Submitted by DJ. on 14 August, 2018 - 07:32
झी मराठी वर १३ऑगस्ट २०१८ पासून रात्री ८.३० वाजता तुला पाहते रे ही नवीन मालिका सुरू होते आहे.
चर्चेसाठी हा धागा.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>>आईवडिलांशी मुलांचे
>>>आईवडिलांशी मुलांचे कम्युनिकेशन चालू च राहते इशा बंगलोरला बसने गेली म्हणजे काही आफ्रिकेला गेली नाही. ह्यांच लगेच नेटवरक नाही नेट नाही कसे चालू झाले.>> +1 खरंय अमा...>>देअर आर वेज टू डील विथ इट> ++++1111
अरे किती विचार करतो न आपण
अरे किती विचार करतो न आपण सगळे, पण जिथे विदाऊट इंटरव्ह्यू, ओव्हर नाईट जॉब मिळू शकतो, बॉस घरी तेल भरतो, विदाऊट एनी प्रिपरेशन प्रमोशन अन ट्रान्सफर होऊ शकते तिथे लॉजिक न लावता, मूर्खातले एक होऊन बघायची शिरेल नाहीतर रिमोट आहेच की आपल्या हातात
तिथं इनोसंटसम्राज्ञीसारखी
विसंचं ilu, भावना व्यक्त करणं....आर्तता, मार्दवता, सहजता, प्रेम...सुंदर. सुभा व्यापून उरला होता.
तिथं इनोसंटसम्राज्ञीसारखी वागणारी इशा घरी आल्यावर गिरकी घेत घेत, आईबाबा, मी विसंबरोबर हाटेलात थांबले होते असं सांगेलसे वाटले होते...पण भलतीच तयारीची निघाली. (जाउद्या...तिला जास्त नावं ठेवली तर एक श्रीमुखात खावी लागेल विसुभाऊंची
)
मी आजपर्यंत एकही भाग पहिला
मी आजपर्यंत एकही भाग पहिला नव्हता या सिरीयल चा ....पण हा धागा मात्र नियमित वाचत होते....आजचा एपिसोड पहिला...आणि अक्षरशः संताप झाला....किती ते akkalshunya direction....
सुभाने प्रेम व्यक्त केल्यावर ज्या पद्धतीत ईशा हसते ...अगदी बनेल वाटली ती....काही निरागस वगैरे नाही....सुभा मात्र बेस्ट....
पण परत चुकून सुद्धा पाहणार नाही....इथेच वाचत जाईन...
आणि सुभाने प्रेम व्यक्त
आणि सुभाने प्रेम व्यक्त केल्यावर हसल्यावर हाताने yesss असंही केलं तिने ...
हे आजच्या भागात झालं का?
हे आजच्या भागात झालं का?
आणि सुभाने प्रेम व्यक्त
आणि सुभाने प्रेम व्यक्त केल्यावर हसल्यावर हाताने yesss असंही केलं तिने ... Angry>> अगदी अगदी नटुकाकी.
धड निरागस नाही नि धड चालू नाही. तिचं कॅरेक्टर नीट डेव्हलप केलंच नाहीये.
तिच्या बऱ्याच प्रसंगातल्या चालूगिरीमुळे तिला जेव्हा निरागस दाखवायचं असतं तेव्हा पण ती चालूच वाटते.
ऑफिसातल्या सेंडऑफला पण ती विसला किती रोखून पाहत टोमणे मारत असते. जर ती खरंच हळवी दुखावलेली असती तर त्याच्या काहीच छटा नव्हत्या चेहऱ्यावर. ही खुन्नस मधीच बघत होती त्याच्याकडे.
तीला काम नीट करता येत नाहीये.
तीला काम नीट करता येत नाहीये. भलतेच एक्सप्रेशन्स येताहेत तिच्याकडून असं वाटतंय.
