्याने फोनवर हे सांगितलं तरी चालेल की.

विहंग म्हणजे श्रेयस राजेचा आवाज छान आहे. गाणी येणारा आणि संगीत ज्ञान असलेल्या मुलाची निवड केलीय बहुतेक ह्या भुमिकेसाठी.

आज्जीचे डायलॉग्ज मस्त होते. तो चुलत आजोबा मात्र विघ्न आणत राहणार, विहंगच्या शिकण्यात.

स्मिता सरवदे आवडते मला, विहंगची मावशी असेल कदाचित. घरातली सगळी धुणीभांडी आता विहंगने करायची. गुरूकुल पद्धत राबवणार वाटतं तात्या. तात्यांचं भारूड होतं आणि विहंग तिथे होता एवढ्यावरून पुढे काय तपास करणार विकास.

स्मिता सरवदे >>> मी किती वेळ नाव आठवतेय, आठवेनाच. मला फारशी नाही आवडत पण उगाच twist असेल स्टोरीत तिच्यामुळे असं वाटतंय, व्हिलन असावी. तिलाही विकास आवडत असावा आणि लग्न वगैरे झालं नाही त्याच्याशी असं उगाच वाटतंय.

तात्यांचं भारूड होतं आणि विहंग तिथे होता एवढ्यावरून पुढे काय तपास करणार विकास >>> तो धागा तात्यांच्या गावी नेऊ शकेल, थोडं डोकं चालवलं तर. विहंगची संगीताची आवड, श्रद्धा आणि लोकसंगीत.

पण असं होणार नाही कारण विहंग स्वत:च घेऊन जाणार आहे ना तात्यांना. स्मिता सरवदेचं नाक ह्रितीक रोशनसारखं आहे. बारीक होती तेव्हा खूप छान दिसायची ती, बघितलं होतं तिला प्रत्यक्ष. तो चुलत आजोबा काय जन्मोजन्मीचं वैर असल्यासारखा वागतो, त्याचं काय डबोलं घेतलंय विहंगने. त्या आजोबाच्या दाढीमिशांमध्ये त्याचे ओठ दिसतंच नाहीत Happy

तो चुलत आजोबा काय जन्मोजन्मीचं वैर असल्यासारखा वागतो, त्याचं काय डबोलं घेतलंय विहंगने >>> हो ना. मला त्याच्या डोळ्यांची जाम भीती वाटते. गोठमध्ये होता आधी मग गायब झाला.

ती विहंगची मावशीच निघाली. रेवती ईतक्या वर्षात आईवडिलांना भेटायला जातच नाही. विकास आणि ती सारख्याला वारखे आहेत. तीला विकास सांगतो की तू जाऊ नकोस, ते स्वत:हून येतील आणि ती ऐकते. ईतक्या वर्षात विकास आणि रेवती स्वत:च्या आईवडिलांना भेटतच नाहीत मग मुलाकडून काय अपेक्षा ठेवतात. विकासचा पीळ अजून गेलेला नाही.

मी बघितला नाही अजून एपिसोड.

ईतक्या वर्षात विकास आणि रेवती स्वत:च्या आईवडिलांना भेटतच नाहीत मग मुलाकडून काय अपेक्षा ठेवतात. विकासचा पीळ अजून गेलेला नाही. >>> रेवतीपण गेली नाही का माहेरी कधी. अरेरे. विकासचा पीळ जाणार नाही इतक्यात. मी तर म्हणते विहंग आजी आजोबांना घेऊन घरी येण्यापेक्षा. तो त्यात्यांबरोबर भारुड गातानाचा लाईव्ह परफॉरमन्स विकासला याची देही याची डोळा बघायला मिळूदे. सगळा मीपणा गळून जाईल.

जी कला विकासने नाकारली त्यातच विहंग पुढे जाणार. अर्थात विकासने नाकारली याला माझा विरोध नाही, इंटरेस्ट नसेल तर जबरदस्ती चुकच. पण विहंगला ज्यात इंटरेस्ट नाही त्यात विकास थोडी जबरदस्तीच करत होता. तो परोपरीने मला शिकायचं नाहीये सांगत होता.

