भेटी लागी जीवा-सोनी मराठी

Submitted by मोक्षू on 29 August, 2018 - 10:06

नवीन channel सोनी मराठी वर लागणारी मालिका... झी मराठी वरच्या फालतू मालिकांना कंटाळलेल्या सुज्ञ प्रेक्षकांनी काहीतरी चांगलं पहावं आणि त्यावर चर्चा करावी असं वाटतं म्हणून हा धागाप्रपंच... वेगळी कथा आणि उत्तम अभिनय...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण विकासाच्या ऑफिस वर हल्ला झाल्याची न्यूज बघितल्यावर ती म्हणते "ही तर सुरवात आहे विकासाच्या संपण्याची" ते अजिबातच नाही आवडलं..ँ>>>>> अच्छाSSS, मी हा भाग नाही पाहिला अजून. विकास घरी येतो त्याबद्दल मी बोलतेय. विकास ने रागाच्या भरात वाट्टेल तसं वागाव आणि मग माफी मागावी आणि सगळं पहिल्यासारखं व्हावं, असं कसं चालणारं ....

अगदी योग्य निर्णय घेतला रेवतीने.. खरंतर आयुष्यातले सगळेच प्रश्न सोडवून सुटत नाहीत तर काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटत जातात... एखादी चांगली व्यक्ति एखादी गोष्ट लपवत असेल तर ती अप्रामाणिक आहे असा अर्थ काढणे चुकीचे आहे... In fact त्यामागे त्या व्यक्तीच्या भावना खूप नाजूकपणे जोडल्या गेल्या असतात... त्याचा त्यांना त्रास होतो.. म्हणुनही ते सगळं टाळत राहतात... म्हणूनच विकासाबद्दल विचार करताना मला तो चुकीचा नाही वाटत... त्याला कोणीतरी समजून घेण्याची गरज आहे असं वाटतं.. म्हणूनच कोणी काही लपवत असेल तर लगेच त्याला प्रामाणिकपणाच्या कसोटीवर तपासून बघू नये..

"भेटी लागी जीवा" ही खूप चांगली सिरीयल आहे. स्टार प्लस महाभारतातील शंतनू, कलर्स वरच्या सम्राट अशोक मधला बिंदुसार आणि सोनीवरच्या बाजीराव पेशवा मधला शाहू महाराज या दमदार भूमिकेनंतर बऱ्याच काळानंतर समीर धर्माधिकारी मराठीत आलेला आहे!

आतापर्यंत "भेटी लागी जीवा" मध्ये काय घडले हे येथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे यापुढचे एपिसोड जरी तुम्ही बघितले तरी ते समजतील!

समीर धर्माधिकारी यात "पत्नी आणि दोन मुले (एक मुलगा, एक मुलगी) असलेल्या" एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत ज्याचा भूतकाळ काहीसा चांगला नव्हता, पण तो सध्या एक वकील आहे आणि अधून मधून त्याला त्याच्या लहानपणीचे म्हणजे अनाथाश्रमात राहत असतानाचे अप्रिय प्रसंग आठवत राहतात. त्याला त्याचा भूतकाळ त्याच्या वर्तमानकाळात डोकावलेला नको असतो आणि तो आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा असतो. विकास आणि त्याच्या पत्नीचे (रेवती) लव्ह मॅरेज असते आणि ती घरदार कायमचे सोडून त्याचेकडे आलेली असते.

आपले भारुड गायक वडील तात्या (अरुण नलावडे) यांचे भारुड गायन त्याला आवडत नाही आणि संघर्ष होऊन तो लहानपणी घर सोडतो. (मी सुरुवातीचे एपिसोड नीट पूर्ण पहिले नाहीत, तेव्हा हा भाग नीट तपासून बघावा!)

अशातच त्याचा मुलगा विहंग ऐशी हजारांचा काहीतरी अपहार करतो पण आपल्या पत्नीला न सांगता विकास परळीकर (समीर धर्माधिकारी) त्याच्या मुलाला सोडवतात हे त्याच्या बायकोला आवडत नाही.