विसंचं ilu, भावना व्यक्त करणं
विसंचं ilu, भावना व्यक्त करणं....आर्तता, मार्दवता, सहजता, प्रेम...सुंदर. सुभा व्यापून उरला होता.>>>>>सुभा साठी बघायची मालिका ...त्याचा अभिऩय खरच वाखाण्याजोगा आहे....hats off to him..♥♥♥♥♥♥
>>>> भलतेच एक्स्प्रेशन येत
>>>> भलतेच एक्स्प्रेशन येत आहेत >>>>
अगदी हेच मनात आले. तिचे संवाद आणि चेहऱ्यावरचे भाव, संवादफेक यात कुठेच ताळमेळ नाही. पुढ्यात वही ठेवून वाचल्यासारखे संवाद बोलते बाई. दिसणं, आवाज या गोष्टी आपल्या हातात नसतात. पण मेहनतीने अभिनय थोडाफार तरी शिकता येतो. इथे सुबोध भावे नामक अभिनयाचे साक्षात विद्यापीठ समोर असताना बाईंकडून अगदी शाळकरी अभिनय होतो आहे. दातार बाई टूर ऑपरेटर का काय होत्या ते सोडून अभिनयाच्या क्षेत्रात का आल्या आहेत? कोणी म्हणेल रिमोट वापरा, पण निदान सुबोध भावे चां अभिनय बघायला मिळावा या आशेने बाकी अत्याचार सहन केले जातात.
विक्रांत ने प्रेम व्यक्त करण्याच्या प्रसंगात इशा बाईंना काही संवाद नव्हते आणि बहुतांश वेळ ती झोपेत असल्याचे दाखवले याबद्दल मालिका दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांचे शतशः आभार!
बहुतांश वेळ ती झोपेत असल्याचे
बहुतांश वेळ ती झोपेत असल्याचे दाखवले याबद्दल मालिका दिग्दर्शक आणि संवाद लेखक यांचे शतशः आभार!>>>>>>>>
झीमराठी अॅवार्डध्येे कसा
झीमराठी अॅवार्डध्येे कसा नाचतो आहे सुभा. बाकी सगळे ठीक आहेत पण सुभा आत्तापर्यंत कमावलेलं सगळं घालवतो आहे. तेही काशिनाथ घाणेकरचं रिलीज तोंडावर असताना. मलाच बघताना लाज वाटते त्याला असं नविन पोराटोरांसोबत नाचताना बघून. खरंच काय गरज होती ही मालिका करण्याची.
मायरा प्रेम करतै त्याच्यावर .
मायरा प्रेम करतै त्याच्यावर ...वाईट वाटलं तिच्यासाठी. काय काम केलं तिनं काल. तोडीस तोड.
मायरा प्रेम करतै त्याच्यावर .
मायरा प्रेम करतै त्याच्यावर ...वाईट वाटलं तिच्यासाठी. काय काम केलं तिनं काल. तोडीस तोड.>>> काल तिला जाणवल का.. एकदम... इतके दिवस कुठे होत... सो थोड वेगळ वाटल...
अरे मायरा वरून आठवलं.. मला
अरे मायरा वरून आठवलं.. मला असं वाटतंय हे ई बाळ म्हणजे त्या खु क खु मधल्या मॉनिकाच नको असलेले बाळ(ईशाच होत तीच नाव,ईशु म्हणायची ती मेंगळी मानसी ) असेल...तिथे ही विक्रांत(परत सेम नाव) हिच्या मुळे तिच्या हातून गेला आणि इथेही...म्हणून आता मायरा हेट्स ई बाळ... डेस्टिनी दुसरं काय (स्लो मोशन मध्ये 'च' म्हणावं)... >>>

मॉनिकाच नको असलेले बाळ(ईशाच
मॉनिकाच नको असलेले बाळ(ईशाच होत तीच नाव,ईशु म्हणायची ती मेंगळी मानसी ) असेल...तिथे ही विक्रांत(परत सेम नाव) हिच्या मुळे तिच्या हातून गेला आणि इथेही...म्हणून आता मायरा हेट्स ई बाळ... डेस्टिनी दुसरं काय (स्लो मोशन मध्ये 'च' म्हणावं).>>
स्लो मोशन आणि घासणीयुक्त टोनमधे.
ह्या सिरीअलीत विसुभाऊचं वय 55
ह्या सिरीअलीत विसुभाऊचं वय 55 दिसतंय आणि अभिनयानं तो अजून 5 किलो वाढवतोय. सुबोधचं खरं वय आत्ता 44 आहे आणि विसुभाऊ 46 म्हणजे फक्त 2 वर्ष लहान, तरी एवढा म्हातारा मेकअप का करतात त्याला? ती इशु वयावरून त्याला बोलते तेही मला नाही आवडत. 46 है काही म्हातार्यात गणण्याचं वय नाही बरं का.
