निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद शाली, वावे!
>>मी फोटो रिसाईज करत नाही. पण ते अपलोड होताना अॉटोमॅटीक होत असावेत.

अरे वा, माझे नाही होत अपलोड, फाइल साइज मोठा असल्याच मेसेज येतोच.
नावासाठी धन्यवाद ऋतूराज

@ शालीदा, ती फळे Ipomoeaच्या कोणत्यातरी जातीची वाटतायेत. गुगलून बघा. फुलांचा फोटो असेल तर पाठवा.
@ वावे, धन्यवाद. पण मला असलेली माहिती ही पुस्तक वाचून मिळालेली, त्यात माझं ज्ञान काहीच नाही.

ऋतूराज ती Ipomoea प्रजातीचीच फुले आहेत पण नक्की नाव नाही सापडले. इथून पुढे फुलांचा फोटो काढल्यानंतर त्या झाडाचा आणि पानांचाही फोटो काढायची सवय ठेवली पाहीजे.

निसर्गाच्या गाप्पाला पूर्वीचे दिवस आल्यासारखे वाटतात. खुप छान फोटो आणि चर्चा.
गुगल फोटो वरून इथे फोटो डाउनलोड करता येतात पिकासाप्रमाणे
फोटोवर राईट क्लिक करुन इन्सपेक्ट वर जायच त्यात एक लिंक येते त्यावर गेले की त्या फोटोची छोटी विंडो येते ती लिंक राईट क्लिक करुन काॅपी वर जायच मग Copy Outer HTML करुन इथे ती लिंक पेस्टकरायची आणि सेव्ह करायच.
माझा प्राॅब्लेम झालाय तो माझ गुगल अकाउंटच फुल झालय.

गेला आठवडाभर रामबाण कापसाचा प्रचि अपलोड करण्याचा प्रयत्न करत होतो..
आज जमलं..

बदलापूरच्या बागेतला रामबाण कापूस..

IMG-20190726-WA0010.jpg

अप्रतिम फोटो सर्वच, नजरसुख आणि सुरेख चर्चा.

हा धागा सर्वात वर दिसला की मन सुखावतं, डोळ्यांनापण बरं वाटतं.

आज निग वर दिवसभरात यायला जमलंच नाही.
@ शालीदा , खरंच काय एकाहून एक सुंदर प्रचि टाकताय. अप्रतिम.
हळुंदा खूप सुंदर. ह्याच्या परागीभवनची ट्रिक एकदम भारी आहे.
ह्याच्या मधल्या वळलेल्या पाकळीच्या आकार मुद्दाम तसा असतो. त्यावर लहान लहान कीटक येउन बसतात आणि त्यांच्या इवल्या वजनाने त्या पाकळीच्या वळलेल्या नळीतून पुंकेसर आणि स्त्रीकेसराचा दांडा बाहेर येतो. त्यातील पुंकेसर कीटकाच्या शरीराला चिकटतात आणि मग तो कीटक दुसऱ्या फुलावर गेला कि काम फत्ते.

गिरीचे मस्तकी गंगा,
तेथुनि चालिली बळे ।।
धबाबा लोटती धारा,
धबाबा तोय आदळे ।।

ती धबधब्याची प्रचि पाहून एवढच म्हणावसं वाटत..... अ प्र ति म

@ जागूताई , खरंच या कट्ट्यावर येऊन खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटत.

@ निरुदा , रामबाण मस्तच. आणखी प्रचि येउद्यात

>>गुगल फोटो वरून इथे फोटो डाउनलोड करता येतात पिकासाप्रमाणे
फोटोवर राईट क्लिक करुन इन्सपेक्ट वर जायच त्यात एक लिंक येते त्यावर गेले की त्या फोटोची छोटी विंडो येते ती लिंक राईट क्लिक करुन काॅपी वर जायच मग Copy Outer HTML करुन इथे ती लिंक पेस्टकरायची आणि सेव्ह करायच.

प्राजक्ता, थँक्स, हे ट्राय करुन बघते.

वर्षा तुम्हाला जमले तर मलाही सांगा. मी खुप प्रयत्न करुनही मला गुगलवरुन येथे फोटो डकवता आला नाही. राईट क्लिक करुन मला वरील कोणतेच पर्याय दिसले नाहीत.

शाली,
प्राजक्ताने सआंगितल्यानुसार करुन पाहिलं.
गूगल अल्बममधला फोटो उघडून त्यावर राइट क्लीक करुन 'इन्स्पेक्ट' सिलेक्ट करायचे. मग भरपूर गिचमिड माहिती असलेली विंडो येते. Proud
त्यातल्या वरच्या भागात एक लिंक दिसते निळ्या रंगात. त्यावर राइट क्लीक करुन कॉपी निवडायचे व त्यातील ड्रॉप डाउन मेनू मध्ये 'कॉपी आउटर एच टिएमएल' निवडायचे व ते इथे पेस्ट करायचे. त्यातले मग लांबी रुंदीचे आकडे अ‍ॅडजस्ट करायचे हवं तर.

जमले. पण हा फारच मोठा HTML CODE पेस्ट होतोय. जास्त फोटो असतील तर गोंधळ होईल मग. राईट क्लिक केल्यावर मॅकवर वेगळेच पर्याय येत आहेत. पण जमले. Happy
थँक्यू वर्षा आणि जागूताई!

पन्हाळा

गणपतीपुळे

रामबाण डोंबिवलीत पूर्वी खूप होतं तसेच नालासोपाऱ्यातही आमच्या मागे खूप होतं. आम्ही काही लागलं खुपलं तर जखमेवर ह्याचाच कापूस लावायचो लहानपणी. पण डोळ्यात तो कापूस गेलेला वाईट असा समज आहे. ख खो माहिती नाही.

सर्वच फोटो मस्त मस्त.

Pages