तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

इथले अपडेट्स वाचून असं वाटतंय, की `आणि काशिनाथ घाणेकर'सारखे सिनेमे केल्यानंतरही पाय जमिनीवरच राहावेत म्हणून सु.भा. स्वत:ला असल्या मालिकेचा अँटिडोट देत असावा...

इशा चे ड्रेस आणि हेअर स्टाईल येवढी गबाळी का करतं आहेत काय माहित.. तिच्या खर्या आयुश्यातल्या फोटो मधे बरी दिसते..
ते पिझ्झा बॉय बनुन आल्यावर काय सुंदर दिसतोय सुभा.. आणि इशा अगदीच बोअर दिसतिये.. काही कुरते बरे आहेत तेच वापरवे.. गरिब आहे ठिक पण कॉटन्चेच साधेच पण बरे रंग डिझाइन तरी देता येतिल ना..मे बी लग्नानन्तर मेक ओव्हर करायचा असेल म्हणुन आत्ता अगदिच सुमार..
बिचार्या सुभा कडे बघुन वाटतं की वयं झालयं अजुन कोण मिळणार म्हणुन इशा तर इशा..
सुभा रेड टि शर्ट मधे कातिल.. : मोठा बदाम :
काय हसतो आणि काय कातिलं डोळ्यात डोळे घालुन थेट बघतो.. बास सिरिअल म्हणजे फक्त आणि फक्त सुभा आहे..
या आधी सुभा कधी येवढा अपिलिंग वाटला नाही.. मॅच्युअर आणि संयत भुमिकेमुळे अजुनच छान वाटतोय.

<<या आधी सुभा कधी येवढा अपिलिंग वाटला नाही.. मॅच्युअर आणि संयत भुमिकेमुळे अजुनच छान वाटतोय.<< +१
एक्झॅक्टली

इशाचे ड्रेसेस आधिपासुनच अस मल्टीकलर तुकड्या तुकड्यान्चे दिलेत. केसान्चा ही अवतारच आहे.

नव्या प्रोमोत ती त्याचा कप असा फिरवून मग कॉफीचा घोट घेते तेव्हा कसली बनेल दिसते... अजून दोन सेकंदांनी, "आता क्या खंडाला" विचारेल असे वाटते. आणि तो इश, इश..असं म्हणतो.... Happy अती समर्पक होतं ते. Happy

हो ना.. बिचारा सारखा मान खाली घालतो किंवा खाली बघतो इशा काही प्रेम प्रेम करायला लागली की..
ती जेव्हा म्हणते मायरा एपिसोड मधे की मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर प्रेम बिम कर्ता .. मी झोपेत होते तुम्ही नाही ई. तेव्हा पण बिचारा मान खाली घालुन होता.. आणि इशाबाई ताड फाड.. प्रेम शब्द उच्चारताना पण काय तो शब्दात ओलावा बिलावा नाही की काही नाही.. प्लेन ........................

हो आणि त्या सीनला तो तिच्या पाठीमागुन बोलत असतो कि "तिथुन अशी लगेच का निघुन आलीस तु" तेव्हा ती बया गालातल्या गालात हसत असते.. त्यावेळी तर खरच बनेल वाटली ती.. कि "कसा गटवला याला.. "अशी म्हणतेय मनातल्या मनात.

खरंच... ईशाला इनसंट दाखविण्याच्या नादात ती अधिकच बनेल वाटायला लागलीय.
जरा म्हणून काही संकोच, लज्जा , अनुराग वगैरे नाही.. म्हणे की सर तुम्ही 'विक्रांत सरंजामे' नसतात तरी मला तितकेच आवडले असतात....!! काय डायलॉग्ज!!
विक्रांत सरंजामे नसतात तर म्हणजे..? मग हिला टिल्लू, जयदीप, परांजपे का नाही आवडत?... कैच्या कैच!

नव्या प्रोमोत ती त्याचा कप असा फिरवून मग कॉफीचा घोट घेते तेव्हा कसली बनेल दिसते...
>>>>>>>>>>>>>>>>>>>
हे का करते आणि ती ?? .. येवढी इनोसंट वगैरे आहे.. मग एकदम असा कुणाचा उष्टा कप .. येवढी हुशरी कुठुन आली.. पहिल्या एपि पासुन प्रेम करायचय आणि करायला लावायचय असा चंगच बांधुन आलिये..

ईशाच्या बाबान्चा नोकरी न करण्यामागचा उद्देश पटतो. तिने सध्या आपल्या शिक्षणावर लक्ष दयाव. पण कसल काय, हिला तर ' आता सरान्ना कस भेटता येईल' हयाचच टेन्शन. अभ्यास को मारो गोली!

