Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ताकाचा गंज असतो तसाच पाच पट
ताकाचा गंज असतो तसाच पाच पट मोठा साधारण स्टीलचा गंज असतो व मिळतो हैद्राबाद कडे दुकानातुन. मला हा लग्नात आहेर म्हणून आला होता व मी तो वर लिहिल्या प्रमाणॅच अंघोळीचे पाणी तापवायला कायम वापरला आहे. आच सर्व बाजूने लागते व पाणी लवकर तापते. दहा मिनिटात. व नॅपकिन ने उचलून बकेटीत ओतायला सोपे जाते.
>> +१२३
हेच लिहायला आले होते. गिझर बसवेपर्यंत अश्या मोठ्ठ्या गंजात पाणी तापवूनच अंघोळ केल्याचे स्मरते आहे कायम. तसेही त्याहून जास्त पाणी हवे असेल तर गंजातच एकदम कडकडीत पाणी तापवून घेऊन बादलीत ओतून विसन भरण करून चांगल्या दोन बादल्या पाणी व्हायचं.
टोप शब्द लहानपणापासून माहिती
टोप शब्द लहानपणापासून माहिती होता, आजुबाजुला काही घरात म्हणायचे.
मोठा गंज असतो हे माहिती नव्हतं.
माझ्या सासुबा ईंकडे
माझ्या सासुबा ईंकडे पुण्यामध्ये अंघोळीचे पाणी तापवायचे एक वेगळ्याच शेपचे भांडे होते. तोंडाक डे आवळ व बुडाला मोठे सपाट बूड. ह्यात पाणी तापायचे चांगले पण ते बारके तोंड उचलून बादलीत ओतायला फारच भीति वाटायची. ते साबांनाच जमायचे. त्यामानाने हा गंज सोपा वाटायचा उचलायला. पुढे हीटिन्ग रॉड, मग गीझर आले. मा हेरी तर साक्षात बंबच होता. त्याला पुढे कॉइल बसवून घेण्यात आली हे फार डेंजरस खरेतर पण बाबांना कोण सांगणार. त्यात ती जुनी पुणेरी बाथरूम जिथे तिथे पाणी. संस्कृती म्हणे परेन्त शॉक बसायची शाश्वती होती.
आमच्या हैद्राबादच्या मावशी कर्नाटकातील भालकी गावातुन आलेल्या त्या मुलीला चारत असत. त्यामुळे शब्द प्रयोग माहीत होता.
‘चारणे’, ‘घालवणे’, ‘उभारणे’
‘चारणे’, ‘घालवणे’, ‘उभारणे’ (वाट बघत वगैरे उभा असणे) ई. शब्दप्रयोग ऐकलेले (परिचयाचे) आहेत.
गंज, आंघोळीचे घंघाळ/घंगाळ वापरलेले आहेत.
अंघोळीचे पाणी तापवायचे एक
अंघोळीचे पाणी तापवायचे एक वेगळ्याच शेपचे भांडे होते. तोंडाक डे आवळ व बुडाला मोठे सपाट बूड. --- पाणी तापवायचा गुंड, आमच्याकडे चूलीवर पाणी तापवायला वापरतात.
तुमच्याकडे पाणी तापवण्याचं
तुमच्याकडे पाणी तापवण्याचं काम गुंड करतो.
>> तोंडाक डे आवळ व बुडाला
>> तोंडाक डे आवळ व बुडाला मोठे सपाट बूड. ह्यात पाणी तापायचे चांगले पण ते बारके तोंड उचलून बादलीत ओतायला फारच भीति वाटायची.
होते हे आमच्याकडे बहुतेक. हो, त्या निमुळत्या तोंडामुळे ते बादलीला टेकत असे. मग काय, गरम पाणी ओतताना बादली पुढे सरके आणि पाणी मागे पडे. आपल्या पायावर
Good old days
<<<सरांनी आमच्याकडे नाग आणतात
<<<सरांनी आमच्याकडे नाग आणतात आणि पिशवीतून सोडतात हे लिहिलं होतं
ते हेतुपुरस्सर लिहिलं होतं>>>+1000
तुमच्याकडे पाणी तापवण्याचं
तुमच्याकडे पाणी तापवण्याचं काम गुंड करतो. Wink हो. ( स्माईली )
टोप म्हणजे भांड्याचा प्रकार
टोप म्हणजे भांड्याचा प्रकार हे समजल्यावर मी गडबडलो होतो. टोप म्हणजे केसांचा टोप असेच वाटायचे.
