तुला पाहते रे.... झी मराठी.. ८.३० वाजता

Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32

झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.

Group content visibility: 
Use group defaults

योग. worship.gif
Rofl Rofl

एपिसोडचा पहिला भाग सुभाने खाल्ला. नन्तरचा भाग मायराने. आय मीन दोघान्नीही छान अभिनय केला. Happy

सुभा काल डिटेक्टीव, पोलिस, वकील सगळ काही एका दिवसात झाला होता. मायराची उलटतपासणी घेताना तर बिग बॉसचा होस्ट सुद्दा झाला होता क्षणभर.

मला वाटल सुभाने झापल्यावर मायरा सुद्दा आता भोकाड पसरते की काय! Lol

मायराने आय लव्ह यू म्ह्टल्यावर विक्या मनातून विचार करत असेल , "हायला, आपल्याला या वयातही इतकी डिमान्ड आहे? एक सोडून दोन दोन जणी मागे लागल्यात माझ्या. '

सगळयात निरागस जर कोण असेल तर ती सपना. 'सरान्च सगळया एम्पलॉयीजपेक्षा इशावर खुप प्रेम आहे. तिच्याशी त्यान्च स्पेशल नात आहे. ' Rofl इशाच्या बाबान्नी तिची चुक दुरुस्त केली, 'सरान्च सगळयाच एम्पलॉयीजवर सारखच प्रेम आहे.

इशाने विक्याला मिठी मारली , त्याचा ऑफिसमधल्या कोणालाही डाउट कसा आला नाही? Uhoh ( अपवाद झेन्डे आणि मायराचा, त्यान्ना तर सगळ आधीपासूनच कळलय म्हणा. )

इशाची आई पण ना, इथे मुलीचा जॉब टान्गणीला लागलाय आणि हि 'मायराने मला सान्गितलय कुणाला सान्गायच नाही म्हणून. मी नाही सान्गणार.' चा धोशा लावत बसलीय. चकल्या महत्त्वाच्या की मुलीच निर्दोषत्व सिद्दध करण म्हत्वाच हे तिला साध कळत नाही का?

पुढच्या भागात मायरा 'आय लव्ह इशा' म्हणतेय. Uhoh आता हे काय नवीन? Lol

योग Rofl

मलेरीया, चिकन गुनिया, डेंग्यू नंतर आता नवी साथ सध्या फोफावलीये... 'सुबोध भावे' (जेव्हढं सात्विक नाम, तेव्हढच घातक काम हे हीचं वैशीष्ठ्य). ही संसर्गजन्य साथ असुन, विशेषतः स्रीवर्गाला (वयाची कुठलीही अट लागू नाही) हीची पट्टकन लागण होते. 'आणि काशिनाथ घाणेकर' चा शो लागलाय, असं कुठलही चित्रपटगृह म्हणजे... बॅक्टेरीया चेंबर्स ठरतायत या साथीचे. घरी, ट्रेनमध्ये, आॅफिसमध्ये पुन्हा पुन्हा 'गोमु संगतीनं' यु ट्युबवर पाहणं... नी डोळ्यांत वेडसर झाक आणुन, सोळावं वरीस लागल्यासारखं खुदुखुदु हसणं स्वतःशीच, ही सुरुवात आहे या साथीची. 'तुला पाहते रे' बघण्यासाठी साडेआठ आधी स्वैंपाक आवरणं (कोकणस्थांकडे) कींवा नऊ नंतर तो करायला घेणं (देशस्थांकडे), म्हणजे 'सुबोध भावे' कणकण अंगात भरण्यावर शिक्कामोर्तब आहे. मग 'वादळवाट' पासुन 'का रे दुरावा' चे जुने एपिसोड्स ते बाल गंधर्व, लोकमान्य टिळक सर्च करुन... सगळं घरबसल्या ग्लुकोजसारखं शीरांमध्ये चढवत राहणं, म्हणजे 'सुबोध भावे' आजार चांगलाच बळावल्याची खात्री. ह्या साथीची लस लवकरात लवकर बाजारात येण्याच्या वाटेकडे, समस्त हतबल नवरे (ईथेही वयाची अट अर्थातच लागू नाही) डोळे लाऊन बसलेले आहेत. कालपर्यंत 'आपलं नाणं खणखणीत वाजतय' असं वाटणा-या प्रत्येक पुरुषाचा, भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे या नव्या 'कssडsssssक' साथीपुढे. आणि सप्तपदिला कितीही वर्ष ऊलटली का असेनात, एका नाकाखालुन... दोन हातांबाहेर जिवानीशी जात असलेल्या आपापल्या बायका बघत, केविलवाणं 'ऊसमें क्या है' म्हणत स्वतःच्याच मनाची ते समजुत काढतायत. आयांच्या नादात लहान पोरंही या साथीचा बळी ठरतायत नी बापाच्या मागे लागतायत विचारत... 'थिएटरचा लांडगा' हा प्राणी कसा दिसतो रे? 'सावर रे सावर रे' च्या चालीवर आता बेजार पुरुषवर्ग 'आवर रे आवर रे' असं आळवतोय, त्यांना न लागलेल्या... नी यापुढेही लागण्याची क्वचितच शक्यता असलेल्या, 'सुबोध भावे' नामक 'लेडी किलर' साथीसमोर (यामध्ये कुठल्याही स्त्रीला जळण्याचा वास आला... तर तो करेक्ट आला असं समजावं).

