Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06
नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अन्जु ,मी पण बघते आणि अगदी
अन्जु ,मी पण बघते आणि अगदी छान चालु आहे. मावशी विलन असेल असं वाटत नाही.
मावशी ला सूड घ्यायचा आहे
मावशी ला सूड घ्यायचा आहे रेवतीचा ना!
मला वाटतंय व्हिलन असेल पण
मला वाटतंय व्हिलन असेल पण अजून तसं दाखवलं नाही.
प्रथमग्रासे मक्षिकापात तसं विहंगचं शिकणं सुरूही झालं नाही आणि अनंत अडचणी समोर. नवीन व्हिलन उगवला आहे गावात तो तात्यांना त्रास देतोय.
विकास स्वतः च्याच तोऱ्यात पुढे जातोय, मुलगा कुठे ते अजूनही शोधता आले नाहीये त्याला. पण तो गृहमंत्र्यांना नडतोय हे बघून मजा येतेय फार. ओमला मात्र धमकी दिली त्याने.
आपलाच मुलगा आपल्या तात्यांबरोबर लोककलाकार म्हणून समोर येईल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकेल मात्र. अर्थात सरकायला नकोस, मुलगा काहीही वाईट करत नाहीये. जे आधी केलं ते वाईट होतं.
स्मिता सरवदेची एन्ट्री
स्मिता सरवदेची एन्ट्री झाल्यापासूनच, ती व्हिलन असणार असं वाटत होतं ते confirmed.
मेन व्हिलन मावशीच आहे,
मेन व्हिलन मावशीच आहे, स्मिता सरवदे. शुभचिंतक तिच्या हाताखालचं प्यादे आहे. तो हातातील घड्याळावरून मकरंद वाटतोय पण आवाज विघ्नेश जोशी सारखा वाटतोय.
आता मला संशय येतोय की मावशीनेच स्वत:च्या आईवडिलांचा घातपात केला नसेल ना किंवा तसं नसलं तरी ते गेले हे तिच्या पथ्यावर पडलं.
मावशी गुंंडं बाळगूून आहे हे
मावशी गुंंडं बाळगूून आहे हे बघून आश्चर्य वाटलं. काहीही दाखवतात.
गावातला व्हिलन संपतराव याच
गावातला व्हिलन संपतराव याच डायरेक्ट गृहमंत्री कनेक्शन. राजकारणात यायची महत्वाकांक्षा विकासला खालच्या थराला घेऊन चाललीय, तो संपतरावाला नकळत आपल्या वडील आणि मुलाविरुद्ध सल्ला देतो आणि मुलावर तर दहशत बसेल असं वागायला सांगतो.
विकास पुढे चांगलाच तोंडघशी पडणार आहे, आत्ता तो खूप तोऱ्यात आहे पण आपले वडील आणि आपला मुलगा एक झालेत आणि आपण त्यांच्या विरोधात त्यांचंच नुकसान करतोय हे समजेल तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकेल.
मी फार पूर्वी predict केलेली अजून एक गोष्ट खरी निघाली ती म्हणजे जमीन प्रकल्प विकासच्या खऱ्या गावी सुरु होणार आणि त्यात त्याच्या पूर्वजांची जमीन वगैरे जाणार, सर्व गाव जाणार पण तात्यांमुळे आणि विहंगमुळे कलाकेंद्र मिळणार नाही तो अडथळा आहे, ते कसं मिळवायचं हे सल्ले विकास देतोय संपतरावाला. त्यात जो तरुण आहे त्याच्यावर दहशत बसेल असं करा हा सल्ला देतो. त्यामुळे विहंगला ऑलरेडी संपतराव मारहाण करतोय, अजून करणार. विहंग मात्र लढणार आणि जिंकणारही. त्याचे दोन मित्र आता मदतीला आलेत त्याच्या पण खरी ओळख लपवून. हे सर्व आणि तात्या मिळून भारुडाचे शंभर कार्यक्रम करणार कारण तात्यांनी पण केलाय तीन महिन्यात शंभर कार्यक्रम करणार ते करून दाखवले तर कलाकेंद्र संपतरावाच्या ताब्यात देणार नाही, हे सफल होऊ नये असे सल्ले विकास देणार. अर्थात विकासला डायरेक्ट सांगितलं नाहीये नाही तर तात्या जंगम विरोधात तो एवढा खालच्या पातळीवर उतरला नसता, जरी तिरस्कार करत असेल तरी.