कॉलेजमध्ये विहंगला काढून टाकणार असतात पण राजकीय दबाव टाकून विकास ते प्रकरण मिटवतात. पैशांनी काहीही करता येतं असे चुकीचे संस्कार विहंगवर होऊ नये म्हणून विहंगची आई (विकासाची पत्नी - रेवती) त्याला रोज थोडे वडिलांबरोबर ऑफिसमध्ये जात जा असे सांगते, जेणेकरून पैसे मिळवण्यासाठी काय मेहनत करावी लागते असे त्याला कळेल!! मग विहंग अधूनमधून वडिलांच्या ऑफिसमध्ये जाणे सुरु करतो. आणि मागील घटनांवरून बोध घेऊन सिरियसली अभ्यास करायला लागतो.

दरम्यान रेवतीला एक निनावी व्यक्ती फोन करून विकासबद्दल, त्याच्या सध्या चाललेल्या काही कामांबद्दल, त्याच्या भूतकाळाबद्दल उलटसुलट सांगत असते आणि ते खरे होतांना तिला दिसते. हे सर्व का विकासने तिच्यापासून का लपवले म्हणून ती त्याला धारेवर धरते आणि गणपती बसतात त्या दरम्यान ती त्याचेशी अबोला धरते आणि त्यांचे वैवाहिक जीवन खूप बिघडते. विकासाला योगायोगाने त्याबद्दल (तिला येणाऱ्या फोन कॉल्सबद्दल) कळतं आणि तो तिच्याकडून फोन हिसकावून फेकून देतो आणि पायाखाली चिरडून टाकतो. नंतर तो पुन्हा नवीन फोन आणतो पण रेवती स्वीकारत नाही! पण फोन करणारी व्यक्ती कोण आहे हे विकास, रेवती किंवा आपण प्रेक्षक यांना अजून कळलेले नाही कारण त्याची फक्त अंधारात बोलतांना सावली दाखवतात आणि त्याच्या रूममध्ये विकासचे अनेक फोटो चिकटवलेले असतात (शाहरुखच्या डर, आमिरच्या गजनी आणि पुन्हा शाहरुखच्या फॅन चित्रपटासारखे).

विकास भूतकाळाला विसरण्यासाठी आणि एक चांगला कुटुंबप्रमुख होण्यासाठी एका महिला सायकोलोजीस्टची मदत घेत असतो. त्यासाठी तो तिच्याकडे केव्हाही जात येत असतो. रात्री सुद्धा! तिचे लग्न झालेले असते की नाही याचा उलगडा झालेला नाही कारण तिला घरात एकटीच राहातांना दाखवलंय! विकास आणि तिच्यात प्लेटोनीक रिलेशन दाखवले आहे. (शारीरिक पातळीपलीकडे फक्त निखळ मैत्री!)

विकास आणि विहंग यांच्यात नेहमी चांगले संबंध असावे यासाठी विकास खूप प्रयत्नशील असतो आणि काही प्रमाणात त्यात यशस्वीही होतो.

पण अचानक एक घटना घडते. विकाससोबत अनाथाश्रमात राहिलेला (आणि विकासाला मदत केलेला) एक मित्र अचानक त्याच्या ऑफिस मध्ये येतो आणि त्याच्यावर आलेल्या खोट्या खुनाच्या आरोपापासून त्याला सोडवण्यासाठी त्याची केस विकासने घ्यावी असा आग्रह करतो, पण विकासला त्याचा भूतकाळ त्याचेसमोर कोणत्याच स्वरूपात नको असतो. मग विकास एका बिल्डरकडून ब्लॅकमेल करून मिळवलेली रक्कम एका बॅगमध्ये भरून त्याच्या त्या मित्राला देतो आणि शहर सोडून जा आणि नवीन शहरात नावाने नवीन आयुष्य सुरू कर असे सांगतो आणि त्याची केस घ्यायचे नाही म्हणतो कारण केस घेतली असती तर कोर्टात त्याचा मित्र जे सांगेल त्यावरून त्याचा नको असलेला भूतकाळ समोर आला असता!

