तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

आजचा एपिसोड मायराचा. सही काम केलंय तिनं. जबरदस्त..

कोणी ILU म्हटलं की लगेच हा गडी रडायला का लागतो? मायरा पण दहा पंधरा वर्षांनी लहानच असणार त्याच्यापेक्षा. बहुतेक सगोत्र चालणार नाही म्हणून रडत असेल Happy सुभाचं नशीब जोरदार आहे सध्या. निम्या वयाच्या हिराॅइन्सच आहेत जिकडे तिकडे.

झेंडे पताका सहीये Lol

अरे ते पैसे गादीखाली सापडले ठिके पण कशावरून ते इशानेच लाच वगैरे वगैरेने घेतलेले आहेत.? काय पुरावा? तिच्या घरचे नसू शकतात का?
बादवे, एक बाबा म्हणून इशाचे वडील मायराच्या जयदीपच्या पाया पडत होते बघून कसंसंच झालं

विक्रांत कसला नशिबवान आहे.एकाच जन्मात तीन बाया.एक त्या सावलीवाल्या शिल्पाताई,दुसरी मॉडर्न मायराताई आणि रडणार ईशाबाळ.

झालं शेवटी ईकडे पण z च्या शिरस्त्याप्रमाणे लव्ह ट्रँगल झालं. पण पताका मागे झेंडे शी बोलताना दाखवली होती की मला काही त्यांच्याशी लग्न करायचं नाही वगैरे वगैरे.
हे लोकं त्यांचाच सिरीयल चा ट्रॅक ठेवत नाही का??

झालं शेवटी ईकडे पण z च्या शिरस्त्याप्रमाणे लव्ह ट्रँगल झालं. पण पताका मागे झेंडे शी बोलताना दाखवली होती की मला काही त्यांच्याशी लग्न करायचं नाही वगैरे वगैरे.
हे लोकं त्यांचाच सिरीयल चा ट्रॅक ठेवत नाही का??

मायरा पण लहानपणापासुन विस वर प्रेम करते ? मायराचा अभिनय इशापेक्षा बराय पण तिचा जिथे तिथे आक्रस्ताळेपणा नको वाटतो किती ते घशाच्या शिरा ताणून बोलणे
सुभाने अति कॅज्युअल कॉलरच्या टिशर्ट वर कोट घातला होता भयाण ऑड दिसत होत ते

कारण त्याला ती विलक्शण भारी वाटते. नकळत तो तिच्याकडे खेचला जातो. त्याच्या वागण्याला काही लॉजीक नाही. असे तो एकदा झेंडेला सांगतो.

झेंडे अन पताका>> Lol

पताका लहानपणापासुन विसवर प्रेम करत होती तर एव्हाना तिने त्याला पटवायला हवा होता. इशा येण्याची वाट बघत होती का?

पताका लहानपणापासुन विसवर प्रेम करत होती तर एव्हाना तिने त्याला पटवायला हवा होता.>>>अगदी. एव्हढं मरमर काम करण्यापेक्शा घरून भाजी पोळी/पोळीचा लाडू/ सणासुदीचे पदार्थांचा डबा आणायला हवा होता. येता-जाता रूसेल त्याला गोष्ट सांगणे, काही नाही जमले तर भोकाड पसरणे असे करायला हवे होते.

आता सुभा नक्की किती वर्षांचा आहे असा प्रश्न पडतो आहे. मायरा एवढ्या मोठ्या पदावर पोचायला निदान ३५ वर्षांची तरी झाली असेल. ती लहान असल्या पासून सुभा च नाव ऐकते आहे म्हणजे तेव्हा सुभा निदान २५ वर्षांचा. ती १० तेव्हा सुभा २५, ती ३५ तेव्हा सुभा ५०. इशा बाळ अजून फक्त २०. फार फार गंडली आहे मालिका.

<<झेंडे अन पताका<< भारी Rofl
<<एव्हढं मरमर काम करण्यापेक्शा घरून भाजी पोळी/पोळीचा लाडू/ सणासुदीचे पदार्थांचा डबा आणायला हवा होता. येता-जाता रूसेल त्याला गोष्ट सांगणे, काही नाही जमले तर भोकाड पसरणे असे करायला हवे होते.<< नैतर काय Lol

<<आक्रस्ताळेपणा नको वाटतो किती ते घशाच्या शिरा ताणून बोलणे<< हो ना त्या खुकखु मधे पण तशीच कराय्ची.
ती चिडली कि तोन्ड फाडुन बोलते मधे मधे... तेव्हा हसते की चिडुन बोलतेय तेच कळत नाही.
पण बाकी काम मस्त केले तिने. काल सुभाने झेन्डे मायरा बोलत असताना त्यान्च्या केबिनमधे अचानक एन्ट्री घेउन नन्तर मला मायराशी काही बोलाय्च आहे असे सान्गुन झेन्डेला बाहेर पाठवतो. व मायराची हजेरी घेतो, त्या सीनमधले बदलणारे हावभाव मस्त दाखवले तिने.

