निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहील आहेस मनिम्याऊ. नविन भागाच्या सगळ्या नि.ग. प्रेमिंना शुभेच्छा. आता जास्तित जास्त तुम्ही अनुभवलेले निसर्गाचे बारकावे शेयर करुया.

नमस्कार सर्वांना. ईतके दिवस इथे येउन वाचत होते..
पण आता मला पण सामिल व्हावसं वाटतय तुम्हा सगळ्यांच्या गप्पांमद्धे
माझ्या छोट्याश्या गच्चीतल्या बागेबद्दलच्या काही शंका ईथे विचारु शकते का मी ?

हो निसर्ग घटकांबाबत चर्चेसाठीच हा धागा आहे. तुमच स्वागत आहे स्मिता.

धन्यवाद जागु.
माझ्या घराच्या गच्चीत खुप कमी उन्ह ( थेट सूर्यप्रकाश) येते..सकाळचे उन्ह जवळजवळ नाहीच..दुपारी अगदी थोडावेळ येते ४ नंतर..
मला तिथे कोणकोणती झाडे/रोपं लावता येतील. ?
सध्या माझ्याकडे तुळस, कढीपत्ता, देशी गुलाब , जास्वंद, लिली, मनी प्लांट, सदाफुली अशी झाडं लावली आहेत..अजुन कोणती झाडं/वेल लावु शकते मी ?
मला गोकर्णाची फुलं खुप आवडतात. तो लावु शकेन का ईतक्या कमी सूर्यप्रकाशात ?
जास्वंद पण वाढेल की नाही शंका आहे मला...त्याच्या पानांवर बारीक हिरवे न पांढरे किडे पडलेत.
गुलाब मात्र छान फुट्लाय..२ नवीन कळ्या पण दिसत आहेत त्याला.. Happy

हो निसर्ग घटकांबाबत चर्चेसाठीच हा धागा आहे.
>>> ३२ व्या भागाच्या शेवटी शेवटी मी एक शंका / प्रश्न विचारला आहे.
ज्यांना त्यावरचं काही माहिती असेल त्यांनी कृपया उत्तर द्यावे.

मागिल भागात प्रितिने खालील शंका विचारली आहे. जाणकारांनी तिला माहिती द्यावी.

इथे मी अधूनमधून पोस्टी वाचायला येते. आज प्रथमच एक प्रश्न/शंका विचारते आहे :

मैत्रिणीकडून जांभळ्या आणि पांढर्‍या गोकर्णीच्या बिया आणून कुंडीत लावल्या होत्या. एकाच कुंडीत थोड्या थोड्या अंतरावर पांढर्‍याच्या ३ आणि जांभळ्याची १.
पांढर्‍या गोकर्णीचे २ छान कोंब फुटले. त्यातला एक वेल जोमाने वाढला. त्याला आधी काठीचा आणि नंतर दोरीचा आणि बाल्कनीच्या ग्रिलचा आधार दिला. बघता बघता वेल पाच-एक फूट वाढला आणि नंतर मात्र पार सुकून गेला. जेमतेम दीड-दोन महिन्यात हे सगळं झालं.

जांभळ्या गोकर्णाला कोंब फुटला, तो बोटभर वाढला आणि तसाच सुकून गेला.

आता आणखी एका पांढर्‍याचा कोंब आला आहे, पण तो देखील वाढेलसं वाटत नाही. आणखी एक पांढर्‍याची बी आता मातीखाली आहे.

हे कशामुळे झालं असेल?
बाल्कनीत सकाळच्या वेळात ऊन असतं. इतरही ३-४ कुंड्या आहेतच.
नर्सरीतून खत आणलंय. त्याच्या पॅकवर दिलेल्या सूचनांनुसार ते घालते. कुंडी मोठी आहे. उन्हाळ्यात रोज पाणी घालत होते.
वरती म्हटलंय तसं रोज सकाळची कॉफी झाडांशेजारी बसून पिते. रविवारचा नाश्ताही तिथेच असतो माझा. अधूनमधून पाणी स्प्रे करून सगळी पानं स्वच्छ करते. एकेका पानांना अलगद बोटांनी उचलून निरखायला, त्यांची रचना पाहायलाही मला खूप आवडतं. नवीन कोंब फुटले की प्रचंड आनंद होतो. तरी वेल सुकल्यामुळे खूप वाईट वाटतंय.

नेटवर जरा शोधाशोध केली तर गोकर्णीला न्युट्रल माती लागते असं कळलं. मग वाटलं, माती अ‍ॅसिडिक झाल्याने असं झालं असेल का?
कशामुळे अ‍ॅसिडिक होऊ शकते काही कल्पना नाही.