>>>>
टोप हा शब्द सर्वसामान्य नाही हे ऐकून आता मी गडवडलो
आमच्याकडे डाळसुद्धा टोपात बनते तर आंघोळीचे पाणीही टोपातच तापवले जाते. अर्थात दोन्ही टोपांचे मटेरीअल वेगळे असते. पण कुठचे ते विचारू नका. माझे रसायनशास्त्र उघडे पडेल
पाणी तापावायचे तपेले असे..
पाणी तापावायचे तपेले असे..
पाणी तापावायचे तपेले असे..>>
पाणी तापावायचे तपेले असे..>> आमच्याकडे पण चुलीवर पाणी तापवायला वापरत असत..
टोप, भगुले/ भगुणे.. थोडेफार कानावरून गेले आहे आजूबाजूच्यांकडून, घरी पातेलेच.. लहान मोठी, सगळी पातेलीच..
ग्ंज : ताकाचा २) लोखंडाचा / बुद्धीला चढलेला गंज ३). धनधान्य गंज
आहे त्याच्याकडे.. .. म्हणजे गडगंज या अर्थी ..हा ऐकीव अर्थ.
हो
हो
आमच्याकडेही तपेले सुद्धा बोलतात त्या टोपाला.. आणि पातेलेसुद्धा
तपेले पातेले.. ईंटरेस्टींग आहेत दोन्ही शब्द.. उलटसुलट अक्षरे .. एखादा शब्द हिंदीतून आलाय का? बुडणे डूबने तसे..
काही मंडळी चहाचा उल्लेख
काही मंडळी चहाचा उल्लेख स्रिलिंगी करतात ते ऐकुणही थोडाफार धक्का बसायचा.
मुंबई बाहेरच्या मराठी
मुंबई बाहेरच्या मराठी माणसांनी येऊन मुंबईची मराठी भाषा बिघडवली. 'चाय पिली' ह्याच्याऐवजी 'चहा घेतला' म्हणू लागली.
“मुंबई बाहेरच्या मराठी
“मुंबई बाहेरच्या मराठी माणसांनी येऊन मुंबईची मराठी भाषा बिघडवली. 'चाय पिली' ह्याच्याऐवजी 'चहा घेतला' म्हणू लागले.” - काय हे?
मोठी समाराधना वगैरे असेल तर
मोठी समाराधना वगैरे असेल तर स्वयंपाक रांधण्यासाठी मोठी पंचपात्रे वापरीत. त्याला वरच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या वलयाकृती जाड कड्या असत. त्यात मोठे वासे किंवा सागाचे दांडे घालून दोन टोकांना उचलून ते पात्र उचलायचे.
पूजेतल्या पळी पंचपात्री मधल्या पंचपात्रीचा भला मोठा अवतार. तांब्याचाच.
ते सगळं अगडबंब प्रकरण पाहून लहानपणी धक्का बसला होता आणि आपण ह्यात बुडू की काय अशी भीतीही वाटली होती.
“मुंबई बाहेरच्या मराठी
“मुंबई बाहेरच्या मराठी माणसांनी येऊन मुंबईची मराठी भाषा बिघडवली. 'चाय पिली' ह्याच्याऐवजी 'चहा घेतला' म्हणू लागले.” - काय हे?
>>> हेच लिहिणार होते
असा मी असामी तर बरंच कल्चरल शॉक्सवरच आधारलेलं आहे
शंकर्याचं 'सुंदर ते ध्यान' गायन,
डोक्यावर दासबोध घेऊन चालण्याची प्रॅक्टिस,
टेक वन इंच ऑफ जिंजर अॅन्ड किस इट,
महिला मंडळात नानू भावजींचा 'टाक',
आपली सरोज खरे,
त्यात मोठे वासे किंवा सागाचे
त्यात मोठे वासे किंवा सागाचे दांडे घालून दोन टोकांना उचलून ते पात्र उचलायचे>>>>>
आमच्याकडे म्हण आहे, हांड्यात दांडे घालुन जेवण बनवण्यावर.
