निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

6BF418D8-8401-400F-BECC-977EC2296053.jpeg
संकासुराची कळी.
4EC0E6DE-EC40-48B9-887D-6081446B7699.jpeg
पोर्ट्रेट मोडमधे फोटो काढल्याने नको तो भाग देखील ब्लर झाला आहे. Sad
5446ED9F-A4FA-419F-8F98-B551D2C1B0A3.jpeg
.
78908D03-7BF1-4822-A2E0-915299BF6A1A.jpeg

धन्यवाद मन्या!

@ऋतूराज, पहिल्या फुलाचे नाव माहित नाही. नखाएवढे फुल आहे ते. त्याचे वेल सगळ्या कंपाऊंड वॉलवर पसरले आहेत. आपोआप उगवलेत.

दुसरे लाल फुल जंपींग जट्रोफाचे आहे. तेल बी प्रकारातले झाड असावे. मराठी नाव माहीत नाही.

सगळेच फोटो मस्त,
कमळ बी
IMG_20190721_225825.JPG

कमळकोश
या बिया एक दोन दिवसात तयार होतील
IMG_20190721_225752.JPG

मनिम्याऊ कमळकोश सुंदर फोटो आहेत.
कमळकोश पहिल्यांदा बघितले.
शालीदा नी काढलेले फोटो सुद्धा सुंदर आहेत.

शालीदा, जंपींग जट्रोफाच्या माहितीबद्दल धन्यवाद. त्याची पाने सुद्धा छान आहेत. एकूणच जेट्रोफा जैव इंधनासाठी वरच्या यादीत आहे.
सिद्धि, सुरेख प्रचि
मनिम्याऊ, कमळकोश अप्रतिम, मला घरी लावायचं कमळ ....... ह्या बिया रुजतात का?

@मनिम्याऊ, कमळकोश अप्रतिम, मला घरी लावायचं कमळ ....... ह्या बिया रुजतात का? >>
हो. बिया रुजतात पण ती फ़ार किचकट प्रोसेस आहे. त्यापेक्षा नर्सरीतून रोपटे आणणे चांगले.

@मनिम्याऊ कमळाची शेती करतात का ? >>> हो. कमळाची शेती करतात
माझे हौशी बागकाम आहे पण जे commercial शेती करतात ते खूपच फ़ायद्यात आहेत.

सिध्दि फोटो भारीच आहेत.
मनिम्याऊ कमलकोष सुरेख. या बियांची माळ भेट म्हणून मिळाली आहे मला. उपयोग काय आहे माहित नाही पण ठेवली आहे.

बादवे हात कोणाचा आहे मनिम्याऊ? मला भविष्य कळतं. Lol Light 1

शालीदा, या बियांची माळ महालक्ष्मी पूजेत वापरतात. तसेच श्रीमहालक्ष्मी जप करताना देखील वापरतात

@बादवे हात कोणाचा आहे मनिम्याऊ? मला भविष्य कळतं. :p
मग सांगा ना . काय वाढून ठेवलंय भविष्यात Proud
हात माझाच आहे

कसले भारी भारी फोटो टाकतायत सगळे ! किती बघू नि किती नको असं होतंय
भातशेती तर अप्रतिम !भातशेती च आहे ना ?
कमळ कोष आणि बी पहिल्यांदाच पाहिलं !कुठे असतं हे ? कमळाच्या फुलाच्या पाकळ्या गळाल्या कि मध्ये जे शिल्लक राहतं त्यात का ?! सुर्ययफुलासारखच का ?
शालींचे फोटो पण मस्तच !

@ कुठे असतं हे ? कमळाच्या फुलाच्या पाकळ्या गळाल्या कि मध्ये जे शिल्लक राहतं त्यात का ?!>>
हो. पाकळ्या गळाल्या नंतरच्या आठवड्यात बिया तयार होण्याची सुरुवात होते

पाकळ्या गळाल्या नंतरच्या आठवड्यात बिया तयार होण्याची सुरुवात होते>> धन्यवाद दोघीना .
आपण तळ्यातून कमळ तोडून आणलं आणि घरी पाण्यात घालून ठेवलं तर नाही ना मिळणार या बिया ?! झाडावरच सुकलं पाहिजे ना

मार्केट मध्ये मखाना मिळतो विकत. छोटी पाकीट असतात. तेच ना हे सुकलेले कमळ बी?? प्रोटीन्स खूप असतात म्हणे यात.

खूप वर्षाआधी भीमाशंकरला गेलो असताना तेथे गवताच्या बियाच्या माळा विकणारे पहिले होते, खूप सुंदर दिसतात त्या माळा . Coix नावाच्या गवताच्या बिया बहुदा.

सिद्धी कोणते गाव? फार सुंदर फोटो आहेत.
शालीदा मस्त फोटो
मनिम्याउ तू बागेसाठी चांगलि मेहनत घेतेस हे दिसत.

@मार्केट मध्ये मखाना मिळतो विकत. छोटी पाकीट असतात. तेच ना हे सुकलेले कमळ बी?
मखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. त्यांची खीर किंवा भडंग करतात

@मनिम्याउ तू बागेसाठी चांगलि मेहनत घेतेस हे दिसत. धन्यवाद जागु ताई. (2018 च 2nd Best 'amature household garden' बक्षीस आहे आमच्या garden ला नागपूर Rotary Club चे.)

@मार्केट मध्ये मखाना मिळतो विकत. छोटी पाकीट असतात. तेच ना हे सुकलेले कमळ बी?
मखाणे म्हणजे कमळाच्या बियांच्या लाह्या. त्यांची खीर किंवा भडंग करतात........ओके.

मनिम्याऊ अभिनंदन.

(2018 च 2nd Best 'amature household garden' बक्षीस आहे आमच्या garden ला नागपूर Rotary Club चे.) >> मनिम्याऊ अभिनंदन.

खूप दिवसांनी आले या धाग्यावर. सगळ्यांचेच फोटो मस्त . माहितीत खूप भर पडते ते वेगळे आणि सुंदर फोटो पाहून मन प्रसन्न होते.
सिद्धी फार सुंदर गाव आहे ग . फोटो छानच.
2018 च 2nd Best 'amature household garden' बक्षीस आहे आमच्या garden ला नागपूर Rotary Club चे.> मनिम्याऊ अभिनंदन.
शाली एकापेक्षा एक सुंदर फोटो आहेत.

Pages