मात्र दुर्दैवाने तो मित्र शहर सोडून जात असतांनाच नेमके पोलीस त्याला पकडतात आणि विकास जे टाळण्याचा प्रयत्न करतो तेच नेमके त्याच्या आता अंगाशी येणार असते. नंतर निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीबद्दल तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनात गेलेली रेवतीसुद्धा योगायोगाने विकासाच्या त्या अटक झालेल्या मित्राला कोठडीत भेटते कारण ती सामाजिक कार्यकर्ती असते. पण गुंडांकरवी विकास तुरुंगात त्याच्या मित्राला मार खाऊ घालतो आणि तो मित्र जखमी होऊन न बोलण्याच्या स्थितीत येतो.

एकदा विहंगचे मित्र त्याला बिझिनेस सुरु करायला वडिलांकडून पैसे मागायचा सल्ला देतात कारण गणपतीला जेव्हा ते त्याचेघरी गेलेले असतात तेव्हा विकास लाखोंचा चेक अनाथाश्रमाला दान करतांना त्याच्या मित्रांनी पाहिलेले असते. पण विहंग नाही म्हणतो. मग ते त्याला त्याच्या गर्लफ्रेंड कडून पैसे मागायला सुचवतात. त्यासाठी तिच्याशी प्रेमाचे खोटे नाटक त्याला करायला सुचवतात.

विकासाच्या कुटुंबाशी लहानपणापासून स्नेहसंबंध असलेले एक जोडपे असते ज्यांना मुलबाळ होत नसते आणि ते विकासाच्या मुलांना स्वतःचे मुलं समजून आपला जीव लावत असतात. त्यातील पुरुष विकासाच्या ऑफिसमध्येकाम करत असतो. पण एका घरगुती जेवणाच्या पार्टीत त्यांचेकडून विकासावर मुलांसमोर, रेवतीसमोर विकासाच्या मनाला लागेल अशी जहरी टीका गमतीत होते म्हणून विकास त्याला म्हणतो की मुलांसमोर त्यांच्या वडिलांबद्दल काय बोलावे याची अक्कल तुला कशी असणार? कारण तुला मुलं नाहीत आणि कधी होणारही नाहीत. यामुळे ते जोडपे भयंकर दुखावले जाते आणि त्यातील स्त्रीकडून विकासाला शाप मिळतो आणि ती नंतर मनात ठरवते की विकासाला ज्या त्याच्या मुलांबद्दल गर्व आहे त्या मुलांना त्याच्यापासून ती तोडेल. अशातच तो निनावी फोनवला तिलाही कॉल करायला लागतो आणि तिला आयती संधी मिळते.

मग नंतर बिल्डरकडून आणलेली बॅग विकास हातात घेऊन जातांनाची व्हिडीओ शुटींग दाखवून विकासाला ब्लॅकमेल केले जाते कारण आता त्या बॅगमधले पैसे (जे विकासाच्या मित्राकडे सापडले) बिल्डरने विकासाला दिलेले असतात आणि विकाससोबत आता तो बिल्डर सुद्धा फसणार असतो म्हणून तो त्याला उलटे ब्लॅकमेल करतो. विकासाच्या ऑफिसवर मग एक हल्ला होतो...

आपले भारुड गायक वडील तात्या (अरुण नलावडे) यांचे भारुड गायन त्याला आवडत नाही आणि संघर्ष होऊन तो लहानपणी घर सोडतो. (मी सुरुवातीचे एपिसोड नीट पूर्ण पहिले नाहीत, तेव्हा हा भाग नीट तपासून बघावा!) >>> मीपण उशिरा सुरु केलं नीट बघायला पण ह्याचे डीटेल्स दाखवले नसावेत.

शारीरिक पातळीपलीकडे फक्त निखळ मैत्री >>> त्याच्याकडून निखळ मैत्री, ती गुंतलीय. ती एकदा म्हणतेही मी असेन कायम, जेव्हा तो म्हणतो भूतकाळ कळल्यावर बायकोने नाही स्वीकारलं तर.

अनाथआश्रमात तो उशिरा येतो, तो काहीतरी चूक करून घरातून पळाला असावा असा अंदाज. फक्त वडील लोककलाकार आहेत ते आवडत नाही, एवढं छोटं कारण नसावं. किंवा वडिलांकडून काही घडलं असावं जे ह्याला पसंत नव्हतं.

बाकी आढावा छान निमिष.

