अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
चाफा बोलेना तसा आता चाफा
चाफा बोलेना तसा आता चाफा दिसेना झाला आहे.
(No subject)
आता दिसतोय का?

almost झाल आहे मनोगत. पाठवते.
almost झाल आहे मनोगत. पाठवते.
वि. पु. पहा जागूताई.
- सगळे फोटो मस्तच.
- चाफा छान फोटो.
म्हणजे दिसला ग बाई दिसला
म्हणजे दिसला ग बाई दिसला (चाफा)
Chafa disala
Chafa disala
मला नाही दिसत चाफा.
मला नाही दिसत चाफा.
चाफा दिसत नाहई जागू
चाफा दिसत नाहई जागू
ज्यांना चाफा दिसतोय त्यांनी
ज्यांना चाफा दिसतोय त्यांनी खाली बसा व ज्यांना चाफा दिसत नाही त्यांनी वर्गाबाहेर जा. अजून कुणाला चाफा दिसत नाही त्यांनी हात वर करा.
रानहळद
रानहळद

लाल चतुर

वॉव! चतूर किती मस्त आलाय.
वॉव! चतूर किती मस्त आलाय. रानहळदीच्या फोटोतील कलरही खुप छान आणि नॅचरल आलेत.
निळकंठ व खाटीक यांचे फोटो देखील सुरेख आले होते.
तुमचा कॅमेरा व लेन्स कोणती आहे?
सेटींग काय ठेवले होते?
मनोगत अतिशय सुरेख, जियो
मनोगत अतिशय सुरेख, जियो मृण्मयी
सर्व फोटो ही सुप्पर्ब
ज्यांना चाफा दिसतोय त्यांनी
ज्यांना चाफा दिसतोय त्यांनी खाली बसा व ज्यांना चाफा दिसत नाही त्यांनी वर्गाबाहेर जा. अजून कुणाला चाफा दिसत नाही त्यांनी हात वर करा. Lol
LOL.. मला काहीच नाही दिसलं
मै कहां जाऊं हा हा
>>>LOL.. मला काहीच नाही दिसलं
>>>LOL.. मला काहीच नाही दिसलं
मै कहां जाऊं हा हा<<<
बाकी मेरे साथ आओ....
(आधे बैठ जाओ, आधे बाहर जाओ..)
मलाही चाफा नाही दिसत आहे.
मलाही चाफा नाही दिसत आहे. पण चाफा दिसल्याशिवाय मी वर्गाबाहेर नाही जाणार.
१.मला चाफा दिसला.
१.मला चाफा दिसला.
२.चाफा गायब झाला
३.परत दिसला..2 August, 2019 - 13:52
४.आताच्या फोटोतला चाफा दिसत नाही.पान ३४ वरील जागूच्या फोटोतला चाफा दिसतोय.
>> तुमचा कॅमेरा व लेन्स कोणती
>> तुमचा कॅमेरा व लेन्स कोणती आहे?
धन्यवाद शाली. मी पॉईंट अॅन्ड शूट कॅमेरे वापरते ज्यात ऑटो सेटींग्ज्/मोड्स दिलेलेच असतात. आधी माझ्याकडे Nikon P600 होता & सध्या Canon powershot sx60hs आहे. निकॉन जास्त चांगला आहे. दोन्ही कॅमेर्यांची ऑप्टीकल झूम चांगली आहे.
मला एसएलआर वगैरे फार जड वाटतात.
@ ऋतुराज, लोकप्रभामधला लेख
@ ऋतुराज, लोकप्रभामधला लेख वाचला. आवडला. फोटोही छान आहेत. डॉ. राजू कसंबे यांचाही उल्लेख आहे लेखात.
.
.
.
वर्षा, लाल चतुराच प्रचि सुरेख
वर्षा, लाल चतुराच प्रचि सुरेख
शालीदा, कळ्या सुंदर
चतूर मस्त आलाय.
चतूर मस्त आलाय.
तुमचा कॅमेरा व लेन्स कोणती आहे? सेटींग काय होते?
वाह वा जबरी फोटो सर्वच.
वाह वा जबरी फोटो सर्वच.
मन खंत करी चाफा मात्र दिसेना.
धन्यवाद ऋतूराज, उनाडटप्पू
धन्यवाद ऋतूराज, उनाडटप्पू
@उनाडटप्पू.
पॉईंट अॅन्ड शूट निकॉन कूलपिक्स पी६००. त्यात रेडीमेड मोड आहेत.
वर्षूताई हल्ली इथे तुला बघून
वर्षूताई हल्ली इथे तुला बघून बरं वाटतं. बाकी हल्ली बरेच जण पूर्वीचे अजिबात दिसत नाहीत. नवीनपण सगळेजण मस्त मस्त माहिती शेअर करतात आणि फोटो पोस्ट करतात, जुने सगळे परत इथे दिसले तर बरं होईल. हा धागा फार पूर्वी एक नंबरवर दिसायचा तसा दिसेल.
हा प्रथम इंडीयन रॉबीन असावा
हा प्रथम इंडीयन रॉबीन असावा वाटले पण रंग वेगळा आहे. गप्पीदास आहे का हा?






खारुतै (Squirrel)
.
मधमाशी (नेहमीची नाही वाटत. आग्या मोहळाच्या मधमाश्या अशाच असतात)
ही केन्याची नाजूक फुले.
.
@मनोगत अतिशय सुरेख, जियो
@मनोगत अतिशय सुरेख, जियो मृण्मयी.. >>>
खूप खूप आभार वर्षू ताई. _/\_
आजकाल पक्ष्यांमधेही विभक्त
आजकाल पक्ष्यांमधेही विभक्त कुटूंब पध्दत सुरू झालीय की काय समजेना. नेहमी थव्यांनी दिसणारे पक्षीदेखील आजकाल जोडीनेच दिसतात. अगदी चिमणी सुध्दा.



ही जोडी गेले आठ दिवस रोज आमच्या सोसायटीजवळ येत आहे.
बदक (Spot-billed duck)
.
याला चोचीवरील रंगांमुळे हळदी-कुंकू देखील म्हणतात.
एक आणि एक अप्रतिम फोटो आहेत.
एक आणि एक अप्रतिम फोटो आहेत.
जागू ताई विपु चेक कर.
थॅंक्यू सिध्दि!
थॅंक्यू सिध्दि!
हा अजून एक स्पॉटबिल्डचा क्लिक
हा अजून एक स्पॉटबिलचा क्लिक.

मस्त फोटो.हॅंड्स अपचा फोटो
मस्त फोटो.हॅंड्स अपचा फोटो मस्त आहे.
Pages