तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमाल आहे, आमच्याकडे नागपंचमीला नाग पुजतात तर अर्थात मुर्तीच ना.
गणपतीबाप्पांची वा देवीची सुद्धा आपण मुर्तीच आणतो ना? कोणाकडे खरेखुरे देव प्रकट होतात का Happy

त्याचे विसर्जन वाहत्या पाण्यात किंवा अळवाच्या बनात करायचे असते.
>>>
अळवाचे बन काय असते?
माझ्या आठवणीप्रमाणे कुठल्यातरी झाडाखाली नेऊन पुजा करून आम्ही तिथेच मुर्ती सोडायचो. ते कुठले झाड हे माहीत नाही.

मुंबईत प्रवास करतांना रस्त्यावरचे खड्डे टाळून जाता येते का???>>> लोल्ल्ल्ल्ल

मस्त आहे हा धागा स्ट्रेसबस्टर Happy
बाकी गणपती पिशवी तून ..ईकडे सिंगापूर ला पार एका टोका ला जाऊन च मुर्ती आणावी लागते २-३ दिवस आधीच, ती नीट पॅक करून बॉक्स पिशवीत असतो, तसा घरी आणुन, फेस वर नवे कापड घालून ठेवतो मग गणेश च. ला यथासांग पूजा होते अशीच पध्धत फॉलो केली जाते.
वीकडे असल्याने जेमतेम सुट्ट्या घ्याव्या लागतात..

मुंबईत प्रवास करतांना रस्त्यावरचे खड्डे टाळून जाता येते का???>> विक्षिप्त_मुलगा माझ्यातर्फे तुम्हाला एक डिझायर सूट( तुमच्या मापाचा बघुन घ्या) आणि वन प्लस नूर्ड. का कायतो नवा मॉडेल.

मला वय वर्शे १९ परेन्त उपमा रवा हा फॅक्ट्रीत बनतो असेच वाट्त असे त्याचा व गव्हाचा काय संबंध - माहीत नव्हते जेनाइनली.

आमच्याकडे नागपंचमीला नाग पुजतात तर अर्थात मुर्तीच ना.
गणपतीबाप्पांची वा देवीची सुद्धा आपण मुर्तीच आणतो ना?

>>>>
खरे नाग आणून पुजले जातात याबद्दल काही आठवणी अनुभव नाहीत का सर तुमच्याकडे
निदान कानावरून तरी गेलं असावं

आणि पिशवीतून सोडतात नाग हे जे तुम्ही लिहिलं आहे ते मुर्त्या सोडायचे का ?

पेट्रोल पंपावर पेट्रोल ची विहीर नसते, हे ऐकून माझ्या मुलाला शॉक बसला होता. (हे कल्चरल मध्ये येत नाही. मी त्यातला फक्त शॉक घेतला.)

ऋन्मेऽऽष हा आयडी कैच्याकै आहे. ह्यांचे प्रतिसाद गाळून वाचायची सोय आहे का?>>
पहिल् वाक्य, ते दोन ओळीत अंदाज येतो.. वेळ आणि मू ड आणि विषय ह्या नुसार गाळून पुढे जाते (म्हणजे अनेकदा)

माझा आंतरजातीय विवाह झाला. माहेरी लग्नाची वरात घरी आली की नवरा -नवरीला मांडवात थोडं तरी नाचायला लावतात. किमान मिनिटभर तरी नुसते हात हलवून दाखवलं तरी पुरे होतं. सासरी हे असं नसतं, याची कल्पना नव्हती. त्यामुळे आम्ही मांडवाच्या दारात आल्यावर , करवल्या " नाचा, नाचा" म्हणून आग्रह करायला लागल्यावर , मी थोडे हात- पाय हलवायला सुरुवात केली. लगेच माझी नणंद जोशात येऊन मला उचलायला गेली आणि आम्ही दोघी धडपडलो. नाच तिथेच थांबला.
पण दुसऱ्या दिवशी मी नाचले, याची गावभर चर्चा झाली. नवरी सासरी आल्या आल्या नाचते, हा सगळ्यांना कल्चरल शॉक होता. मला हे अर्थातच, काही दिवसांनी समजलं. तेव्हा इथे नाचत नाहीत, हे कळल्यावर मलाही शॉक बसला.

