तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

ghanekaranchi site mhanje? >>>>>>> सुभाची साईट. हयाच धाग्यावर लिन्क दिलीय कुठेतरी.

त्याच्या खोलीतल्या बोर्डवर विक्याची माहिती असलेली कात्रणे होती अगदी तरुणपणापासूनची>> हो का ? माझ्या नाही आलं लक्षात .. पण एवढं सगळं माहित आहे म्हंटल्यावर मला वाटलं कि ते दोघे पूर्वी चांगले मित्र असतील लंगोटीयार टाईप आणि दोघाना एकाच मुलीवर प्रेम जडलं असणार (शिल्पा तुळसकर ) आणि मग त्यावरून काहीतरी भांडणं विश्वासघात वगैरे झाला असावा .. आणि जालिंदर ने खून केला असावा शितू चा ?!!?!!

बदाम भावे Rofl

ईशाच्या आवाजाचं काहीतरी कराsss कानावर हात ठेऊन लांब पळणारी बाहुली
तिला दुसऱ्या कुणाचा आवाज का देत नाहीत ? असं डबिंग कि काय करता येतं ना ?

काका म्हणाले की विकू हा विक्रांत संरजामे नाहीच.
आता ग बया,हे काय?
आणि त्या बाळाला नीट घाबरता पण येत नाही,सुभा कसली एक्स्प्रेशन्स देतो आणि बाळ पार विचका करत.
म्हणूनच बाळाला फक्त लाजण,हसण,भोकाड पसरण एवढच काम दिल असेल.

म्हणूनच बाळाला फक्त लाजण,हसण,भोकाड पसरण एवढच काम दिल असेल >>>>> बाकी काही जम न जमो पण त्या कुठल्या एका सिरियलमधल्या गौरीसारखं कमीत कमी सुंदर तरी दिसायला जमवायला हवं होतं. तीच पण acting मठ्ठ होतं की, पण तरी ती सुसह्य होती. बाकी सुंदर असणं हातात नसतं, पण कमीत कमी आकर्षक असणं तरी जमवता यायला हवं ना, ते पण जमलं नाही या कळकट इशाला ( म्हणजे जी कोणी actress आहे तिला).

इथल्या एकेक पोस्ट्स वाचून कळतं आहे की ती कनिंग, बनेल चालू आहे, ( म्हणजे चुकून तसे एक्सप्रेशन्स देते आहे) तरी तिला सगळे बाळ का म्हणताहेत?

कळकट इशाला >>>>> sorry but ti kalkat Nahee.. She disayala Chan.... But Ti acting madhye sumar ahe... Ani aplya Subha chya pudhe Ajun jast vatate.. Tya mule discussion

कुछ तो गडबड है दया.. विक्रांतच नाव विक्रांत नाहिये म्हणे. अजून एक ट्विस्ट. बॉडीगार्ड काय मठ्ठ दाखवले आहेत आणि असा कोणी काहीच माहित नसताना बॉडीगार्ड घराबाहेर ठेवून घेतील का. ओह सॉरी ही सिरियल बघताना डोक बाजूला ठेवायचंय हे विसरलेच मी

खरतर बॉडीगार्ड्सना आपल्याला कोणाच कोणापासून संरक्षण करायच आहे हे माहित असत,म्हणजे माहित असायला हव.बाळाच्या घरी असलेले गार्ड्स वेळ जात नाही म्हणून आलेले नाहीत.त्यांना काकांबद्दल माहित असायलाच हव.मग रिक्क्षात जालिंदर असूनही तो गार्ड मठ्ठासारखा का बसतो?
हा समस्त गार्ड्सच्या प्रोफेशनचा अपमान आहे.
कड्या कुठे फेडशील हे पाप

sorry but ti kalkat Nahee.. She disayala Chan.... But Ti acting madhye sumar ahe... >>>>> नाही, टायटल सॉंग सोडता मला ती दिसायला छान अजिबात वाटत नाही आणि आकर्षक तर नाहीच नाही. अर्थात मी क्वचित एखादा एपिसोड पाहते, त्यामुळे तिचं छान दिसणं मिस केलं असेल तर माहीत नाही.
Acting जमत नाही याबाबतीत मात्र आपलं एकमत आहे.

काय चाल्लयं ह्या सिरेलीत नक्की!
काल सीआयडीतल्या दयासारखे काळे कपडे घातलेले कमांडोज नीमकरांना चाळीत परसाकडे जायला सोबत करीत होते!
कसले भिकार प्रसंग लिहतात आणि काय त्या 'शी' टीव्हीच्या सिरेली!

खरोखरीच भिकार प्रसंग आणि अति भिकार अभिनय।। सुभाच्या डोळ्यात वात्सल्य आणि ईई बाळाच्या डोळ्यात हाव दिसते फक्त।।

खरतर केड्याला शिरियलीच नाव ठेवायच होत
"माझ्या नवर्याची गेलेली बायको"
पण झी वाले हटून बसले,तुला पाहते रे वर,कारण बाळाला तेवढच जमत.

Lol

इबाळ सारखं चिरकत असतं. हळदीचं दूध बाटलीने पाज म्हणा त्या सुभाला. आणी केड्याला ही लिंक पाठवा रे कोणीतरी. हे सगळे वाचुन दाढी कराकरा खाजवेल तो.