अनाथाश्रमाच्या आधी विकास सुधारगृहात होता...drugs पुरवले असतात त्याने एका व्यक्तीला पण तो लहान असल्याने अनभिज्ञ पणे ड्रग्स पोचवतो आणि पोलिस त्याला पकडतात मग रवानगी होते ती सुधारगृहात.. ओम त्याला पहिल्यांदा तिथेच भेटतो... आणि यशस्वी विकास परळीकरला अनाथ नसताना अनाथाश्रमात राहिलो अन्‌ त्याआधी गुन्हा केल्यामुळे सुधारगृहात राहिलो हे आता family, friend, coloulegs यापैकी कोणाला कळले तर काय होईल याची सतत भीती वाटत असते... त्याच्या मनाची, जिवाची सतत तगमग होते.. ही भूमिका समीर धर्माधिकारी अत्यंत उत्तमपणे निभावतोय...

मस्त आढावा घेतला आहे तुम्ही निमिष, वाचताना सगळे भाग आणि घटना डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.
तात्या आणि विकासचं नेमकं नातं काय आणि त्याचा त्रासदायक भूतकाळ काय हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही, सस्पेन्स आहे. मधेमधे मालिका खूप संथ होते. खरा सस्पेन्स म्हणजे तो फोन करणारा माणूस नक्की कोण???
रच्याकने तो मिनिस्टरचा पी.ए. कसला खतरनाक घेतलाय, साॅलिड काम करतो तो !!
सगळ्या कलाकारांची नावं कळली पाहिजेत पण, विहंगचं काम करणारा मुलगा पण छान , स्मार्ट आहे.

संथ होतेय बरेचदा हे खरं आहे.

विहंगचे दोन मित्रही उनाडक्या करणारे आहेत. अभ्यास नको, शेअर्समध्ये पैसे लावायचे. पण विहंग तसा शहाणासुरता वाटतो पण त्याचं ऐकतो.

विहंगला शिकायचं नाहीये, त्याचं मन लागत नाही तर त्याचे बाबा शिक्षणाचे महत्व सांगतात. पण जर तो पेपर वगैरे चोरून पास होत असेल तर न शिकलेला बरा. कालच्या मित्रांच्या डायलॉग्जवरून पेपर मिळवतात ते लोक्स दरवर्षी असं वाटतं.

शिकायला हवं हे मला विहंगच्या बाबांचे पटते (प्रीकॅप दाखवला), पण विहंगचं मन नसेल तर उलटसुलट काही करून त्याने ग्रज्युएट होण्यापेक्षा त्याला गायन वादनात करियर करुदे, जे त्याला आवडतं.

नवीन सायबरसेलवाले इन्स्पेक्टर मस्त आहेत, त्यांचे डायलॉग्ज मस्त होते.

शिकायला हवं हे मला विकासच्या बाबांचे पटते (प्रीकॅप दाखवला)>> अग विहंग म्हणायचं आहे ना तुला की विकास आणी त्याचे बाबा म्हणजे तात्या यांचा काही भूतकाळ दाखवला का असा? मी missla वाटत एपी. मला विहंग n त्याचे कॉलेज मधले सीन बोअर होतात. समीर नंतर माझा फेव्हरटे बबनच :D. Vihang n त्याचे 2मित्र सोडले तर मला सगळेच आवडतात. स्वरा पण खूपच गोड आहे..
बाकी योगिताला असुरी आनंद झाल्यासारखा वाटला मला काल...

बाकी योगिताला असुरी आनंद झाल्यासारखा वाटला मला काल... >>> हो. ती सूड उगवणार.

मला विहंग आवडतो, रादर समीर, मुग्धा, त्याची बहिण आणि तो सर्व family आवडते.

नाही.

कट्टीबट्टी बघत होते, ती संपली. ह म बने, तु म बने बघतेय सध्या आणि भे ला जी पण बघतेय. अमिताभचं के बी सी आवर्जून बघतेय. परवाचा हिंदी बिग बॉस एपिसोड बघितला नेटवर.

इथे वाचते बाकी सिरियल्सचं. युट्यूबवर छोटे छोटे सीन्स दोन मिनिटांचे असतात ते बघते कधी बघितले तर. त्यात हिंदी उडान, बेपनाह मध्ये काय चाललंय ते समजते.