रुपालीला वाटत की 'की आईग, कित्ती ती माझी गुणाची मैत्रीण. हिला साध खोट सुद्दा बोलता येत नाही. कस होणार हिच?' त्यामुळे हि ईशातर्फेच खोट बोलून टाकते की, 'आम्ही बिपिनकडे अभ्यासाला जातोय' म्हणून. हि ईशा सर्वान्नाच फसवते,आपल्या मैत्रिणीला सुद्दा.

झेन्डे जालिन्दरचा असा उल्लेख करतोय जसा काय जालिन्दर हा माणूस नसून जन्गली प्राणी आहे. चुकून त्याची माणसान्च्या जेलमध्ये रवानगी झाली असावी. बहुधा जालिन्दर हा 'जानी दुश्मम' ( सन्जीव कुमार) टाईप अर्धा माणूस, अर्धा प्राणी असा काहीतरी असावा. Lol

झेन्डे पन्धरा वर्षापुर्वी काय झाले ते सान्गतोय. सुभाला जालिन्दरपासून कस वाचवल वगैरे वगैरे. शिल्पा तुळसकरचा खून सुद्दा जालिन्दरने गैरसमजातून केला असावा.

जालिन्दरच्या वर्णनावरुन तो मिलिन्द शिन्दे असावा. तो जॉनी लिव्हर टाईप कोणी निघाला नाही म्हणजे पुरे. Biggrin

मागे एका सिरियलमध्ये (नाव आठवत नाही) अश्याच एका खलनायकाच इन्ट्रो़डक्शन 'खतरनाक, क्रुर, निर्दयी' वगैरे वगैरे सान्गितल होत. पण प्रत्यक्षात त्याची एन्ट्री झाल्यावर 'खोदा पहाड निकला चूहा' अशी गत झाली होती Rofl

जालिन्दरच वर्णन तर तो साळिन्दर असाव अस केलय... पण झीच्या अनुभवावरुन तो कॅलेन्डर निघेल हे नक्कि. Happy

इशा टू सर - सर मला वाईट वाटेल उदयापासून ऑफीसला यायचं नाही म्हणून....
सर - हो तुला ऑफीसचं काम आवडतं ना खूप?
ईशा- नाही, तसं नाही सर.. तुम्ही भेटणार नाही म्हणून...
Happy अरे काय चाल्लंय काय ?

विक्रांत सरंजामे नसतात तर म्हणजे..? मग हिला टिल्लू, जयदीप, परांजपे का नाही आवडत?... कैच्या कैच! >>> Happy टोटली. टिल्लू म्हणजे बिपिन की मामा? तिच्या आवडीचा एज ग्रूप, आणि लग्न झाले आहे की नाही याची खातरजमा करण्यात तिला इण्टरेस्ट नाही हे दोन्ही या मालिकेतच दिसलेल्या गोष्टी धरल्या तर मामा ही धोक्याच्या परिघाबाहेर नाही Happy

खरे म्हणजे बिपिन आणि ईशा ही चपखल जोडी आहे. या सिरीज मधे कधी फ्लॅशबॅक दाखवलाच, तर ईशाचे आईवडील तरूणपणी या दोघांसारखेच असतील एकदम.

बहुधा जालिन्दर हा 'जानी दुश्मम' ( सन्जीव कुमार) टाईप अर्धा माणूस, अर्धा प्राणी असा काहीतरी असावा. >>> लोल. अजून जालिंदर नावाच्या एण्ट्रीच्या ४-५ एपिसोड मागे आहे मी, पण आता कुतूहल वाढले आहे.

सर - हो तुला ऑफीसचं काम आवडतं ना खूप?>>> Uhoh विसचा भयंकर गैरसमज झालेला दिसतोय. झेंडे-पताका इतके फडफडत असतात कि हि ऑफिसमधे कधीही येते-जाते, काही काम करत नाही तरीही!

बहुधा जालिन्दर हा 'जानी दुश्मम' ( सन्जीव कुमार) टाईप अर्धा माणूस, अर्धा प्राणी असा काहीतरी असावा...
.
नरसिंह

बहुधा जालिन्दर हा 'जानी दुश्मम' ( सन्जीव कुमार) टाईप अर्धा माणूस, अर्धा प्राणी असा काहीतरी असावा...
.
नरसिंह

शिल्पा तुळसकरचा खून सुद्दा जालिन्दरने गैरसमजातून केला असावा.,,,,मला अस वाटतय कि जालिन्दर चे आई बाबा गेले आणि तो जेल मधे गेल्यावर त्याचि बाय्को गेली अस झेंडे म्हणतात. मग शि तु. त्याची बायको असावी काय?