ईशा आजच्या भागात सुभा च्या
ईशा आजच्या भागात सुभा च्या monologue नंतर बनेल वाटली. मायराचं hurt होणं तिनी खूपच छान रंगवलं असलं तरी काय संबंध? आता जर अचानक सुभासाठी मायरानी ईशाविरुद्ध आघाडी उघडली तर माझा सिरीयल ला बाय-बाय. आज जरा वाटलं ईशा आणि मायराचे रोल करणाऱ्या व्यक्तींची अदलाबदल असती तर जास्त मजा आली असती! पण मायरा ईशा सारखी लहान, अननुभवी दिसत नाही आणि ईशा मायरा समोर VP म्हणून शोभली नसती.
ह्या सिरीअलीत विसुभाऊचं वय 55
ह्या सिरीअलीत विसुभाऊचं वय 55 दिसतंय आणि अभिनयानं तो अजून 5 किलो वाढवतोय. सुबोधचं खरं वय आत्ता 44 आहे आणि विसुभाऊ 46 म्हणजे फक्त 2 वर्ष लहान, तरी एवढा म्हातारा मेकअप का करतात त्याला? ---- +1, विक्रांत च्या वयाचा उल्लेख मी miss केला बहुतेक!
त्या स्लॅमबुकात होतं ना वय..
त्या स्लॅमबुकात होतं ना वय...46
झेंडेनच चुकलंच एखाद्या
झेंडेनच चुकलंच एखाद्या मुलीबद्दल अस बोलणं बरोबर नाहीये..झेंडेना काळजी होती सुभाची पण दुसऱ्या प्रकारेपन समजावून सांगता आलं असत
काय झालं आज?
काय झालं आज?
झेंडेंनी विसकडून कानाखाली
झेंडेंनी विसकडून कानाखाली खाल्ली.
मायरा चांगलं काम करतियै. ती
मायरा चांगलं काम करतिये. ती पण खूप "खरी" आहे म्हणावं:) किंबहुना इशापेक्षा जास्त तीच खरी आहे. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह दिसतंय विक्रांतचं.
बेबीच्या बाबांनी पहिल्यांदा कायतरी लाॅजिकल प्रश्न विचारला..."असं काम चालतं काय कधी एवढ्या मोठ्या ऑफीसमधे? "
5 दिवसांत वाजवतायत की काय?
ईशा बाळ कशी काय बुवा सराईतपणे
ईशा बाळ कशी काय बुवा सराईतपणे फेकते की विक्रांत सर आले होते पुढच्या स्टॉपला म्हणे... अरे तू इतकी निरागस भोळी आहेस ना जिला ते हॉटेल आणि तो रिसेपशन वाला किती घाण आहे आणि कुठल्या संदर्भात म्हणतो आहे ते कळलं नाही...मग सांग की खरं खरं सगळं आई बाबांना... कशी त्यांनी बस अडवली ,कसे तुम्ही दोघ एका लॉज वर थांबलात... हे सगळं सांगायला तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि म्हणे मी रुपाली कडे जाते अस म्हणून सटकली म्हणजे अजून काही प्रश्न नको यायला..
आणि रुपाली विचारते काय काय झालं सांग की तर तिथेही बाकी वि स जे काय आर्त स्वरात बडबडला त्याबद्दल हिला काही नाही फक्त शेवटी ILU म्हणाला ना बास यातच तिला इंटरेस्ट... अरेरे काय त्या सु भा च्या नशिबी दगडं आलाय...
किंवा आता अडला विकू गाढव बाळाचे पाय धरी अस झालंय का काय...असो ,झेंडे बरोबर च बोलत होता...उगाच मारलं त्याला...