Copy paste from whatsapp

उद्याच्या भागात विक्रांत प्रेमाचा स्विकार करताना दाखवला. "मला कुणाची भिती आहे" म्हणताना डाॅ. काशिनाथ दिसले Happy शेवटी डाॅक्टरांनीच हिम्मत दिली म्हणायची.

हो ते मायराचे वय, सुभाचे वय याचा काही अंदाज च येत नाही. हिच्या लहानपणापासूनच हा काय बिजनेसमन होता का? त्या हिशोबाने हा ६५ चा असायला हवा.

कसली बनेल आहे इबाळ! आता विस म्हणतात कि मी निर्दोष आहे तर नक्की काय झाले ते विचारू नका आणि सगळं विसरून घरी जा Uhoh

मालिकेतले आकडे सांगतात विस ४५ चा आहे. मायरा १० वर्ष विसकडे काम करते. म्हणजे मायरा काय लहान नाही. पण जर तिला लहान समजायचे असेल तर विस अगदीच त्याच्या लहानपणी यशस्वी उद्योगपती झाला असे मानावे लागेल किंवा त्याने मायरातले टॅलेंट हेरून तिची शाळा संपताच तिला आपल्या कंपनीत नोकरी दिली असेल. त्यापेक्शा लेखकाचे गणित कच्चे असेल यावर जास्त विश्वास बसतो.

इशाचा ड्रेस किती वाईट होता कालचा. अगदीच अजागळ दिसत होता. विसचाही कपडेपट गंडलाय....काहीच्या काही कपडे दिलेत.
आणि इशाच्या नव्या शोधामुळे ती जेव्हा तिच्या आईच्या साड्याचे ड्रेसेस घालायला लागेल तेव्हा काय होईल आपलं? त्यापूर्वीच तिचं वाजलं तर बरं.

कसली चँप्टर आहे ईशा,सुभा ने सहीसलीमत सोडवल्यावर बाई पुन्हा मूळपदावर सर"आई लव् यू" हे तुम्ही म्हणालात ते मी ऐकल.आता मायरा ला सांगा की हो,नाहीतर आम्ही नाही जा.
हा तर शिशुवर्गातल्या बाळाचा हट्ट झाला.म्हणजे ईशाबाळ मॉंटेसरीत आहे तर.
सुभाने खरतर सांगायला हव होत की बाय माझे,ही माझी कंपनी आहे ग.परिस्थिती काय तू बोलतेस काय.अग जी देव आपल्याला द्यायलाच विसरला आहे ती पाझळू नये ग.ती मायरा बघ कशी शहाण्या मुलीसारखी आत रडत बसली आहे.
हे एकल्यावर मात्र ईशाबाळाने जे काही भोकाड पहरल असत ते पाहून मात्र विक्रांतने मायराला लग्नाची मागणीच घातली असती.

कसली चँप्टर आहे ईशा,सुभा ने सहीसलीमत सोडवल्यावर बाई पुन्हा मूळपदावर सर"आई लव् यू" हे तुम्ही म्हणालात ते मी ऐकल.आता मायरा ला सांगा की हो,नाहीतर आम्ही नाही जा. >>>>> नैतर काय, मला वाटल आज ईशाला 'आदर्श नायिकेचे' झटके येतील, म्हणेल की, सर, तुम्ही मायराशी लग्न करा. मी तुमच्या आणि मायरामध्ये येणार नाही. त्याग प्रेमापेक्षा श्रेष्ठ असत. सो, मी चालली आता, गुड बाय फॉर एव्हर.(भोकाड पसरत ) पण कसल काय.