पिशवीतून खरेखुरे नाग आणले असे ज्यांना वाटले त्यांना नमस्कार! नागपंचमी ला नाग मूर्त्या पाहिल्या नाही का?

आता lihitech आहे तर, अमेरिकेत सुप्रीम कोर्ट justice निःपक्ष नसतात तर ते डेमोक्रॅटिक किंव्वा रिपब्लिकन पार्टी या विचारसरणी चे असतात अणि त्यांची नियुक्ती प्रेसिडेंट आपल्या हिता प्रमाणे करतो हे ऐकून धक्का बसलेला. आपल्या कडे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश नेहमीच निःपक्षपाती असतात त्यामुळे kharch नवल वाटलेले.

मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्तीच आहे, मूर्त्या किंवा मुर्त्या नाही हे दोन तीन दिवस झाले तरी कुणीच दाखवून दिलं नाही याचा मला सांस्कृतिक धक्का बसला आहे Light 1
मूर्तीचं अनेकवचन मूर्तीच.

पिशवीतून खरेखुरे नाग आणले असे ज्यांना वाटले त्यांना नमस्कार! नागपंचमी ला नाग मूर्त्या पाहिल्या नाही का?>>>

खरेखुरे नाग ज्यांना वाटले ते कदाचित पश्चिम महाराष्ट्रातील असतील. (बहुदा) सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळे गावात खऱ्या नागांची पूजा करण्याची पद्धत आहे तर कोकणात नागाची मूर्ती किंवा भिंतीवर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे. कोकणात कोणत्याही गावात गेलात तरी गावातील अनेक घरात बैठकीच्या खोलीत किंवा देवघरात एखाद्या भिंतीवर जमिनीजवळ नागाचे चित्र काढलेले दिसेल, ज्याची नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते. (ग्रामीण पद्धतीचे घर, शहरी पद्धतीने बांधलेल्या बंगल्यात असे काही दिसण्याची शक्यता कमी आहे)

हे दोन तीन दिवस झाले तरी कुणीच दाखवून दिलं नाही >> वर फारच सरमिसळ Wink झाली आहे त्यामुळे जन्तेने उड्या मारल्या असतील.

अमेरिकेत सुप्रीम कोर्ट justice निःपक्ष नसतात तर ते डेमोक्रॅटिक किंव्वा रिपब्लिकन पार्टी या विचारसरणी चे असतात अणि त्यांची नियुक्ती प्रेसिडेंट आपल्या हिता प्रमाणे करतो

>> हे खरंच शॉकिंग आहे माझ्यासाठी. योगायोगाने इतक्यातच 'मेरा भारत महान' वाटावा अशी बरीच माहिती वाचण्यात येते आहे.

बाकी नागपंचमीला लहानपणापासून गारुडी त्याच्या टोपलीत खरे नाग आणताना बघते आहे (अंबरनाथ ला). अगदी आता आता त्यावर कायद्याने बंदी आली तोपर्यंत प्रत्येक नागपंचमीला गारुड्याच्या नागाची पूजा केलेली आहे. त्यामुळे नागपंचमी ला नागाची मूर्ती आणणे हेच कशॉ आहे माझ्यासाठी. गारुडी वाल्या नागांवर बंदी आली त्यांनतर पाटावर रांगोळीने नाग व नागकुळे काढून त्यांची पूजा केली आहे.

Submitted by अमितव on 16 June, 2022 - 22:26 Lol सरमिसळीमुळे सरधोपटपणे उड्या मारल्या.

मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्तीच आहे, मूर्त्या किंवा मुर्त्या नाही
>>>>>
अच्छा हे नव्हते माहीत मला...
दाखवून देत जा लोकहो. माझी नव्वद टक्के मराठी मी मायबोलीवरच शिकलो आहे.

