निसर्गाच्या गप्पा (भाग ३३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 July, 2018 - 03:13
landscape

अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..

आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.

त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .

हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.

सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.

पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.

खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...

बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..

सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा

वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिम्याऊ, धन्स ....मुल्ल्यांचं झाड़ ..... मुळापर्यंत जायला हवं Happy
उनाडटप्पू , ..रुबाब... मस्तच
शालीदा , पाणकणीस ...सुंदर ...जखमा भरून येण्यासाठी वापरतात ना?

उनाडटप्पू निरागस फोटो भारीच. कसलीच चिंता नाही. Happy
@ऋतूराज, होय जखमा भरुन येण्यासाठी लावतात पाणकणीस.

@वर्षा, नाही हो. तुमच्या पेन्सिल वर्कपुढे काहीच नाही.
मोबाईलवर फोटो काढायला काही लागत नाही.

@ऋतूराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे काटेरी फळे दिसली आज उतरणीच्या वेलीला.

शालीदा, या उतरन वेली चा अजुन एक उपयोग माहिती आहे. गावाकडे कोणाला जर स्वत:वर कोणी करणी / टोणा केला असल्याचा संशय आल्यास काही दिवस उतरन वेल पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ करतात.
माझ्या आजेसासूबाई या पाल्याने दृष्ट काढायच्या. तसेच हा वेल ओलांडायच्या नाहीत. (या पोस्ट मागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. फक्त एक पद्धत सांगण्याचा हेतू आहे)

वेका रामबाण नाव सुरेख आहे. कारण जखमा खुप लवकर भरतात पाणकणसाने.

@मनिम्याऊ, ओह! म्हणून त्या वेलीला उतरण म्हणतात वाटतं.

शालिदा काय मस्त मस्त प्रचि टाकताय; डोळ्यांना मेजवानीच. आणि वेका, मनिम्याऊ आणि ऋतुराज यांनी दिलेली माहिती पण छान.
ती उतरणीची फळे मला पहिल्यांदा सुरवंटच वाटला.

मस्त फोटो.
घाणेरीपेक्षा रायमिनुया नाव आवडले.

व्वा शालीदा मस्तच.
आता उतरणीच्या म्हाताऱ्यांकडे लक्ष ठेवा, जमल्यास काही बिया रुजवता आल्या तर पहा
@ मनिम्याऊ, उतरणीच्या नवीन माहितीबद्दल धन्स
@ शालीदा, फायर बुश व घाणेरीचे प्रचि सुंदर, घाणेरीची फुले फुलपाखरांची आवडती. एकाच रंगाची घाणेरी बागेतील वाटतायेत
@ वावे, पाइड खंड्या सुंदर, ह्याचा एक विशिष्ठ आवाज असतो, लोणावळ्याला पाहिला होता

Crateva religiosa aka the sacred garlic pear aka Sacred Barna
Parsi Colony, दादर.
याचे मराठी नाव काय आहे?
Crateva_religiosa_aka_the_sacred_garlic_pear_aka_Sacred_Barna_Oct_2017_at_Parsi_Colony_Dadar-1_70.jpg

इथे फोटो रिसाइज करुन, अपलोड करुनच देता येतात का? पूर्वी पिकासा वगैरेच्या लिंकद्वारे देता यायचे ना फोटो? आता पिकासा नसलं तरी दुसर्‍या ठिकाणी अपलोड केलेल्या फोटोच्या लिंकवरुन इथे फोटो चढवता येणार नाही का?

किंगफिशर मस्त आहे वावे.
वर्षा रायमुनिया हे नाव अगदी अलिकडे समजले. आम्ही टणटणी या नावानेच ओळखतो.

ऋतूराज बी कशासाठी रुजवायचे? उतरणीचे वेल अगदी मुबलक प्रमाणात आहेत कंपाउंड वॉलवर. म्हाताऱ्या पहायची उत्सुकता मात्र आहे.

एकाच रंगांची घाणेरीची फुले येथील मंदीराभोवती लावलेली आहेत.

वर्षा फोटो मस्तच. नाव माहीत नाही.
मी फोटो रिसाईज करत नाही. पण ते अपलोड होताना अॉटोमॅटीक होत असावेत.

दुसर्‍या ठिकाणी अपलोड केलेल्या फोटोच्या लिंकवरुन इथे फोटो चढवता येणार नाही का?......मलाही हा प्रश्न पडला आहे. कारण मायबोलीने फक्त 70 MB स्पेस दिली आहे. अगोदरचे फोटो डिलिट केल्याशिवाय नविन अपलोड करता येत नाहीत.

Cratavas या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ
याच बंगाली नाव बर्ना, बरून (वरुण) वायवर्ण असेही एक संस्कृत नाव आहे.
KEM मध्ये दोन मोठी झाडे आहेत, सुंदर वृक्ष

शालीदा, इकडे मुंबईत पाहण्यात नाही उतरण. मुबलक असल्यास उत्तम
@ वर्षा, घाणेरीला गुजरात मध्ये चुनडी असे नाव आहे आणि काठियावाड, राजपुताण्यातील भडक रंगीबेरंगी चुणऱ्यांचा संबध या नावाशी निगडित असावा असे दुर्गाबाईंनी ऋतुचक्र मध्ये लिहितात

मी या अगोदरही हे फोटो टाकले होते बहुतेक. मला कुणी याचे नाव सांगेल का? हे झुडूप मला सज्जनगडावर दिसले होते. गुगलनेही नाव सांगितले नाही.
7C92F055-B3BC-4F35-91FF-C87B90F70BED.jpeg
या ज्या पाकळ्या दिसत आहेत, त्या एका डेकोरेटिव्ह घंटीसारख्या दिसणाऱ्या फुलात (!) होत्या. हे पुर्ण वाळलेले होते. हा त्या घंट्यांचा फोटो.
A64D69A3-E559-423D-9F3E-4907977ACB10.jpeg

Pages