काल सुभा इशाला शुभेच्छा द्यायला आला तेव्हा ते बाप लेक वाटले.>>++११११ खरंच मला काल त्यावेळी सुभा अज्जीबात आवडला नाही .. अगदीच म्हातारा वाटत होता .. अगदीच कसातरी ..
आणि बावळट गार्डस दोघेही काय अरे ईशाच्या बाबांच्या मागे गेले .. एकाने जायचं आणि एकाने घरासमोर थांबायचं ना ! मूर्खपणाचा कळस होता कालचा भाग .. खरंच डोकं बाजूला काढून ठेवायचं आणि बघायचं टाईप होता कालचा भाग ..
ईशाची मैत्रीण रुपाली खरंच खूप छान करतेय अभिनय .. तिला पुढे चांगलं काम मिळायला हवं

"माझ्या नवर्याची गेलेली बायको"
पण झी वाले हटून बसले,तुला पाहते रे वर,कारण बाळाला तेवढच जमत.>> smiley36.gif

केड्या नाहिये याचा लेखक कुणितरी दुसराच आहे ना

ती इशा टी वाय ला आहे ना? १०वी , १२वीतल्या मुलांना दाटुन दडपुन अभ्यासाला बसवतात तसे निमकर आईबाबा मागे आहेत तिच्या. दोघी मैत्रीणी अभ्यासाला बसल्यावर जरा गप्पा मारतात तर आई काय लगेच दटावते, जरा बाहेर गेल्या तर आईबाबा काय शोधाय्ला निघतात!( नोकरीत असताना इबाळ रात्री बेरात्री पावभाजी, पाणीपुरी खाय्ला भटकत होते तेव्हा नाही इतकी काळजी दाखवली. )
कहर म्हणजे, इबाळ परिक्षेला निघते तेव्हा बाबा, अगदी शाळेतल्या मुलाला समजावतात तसे टेन्शन नको घेउस, आधी प्रश्नपत्रीका हातात पडल्यावर सम्पुर्ण वाचायची वै वै,सुचना देतात! (तसेही इबाळ शाळेतच आहे म्हणा अजुन. :फिदी:)

आणि तो बॉडीगार्ड तिच्या सोबत कॉलेजला गेल्यावर तिच्याबरोबर रहाय्च सोडुन मैत्रीणीबरोबर आधी काय हॉल चेक कराय्ला जातो? Uhoh इकडे इबाळाला जालिंदर चिठ्ठी देतो तर हळुच सरकवायची ना सुभाच्या हातात... शेकहॅन्ड केले तेव्हा.
तर आपले इबाळ कन्फ्युज्ड चेहरा करत बसलय... तेव्हा कुठे गेले विश्वास अन प्रेम?

Ho na chitthi lapawun fukatacha gairsamaj.. confusion wadhawaycha
Spasht kahi bolat nahit sagalyach serial madhe

मी_आर्या>> ++१११ सहमत
अगदी शाळेतल्या मुलाला समजावतात तसे टेन्शन नको घेउस, आधी प्रश्नपत्रीका हातात पडल्यावर सम्पुर्ण वाचायची वै वै,सुचना देतात!>> तेच आणि तेच आधी सोप्पे प्रश्न सोडवायचे आणि मग बाकी.. ब्ला ब्ला .. Uhoh
अतिशय सुमार होता कालचा भाग फिलर होता बहुतेक बाकी गोष्टीत काहीच दाखवण्यासारखं नसल्यासारखं Angry

इकडे इबाळाला जालिंदर चिठ्ठी देतो तर हळुच सरकवायची ना सुभाच्या हातात... शेकहॅन्ड केले तेव्हा.>> इशा एवढी स्मार्ट असती तर ती आपल्याला आवडली असती

त्या गार्डस ना निदान जालिंदर चे जुने फोटो तरी देऊन ठेवायचे म्हणजे मग रिक्षा कोण चालवतोय ते कळलं असतं .. भले १५ वर्षानंतर तो दिसायला वेगळा दिसूदेत ...

ईबाळ म्हणल्यामुळे उगाच गोड गोंडस निरागस अस काही वाटू शकते. पण ते चूक आहे कारण ह्या बनेल, चिरक्या आणि माठ ईबाळाचे कारनामे वाचून आणि बघून हॉरर ष्टोऱ्या मधली बालभूते फार तर आठवतात. ( आणि जोई (फ्रेंड्स) प्रमाणे बेबी भूत सर्वात खतरनाक ! ( संदर्भ आठवला नाही तर सोडून द्या) )

खरंच.....काल सुभा अगदीच एजेड दिसत होता..... आणि ती तर बावळट, लॉस्ट, कंफ्युज्ड!
पेपरात काय दिवे लावले असतील कोण जाणे!

काल ईशा आणि तिच्या मैत्रिणीच्या हातांत जी टेक्स्ट बुक्स दाखवली होती ती बारावी सायन्स ची वाटत होती.

Visa la kay wayach dakhawayach aahe ya badddal fix nahi zal lekhakach ajun.. dar 2 episode la wegla vayacha dalhwatat.. suruwatila tar changla young dakhawala hota

Pages