Ohh...:)

मायराशी काही बोलाय्च आहे असे सान्गुन झेन्डेला बाहेर पाठवतो. व मायराची हजेरी घेतो, त्या सीनमधले बदलणारे हावभाव मस्त दाखवले तिने.>++१११

हो कालचे बरेचसे सीन्स आवडले .. पताका ने बॉम्ब च टाकला सुभा च्या अंगावर आय लव्ह यु म्हणून ... त्यावेळचा त्याचा अभिनय पण चांगला वाटला !
कावराबावरा, गोंधळलेला , हे काय होतंय ? इकडे इशा तिकडे पताका .. टाईप ! इशा नेहेमीप्रमाणे रडायला लागली Uhoh आणि .. मला आधी आय लव्ह यु म्हणायचं होतं .. हिनेच आधी म्हंटल ... माझ्या अगोदर तिने माझी भावली (इथे खरंतर भावला आहे ) घेतली .. भ्या sss असं मनात म्हणत तिकडून पाय आपटत निघून गेली .

एव्हढं मरमर काम करण्यापेक्शा घरून भाजी पोळी/पोळीचा लाडू/ सणासुदीचे पदार्थांचा डबा आणायला हवा होता. येता-जाता रूसेल त्याला गोष्ट सांगणे, काही नाही जमले तर भोकाड पसरणे असे करायला हवे होते.>> खरंच Lol

झी५ ला आलाच नाहीये अजुन>> एक्स्पर्ट बॉईज ला आलाय (आपली मराठी वरून एक लिंक ओपन होते त्यावर )

एव्हढं मरमर काम करण्यापेक्शा घरून भाजी पोळी/पोळीचा लाडू/ सणासुदीचे पदार्थांचा डबा आणायला हवा होता. येता-जाता रूसेल त्याला गोष्ट सांगणे, काही नाही जमले तर भोकाड पसरणे असे करायला हवे होते. >>> हे महान आहे Lol

इबाळाच्या बाहुल्याला मायरा ने पहिले आय लव यू म्हटले म्हणून बाळा अगदीच मुळूमुळू करून गेली.. आता खरे तर कथानकाला उत्कंठावर्धक मोड फुटावेतः

१. इबाळ बिपीन च्या खांद्यावर मान ठेवून रडते.. टिबाळ तिला पहात रहातो.. (मागे मस्त गाणे: ओंजळीत वेचताना, सुटला तो चंबूकडा.. तुला पाहतो रे..)
२. वरील दृष्य सिनीयर टिल्लू व बिपीन ची आई बघतात व एकमेकांकडे पाहतात.. (रात्र काळी, ऊजळली चाळी.. मार्ग झाला मोकळा.. तुला पाहते रे..)
३. तिकडे मायरा विस च्या खांद्यावर मान ठेवून रडते .. हे जयदीप पाहतो.. व त्याला भलतीच शंका येते.. (दादा आला, राडा झाला.. काय म्हणेल सॉनिया.. तुला पाहतो रे...)
४. हे आईसाहेबांना कळते... त्या छान छौकी करून त्यांच्या फेवरेट खुर्चीत बसतात आणि विस साहेबांना दोघिंपैकी कोण आवडली आहे ते आता मोकळेपणाने सांगावे असे म्हणतात.. त्यावर विस साहेब हलकेच त्यांच्या कुशीत मान ठेवतात व फंडा मारतात की स्वार्थापेक्षा त्याग मोठा आहे. तेव्हा मला दोघी ही आवडल्यात. शिवाय तिसरी देखील येईलच... आता काय ते आई साहेबांनीच ठरवावे.. (गाणे: देव झाला, मोह ज्याने, तीन प्रकरणांचा सोडला.. तुला पाहते रे..)
५. तिसरी (ती शीर्षकगीतातील सावली) अचानक अवतरते आणि विस चा हात हाती घेऊन डायलॉग मारते की माझ्या गैरहजेरीत खूप ईशाणे व पताका लावल्यात, आता पुरे. आता वचन पुरे करायची वेळ झाली आहे.. (गाणे: भास सारे, विसरून जा रे, चाळीशी ऊलटली माणसा... तुला पाहते रे...)
६. ईकडे या सर्वाचा सुगावा झेंडें ना लागला आणि आपल्या मित्राला आता या सर्वातून बाहेर काढायचे म्हणून त्याने तयारी सुरू केली.. (गाणे: वडा पाव, शेवटचा डाव, सांगून टाकू नाव गाव. प्रेक्षक कावतात रे...)

आणि कहाणी पुढे सुरु..

Pages