भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मुग्धा छानच काम करते. समीर ला खरंच acting येत नाही... Dailogue डिलिव्हरी तर खूपच बेकार आहे, पण तरी मला तोच जास्ती आवडतो. त्या विहंगने एका फालतू स्कीम मधे 80, 000 चा मोबाईल 60, 000 ला घेण्यासाठी पैसे घातले, ते पण khi टपोरी लोकांकडून घेऊन. आता मोबाईल पण तिकडेच आणी पैसे गेले अन ते टपोरी पण मागे लागले पैसे नाही तर मोबाईल दे म्हणून.... सो त्याला 80, 000 पाहिजेत....

त्याने आता shares मध्ये गुंतवले आहेत ना ?
त्या so called girlfriend कडून पैसे घेत असतो.

हो त्रिज्या मलाही समीर आवडतो, पण मेन रोल असताना acting कडे नाही डोळेझाक करता येत. फार जाणवतं. मुग्धा तर कसलेली आहे पण तो पत्रकार दाखवलाय, त्यानेही सहज मात केली त्याच्यावर त्यामुळे अगदीच हा कमी पडतो जाणवलं.

Thank u त्रिज्या, स्वस्ति.

समीर कुठे कमी पडतोय?? आत सतत काहीतरी खदखदत असताना चेहर्‍यावर न दाखवता जगताना होणारी घालमेल किती छान दाखवतोय तो... ज्या वडील प्रेमाला तो मुकला ते प्रेम आपल्या मुलांना मिळाल पाहिजे यासाठी झटणारा बाबा किती छान साकारतोय तो... मला त्याच्या इतर projects मधल्या अभिनयाबद्दल माहिती नाही... पण यातला अभिनय तर कुठेच कमी वाटत नाही.. सगळ्याच ठिकाणी चेहर्‍यावरच्या रेषा झरझर बदलल्या म्हणजे अभिनय होत नाही ना..in fact आता कंटाळा आलाय हो अशा अभिनयाचा.. कधी कधी सहज अभिनयही मनाला भावतो... कट्टी बट्टी मधला पराग आणि आता स ध सुद्धा आवडतोय मला... त्याचा आनंद, राग, बुद्धीमत्ता, दु:ख, हतबलता सगळे प्रभावीपणे हाताळतोय तो..

मालिका खरच बाकि मालिंकां पेक्शा वेगळी वाटत आहे. समीर चा अभिनय खुप आवडला मला. या रोलमध्ये तो एकदम perfect वाटत आहे .सुशी चा अमर विश्वास आठवला Happy

आवडू शकतो ना समीरचा अभिनय, मी आदर करते त्याचाही. मला नाही आवडला, म्हणून मी लिहिलंना माझं personal मत. समीर मला आवडतो पूर्वीपासूनच पण अभिनयात हेच मत तेव्हाही आणि आत्ताही. संताप हतबलता असा एक सीन त्याने मस्त केला, तेही मी लिहिलं.

सुप्रिया तुम्ही तर काळजालाच हात घातलात की... मी एके काळी खूपच फॅन होते अमर, मंदार, दारा आणी फीरोज ची (अन मला असाच नवरा मिळेल असं वाटे...) अमर पण अनाथच असतो ना...
विषयांतर केल्याबद्दल sorry. मोक्षु मी समीर साठीच सिरीयल पहते... To नसेल तर फॉरवर्ड करावे वाटतात सीन मला... पण थोडा अभिनय कमी जमतो त्याला असं मला वाटत... पण मस्त इम्प्रेससिव्ह पेर्सोनालिटी आहे त्याची....

आजचा मी अर्धाच बघितला, टीव्हीवर. तो विहंग आईला रोप देतो तो सीन कित्ती सुरेख होता.

डायलॉग रायटर कोण आहे, नाव बघेनचं मी पण काही संवाद सुरेख लिहिलेत. समीर आणि तेजस्वी सीन मध्ये, तिचे डायलॉग्ज सुरेख होते, तू स्वतः तुझा भूतकाळ स्वीकारत नाहीयेस वगैरे.

मस्त इम्प्रेससिव्ह पेर्सोनालिटी आहे त्याची >>> ह्यासाठी अनुमोदन. डोळे पण फार सुरेख आहेत, तेजस्वी.

मुग्धाने काम सुंदर केलंय, दिसतेही छान पण समीरबरोबर मला पूर्वा गोखले किंवा मधुरा वेलणकर जास्त आवडली असती मात्र.

मलाही आवडतो समीर धर्माधिकारीचा अभिनय, अगदी उत्तम अभिनेता वगैरे नसला तो तरी he is good at what he’s doing!!
आजचा रेवती आणि विहंगचा झाड लावतानाचा सीन मस्त होता,काही संवाद खरंच छान आहेत मालिकेतले..

आजचा रेवती आणि विहंगचा झाड लावतानाचा सीन मस्त होता >>> तो आता बघणार आहे. मगाशी अर्धी बघता आली मला. आता रिपीट आहे टीव्हीवर. नाहीतर नेट आहेच.

शुक्रवारचा भाग बघितला. मस्त होता.

स ध ओळख वापरून मुलाला सेमिस्टरला बसायची परवानगी मिळवतो. ते त्याच्या बायकोला आवडलं नाही. बरोबर आहे तिचे. ती एक चांगली आई आहे.

स ध ने कॉलेज सीन एवढा खास नाही केला पण मिनिस्टरच्या माणसाबरोबरचा सीन उत्तम केला.

तो लहानपणी सुधारगृहात होता म्हणजे त्याने नक्की काहीतरी गुन्हा केलेला आहे लहानपणी. त्यामुळे त्याला त्या सर्व आठवणी नको आहेत. कौन्सेलरलाचं फक्त त्याने सांगितलं असतं. तिला तो आवडतो हेही जाणवतं पण तो नाही तिच्यात गुंतलाय. त्याचं बायकोवर मनापासून प्रेम आहे.