त्यामुळे नागपंचमी ला नागाची मूर्ती आणणे हेच कशॉ आहे माझ्यासाठी
>>>>
गारुडी खरा नाग आणतो ते वेगळे. तो प्रोफेशनल असतो. आपण सामान्य माणसे घरात पुजायला नाग आणतो तेव्हा मुर्ती आणनेच सोयीस्कर पडते.

लहानपणी एकदा नवरात्रीत आमच्या अंजीरवाडीच्या देवीला नेहमीसारखी देवीची मुर्ती आणलेली. पण तिचे वाहन वाघ मात्र खराखुरा आणलेला. राणीबागेतला असल्याने माणसाळलेला होता. तरीही रिस्क होती म्हणून जनतेने ऑब्जेक्शन घेताच दुसऱ्या दिवशी जंगलात सोडून यावा लागला.

>> सुप्रीम कोर्ट justice निःपक्ष नसतात तर ते डेमोक्रॅटिक किंव्वा रिपब्लिकन पार्टी या विचारसरणी चे असतात अणि त्यांची नियुक्ती प्रेसिडेंट आपल्या हिता प्रमाणे करतो >> यात मोठ्ठा स्टार लावुन कंडिशन अप्लाय लिहावं असं विधान आहे.
धाडकन नि:पक्ष नसतात म्हणजे पक्षपाती असतात आणि म्हणून भारतातले सद्गुणाचे पुतळे असतात असे गणितासारखं कॉन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काढून त्याची सत्यता मानण्यात काही अर्थ नाही. भारतात अजुन साधी फर्स्ट अमेंडमेंट (फ्रीडम ऑफ स्पीच) नाही. म्हणजे म्हणायला आहे पण त्यात अनेक वाटा पळवाटा आहेत त्यामुळे अमेरिकेला दोन चार नाव ठेवण्यात धन्यता मानायची असेल तर मेरा भारत महान!
दोन चार वाक्यात लिहिण्याचा विषय नाही आणि सध्या वेळही नाही त्यामुळे असो.

अनेकवचन मूर्तीच आहे : असे आत्ताच ऐकले Happy संदर्भ देऊ शकाल का. कारण मूर्त्या हा शब्द Cell phone वरील मराठी library nehi दिला अणि वाचला ही आहे बर्‍याच ठिकाणी.

भाकरी che अनेक वचन काही ठिकाणी भाकरी करतात, काही ठिकाणी भाकर्‍या अशातला प्रकार वाटतो आहे. आम्ही भाकरी che अनेक वचन भाकर्‍या करतो Happy

मी मुंबई chi, मी म्हटलं, त्याने म्हटले असे शब्द प्रयोग करतो, ऐकतो. पण इथे बरेच पुणेकर (बहुतांश) म्हणला, म्हणली असे बोलतात ते ऐकून विचित्र वाटलेलं. हा शब्द प्रयोग बरोबर आहे का हेही विचारायचे होते बरेच दिवस. कोणाला माहित असेल तर सांगा Happy

Excuse me, कोणी अमेरिकेला नावे ठेवत नाहिये की मेरा भारत महान असा नारा लावत नाहिये. हे एक observation मांडले एव्हढेच. सगळा उहापोह करायला मलाही वेळ नाहिये एका कमेन्ट मध्ये.

पिशवीतून खरेखुरे नाग आणले असे ज्यांना वाटले त्यांना नमस्कार! नागपंचमी ला नाग मूर्त्या पाहिल्या नाही का?>>>

तुम्हालाही नमस्कार, कारण टोपल्यातून नाग आणलेले आणि हळद कुंकु वाहून, दूधाची वाटी नैवैद्य दाखवून केलेली पूजा तुम्हाला कधी बघून माहीतीच नाहीये.