रंगतदार होतेय.
ती दोन मुलं कुठून आली आणि
ती दोन मुलं कुठून आली आणि विहंगला माहिती असतं का ते येणारेत ते. तात्यांचं आडनाव जंगम आहे का, मग विकासचं परळीकर कसं. विकासचे आईवडिल त्याला किसना म्हणतात म्हणजे विकासला कुणी दत्तक घेतलं का.
स्मिता छान फ्रेश दिसते आणि
स्मिता छान फ्रेश दिसते आणि तिचे काॅटन कुर्ते आवडतात मला. रेवतीच्या भरजरी साड्या, दागिने, मेकपपुढे ती साधी छान वाटते.
ती दोन मुलं कुठून आली आणि
ती दोन मुलं कुठून आली आणि विहंगला माहिती असतं का ते येणारेत ते. तात्यांचं आडनाव जंगम आहे का, मग विकासचं परळीकर कसं. विकासचे आईवडिल त्याला किसना म्हणतात म्हणजे विकासला कुणी दत्तक घेतलं का. >>> तात्या कुठेतरी निघून जातात, त्यामुळे संपतराव कलाकेंद्र ताब्यात घ्यायला येतो तेव्हा विहंग टशन देतो आणि कमीतकमी दोन विद्यार्थी उद्या आणेन सांगतो पण गावातले लोक पाठवत नाहीत मुलांना मग कलाकेंद्र वाचवण्यासाठी तो आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतो.
विकासला जंगम म्हणून ओळख नकोच आहे, त्याचं मन पारंपारीक लोककलेत रमत नाही आणि तात्या जबरदस्ती काम करायला लावतात म्हणून तो घर सोडून गेला आणि ते नाव आडनाव कोणी दिलं माहिती नाही, तो सुधारगृहात जातो मग अनाथआश्रमात.
स्मिता छान फ्रेश दिसते >>>
स्मिता छान फ्रेश दिसते >>> मला स्मिता नाही आवडत पहिल्यापासूनच पण तिची एन्ट्री झाली तेव्हाच जाणीव झाली की ही व्हिलन असणार, कारण मला आवडत नसली तरी ती काम चांगलं करते आणि फेमस आहे त्यामुळे तिची भूमिका जबरदस्त असणार, अगदीच गुडी गुडी म्हणून तिला आणलं नसणार याची पूर्ण खात्री होती.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PJsFxCpy7ns
संपतराव विकास फोन, उल्लेख केलेला म्हातारा म्हणजे तात्या. आता विकास विरुद्ध तात्या आणि विहंग संघर्ष पण दोघांनाही माहिती नसेल की आपण एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहोत. कारण संपतराव मोघम सांगणार, विकासने सध्या काही विचारायचं नाही ही अट असते गृहमंत्र्यांची. विकाससारखा हुशार माणूस साधी माहिती काढू शकत नाही कुठल्या गावाबद्दल संपतराव बोलतोय. गावाचं नाव जरी समजलं तरी आपलंच गाव हे लक्षात येईल.
आता मला बोअर होतेय ही serial.
आता मला बोअर होतेय ही serial... अर्थात अजून 8-10 episodes बाकी आहेत बघायचे.. पण आधी सारखी खूप इच्छा नाही होत बघण्याची... गावातले scenes असले की जाम बोअर होत... तोचतोचपणा वाटतोय... आधी जशी unique वाटायची तशी नाही वाटत आता... इतर मालिकां सारखीच वाटतेय....