स्वयंपाकघरात भाज्या, पालेभाज्या धुतल्या की ते पाणी ओतून देण्याऐवजी मी अनेकदा कुंड्यांमध्ये घालते. त्यामुळे तर असं झालं नसेल?

Submitted by ललिता-प्रीति on 13 July, 2018 - 09:57

देवकी, शाली अन मेधा, आधीच्या भागातल्या उत्तरांबद्दल खूप धन्यवाद. आता नक्की करून बघते. कुंडी मोठी आहे आणि खत पण घालते आहे. माझ्या कंपनी चा फायदा होतो का बघू. Happy
ललिता प्रीती, गोकर्णीची फांदी पण लागते. मिळाली तर लावून बघ. योगायोग म्हणजे मागच्या 1/2 दिवसात माझा पण एक गोकर्णीचा मोठा वेल अचानक सुकला आहे. कारण माहिती नाही. रच्याकने, खत खुप स्ट्रॉंग झालय का? त्यानी पण बाळझाडं मरू शकतील. मला इथल्या माळ्यानी सांगितलं होतं कि खूप ऊन असेल तर खत घालायचं नाही किंवा मग कुंडी सावलीत ठेवायची 1/2दिवस. आणि झाडांच्या मुळाशी खत ना घालता, कुंडीच्या कडेनी घालायचं. करून बघ.

स्मिता, आपल्याकडे सूर्याची दिशा बदलली कि ऊन कमीजास्त होत. एकदा अन्दाज आला कि मग अजून झाड लावता येतील. पण आटा सुद्धा गोकर्ण, झेंडू, ब्रह्मकमळ, पुदिना, बेसिल, कांदा / लसूण (पात छान येते), अळकुड्या (पानं मिळतील), गवती चहा इत्यादी लावता येईल. कुंड्या थोड्या उंचावर ठेवल्या तर ऊन नाही तरी प्रकाश जास्त मिळेल. आत्ताचा सिझन पण छान आहे झाड लावायला. फक्त फळभाज्यांना दिवसभर ऊन लागत सो फळ कितपत येतील माहिती नाही.

<<< वरती म्हटलंय तसं रोज सकाळची कॉफी झाडांशेजारी बसून पिते. रविवारचा नाश्ताही तिथेच असतो माझा. >>>
हा काय प्रकार आहे? आता थोडे दिवस संध्याकाळी कॉफीऐवजी स्कॉच पिऊन बघा, झाडांशेजारी बसून.

मला तिथे कोणकोणती झाडे/रोपं लावता येतील. ? >> मोगरा, मदनबाण मोगरा, बटमोगरा, अबोली, मरवा, पाचू, गुलबक्षी, शेवंती, झिपरीच्या व्हरायटी, शतावरी , अनंत

गवती चहा, हळद, कार्ले, मिरची, तुळस, पुदिना, बेसिल, पातीचा कांदा, गाजरे, मुळा, विड्याच्या पानांचा वेल, सर्व काही कुंडीत लावू शकता

वा नविन भागाची सुरुवात उपयुक्त गप्पांनी झाली आहे.
शाली खुप सुंदर फोटो आहेत.
मेधा मस्त फुले.

आला आला नवा भाग..
मनोगत मस्त मनिम्याऊ..
प्रश्नोत्तर सुरु झाली ना..अरे वा वा..
नविन भागासाठी शुभेच्छा...

नवीन धागा फ़ुलांनी बहरला. Happy
रचना, तु दिलेल्या फ़ोटोतला तेरडा माझा फ़ार आवडता आहे. इकडे बघायला पण मिळत नाही. धन्यवाद! Happy

मनोगत मस्स्त! आणि फोटो पण सुरेख !
आत्तापर्यंत चे भाग संस्कृती ग्रुप मध्ये होते आता हा ३३ पासून पर्यावरण मध्ये हलवला का ?
मग तसं भाग ३२ मध्ये सांगायला पाहिजे का ?कारण तो धागा आहे चालू अजून ...
कारण मी नव्हते पर्यावरण ची सभासद आत्ता हा धागा पाहिल्यावर कळलं Sad

१००० च्या पुढे पोस्ट गेल्या की आपण नविन धागा काढतो>>हो ते माहित होतं
मागचा भाग चुकुन संस्कृतीमध्ये गेला होता.>>ओह! ओके

आमच्या बागेतली लाल मश्रूम्स..

IMG-20180715-WA0024_1.jpg

Pages