Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल मायरा चान्गली खुशीत
काल मायरा चान्गली खुशीत दिसत होती, विसबरोबर सायकलिन्ग करायला मिळतय म्हणून.
तिकडे तो इबाळाची स्तुती करत होता हिला वाटत, हा आपल्याला छान म्हणतोय. 
काल सीआयडीतल्या दयासारखे काळे कपडे घातलेले कमांडोज नीमकरांना चाळीत परसाकडे जायला सोबत करीत होते! >>>>> त्या बॉडीगार्डसना जराही कॉमनसेन्स नाहीयेका , कुणाच्या मागे कुठे जायच ते. विस टॉयलेटला जातानासुद्दा हे असेच करतात का? पण विसला झेन्डे आणि पताका असताना वेगळया बॉडीगार्डसची गरजच नाही म्हणा.
त्या गार्डस ना निदान जालिंदर चे जुने फोटो तरी देऊन ठेवायचे म्हणजे मग रिक्षा कोण चालवतोय ते कळलं असतं .. भले १५ वर्षानंतर तो दिसायला वेगळा दिसूदेत ... >>>>>>> अगदी अगदी. तो जालिन्दरला म्युझिक प्लेअरचा आवाज सुद्दा कमी करायला सान्गत नाही. किती मख्ख आहे तो.
आणि तो बॉडीगार्ड तिच्या सोबत कॉलेजला गेल्यावर तिच्याबरोबर रहाय्च सोडुन मैत्रीणीबरोबर आधी काय हॉल चेक कराय्ला जातो? >>>>> क्षणभर मला वाटल, रुपाली आणि त्या बॉडीगार्डच जुळतय की काय?
Visa la kay wayach
Visa la kay wayach dakhawayach aahe ya badddal fix nahi zal lekhakach ajun.. dar 2 episode la wegla vayacha dalhwatat.. suruwatila tar changla young dakhawala hota +++++++ १११११११
तर आपले इबाळ कन्फ्युज्ड चेहरा करत बसलय... तेव्हा कुठे गेले विश्वास अन प्रेम? >>>>>> रुपाली तिला बरोबर सान्गत होती, विसला सगळ खर सान्गून टाक म्हणून. पण हि ऐकेल तर शप्पथ.
ती इशा टी वाय ला आहे ना? १०वी , १२वीतल्या मुलांना दाटुन दडपुन अभ्यासाला बसवतात तसे निमकर आईबाबा मागे आहेत तिच्या. >>>>>>> कारण ईशा वागतेच हल्ली तशी. अभ्यास सोडून लक्ष मात्र भलतीकडेच (विस, सरन्जामे इन्डस्ट्री, ऑफिस, लग्न, वै वै)
ईशाची मैत्रीण रुपाली खरंच खूप छान करतेय अभिनय .. तिला पुढे चांगलं काम मिळायला हवं >>>>>>>> सहमत
सुभा पेढे दयायला जेव्हा येतो
सुभा पेढे दयायला जेव्हा येतो तेव्हा त्याची स्माईल किलर होती.
क्षणभर मला वाटल, रुपाली आणि
क्षणभर मला वाटल, रुपाली आणि त्या बॉडीगार्डच जुळतय की काय? >>शू sss !! असं मोठ्याने लिहू नका .. नको ती आयडिया मिळायची त्यांना
पुढे मागे काय नसेल तर ते हि दाखवायला कमी करणार नाहीत ..
शू sss !! असं मोठ्याने लिहू
शू sss !! असं मोठ्याने लिहू नका .. नको ती आयडिया मिळायची त्यांना Wink पुढे मागे काय नसेल तर ते हि दाखवायला कमी करणार नाहीत .. >>>>>>
रुपालीला हिरवीण करायला हव होत
रुपालीला हिरवीण करायला हव होत.कसली हुशार आहे पोरगी.काहीत्रका असेना पण एकदा तरी तिला अस वाटल की काकांच खर असल तर.
पण बाळाचा जर सरांवर विश्वास आहे तर मग चिठ्ठी फाडून फेकून द्यायची ना.
पण आता मला सुध्दा सुभा वर संशय येत आहे.