अफसोस,आज भी जालिंदर पाजी नही आये.लेकिन (राखीच्या ईश्टाईलमध्ये) मेरे जालिंदर पाजी आयेंगे.
ईशाबाळ नोकरी करुन आईला साहेबाच्या देशात घेऊन जाणार होती,लई मोठी होणार होती.पण नोकरी सुटल्यावर बाळाला काळजी एकाच गोष्टीची ,विक्रांत सरांना भेटता येणार नाही.आणि ही पोरगी म्हणे इनोशंट.
आज तर ईशाबाळाचा आगाऊपणा बघून पोरीला रिमांड होम मध्ये टाकायला हव अस वाटत होत.
बाकी श्टोरी बद्दल बोलायच तर ईशाबाळ शिल्पाचा पुनर्जन्म असेल तर मग लवकर लगान व्हायला हव कारण सुभा म्हणाला होता की विक्रांतचा खरा चेहरा लग्नानंतर समोर येणार.
अस असेल तर केड्या याचा कोहरा करेल का,पण त्यात ललिता पवार सस्पेन्स आहे.

जालिंदर जालिंदर वाचून मला तो एकदम जोगिंदर आठवला हिंदी पिक्चर मधला.. तोच तो विअर्ड डान्स करायचा तो दाढीवाला☺️☺️

इशा आणि विसच्या वयातल अन्तर खुप वाटत सतत पण अस्सल पाहुणे बघताना कळल की सुरेश वाडकर आणि त्याची बायको( शिष्या) याच्यातही ३० पेक्षा जास्त वर्शाच अन्तर आहे.. प्रचन्ड आश्चर्य वाटल हे एकुण! , गन्डलेल्या सिरियलित ठिक आहे पण ये तो रियल लाइफ है बाबु
इशाच्या बाबानी इशाचा आणि स्वतःचा एवढा अपमान झाल्यावर इशाला नोकरी न करु देण्याचा निर्णय घेतला हे अगदिच पटल.

त्याची गेलेली बायको ईशा म्हणुन आली असेल....झेंडे बोलतच आहे.. पहिल्या दिवसा पासुन... पोरगी वाट लावनार आहे.... नेहमी एकच डायलाँग..
सुभा रेड टि शर्ट मधे कातिल.. : मोठा बदाम :
काय हसतो आणि काय कातिलं डोळ्यात डोळे घालुन थेट बघतो.. बास सिरिअल म्हणजे फक्त आणि फक्त सुभा आहे..>>>>>>>++111111111111

सुरेश वाडकर आणि त्यांच्या बायकोमध्ये अठरा वर्षाचं अंतर आहे. तेवढंच अंतर निवेदिता व अशोक सराफ यांच्यामध्ये आहे. अस्सल पाहुणे बघितलेलं नाही पण आधी एका मुलाखतीत ऐकलं होतं.

सुरेश वाडकर आणि त्याची बायको( शिष्या) याच्यातही ३० पेक्षा जास्त वर्शाच अन्तर आहे.. >>> ३० नाही काही २० -२५ असेल. कारण वाडकर म्हणाले की त्यांनी ४३व्या वर्षी लग्न केले.

इशा फारच निलाजरी दाखवलीय. चाळीत, ओढाताणीच्या परिस्थितीत वाढलेल्या मुली अशा असतात?

तिकडे मानबा मधे तो आनंद आणि जेनी दोघांचं काय मी सांगू कसं मी सांगू चाललंय. आणि इकडे ही बया मिनटाला ४ वेळा मी तुमच्यावर प्रेम करते हे मारक्या म्हशीसारखं त्याच्याकडे बघून अशी काही सांगते की बघणार्‍याला अशक्य वाटावं.

३० नाही काही २० -२५ असेल. कारण वाडकर म्हणाले की त्यांनी ४३व्या वर्षी लग्न केले.>> विकीने गडबड केलिये, पद्मा वाडकरच बर्थ इयर १९८८ दाखवुन.. असो! १८-२० असेल अस मलाही वाटलेल...

विक्रांत टोपी ठेऊन काढून हेलमेट घालतो. पिझा त्या अश्राप जिवाला खायला देतो आणी मग इशूला काय नुसतंच खोकं नेतो काय? परत टोपी कुठून येते?

एक काॅफी दोघांत. कप फिरवून काॅफीचे घोट घेणं....अयाया.. फारच बोअर लेखक आहे.

Pages