भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्या मुलाला कुठेतरी बघितलंय, >>> तुझ्यात जीव रंगलामधे गुज्जु होता.

ती बहीण हॉटेलात एकटी बसलेली असते, काही मुलं बघत असतात, तेव्हा हा येऊन ओळख आहे असं दाखवतो आणि त्या मुलांपासून वाचवतो. पण त्याचा काहीतरी उद्देश असणार, त्या विघ्नेश जोशीच्या बायकोने पाठवलं असेल त्याला.

रेवती आता संपर्कात राहील तात्या आज्जींच्या.>> हे वाचलं म्हणून असं वाटलं की तिला कळलं का >>> तात्या सिरीयस म्हणून रेवतीला बोलावतो विहंग, तेव्हा सांगतो की कसा ह्या लोकांनी आधार दिला. आता रेवती ओळख करुन घेईल त्यांच्याशी असं वाटतंय.

स्मिता आणि सतीशची बायको यांची एकी झाली अखेर. ती श्वेता सारखी ते कानातले घालते, मला बार्बेक्यू स्टिकची आठवण येते. असं वाटतंं पनीर, ढोबळी मिरची वगैरे ग्रील करून ती काठी कानात घातलीये Proud

स्मिता आणि सतिश नाही मिलिंदची बायको, यांच्या सीनमधे स्मितावर अभिनयात मिलिंद (विघ्नेश जोशी) च्या बायकोने सहज मात केली. खरं म्हणजे मला दोघी आवडत नाहीत. मुग्धा आली ते बरं झालं, ती फार सहज काम करते.

विकांताला एक दोन भाग पाहिले.
तात्या आता विकास च्या घरी राहयला आले. सध्या विकास salt n paper look मध्ये.
विहंगचा आवाज फार छान आहे.
तो शुभचिंतक मेला का ??

तो शुभचिंतक मेला का ?? >>> हो मावशीने मारलं त्याला, कोण होता काय समजलं नाही.

विकास आता आपल्या family ला तात्यांपासून दूर कसं ठेवायचं या प्रयत्नात आहे.

एकदाची विहंग आणि विकासची भेट होणार तीही अगदी नाट्यमय. विहंगची याआधीची भारूडं दाखवली त्यात तो असा डोक्यावर पदर घेऊन दाखवला नव्हता. तो गोंधळ आणि जागरणाचा भाग आहे का. विकास आता विहंगला खेचत घरी घेऊन जाणार आणि तात्यांना जाब विचारणार. ती पेपरमधली बातमी विकास स्वत: बघत नाही आणि त्याला कोणी दाखवतही नाही, नाट्यमय भेट घडवायची आहे ना त्यांची.

नेमका विकास भेटणार त्यावेळी विहंग असं नाट्यमय भारुड सादर करणार, परंपरागत वेषात. एरवी तो नॉर्मल वेषभुषेत असतो, म्हणजे अगदी जिन्स, टीशर्ट नाही पण झब्बा पायजमा असतो.

तात्या सांगतात त्यांनी दिलेली टोपी घालूनच करायचं पुढचं भारुड, विकाससाठी शॉकींग सर्व. पण विकासने जसं भारुड नाकारलं, वेगळी वाट धरली तसं त्याचा मुलगा वेगळी वाट धरतोय, भारुड स्वीकारुन. त्याचा जीव त्याच्यात रमतोय. त्याच्या आईलाही ऑब्जेक्शन नाहीये.

ती पेपरमधली बातमी विकास स्वत: बघत नाही आणि त्याला कोणी दाखवतही नाही >>> हो ना, एरवी सकाळी पेपर वाचणारा विकास, त्याच दिवशी वाचत नाही.

अहंकारी विकास. परंपरागत कला ह्याला पसंत नव्हती तर त्याने वेगळी वाट चोखाळली, ते चांगलं केलं पण ती वाट मुलाला पसंत आहे तो त्यात काही करु इच्छितो तर हा विरोध का करतो. विकास हे तात्यांचेच दुसरं रूप होत नाहीये का ?

तात्या ती कला विकासच्या मनाविरुद्ध लादत होते आणि विकास मुलाला त्याच्या मनाविरुद्ध दूर नेतोय, ते न करणे लादतोय.

डायलॉग्ज काही काही फार सुंदर लिहिलेत, श्रीपाद देशपांडे यांनी.

विहंग जेव्हा चुकीचं खरोखर वागत होता तेव्हा विकास पाठीशी घालत होता, आता विहंग त्याला आवडीचे काही करू बघतोय तर करू देत नाहीये.

नाट्यमय भेटीचा प्रसंग बघता आला नाही कारण सोनीमध्ये काहीतरी गडबड होती. विकास त्या कृष्णाशी बोलतो ते कुणी बघितलं तर त्यांना तो वेडाच वाटेल. मागेही त्याला कुणीतरी बोललंं होतं त्यावरून. शुभदा किती भोचकपणा करते, मी असते विकासच्या जागी तर हाकलून दिलं असतं कायमचं. शलाका पवार विकासला कुठे भेटत असते, त्याच्या आॅफिसात नाही काम करत का ती. तात्यांचे संवाद छान असतात, विशेषत: डाॅक्टरबरोबरचे संवाद मला फार आवडले.

शलाका पवार विकासला कुठे भेटत असते >>> विकास तिच्याकडे जात असतो, सल्ल्यासाठी. कधी घर दाखवतात, कधी lawn दाखवतात. ती मानसोपचारतज्ञ आहेना, ती नाही त्याच्या ऑफिसमध्ये काम करत.

शुभदा किती भोचकपणा करते >>> जाम बोअर करते ही.

ईथे कुणीतरी लिहीलं होतं नाकी शलाकाला तो आवडत असतो, म्हणून मला वाटलं ती त्याची सेक्रेटरी वगैरेे असेल. श्वेता गोड आहे. सगळी पात्र मराठीत नीट बोलतात, ईतर मालिकांसारखं ईंग्रजाळलेलं मराठी नसतं. तो श्वेताचा मित्र नाही दाखवला ईतक्यात.

Pages