मध्ये मध्ये बोअर होतेय. पण
मध्ये मध्ये बोअर होतेय. पण स्टोरी मस्त पुढे नेलीय. कालपण काही ठिकाणी स्लो वाटली.
आजपासून भारुड कार्यक्रम सुरु होतील. होळीपर्यंत शंभर करायचेत त्यामुळे ती पुढेही बोअर होऊ शकेल कारण होळीला वेळ आहे.
धन्स अंजू. खरंच शंभर
धन्स अंजू. खरंच शंभर कार्यक्रम दाखवणार का. मग कंटाळा येईल.
काय माहिती, कोण बघणार. असं
काय माहिती, कोण बघणार. असं केलं तर एकदम होळीला 100 वा बघावा
विष घातलंय दोघांच्या
विष घातलंय दोघांच्या जेवणामध्ये पण तात्यांना संशय येणार आणि ते खाणार नाहीत. विकास स्वत:च्या मुलाच्या जीवावर उठलाय, नकळत किती मोठी चूक करतोय तो.
गुन्हा करतोय विकास. चुक
गुन्हा करतोय विकास. चुक नव्हे, अरे कोणाही माणसाच्या जीवावर उठणं आपल्या पॉलिटीकल करीयरसाठी हा गंभीर गुन्हा आहे.
हल्ली मुग्धा रानडे नसते. मला स्मिता बोअर होते.
कोणी पहाताय की नाही... मी तर
कोणी पहाताय की नाही... मी तर नाही बघत...पण काही updates माहीत असेल तर सांगा plz...
बघतेय मी पण मध्ये दोन दिवस
बघतेय मी पण मध्ये दोन दिवस बघितली नाही. शुक्रवारचा बघितला, भारुड म्हणताना तात्यांना त्रास होतो, त्यांना बाजूला करतात आणि बसवतात मग विहंग अचानक येऊन पुढे चालू करतो. तो आवाज विहंगचा स्वतः चा असेल तर तो चांगला गायक आहे. त्यात्यांचा आवाज ऐकून विकास येतो मग विहंगचा आवाज ऐकतो पण ओळखत नाही बहुतेक आणि नेहेमीप्रमाणे भेट होत नाही. फालतू फिल्मीपणा. विकास आपल्या बापाला आणि मुलाला मारण्याची योजना करणाऱ्यांना साथ देतोय, संपवू नका असं सांगत नाही अजिबात. ते मारून टाकणार याची कल्पना असून अडवत नाही, कोणाचा जीव घेणे चूक असं अजिबात म्हणत नाही.
त्याआधी विकासचा माणूस त्या मावशीच्या माणसांच्या कैदेतून सुटून बेशुद्ध पडतो रस्त्यात ते विहंग बघतो आणि हॉस्पिटलमध्ये admit करतो. मावशीचा माणूस सावलीवरून मकरंद वाटतोय.
कोण मकरंद. विकास त्या जागी
कोण मकरंद. विकास त्या जागी येतो (भारूड) पण नेमका विहंगला तात्या बोलावतात, ते दोघे परत स्टेजवर येतात पण विकास मागेे वळून बघत नाही आणि त्याला फोनपण येतो हे सगळं ईतक्या संथपणे दाखवलं की मला स्वत:चाच प्रचंड राग आला, असल्या फिल्मी मालिका बघते म्हणून (केस ऊपटणारी बाहुली (स्वत:चेच)).
कोण मकरंद >>> तो ऑफिसातला
कोण मकरंद >>> तो ऑफिसातला पत्रकार. पण तो नाहीये. विघ्नेश जोशी पण नसावा कारण बबन ओळखत नाही त्या माणसाला, विकास आणि बबन भेट होते. ओमला समजतं तो हॉस्पिटलमध्ये आहे.
