निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर फोटो सगळेच!
वर्षाताई, पक्षी कोणते आहेत? सुरेख फोटो आलेत.

वावे,

पहिला नीळकंठ म्हणजे Indian Roller
दुसरा Shrike वाटतोय

साक्षी

साक्षी Indian Roller म्हणजे नीलपंख
नीलकंठ वेगळ्या पक्षाला म्हणतात. दुसरा Shrike आहे. याच्या डोळ्यावरील काळ्या पट्टीमुळे त्याचे गांधारी नाव शोभून दिसते.
@ शालीदा, काहीच फोटो दिसत नाहीत Sad

अरेच्चा! ब्राऊझर बदलला तर मलाही माझे फोटो दिसत नाहीएत.

@साक्षी, बरोबर आहे. पहिला निळकंठ व दुसरा खाटीक आहे.
इतक्या सुंदर पक्षाला खाटीक का म्हणत असावेत?

इतक्या सुंदर पक्षाला खाटीक का म्हणत असावेत?>>>>> कारण तो किडे, सरडे, पाल असे त्याचे भक्ष्य झाडावर काट्याला टोचून ठेवतो. (खाटकासारखे) असं वाचलंय कुठेतरी.

ऋतूराज अगदी बरोबर. मी डिस्कव्हरीवर पाहिले आहे हे. पण तो पक्षी म्हणजेच खाटीक हे आता लक्षात आले. छान माहिती.
येथे खाटीकचा व्हिडीओ पहाता येईल.
23D29B8A-80A2-41A0-AA55-6A40A9680334.gif

नविन भाग चालू करायचा आहे. नविन भागासाठी मनोगत कोण देणार ते मला सांगा. शक्यतो आधी लिहिले नसेल अशा निग सदस्याने द्या म्हणजे सगळ्याना संधी मिळावी हा उद्देश. सोबत एक साजेसा निसर्ग फोटोही येउद्या. कोण पाठवत ते इथे सान्गा आणि मनोगत आणि फोटो मला मेल पाठवा.

धन्यवाद !
वावे हो तो इंडीयन रोलर (नीलपंख/कंठ) आणि खाटीक (श्राईक) आहे.

वॉ ss व !! कसेल भारी भारी फोटो येऊन पडलेत इथे !! कित्ती सुंदर सुंदर फुलं आणि पक्षी . ऋतुराज मस्त माहिती आणि नावं
शाली, निरू, वर्षा, वावे , निरुदा सग्गळे फोटो आवडले .. धागा पळतोय जोरदार

वाह. काय झकास फोटो आहेत सगळे. निव्वळ अप्रतिम.
पण व्हिडीओ कसा अपलोड झाला आहे ईथे ?
गुगल लिन्क की यु टुब वरुन ?

खालील extensions असलेल्या फाईल येथे अपलोड करता येतात सिध्दि. त्यात न समजण्यासारखे काही नाही. Happy
मी व्हिडीओ नाही डकवला येथे. GIF डकवली आहे.
Permitted file extensions: gif png jpg jpeg doc pdf zip xls txt

Ok. बघते जमत का.
बाकीच्यांना माहित असेल but this is new 4 me.

थॅक्स शालीदा, ऋतूराज, देवकी.

अश्विनी- हि वाशिष्ठी ची उपनदी म्हणता येईल.
खेड भरणे नाका मधुन- धामणन्द मार्गे आतमध्ये जाताना, तासभर पुढे गेल्यावर लागते ही नदी.
फक्त पावसाळ्यातच जास्त पाणी असते. एरवी डबक्या सारख कुठे-कुठे पाणी पहायला मिळत.
वाहत खाली येऊन वाशिष्ठीलाच मिळते.

Pages