काम करुन दमलो असे कोणी म्हटले तर त्याला गंमतीने ‘हांड्यात दांडे घालुन जेवना रांधत होतंस काय‘ विचारतात
मुंबई मेट्रो सिटी आहे. ईथली
मुंबई मेट्रो सिटी आहे. ईथली मराठी वेगळी असते तशी ईथली हिंदी सुद्धा बंबैय्या असते. उत्तरेकडचे हिंदीभाषिकांचीही सेम अशीच तक्रार असावी ईथल्या हिंदीबाबत.
चहाबाबत बोलायचे झाल्यास येस, मुंबईत चहाला कटींग असेही म्हटले जाते. त्यामुळे "ती" कटींग होते. आता चहाला कटींग बोलतात यात ईतर शहरांना हसण्यासारखे वाटू शकेल. पण जे आहे ते आहे. याची एक मुंबईकर म्हणून ना लाज आहे ना अभिमान आहे.
पण मुळात मुंबईची तुलना कुठल्याही क्षेत्रात ईतर शहरांसोबत एकच फूटपट्टी लाऊन होऊ नये असे वाटते. मुंबई वेगळीच आहे. ईतर शहरांचे कल्चर आणि बोलीभाषा तिथल्या स्थानिक लोकांमुळे आहे. मुंबईचे तसे नाही. मुंबई अठरापगड जाती धर्म प्रांत प्रदेशातील लोकांनी बनली आहे. आणि आजच नाही तर पुर्वापार अशीच आहे. मुंबईत कोणीही येऊन सामावून जाऊ शकतो ते याचसाठी. फक्त तुम्ही ज्या प्रांतातून आला आहात तिथल्या अहंकाराची चप्पल बाहेर ऊतरवूनच प्रवेश करा. मग मुंबई आपलीच आहे
आयपीएलमध्ये बरेच जणांना बोलताना पाहिलेय की मुंबई ईंडियन्समध्ये कुठे मराठी आहेत. शर्मा आहे मुंबईचा पण तो अमराठी आहे. पण मुंबईकरांसाठी मराठी-अमराठी हा भेद गौण झाला. ते मुंबईकर आहे की नाही हे आधी बघतात. आणि मुंबईकरांना रोहीत शर्मा मुंबईकरच वाटतो. कारण तो तश्याच स्टाईलमध्ये वागतो आणि बंबैय्या भाषेत बोलतो.
मॉरल - मुंबईकरांवर आपली शुद्ध आणि पुस्तकी, मराठी वा हिंदी भाषा न लादणे हेच ऊत्तम
चहाबाबत बोलायचे झाल्यास येस,
चहाबाबत बोलायचे झाल्यास येस, मुंबईत चहाला कटींग असेही म्हटले जाते. त्यामुळे "ती" कटींग होते. आता चहाला कटींग बोलतात यात ईतर शहरांना हसण्यासारखे वाटू शकेल.>> सर गैरसमज नसावा. 'ती चहा' हे प्रथम मुंबैबाहेर ऐकले होते. आपण निबंधच लिहिला..
साधना,
साधना,

ती चहा' हे प्रथम मुंबैबाहेर
ती चहा' हे प्रथम मुंबैबाहेर ऐकले होते.
>>>>
शक्य आहे. किंबहुना तेच तर म्हणतोय मी. मुंबईचे कल्चर हे विविध भाषा आणि संस्कृतींची सरमिसळ होत तयार झाले आहे.
काम करुन दमलो असे कोणी म्हटले
काम करुन दमलो असे कोणी म्हटले तर त्याला गंमतीने ‘हांड्यात दांडे घालुन जेवना रांधत होतंस काय‘ विचारतात >>>>
आमच्याकडे कुठे खड्डे खांदायला/खणायला गेला होतास असे म्हणतात.