हा त्या रुद्रम मधल्या करमरकरसारखा नसेल ना.
सुभा सारख वेगळा रोल वेगळा रोल करत आहे ,तो हाच नाही ना.
विनोदी होत चाललीये सिरीयल.
विनोदी होत चाललीये सिरीयल. ईबाळाची आई त्या बॉडीगार्ड्सकडून घरातली कामे करवतीये.
रुपालीला हिरवीण करायला हव होत
रुपालीला हिरवीण करायला हव होत.>>+१
सुभाच्या डोळ्यात वात्सल्य आणि ईई बाळाच्या डोळ्यात हाव दिसते फक्त।।>>+१११
ईबाळाची आई त्या
ईबाळाची आई त्या बॉडीगार्ड्सकडून घरातली कामे करवतीये. >>>
खरं की काय आणि ते करतायेत, आमची ही ड्युटी नाहीये असं नाही सांगत. मज्जा आहे बुआ ई familyची.
आधी मॅगी घातली आणि नंतर कांदा
आधी मॅगी घातली आणि नंतर कांदा टाॅमेटो. काही येत नाही त्या विक्रांत सरंजामेला..आणि नंतर ढवळून ढवळून त्या मॅगीचं पार पिठलं करून टाकलं.
हो. मी तर म्हटले असते तूच खा
हो. मी तर म्हटले असते तूच खा असली पचपचीत मॅगी.
ईपालकांना काही कळत नाही.. हा घरावर बसून लेकीला मॅगी खायला देतो आहे तरीही म्हणतील कि किती करतात वि सर आपल्यासाठी
ईशाला टर्मिनेट करायच्या नोट
पुन्हा बॅकलॉग कॅचअप. बहुधा १४ नोव्हें. चा भागः
ईशाला टर्मिनेट करायच्या नोट वर डायरेक सीईओ ची सही कशाला पाहिजे? एच आर मधली कोणीही सिनीयर व्यक्ती ते करू शकते.
त्यावर ईशातै रडत आहेत. आधीच इव्हन नॉर्मल असताना त्यांच्या तोंडून वाक्ये महत्प्रयासाने बाहेर आल्यासारखी येतात. इथे तर रडत बोलायचे आहे. अॅक्टिंग चॅलेंज. ती ऑफिस मधली कलीग तिला म्हणते
"मला तर वर्ड्सच सापडत नाहीयेत"
त्यावर ईशा "मलाही अधूनमधून अक्षरे सापडत नाहीयेत" असे म्हणेल असे वाटते, इतकी ती मधली अक्षरे खाते रडत बोलताना.
नशीब कंपनीचे बोर्ड मेम्बर्स, प्रमुख शेअर होल्डर्स आणि ते चार डीलर्स बोलावले नाहीत ईशाच्या टर्मिनेशन नोट प्रदान समारंभात. त्यात निमकर कपल ची (वरचे "ईपालक" जबरी भारी आहे
उर्फ ईपालकांची मीटिंग मधे एण्ट्री जितकी अभूतपूर्व आहे, तितके त्यांना तसे घुसू देण्याचे कारणही - "साहेब, ते ऐकतच नाहीत"!
आणि तितक्यात हिंदी पिक्चर मधे जशी हीरो ची एण्ट्री आधी शूज दाखवून मग वर हळुहळू कॅमेरा जातो - तशी विक्रांतसरांची एण्ट्री. आणि उपस्थित सर्वांना क्रमाक्रमाने वाटलेले आश्चर्य. फिरत्या ढालीसारखे फिरते आश्चर्य. म्हणजे पहिल्याचे वाटून झाल्याशिवाय दुसर्याला नाही.
"सर, एन्क्वायरी मधे तिच्या घरी गादीखाली पैसे सापडले" हे वाक्य ऐकताना सुभाच्या चेहर्यावरचे भाव "अरे ती गादी! केव्हापासून आठवत होतो ते खिशातले पैसे त्या दिवशी कोठे ठेवले!" असे होते. आणि मग नंतर ईशा भोकाड पसरत त्याच्या छातीत डोके खुपसून रडू लागते तेव्हाचे भाव "अहो झेंडे, आता कोठे आहे तुमची सिक्युरिटी? हे काय चालले आहे?" असे
"या मालिकेतील सर्व पात्रे
"या मालिकेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही"
हे वाक्य या सिरीज करता आवर्जून लिहीण्याची गरज आहे का?