लहानपणी एकदा नवरात्रीत आमच्या अंजीरवाडीच्या देवीला नेहमीसारखी देवीची मुर्ती आणलेली. पण तिचे वाहन वाघ मात्र खराखुरा आणलेला.
>>>
सर तुमच्या लहानपणी दिवाळीत खरा नरकासुर पण आणला असेल ना

मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्तीच आहे, मूर्त्या किंवा मुर्त्या नाही हे दोन तीन दिवस झाले तरी कुणीच दाखवून दिलं नाही याचा मला सांस्कृतिक धक्का बसला आहे >>> मलाही Happy

आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या गटातून रेकमेण्डेशन येते व राष्ट्रपती निवडतो असे काहीतरी वाचले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाचा थेट प्रभाव नसतो, अमेरिकेत असतो तसा. पण एकतर कोणतीही व्यक्ती थोडीफार इकडे किंवा तिकडे झुकलेली असतेच. त्यामुळे घटनेतील कलमांचा एखाद्या खटल्यासंदर्भात अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा तो कल त्यात येतच असणार. इव्हन गेल्या काही महिन्यांतील निकाल पाहिले तर तसे वाटते. दुसरे म्हणजे इथेही जरी एखाद्या पक्षाने न्यायाधीश नियुक्त केला तरी त्याला काँग्रेसचे मत लागतेच. ते ही जरी एकाच पार्टीचे असतील तरी सर्वांची संमती असतेच असे नाही. आणि या सगळ्यातून नियुक्त केलेला न्यायाधीश पुन्हा त्या पार्टीच्या मतासारखे वागेल याची काही गॅरंटी नसते. कारण तो त्या पार्टीला बांधील नसतो. ट्रम्पने नियुक्त केलेल्या न्यायाधीशांनी खुद्द ट्रम्पच्या विरोधातच निकाल दिल्याची उदाहरणे २०२० च्या निवडणुकीसंदर्भातील खटल्यांमधे आहेत.

भारतीय पद्धतीत एक फ्लॉ आहे तो म्हणजे लोकांच्या मताविरूद्ध जर न्यायाधीश नेमला गेला तर लोकनियुक्त सरकार त्यात आडकाठी करू शकत नाही. अमेरिकेत लोकनियुक्त सरकारच न्यायाधीश नियुक्त करते. दोन्हीमधे फायदे तोटे आहेत.

लहानपणी अर्शद वारसीचा एक चित्रपट पाहिलेला. त्यात हिरोईन लंडन की अमेरीकेला राहणारी दाखवली आहे. त्यांच्या घरात एकदा सत्यनारायणाची पूजा असते. पण भटजी नाही बोलावत तर रेकॉर्डवर मंत्र लावतात. आणि बाकीचे लोकं हातात दारूचे ग्लास घेतल्यासारखे कोल्ड्रींकसचे ग्लास घेऊन घरभर पार्टी असल्यासारखे फिरत असतात. ते बघून अर्शद वारसी चिडतो. हि काय पूजा आहे का? आणि असे म्हणून स्वतःच मंत्र बोलून पूजा करायला सुरुवात करतो. मंत्र सुद्धा असे असतात की ऊठून तांडवनृत्य करावेसे वाटावे.

सर तुमच्या लहानपणी दिवाळीत खरा नरकासुर पण आणला असेल ना
>>>>

ते वाघाचे उदाहरण मुद्दाम दिलेले.

जसे शेजारी राणीबाग आहे म्हणून कोणी नवरात्रीला देवीचे वाहन म्हणून खराखुरा वाघ मंडपात आणत नाही
तसेच गारुडी नाग घेऊन येतो म्हणून आपण काही घरच्या पुजेला खराखुरा नाग पकडून पुजायला आणत नाही.

ईतके सिंपल लॉजिक आहे Happy

तुम्हालाही नमस्कार, कारण टोपल्यातून नाग आणलेले आणि हळद कुंकु वाहून, दूधाची वाटी नैवैद्य दाखवून केलेली पूजा तुम्हाला कधी बघून माहीतीच नाहीये. - - अहो टोपल्या मध्ये खराखुरा नाग गारुडी आणताना पाहिला आहे. सर्वसामान्य लोक कसे आणतील?