नवीन Submitted by त्रीज्या on 26 September, 2018 - 19:15
नाही.

कट्टीबट्टी बघत होते, ती संपली. ह म बने, तु म बने बघतेय सध्या आणि भे ला जी पण बघतेय. अमिताभचं के बी सी आवर्जून बघतेय. परवाचा हिंदी बिग बॉस एपिसोड बघितला नेटवर.

इथे वाचते बाकी सिरियल्सचं. युट्यूबवर छोटे छोटे सीन्स दोन मिनिटांचे असतात ते बघते कधी बघितले तर. त्यात हिंदी उडान, बेपनाह मध्ये काय चाललंय ते समजते. >>>>>> तरीच विचार केला, एवढे सगळे हिन्दी-मराठी सिरियल्स बघायला तु वेळ कसा काय मॅनेज करतेस!

सुलु, यु ट्यूबवर मानबा, तू पा रे चे पण दोन दोन मिनिटांचे सीन्स असतात पण ते बघायचं डेरिंग नाही होत आणि त्यापेक्षा इथे त्या सिरियल्सचं वाचायला आवडतं.

आज शनिवार , आठवड्याचा backlog भरून काढला.
तो speaker fone वर बोलतानाचा scene काय सही होता.मला एकदम भरून आलं.
Vikas really loves his family , especially रेवती.

मंत्र्याचा PA कुठून शोधून काढलायं , कसला बेरकी आहे तो!
विकास आणि विहंगमधले scenes आवडतात.
मकरंदला मध्ये काम चांगली देतो शोधून. आता ते पत्र लिहायचं. मकरंद , श्वेताशी बोलून फोन परत देतो तेव्हा विकासचा चेहरा मस्त होतो.
सध भारी दिसतोय . डोळ्यात total बदाम !!!!
त्याचे cunning expression जास्त छान असतात.

विहंग झोपतो तेव्हा विकास त्याचं सर्व हळुवारपणे आवरतो, त्याला सावकाश उठवून बेडवर झोपायला सांगतो तो सीन बेस्ट होता, बाबा म्हणून समीरने तो सुपर्ब केला. त्याच्या अभिनयात खूप सुधारणा आहे आता.

मुग्धा समीरमधला सीन, मुग्धाने बेस्ट केला.

सध्या स्लो वाटतेय जाम मला.

विहंगला अभ्यासात इंटरेस्ट नसेल तर उलटसुलट काही करून पास होण्यापेक्षा त्याला एखाद्या वर्षाची gap घे असं सांगायला हवं. तोपर्यंत अर्धा दिवस ऑफीसमध्ये मदत कर आणि अर्धा दिवस गिटारवादन मीन्स त्याच्या आवडीसाठी वेळ. नाहीतर हा त्या दोन मित्रांमुळे वाया जाणार.

तेजस्वी पाटील बदलली मीन्स आता गोठच्या सुलेखावहीनी म्हणजेच शलाका पवार आता त्याजागी आली. तेजस्वी यंग होती पण acting so so. शलाका पवार actingमध्ये उत्तम.

आधीची अनया विकासवर खरं प्रेम करणारी वाटायची आणि आत्ताची जरा चालाख आणि वेगळीच वाटली... ती नक्की कशी आहे यातच confusion झालंय आता.. समीरची acting जबरदस्त... रेवतीला आलेला mail वाचताना तर अप्रतिम acting केली त्याने...स्वप्न दाखवलं त्यात विहंगने पण छान केला अभिनय... तसा मला नाही आवडत विहंग फारसा.. स्वरा किती कृत्रिम पणे बोलते.. श्वेता मस्त आहे..

विहंग अभिनय छान करतो नविन असून, मला आवडतो. पण अ‍ॅज अ कॅरॅक्टर फार झोल करणारा मुलगा आहे.

समीर आवडतो मला पुर्वीपासून पण अभिनय हल्ली सुधारला अस माझं पर्सनल मत. ह्याच सिरीयलमधे बरेचदा समीरवर समोरच्याने मात केली अभिनयात असं दिसून आलं. पण आता बराच सुधारलाय त्याचा अभिनय. तो पत्रकार आणि समीर सीन पहीली भेट, समीर मुग्धा सीनमधे समीरपेक्षा समोरच्याने उत्तम केलं, अगदी सहज.