ईशाने सुभा आणि मायराच बोलण चालू असताना बाहेर का गेली त्याच कारण जेव्हा सान्गितल तेव्हा ती मॅच्युअर्ड वाटली.

सिरियल सुरु होता होत शॉक्ड झाले, म्हटल ऑफिस हॉलची लिव्हिन्ग रुम कशी काय झाली. Lol म्हणायला ऑफिस हॉल, पण इन्टरियर लिव्हिन्ग रुमच होत.

आज शेवटी मायरानेही भोकाड पसरलच. मायराच काम मात्र छान झाल. ' इमोशन्स आणि प्रोफेशन एकत्र आणू नकोस हे तुम्ही म्हणता? सिरिअसली?' तेव्हाचे एक्स्प्रेशन्स तर मस्तच! Happy

फायनली सिनिअर टिल्लूने ते फोटो दाखवलेच. मला वाटल, आता विक्या आणि ईशाच्या लग्न्नानन्तर ते फोटो दाखवतायत की काय.

मेधावि, वरची वॉटसअ‍ॅपची पोस्ट मस्त. सुभा- करिश्माने जळून होरपळून गेलेल्या एका नवर्याची ही पोस्ट असावी. Proud

सुभाने खरतर सांगायला हव होत की बाय माझे,ही माझी कंपनी आहे ग.परिस्थिती काय तू बोलतेस काय.अग जी देव आपल्याला द्यायलाच विसरला आहे ती पाझळू नये ग.ती मायरा बघ कशी शहाण्या मुलीसारखी आत रडत बसली आहे. >>>>>>> Rofl

फायनली सिनिअर टिल्लूने ते फोटो दाखवलेच. मला वाटल, आता विक्या आणि ईशाच्या लग्न्नानन्तर ते फोटो दाखवतायत की काय. >>> कसले फोटो आहेत.

ईबाळाने बाबांच्या सांगण्यावरून ऑफीस सोडलं एकदाच!
आता तो जालिंदर कोण तो जेलमधून सुटून येणार त्यासाठी झेंडे सुभाची सिक्युरिटी टाइट करत आहेत.

अगदी आत्ता 5 मिन पाहिले,
CEO च्या ऑफिस मध्ये nw जॅमर बसवून त्याचा मोबाईल बंद पडलाय :०
कसं जमतं या लोकांना अशा आयडिया काढायला

आजच्या भागात ना मला सुभाला बघायच होत,ना मायरा,ना निमकर ,त्या माकडाला तर नाहीच नाही,आज ऑंखे तरस रही थी सिर्फ और सिर्फ जालिंदर पाजी के लिये.मन कह रहा था,जालिंदर पाजी आयेंगे.मगर अफसोस.ससुरी आये ही नही.

सुभा पिझ्झाबॉय बनून येतोय नेक्स एपी मधे, महाबोर चाललीय मालिका। काय त्या मंडाड च्या मागे फिरतोय वेड्यासारखा कळत नाहीये।

जालिंदर! काय नाव आहे.. असे वाटते कि कोणी जाळीदार बनियन घातलेला चिडका माणूस असेल.

आता प्यार का इजहार करायची वेळ आली आणि झेंड्यांनी नजर ठेवली. त्यांच्या हातावर तुरी देऊन विस चाळ गाठणार, इबाळाला भेटणार.... पण तिथे जाळिंदर टपकणार. तो विस वर वार करणार तोच इबाळ मधे पडणार. ती त्याला गोष्ट सांगून त्याचे मतपरिवर्तन करणार. जालिंदरचा जिनेंद्र होणार!! त्यामुळे झेंडे-पताकाचे सुद्धा इबाळबाबत मत परिवर्तन होणार.

<<विस वर वार करणार तोच इबाळ मधे पडणार. ती त्याला गोष्ट सांगून त्याचे मतपरिवर्तन करणार. जालिंदरचा जिनेंद्र होणार!! त्यामुळे झेंडे-पताकाचे सुद्धा इबाळबाबत <<<
आयया.. जाम हसले ! Rofl Rofl

जालिंदर नावाच्या प्रेमात दिसतात. कारेदुरावात पण होतं जालिंदर. (दळींदर सारखं वाटतं) हा हा हा

Pages