फारेंड : बरोबर. नील gorsuch नियुक्ती अणि आता रो v wade खटल्या संदर्भातही असे गदारोळ झालेले. तेव्हाच वाचून आश्चर्य वाटलेले. बाकी मुद्द्यावर सहमत.

हे लॉजिक थापा मारण्यापूर्वी का नाही वापरत

आमच्याकडे लहानपणी नागपंचमीला नाग आणायचे. बहुधा पिशवीतूनच आणायचे आणि पिशवीतूनच सोडायचे.>>>>

पिशवीतून मूर्ती आणत इतपर्यंत ठिके, पिशवीतून नाग सोडत म्हणजे काय

काये सर तुम्ही आधी मारली थाप, मग ती अंगाशी आल्यावर सारवासारव सुरु केली

मग वाघ आणला आणि आता लॉजिक सांगताय

किती भंपकपणा कराल

पिशवीतून आणलेल्या नागाची (म्हणजे मूर्तीची) मनोभावे पूजा केल्यावर तो जिवंत होत असेल, मग त्याला त्याच पिशवीत घालून सोडत असतील. किंवा नागाला नाकाला रुमाल लावून बेशुद्ध करत असतील, पिशवीत घालून घरी आणून पूजा करून परत त्याच पिशवीत घालून सोडत असतील. किंवा जिवंत नाग पिशवीत घालून आणत असतील आणि पूजा केल्यावर त्याची मूर्ती आपोआप बनत असेल. मग ती मूर्ती सोडत असतील कारण आता ती मूर्ती असली तरी आधी तिच्यात नागाचा जीव होता ना. बघा पटतंय का.

सकाळी उठतात किती वाजता? आणि स्वतःचे, मुलांचे डब्बे, शाळेत सोडणे वगैरे आवरुन बाहेर पडतात कधी? रात्र मोठी असते तेव्हा काय करतात? सहा वाजता कामावर हजर होणे फक्त शिफ्ट वालेच इथे करतात. ओफिसात काम करणा-यांचा बहुतांशी ९ हाच रिपोर्टींग टाईम असतो.
>> बहुंताश ६ वाजता हजर असणार्‍यांवर मुलांची जबाब्दारी नसते. पण ८ वाजता कामावर हजर होणे कॉमन आहे. आपल्यासारखा साग्रसंगीत डबा नसतो. बाहेर खाण कॉमन आहे लंचला किंवा सॅलड वगैरे नेण. किंवा लेफ्टोव्हर्स. मुलांच्या डब्यात सँडविच वगैरे सारखे पदार्थ असतात. बरीच मुलं मिडल स्कुल पासून आपला स्वतःचा डबा भरून घेतात. डे केअर वगैरे ६ ला उघडतात. शाळा ७:४५ ला उघडतात एलेमेंटरीच्या. मिडलस्कुल,हायस्कुल थोड्या वेळाने. डब्याचा लोड जितका मी भारतात पाहिला आहे तितका मी इथं कधीच पाहिला नाही. अ‍ॅडल्ट्स बाब्तीत तर अज्जिब्बातच नाही. बहुंताश लोक आपला डबा स्वतःच भरतात्/वीक एंडला करतात्/मंथली करतात्/वीकली करतात किंवा फ्रोजन तयार ट्रे ऑफिसमध्ये घेवून जातात आणि तिथे गरम करतात.
त. टि. हे माझ्या निरिक्षणानुसार लिहित आहे. बायको नवर्‍याचा डबा बांधती आहे हे जरा कमीच.

बहुधा पिशवीतूनच आणायचे आणि पिशवीतूनच सोडायचे.>>>> सोडायचे लिहिले कारण विसर्जन नाही करायचे. वर एका पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे एका झाडाखाली मुर्ती ठेवून तिची पुजा करून तिथेच सोडून यायचे. असो, सोडायचे वरून गोंधळ झाला असेल तर एखादा समर्पक शब्द सुचवा. मी पुढच्यावेळी तो वापरेन Happy

Pages