खरं ऐकवलं नाही सु भा ला... ई बाळाचे बाबा थोडे साशंक झालेत म्हणून डायरेक्ट काही न म्हणता म्हणाले पण बाळा नोकरी सोड.. आधी डिग्री घे...तर नाही... चालू ई बाळ लग्गेच म्हणतं कसं ' बाबा मग मी असं केलं तर?? अभ्यास सांभाळून नोकरी केली तर्' की आई लगेच गरागरा डोळे फिरवून आणि गदागदा मान हलवून हो हो निमकर.... तीला काय तिचे एव्हढे पैसे हवेतच चाळीत सांगायला आणि लग्नानंतर ही हवेत.... शी..ई बाळ आणि तिचे आई बाबा खरंच सु भा च्या बौद्धिक बरोबरीचेही नाहीत... पैशाने तर नाहीच नाही पण इतर प्रत्येक गोष्टीत... एक वेळ पैसे नसेल तरी चालेल पण....... इथे तर
…..विनाश काले विपरित बुद्धी सु भा ला दुसरं काय... 
मी बघायला चालू केला तो
मी बघायला चालू केला तो एपिसोड पण प्रामाणिक पणे सांगते पाच मिनिटात बंद केला. मुलगी बेड वर गाढ झोपलेली आणि हा काईतरी बोलतो आहे. इतके बघून बंद करून टाकले. द्ड्पण आले एक प्रकारचे. दिस इज नॉट डन. नॉट डन. मग दुसरा पुढ चा एपिसोड बघायला आज लावला तर आवाजच नाही. मायरा काहीतरी झें डे ला सांगत असते तो वाला.
एक पालक म्हणून मी अॅक्सेप्ट करू शकत नाही हा आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग. किती तरी मुले मुली मेहनत करून शिक्ष ण पूर्ण करत आहेत. आर्थिक पाठ्बळ नसले तरीही. त्यांना नोकरी कुठे व कशी मिळेल का आईबाबांच्या जिवावरच राहायला लागते आहे अश्या चिंता असतात.
पीजी करायची काही एक दिशा दिसत असते. डिरेक्ट बिझनेस ओनरलाच पटवणे हा बरोबर मार्ग नव्हे. तेही अश्या सिचुएशन मध्ये. चुकीचा संदेश जातो.
मला माहीत आहे सिरीअल बनव्णारे व प्रेक्षक इतका विचार करत नाहीत. पण म्हणून मी ही तो करायचा नाही असे नव्हे. आता लग्न झाले कीच बघेन
सध्या ह्या शिरेलीत जे काही
सध्या ह्या शिरेलीत जे काही चालू आहे ते बिलकुल पटण्यासारखे नाहीये. मला तर तो सुभा पण आवडत नाही, सो मी पण आता मुद्दाम बघणार नाही, घरी आलीच लवकर अन चालू असेल तर बघेन. परवाच्या एपीला सगळेच नाव ठेवतायेत. खूप वाईट संदेश जातोय ह्या शिरेलीतून. अरे कितीतरी गरीब मुली असे कष्ट करून एक उत्तम भविष्य घडवितात , मे बी त्यातील एखादी पडतही असेल बॉस/ ऑनर च्या प्रेमात, पण इतका गळेपडू पणा नक्कीच नसावा. ईशा आता खरेच चिप वाटायला लागलीय. अगदी इतक्या प्रेमळ आई वडिलांना देखील फसवत आहे ती
सुभा पण पटत नाही, वर तो सुजलेला चेहरा अन ते पोक्त शरीर, इतक्या लहान वयाची कुठली मुलगी त्याच्या प्रेमात पडू शकते ??? हा त्याच्यापेक्षा त्याच्या पैशाच्या अन स्टेटस च्या प्रेमात पडली असावी.
कदाचित नंतर सुभाची negative
कदाचित नंतर सुभाची negative shade केली भूमिका तर मुलींना पैश्याच्या मागे असं पटापट लागू नका, नीट माणूस कसा आहे बघा, संदेश असू शकतो.
बाकी माझा सिरीयल ला रामराम! मायरा interfaring in बॉस'स personal affairs .
नव्या प्रोमोत सुभा गुलाबी टी
नव्या प्रोमोत सुभा गुलाबी टी शर्टात. वय कमी दिसतंय. ईशाबरोबर लंडनला जातोय. मायरा अन झेंडे तिकीट्स करतायत्.
एक प्रश्न आहे, हे प्रोमो कुठे
एक प्रश्न आहे, हे प्रोमो कुठे दिसतात? मागे पण लग्नाच्या प्रोमो बद्दल वाचले होते या धाग्यावर.
Pages