बघितला एपिसोड, सरवदे ताई व्हिलन असणार अशी दाट शंका येतेय कारण मोठ्या बहिणीने पळून जाऊन लग्न केल्यामुळे हिचे लग्न झालं नाही. रेवतीने आई बाबांना भेटण्याचे प्रयत्न केले नाहीत, so sad. भले हाकलले असतं पण प्रयत्न केले नाहीत हे चुकीचं वाटतं.

विकासला तात्या आईची आठवण येतेय पण जावसं वाटत नाही आणि विहंग सापडला तरी तो जाणार नाही. लांबून चौकशी करणार आई तात्यांची, हे अतिच विकासचं.

तात्या अतीच कठोर आहेत, एक मुलगा पळून गेला तरी कठोरपणा कमी झाला नाही. बास की विहंगची परीक्षा, बिचारा राब राब राबतोय. विहंग नाही पळून जाणार, कितीही परीक्षा घेतली तरी तो स्वअस्तित्व निर्माण करेल. त्याशिवाय त्याला पर्यायही नाहीये.

झाला ब्वा एकदाचा विहंग तात्यांच्या परीक्षेत पास, आता त्याचं लोककला शिक्षण सुरु होईल.

आठवडाभर. भांडी, कपडे, स्वयंपाक, शेणाच्या गोवऱ्या करून घेतल्या. सर्व केलं हो त्या पोराने.

कालचा एपिसोड बघितला नाहीये अजून.

बघितला शनिवारचा एपिसोड. घरी फोन करायला लावला तात्यांनी. आईशी बोलला विहंग. मी सुखरूप आहे, मला शोधू नका, बाबांना अभिमान वाटेल असं करेन तेव्हा घरी परत येईल असं म्हणाला. तो भारुड शिकला तर विकासला अभिमान वाटेल की नाही शंका आहे पण आईला वाटेल नक्की.

ही सिरीयल आता मी एकटीच बघतेय की काय Lol

जबरदस्त पुढे चाललीय, नवीन पात्र घुसवायला लागलेत मात्र. घरात मावशी आलीय, तिचा हेतू कळायचा आहे मात्र. गावात एक व्हिलन संपतराव उगवला आहे.

जबरदस्त डायलॉग्ज. तात्या आता विहंगला शिकवणार. आपण जी कला नाकारली तीच आपला मुलगा पुढे नेतोय कळल्यावर विकास काय करेल काय माहिती.

अर्थात विकासचं काही चुकलं नाही ज्यात मन नाही ते मारून मुटकून करण्यात अर्थ नाही, त्याने त्याचा मार्ग निवडला. त्याच इतिहासाच्या पुनरावृत्तीचा विकासने पण आदराने स्वीकार करायला हवा जेव्हा कळेल तेव्हा. विहंगचं मन अभ्यासात नव्हतं रमत, हे समजून घ्यायला हवं होतं त्यानेही अर्थात विहंगने परीक्षेला डमी बसवणं ही चूक नव्हे तर अपराध होता. आता विहंग भारुड पुढे नेणार, त्याला जे हवं आहे ते गवसलं आहे. ते त्याच्या रक्तातही आहे. Good going.

तात्यांनी पण विकास भेटल्यावर त्याच्या कर्तृत्ववानपणाचे कौतुक करायला हवं.

विकासचा अजूनही मीपणा गेलेला नाही, तात्यांबद्दल तिरस्कार आहे मनात. तात्यांशी स्वगत म्हणताना बोलतो की बघा माझ्या मुलाने फोन केला. तुम्हाला वाटत होतं तसं नाही झालं वगैरे पण त्याच तात्यांकडे विहंग आहे सुरक्षित आणि कला पुढे नेतोय कळल्यावर काय होईल त्याचं काय माहिती.

Pages