मिनिस्टर सिटी वसवणार आहेत ते त्याचं बालपणीचे गाव वगैरे दाखवतील कदाचित आणि त्याच्या वडलांची जमीन वगैरे जाणार असेल कदाचित त्यात.

मी Backlog भरून काढतेय . आई-मुलाचे रोप लावण्याचे scenes सुंदर आणि त्या वेळेचे संवाद केवळ अ..प्र..ति..म. hats off !! सहज सुसंवाद आणि सहज अभिनय !!!
Counselor चा वड-पारंब्यांचा dialogue ही छान .

हो superb आहेत काही काही dialogues... त्याला जशी पैशांची गम्मत दाखवलीस तशी कष्टाची किंमतही कळू दे....व्वा व्वा..creative team मस्त आहे या serial ची.. आजच्या overacting आणि अविश्वसनीय दाखवणार्‍या इतर मालिकांच्या तुलनेत खूपच पुढे आहे... खूप जवळची वाटते... Family relations तर खूपच आवडले मला यातले... बाकी मालिकांसारखी predictable नाही हे जास्त जाणवत पाहताना

मिनिस्टर सिटी वसवणार आहेत ते त्याचं बालपणीचे गाव वगैरे दाखवतील कदाचित आणि त्याच्या वडलांची जमीन वगैरे जाणार असेल कदाचित त्यात.>>>मला नाही वाटत तसं.... Illegal काम करणार्‍या मिनिस्टरला दणका देईल बहुतेक स. ध.

विकास ने त्याचा सगळा भूतकाळ कुटुंबापासून लपवून ठेवलाय त्यामुळे भूतकाळातले जे जे ओळखीचे लोक भेटतात त्यांच्या पासून तो लांब पळतोय या सगळ्यामुळे त्याची होणारी कुतरहोड चांगली दाखवली आहे . पण त्याने सगळं काही सांगितलं तर एक तर त्याची बायको एक्सेप्ट तरी करेल किव्वा करणार नाही . ती कशी वागेल याचा त्याला अंदाज येत नाहीये म्हणून तो घाबरतोय . या एका सूत्रावर मालिकेचा डोलारा उभा आहे . आजूबाजूला त्याच व्यवसायातील यश . मोठं झालेल नाव या गोष्टी आणि त्यातून राजकारणी लोकांनी त्याला दिलेलं काम वगैरे वगैरे आहेतच . एकंदर इंटरेस्टिंग आहे सगळं . मालिकेचं संवाद मात्र खरंच खूप सुंदर आहेत

मालिका रंगत चालली आहे.
काल विकास च्या समोर त्याचा भूतकाळ येतो तो scene मस्त झाला. रेवती इतके भारी कपडे आणि दागिने का घालते घरात ही? परवा रोप लावताना पांढरी साडी नेसली होती. माझ्या जीवाला उगीच घोर Sad

मस्त होता कालचा एपिसोड.

तो सर्व तिला कळवणारा त्याचा मित्रच आहे, विघ्नेश जोशी भुमिका करतोय त्याची. जास्त वेळ फोन सुरु होता म्हणून आवाज ओळखू आला.

आता मला भीती वाटते की विकास परळीकर ओमचा खुन करेल का, स्वतःचा भुतकाळ समोर येऊ नये म्हणून.

सुरुवातीचे रेवती विकासमधले संवाद छान होते.

मला असाही संशय येतोय की काऊंन्सेलर त्या मित्राला बातम्या पुरवतेय का, म्हणजे बायकोला सांगितल्यावर ती आणि मुलं विकासपासून दूर होतील कारण तिला विकास आवडतो.

का त्या मित्राचापण काहीतरी ठोस हेतु आहे.

एनीवे पण फार इंटरेस्टींग टप्प्यावर येऊन पोचली आहे ही सिरीयल. आता वेग घेईल बहुतेक आणि जास्त मजा येईल बघायला.

I thought it was that reporter who lost his job and later joined vikas' office; now spying and reporting to revati for revange. Some how he knew vikas' past, met om somewhere and then planned everything. Though he's very chiller party before vikas, he will take his revange for spoiling his career.

I thought it was that reporter who lost his job >>> सेम Happy

हो मला त्याचाच संशय आधी आलेला, रिपोर्टरचा. पण काल फोनवर आवाज विघ्नेश जोशीचा होता, may be कन्फुस्ड करायला असेल पण आवाज मित्राचं काम करणाऱ्या विघ्नेश जोशीचा होता हे नक्की.

तो सर्व तिला कळवणारा त्याचा मित्रच आहे, विघ्नेश जोशी भुमिका करतोय त्याची. जास्त वेळ फोन सुरु होता म्हणून आवाज ओळखू आला >> omg really???
पण तो असं का करेल ? तो तर चांगला आणि त्याचा पार्टनरपण आहे ना, समहाऊ मला तो वाटत नाहीये माहिती पुरवणारा, दुसराच कोणीतरी असेल असं वाटतंय..
तो ओमचं काम करणारा अभिनेता ओळखीचा वाटतोय, याआधी पाहिलंय त्याला कुठेतरी पण नक्की आठवत नाहीये.

माझा अंदाज फक्त आवाजावरुन आहे. आवाज तरी त्याचा वाटला मला.

तो ओमचं काम करणारा अभिनेता ओळखीचा वाटतोय, याआधी पाहिलंय त्याला कुठेतरी पण नक्की आठवत नाहीये. >>> सेम पिंच. मी पण आठवायचा प्रयत्न करतेय, कुठे बघितलं आहे ह्याला.

Pages