त्याला फोनपण येतो हे सगळं ईतक्या संथपणे दाखवलं की मला स्वत:चाच प्रचंड राग आला, >>>
मी गृहीत धरलं तसंच दाखवणार. मी नवऱ्याला म्हणाले पण हा इतका स्लो जातोय ऐनवेळी त्याला फोन येणार आणि तो वळणार. बरं साहेब तात्यांचा आवाज ओळखतात पण विहंगचा नाही हे totally आश्चर्य.
ते आता tv वर नको बघायला.
ते आता tv वर नको बघायला. सोनी liv वर बघावं. खाली चौकोन असतात त्यात समजतं मग तेवढेच महत्वाचे वाटतील ते shots बघावेत असं ठरवलं आहे. आत्ता तसंचं केलं. वीस मिनिटं बघण्यापेक्षा पाच सात मिनिटं महत्वाची बघावीत.
शंभराव्या भारुडात समजेल तात्यांबरोबर विहंग हे विकासला किंवा डायरेक्ट मारेकरी मारायला जातील तेव्हा.
ओमला कसं समजतं बबन हॉस्पिटल
ओमला कसं समजतं बबन हॉस्पिटल मध्ये आहे ते नाही समजलं मला.
बाकी मालिकांपेक्शा बरी आहे ही एवढ्चं
ओमला कसं समजतं बबन हॉस्पिटल
ओमला कसं समजतं बबन हॉस्पिटल मध्ये आहे ते नाही समजलं मला. >>> त्याची आणि विहंग आणि तात्या यांची टक्कर होते, तो सीन विसरले actually means नीट लक्ष नव्हतं tvकडे आणि फाईल आणि फोटो विहंग ओमच्या हातात देतो बहुतेक.
बाकी मालिकांपेक्शा बरी आहे ही एवढ्चं >>> तशी बोअर होते मध्ये मध्ये पण अजूनही बघतेय. Voot वर बघते जास्त करून, काही सीन स्किप करते. स्मिता सरवदे आल्यावर मुग्धाला गायब केली. ती स्मिता मला नाही आवडत फार.
आजही विहंगची आणि विकासची भेट
आजही विहंगची आणि विकासची भेट होते की नाही, होते की नाही असा संभ्रम निर्माण करायचा मालिकेने प्रयत्न केला पण आज मी नाही फसले
आता विकास रक्त देईल, तात्या बरे होतील पण विहंग कुठे जाईल हे बघायचं. मला वाटतं तो तात्यांबरोबर परत जाईल आणि रेवतीच्या संपर्कात राहिल.
पण आज मी नाही फसले >>> मी पण
पण आज मी नाही फसले >>> मी पण नाही.
रेवती आता संपर्कात राहील तात्या आज्जींच्या.
ती वि वि भेट शंभराव्या भारुडाला होईल किंवा कोणीतरी मारेकरी हल्ला करेल छोट्या वि वर संपतरावाच्या सांगण्यावरून तेव्हा.
विहंग तात्यांना नाही सोडणार, त्याने स्वतः चं नाव चांगल्या रीतीने कमावले कि विकासला भेटायचं ठरवलं आहेना. मग तो उत्तम भारुड करायला लागेल तेव्हा नाव होईल त्याचं.
हम्म्, असेच होईल. ती स्मिता
हम्म्, असेच होईल. ती स्मिता अशी का वागत असते, त्या कलिगला बोलूच देत नाही. विहंगची बहिण कोणाच्या प्रेमात पडली आहे, म्हणजे कशी ओळख झाली तिची. त्या मुलाला कुठेतरी बघितलंय, ओठ मुडपून बोलतो.
रेवतीला कळले का विकासच्या आई
रेवतीला कळले का विकासच्या आई बाबा बद्दल?
मोक्षू, खूप वेळ आहे अजून
मोक्षू, खूप वेळ आहे अजून त्याला. दोन महिने तरी लागतील आरामात
Pages