किंवा, ह्यातली सर्व पात्रे ही
किंवा, ह्यातली सर्व पात्रे ही "पात्रेच" असून त्यांचा लाॅजिकशी संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा
फरेंड, तुमच्यामुळे तो भयंकर
फारेंड, तुमच्यामुळे तो भयंकर विनोदी एपिसोड परत एकदा आठवता आला त्यामुळे परत एकदा खरमणूक झाली. (इशा म्हटल्यावर करमणूकीच्या जागी ऑटोकरेक्ट होऊन खरमणूक आलं)
मायराचा कावा उघडकीस आल्यावर
मायराचा कावा उघडकीस आल्यावर आता ती त्याच्या छातीत डोके खुपसून रडते की काय? ओपन सीझन दिसतोय सुभा च्या छातीचा. त्याला भीती वाटत असेल, की आपण लंडनला गेल्यानंतर ही कसली साथ आली आहे ऑफिसात. ईशा आणि मायरा झाल्या. पण आता बाहेर पडल्यावर त्या वाडकर मॅडम आणि ती धेडगुजरी मराठी कलीग यांच्यापासून वाचत कसे बाहेर पडावे.
मायराने केवळ "आय लव्ह यू" डायरेक्ट म्हंटल्यामुळे विक्रांतने तिलाच हो म्हणायला हवे. नाहीतर ईशाचे "सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे/माजा तुमच्यावर विश्वास आहे/काय हो सर्/तुम्ही मनातले का बोलत नाही/सर माझ्याशी मनातले का बोलत नाहीत" ची मालगाडी सुरूच राहील पुढे सुद्धा.
अक्षरं सापडत नाहीत, फिरती ढाल
अक्षरं सापडत नाहीत, फिरती ढाल, मालगाडी >>>

ह्या मालिकेच्या
ह्या मालिकेच्या पुनर्प्रक्षेपणाचे नाव 'मालगाडी डेज' ठेवायला हरकत नाही.
>>>>>>मायराने केवळ "आय लव्ह
>>>>>>मायराने केवळ "आय लव्ह यू" डायरेक्ट म्हंटल्यामुळे विक्रांतने तिलाच हो म्हणायला हवे. नाहीतर ईशाचे "सर तुमचा माझ्यावर विश्वास आहे/माजा तुमच्यावर विश्वास आहे/काय हो सर्/तुम्ही मनातले का बोलत नाही/सर माझ्याशी मनातले का बोलत नाहीत" ची मालगाडी सुरूच राहील पुढे सुद्धा.
>>>>>>>>>>>>>>>> हे सही आहे
तसं तर काहिच लॉजोकल नाहिये.. पहिल्या दिवशीच्या हेलिकॉप्टर एन्ट्रीला बघितली होती बोअर वाटली होती .. सिरिअल चे प्रोमो पण बोअरिंग होते.. बघितलिच नव्हती सिरिअल .. मधे आधे बघताना वाटलं सुभा साठी बघु शकतो..
रच्याकने.. त्या रुपालीचं नावं सोनल पवार आहे.. इंस्ता वर तिचा प्रोफाईल बघितला हुशार वाटते.. फ्रेश
पण..
मोठी मजा अशी की तिने झी नॉमिनेशन पर्टी चे फोटो टाकले होते टिम चे फोटो नावाखाली त्यात शिल्पा तुळसकरचा फोटो होता.. म्हणजे ती येण्याची पॉसिबिलिटी आहे तर
<<नाही/सर माझ्याशी मनातले का
<<नाही/सर माझ्याशी मनातले का बोलत नाहीत" ची मालगाडी सुरूच राहील पुढे सुद्धा.<<
शेवटी कालचा पेपर अवघड गेलाच ना! काय लिहुन आलेय काही समजत नाही म्हणे इबाळ.
आणि काय नाटके इबाळाची! सुभा समोर बसुन मॅगी देत असताना पुस्तकात लक्ष!