नविन अनया एवढी एजेड का घेतली काय माहीती. मला आधीचीपण आवडली नव्हती, आत्ताची पण नाही आवडत. शलाका पवार मायाळू वगैरे वाटते जास्त, आधीच्या सिरीयलमधे होती तशी. पण ते ह्या charactorला अजिबात सूट होत नाही. दोघींची तुलना करता तेजस्वी मला आवडत नसली तरी जास्त योग्य होती. ती दिसायला छान आणि अभिनय हिचा छान. पण बदलायची होती तर तेजस्वीच्या वायाचीच घ्यायला हवी होती.

स्वरा किती कृत्रिम पणे बोलते.. श्वेता मस्त आहे. >>> अगदी अगदी.

विहंग टोटली चुकीचं वागतोय. बाबांचा उत्तम सपोर्ट असूनही आधी केलेले झोल कमी वाटतील असे नवीन झोल करतोय. त्यापेक्षा आईबाबांना सांगायचं होतं की मी एक वर्ष gap घेतो, प्लीज परमिशन द्या.

आईच्या मनात येतं त्याकडे बाबा दुर्लक्ष करतोय. आईने बरोबर point out केलं की ह्याला बेसिक्स येत नाहीत तर हा पास कसा झाला आत्तापर्यंत.

नक्की विकासच्या आयुष्यात काय झालं लहानपणी माहिती नाही, अजून दाखवलं नाही पण जसा विकासमुळे त्याच्या बाबांना त्रास झाला, सेम history रिपीट होणार. विहंगमुळे विकासला त्रास होणार.

योगिता भडकवते म्हणून विहंग अजूनच बिघडतोय पण विकासचं विहंगला समजून घेणे पाहिलं की वाटतं यांचं कोणीच काहीही बिघडवू शकणार नाही.....Vikas is really a gr8 dad.....समीर मला पहिले पासूनच आवडतो पण त्याने आपल्यासमोर उभा केलेला बाबा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात असावा असा आहे... Really his work is very adorable and appreciable... या मालिकेतील villains पण खर्या आयुष्यात घडतात तशीच वागत आहेत.. उगाच अवाजवीपणा कुठेच नाही..

स्टोरीचा बेस नक्कीच असा आहे की विकासचा भूतकाळ पुढे येणार. त्यामुळे घटना त्या अनुषंगाने जातायेत. Duplicate student ला ती योगिता पकडवून देणार असं वाटतं.

विकास एक उत्तम बाबा आहे यात शंका नाही, very sweet and lovely father. पण एक मुलगा म्हणून तो कसा आहे हे आपल्यासमोर आलं नाहीये अजून त्यामुळे जेव्हा मुलाकडून त्रास होईल त्याला तेव्हा त्याला जाणवेल की आपण आपल्या बाबांना त्रास दिला.

मला आधी वाटलेलं की विहंगला गायन वादन आवड आहे तर तो लोककला, लोकसंगीत शिकण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी नेमका आजोबांकडे जाईल. स्टोरी तशी पुढे नेतील पण हा विहंग खड्ड्यात पडत चाललाय.

मस्त होता कालचा episode.... Call करणार्‍या व्यक्तीला शोधायला विकास, रेवती आणि सायबर क्राइम वाले जातात आणि तिथेच त्याचा फ़ोन येतो त्या scene मधले संवाद मस्त होते.... विकास खूपच हुशार आहे... मजा येतेय पहायला

विकास खूपच हुशार आहे. >>> अगदी अगदी. काय परफेक्ट समजलं त्याला फोन hack केलाय त्याचा ते.

विहंगचे दोन मित्र रिकामटेकडे चुकीचंच वागतात आणि विहंगही. नशीब दारू पीत नाही त्यांच्याबरोबर.

विकास मस्त सुनावतो विहंगला ठामपणे, मस्त सीन होता तो.

विकास मंत्र्यांच्या पी ए ला पण छान सुनावतो, ओमला मारायचं नाही.

Pages