ग्ंज : ताकाचा २) लोखंडाचा /
ग्ंज : ताकाचा २) लोखंडाचा / बुद्धीला चढलेला गंज ३). धनधान्य गंज
आहे त्याच्याकडे.. .. म्हणजे गडगंज या अर्थी ..हा ऐकीव अर्थ.
Submitted by निलाक्षी on 19 June, 2022 - 14:02
ताकाचा गंज हा शब्द 6 महिन्यापूर्वी यूट्यूब वर समजला.बाकीचे(2,3) गंज आताही वापरतो.(शब्द).
टोप म्हणजे भांड्याचा प्रकार
टोप म्हणजे भांड्याचा प्रकार हे समजल्यावर मी गडबडलो होतो. टोप म्हणजे केसांचा टोप असेच वाटायचे.
Submitted by वीरु on 19 June, 2022 - 00:20
Pages
« सुरुवात
मीपण सेम.
माणसाला जेवण भरवण्याला चारणे
माणसाला जेवण भरवण्याला चारणे हा शब्द तेव्हा पहिल्यांदाच ऐकला. ..... हा बहुतेक सातारा साईडचा असावा>>>>>
सांगली साईडला पण लहान बाळाला चार हाच शब्द वापरला जातो.
ताकाच्या व इतर भांड्यांसाठी
ताकाच्या व इतर भांड्यांसाठी तकली, डीचकी, पातेलं, भुगूनं इत्यादी शब्द होते. यातला भुगूनं शब्द एकदा एका हिंदी चित्रपटात आला होता ते पाहून मौज वाटली होती. शब्द म्हणजे त्या त्या भागातले कल्चर असते (हूश्श! कल्चर शब्द आला )
Submitted by अतुल. on 18 June, 2022 - 15:28
डिचकी कालवण,ताक,भात यासाठी पाणी तापवायला मोठी डिचकी.भगुने/पातेले पण भात,कालवण साठी.पाणी तापवायला मोठे पातेले(आल्युमीनियम/जर्मन) /(तांब्याचे पण ).बंब पण वापरतात अजुनही.
ज्यांना भाऊ नाही अशा बायका
ज्यांना भाऊ नाही अशा बायका नागाला भाऊ मानून प्रार्थना करतात.
Submitted by पुंबा on 18 June, 2022 - 16:49
सगळे सेम पण आदल्या दिवशी भावाचा उपवास असायचा पूर्ण वर्गाचा आणी गळ्यात पिवळे दोरे सगळ्यांच्या असायचे.आई आणी सगळ्या बायका सारवलेल्या भिंतीवर हळदीने रंगवून नाग नागिण आणी पिल्ले काढायच्या.जे पुढील सारवण होईपर्यंत तसेच असायचे.नेवेद्य पुरणपोळी आणी दिंडपण असायची दुपारी गारुडी यायचा त्याला पुरणपोळी द्यायची.त्याचे विषाचे दात काढलेत असेच सगळे म्हणायचे खरेखोटे माहीत नाही.आई नागमूर्ती आणी भिंतीवरील नाग याचीच फक्त पुजा करायची जिवंत नागाची नाही.सकाळी लवकर शाळेत जाऊन प्राजक्ताची फुले आणून गजरा केलेला असायचा तो घालून साडी नेसून नटून मैत्रिणींबरोबर झोका(मोठा) खेळायला वरच्या गल्लीत जायचे.घरी लहान झोका/झुमकुळा असायचा.रात्री गल्लीतील/भावकीतील बायका आणी माहेरवाशिणी,लहान मुली गाणी आणी फेर धरुन नाच,खेळ असे चालायचे.हुश्श! ......झाले एकदाचे लिहून.
सांगली मिरज कडे लग्नाचा बस्ता
सांगली मिरज कडे लग्नाचा बस्ता बांधायला "कपडे काढणे" असे म्हणतात. "याद्या झाल्या, आता चला कपडे काढायला ! " हे वाक्य ऐकून क शॉ बसला !
Submitted by vijaykulkarni on 18 June, 2022 - 19:45
हो असेच म्हणतात. पण याचा दुसरा अर्थही निघू शकतो हे आताच समजले आणी कल्चरल शॉक बसला.
Pages