अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
वावे - आपण त्यात थोडा चुना
वावे - आपण त्यात थोडा चुना घालून पहा ... फक्त चुना खूप जास्त नका घालू नाहीतर माती खराब होऊ शकते
ओके उनाडटप्पू. साधारणपणे किती
ओके उनाडटप्पू. साधारणपणे किती प्रमाणात घालू?
प्रमाण हे तुमच्या कंपोस्टच्या
प्रमाण हे तुमच्या कंपोस्टच्या quantity वर अवलंबून असेल. आधी एक छोटी पुदी घालून परिणाम पाहू शकता आणि मग लागला तरच अजून घाला
धागा आवडला. फुले छान.
धागा आवडला. फुले छान.
वावे >>> करून पाहिलंत का?
वावे >>> करून पाहिलंत का? काही परिणाम झाला का?
नाही, आज नवऱ्याला पानटपरीवरून
नाही, आज नवऱ्याला पानटपरीवरून चुना आणायला सांगितलाय
लगेच घालून बघणार आहे. चुन्यामुळे नेमका काय केमिकल परिणाम होईल याची मला उत्सुकता आहे.
वावे फेसबुकवर मातीविरहीत
वावे फेसबुकवर मातीविरहीत गच्चीवरील बाग म्हणून ग्रुप आहे. त्यावर प्रश्न विचार तिथे बरेच कंपोस्ट बद्दल अनुभवी लोक आहेत.
पण मी फेसबुकवर नाही
पण मी फेसबुकवर नाही
चुना घातलाय थोडा आज. त्याचा काही उपयोग झाला नाही तर सरळ एखादं हर्बल/ ऑरगॅनिक कीडनाशक आणणार आहे.
कडुनिंबाची पान मिळतील का ?
कडुनिंबाची पान मिळतील का ? ती टाकून बघा .. आपण साठवणीच्या धान्यात टाकतो पोरकिडे होऊ नये म्हणून .. म्हणून सुचलं .. आधीच पोरकिडे आहेत तर उपयोग होईल कि नाही काय माहित ..उपयोग नाही झाला तरी कंपोस्ट होऊन जाईल पानांचं ..
फोटो सर्वच आहाहा आहेत अगदी.
फोटो सर्वच आहाहा आहेत अगदी.
कडुनिंबाची पानंच मला आठवली
कडुनिंबाची पानंच मला आठवली होती आधी
म्हणून नीम पावडर आणली. कडुनिंबाचं तेल आहे पण त्याला अशक्य वास येतो. ते मी कंपोस्टमधे घालू इच्छित नाही 
तयार झालेल्या कंपोस्टच्या
तयार झालेल्या कंपोस्टच्या थोड्या भागात चुना घातलाय पण २ दिवसात तरी काही फरक पडला नाही.
चालू कंपोस्ट पाइलमधे ( ज्यात रोज नवा ओला कचरा टाकते) त्यात भरपूर मॅगॉट्स दिसतायत आता. अन्नासाठीच्या स्पर्धेत त्यांनी या किड्यांना मागे टाकलं तर बरं
वावे मला तुझा नंबर
वावे मला तुझा नंबर संपर्कातून मेल कर.
कमळाचे फळ. ह्यात कमळाच्या बिया असतात. त्या बिया रुजतात. हे फळ असे कच्चे असताना त्यातील बिया नुसत्या खातातही. बिया तयार झाल्या की त्यापासून लाह्या बनवतात त्याला मखाणे म्हणतात. त्याचा चिवडा बनवता येतो.
पाऊस आला की फुले ही कशी
पाऊस आला की फुले ही कशी आनंदून जातात ना.

१) परीसर सुगंधी करणारा अनंत
२) प्रसन्न हसणारी जास्वंद.

३) जमिनीवरचे ऑर्चिड जमीनीकडे झुकणारं.

४) धरतीवरील प्रकाशातील चांदण्या तगर.

५) आता आम्हालाही बहर येईल. ही झलक आहे.

कमळाच्या फळाचा फोटो खास आहे.
कमळाच्या फळाचा फोटो खास आहे. ते आकाराने असं अर्धगोलच असतं का? भारीच आहे.
जागूताई, मेल करते संपर्कातून
किती सुंदर फोटो! कमळाचे फळ
किती सुंदर फोटो! कमळाचे फळ प्रथमच पाहिले.
(No subject)
वा!
वा!
प्राचीन छान बहरलाय गुलाब.
प्राचीन छान बहरलाय गुलाब. नविनच आहे का?
आमच्या घरी मधमाशान्चे पोळे
आमच्या घरी मधमाशान्चे पोळे लागले असून ते सध्या तरी लहान आहे पण झपाट्याने वाढत आहे. माझ्या दोन वर्षांच्या मुलीला तिच्या 'हनीबनीज्' प्रचंड आकर्षण असल्याने आमचा बराच वेळ त्यांचे निरिक्षण करण्यात जातो. प्रश्न असा की आमच्या सततच्या उपस्थितीमुळे (आम्हाला / माशांना/ एकमेकांचा ) काही उपद्रव होऊ शकतो का?
त्यांच्या पोळ्याच्या एकदम जवळ
त्यांच्या पोळ्याच्या एकदम जवळ नका जाऊ. बाकी अशा काही करत नाही त्या. आमच्याकडे पण लागत असतात. सध्या जामच्या झाडावर आहे.
३) जमिनीवरचे ऑर्चिड जमीनीकडे
३) जमिनीवरचे ऑर्चिड जमीनीकडे झुकणारं .....ह्याच नाव काय? सुंदर
.
.
वाह शाली! काय रसरशीत दिसतायत
वाह शाली! काय रसरशीत दिसतायत कणसं! ज्वारीची आहेत का?
वाह शालीदा!
वाह शालीदा!
बाजरी आहे फुलोऱ्यावर आलेली.
थॅंक्यू मनिम्याऊ!
नाही वावे. ही बाजरी आहे फुलोऱ्यावर आलेली. ज्वारीची कणसे गोलाकार असतात.


झेंडू
आहाहा सुंदर सकाळ माझी,
आहाहा सुंदर सकाळ माझी, अप्रतिम फोटो एकसेएक.
आणि ही बांधाच्या कडेने केलेली
आणि ही बांधाच्या कडेने केलेली लाह्यांसाठी थोडी मका.

हे कोणते फुल आहे?
हे कोणते फुल आहे?


त्याच्या आत दुसरे फुल होते.
आमच्या घरी काल एकाच दिवशी
आमच्या घरी काल एकाच दिवशी आलेली ही फुले.
सकाळी कृष्णकमळ तर रात्री ब्रम्हकमळ
Pages