एकिकडे अभ्यास करताना सतत सुभाचे विचार असतात आणि आता प्रत्यक्षात सुभा समोर असताना अभ्यास कराय्च नाट्क.
आता सुभा अभ्यास घेतो म्हटल्यावर पहिल्या नम्बरात पास होणार पोरगी.
ही ईशा काही सुंदरांत गणना
ही ईशा काही सुंदरांत गणना होणारी नाही ए......
सुबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय
सुबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय का कोणाला?
हो. मला सुबोध, इशा, इपालक,
हो. मला सुबोध, इशा, इपालक, झेंडे पताका, एकुण ही बेक्कार सिरीयलच बोर झालेली आहे.
बघणं बंद केलेलं आहे. जे स्वतःहुन डोळ्यासमोर दिसतंय ते नावं ठेवत बघणं होतं.
झी मराठीचा एकंदर असाच अनुभव आहे माझा.
त वरुन ताक तसं मला पहिल्या दहाएक एपि मधेच असल्या इल्लॉजिकल सिरीयलींचा आधी अंदाज येतो. मग उबग येतो.
इथे सुबोध साठी जरा जास्त पाहिली. पण आता स्वतः सुबोधलाच इंट्रेस्ट नसल्यासरखं वाटतंय.
काल सीआयडीतल्या दयासारखे काळे
कमांडोज नीमकरांना चाळीत परसाकडे जायला सोबत करीत होते! >>
लेखकाने हल्लीच मक्याचा झी टॉकीज वर असंख्यवेळा लागणारा "गाढवाचं लग्न" सिनेमा पाहिलेला दिसतोय !
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय
सबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय का कोणाला?
मेधावि---अगदी बरोबर.
खूप वाईट वाटत आहे लिहिताना,पण आता सुभाचाच कंटाळा यायला लागला आहे
सारख ईशा ईशा करत,त्या बाळाच्या मागे काय फिरतो,नूडल्स काय भरवतो,पेढा काय देतो,
कीव येते सुभाची,केड्या आणखी काय काय करायला लावणार आहे.
एकीवात आल आहे की झीवाले 9तारखेला,सुभा बाळाला प्रपोज करणार आहे,तो दोन तासाचा सोहळा दाखवणार आहेत.म्हणजे सुभाला बघू 2तास,पण बाळ पण लाजणार,हसणार,काय हो सर,अस म्हणणार आणि ते आपण बघणार.
मेधावि....अगदी मनातलं !
मेधावि....अगदी मनातलं ! म्हणजे कबूल करायला नकोसं वाटतंय..पण सुबोध स्वतःच किती कंटाळलेला, सुस्त, बोअर दिसतोय...! आणि गच्चीवर इतक्या वेळ नूडल्स बनवे पर्यंत कुणालाच काही कळत नाही खाली? चाळीत तर कोण आलं नि कोण गेलं याची लग्गेच खबर होते! आणि सिक्युरिटी गार्ड्स काय करताहेत खाली...ईशा वर असताना? कैच्या कैच!
केड्याला सुबोध सारख्या सोन्याचं लोखंड करताना पाहून वाईट वाटतंय!
<<केड्याला सुबोध सारख्या
<<केड्याला सुबोध सारख्या सोन्याचं लोखंड करताना पाहून वाईट वाटतंय!<<< +११११११११
सुबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय
सुबोध जरा जरा बोअर होऊ लागलाय का कोणाला?
>>>>>>>>> तो येवढा जीव ओतुन बघुन बघुन कुणाकडे प्रेमाने या विचाराने बोअर होतयं..
आणि जोपर्यन्त लाजत होता तोपर्यंत बरं वाटतं होतं पण आता '' हा मैने महोब्बत की जमाने से बगावत की" मोड वर तो आल्यापसुन त्यांच्या वयातला फरकं फारच जाणवतोय आणि ती फारच बोअर वाटतिये
सगळ्या पोस्ट्स जाम भारी ।
सगळ्या पोस्ट्स जाम भारी । सिरीयल पेक्षा इथेच मजा येते वाचायला।
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/68143
नवीन धाग्यावर चर्चा करूया ।
Pages