मॉडर्न टॉयलेट रेस्टॉरेंट

Submitted by वर्षू. on 8 January, 2013 - 07:48

काय मित्रांनो.. चमकला ना हे शीर्षक वाचून???
मला पण अस्सच वाटलं जेंव्हा एका लोकल मासिकात वाचून ,लेक मागेच लागली या आगळ्यावेगळ्या नावाच्या रेस्टॉरेंट मधे घेऊन जायला..

मागच्या वर्षीच क्वांग चौ मधे उघडलेल्या या रेस्टॉरेंट चं नाव वाचून ' ई>> शी>>>' करून झालं होतं, त्याची पुनरावृत्ती करून पाहिली पण लेक बधली नाही.. त्यामुळे नाईलाजाने आम्ही गेलोच पण रस्ताभर बजावत गेले तिला कि मी तिला दारातच सोडून देईन म्हणून..पण प्रत्यक्षात तिथे पोचल्यावर मी ही आत गेलेच.. आतमधे कायकाय पाहायला मिळेल याबद्दल मलाही उत्सुकता वाटतच होती की!!!

साधारणपणे बाथरूम आणी जेवण याचा परस्पर संबंध लावायचा विचार ही डोक्यात कधीच येत नाही नै?? पण तायवानीज ,' चियांग मू' च्या डोक्यात हा विचार आला आणी त्याने ही अफलातून कल्पना प्रत्यक्षात आणली. तायवान मधे लोकांचा जोरदार पाठिंबा मिळाला त्याच्या या अनोख्या थीमच्या रेस्टॉरेंट ला आणी बघता बघता चीनमधे त्याने १४ शाखा उघडल्या..

या रेस्टोरेंट मधे प्रवेश करताच एका मोठ्या बाथरूम मधे शिरल्याचा भास झाला. प्रत्येक टेबल फुल्ल होतं. एक टेबल मिळवून आम्ही बसलो. बसायला खुर्चीऐवजी टॉयलेट सीट होती. मधल्या काचेच्या टेबलाखाली वॉशबेसिन दिसत होतं. आजूबाजूच्या भिंतींवर बाथरोब,टूथ ब्रश स्टँड, नॅपकिन हँगर्स लटकावलेले होते


..
मागवलेल्या चिप्स , लहानशा बाथ टब मधे आल्या

मी मागवलेलं सूप चक्क पॉटीत.. Uhoh अगदी प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करत खाल्लं..

जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना .. Proud

सिंक मधे स्टीक

लास्ट बट नॉट द लीस्ट..

किसको हिंमत है ये आईसक्रीम खाने की???

(आम्ही खाल्लं.. कारण खूप टेस्टी होतं.. अर्थात सर्विन्ग डिश कडे न पाहता.. )

हा!!! संपला बाबा एकदाचा हा विचित्र अनुभव...

मात्र माणसाच्या रिवर्स्ड सायकॉलॉजीचा भरपूर उपयोग करून या धंद्यात अफाट यश मिळवणार्‍या ,'चियांग मू' चं कौतुक वाटल्यावाचून राहवलं नाही!!!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अशी भानगड आहे होय. मला अगोदर वाटल कि या रेस्टॉरंट मधे मॉडर्न टॉयलेट आहे. आयडीयेची कल्पना छान आहे.

Biggrin

प्रकाश.. गंमत म्हणजे हे एका मॉल मधे स्थित असल्यामुळे रेस्टॉरेंट मधे टॉयलेट नाही..
बरच झालं न्हायतर लोकांची गल्लत व्ह्यायची..

हाय रामा...
खुप भुक लागली असेल आणि दुसरा ऑप्शनच नसेल तरच इकडे जेवता येइल.
नुसतं बघ्यायला ठीक आहे.
आइसक्रीम खायची हिमंत नाय होणार... Sad

फोटु छान Happy

Rofl सह्हीच आहे.

पण ते आईस्क्रीम नसतं ब्वा खाववलं. वर्षुताई, तुझ्या हिंमतीबद्दल तुला दाद द्यायलाच पाहिजे.

मागे डिस्कव्हरीवर पाहिला होता कार्यक्रम 'टॉयलेट थीम' असलेल्या रेस्टॉरंटबद्दल.
बाथटब किंवा बेसिन ठीक आहे पण कमोडमध्ये समोर आलेलं खाणं म्हणजे हिंमत पाहिजे Proud
रेस्टॉरंटच्या आत त्यांनी मुद्दामच टॉयलेट ठेवलं नसणार किंवा ठेवलेच तर ते एखाद्या डायनिंग हॉलसारखी रचना असणारे हवे. म्हणजे कसे ते विचारु नका Wink

Happy

तायडे... I must say u r a brave lady Lol

मू काकांना ही आयडीया टॉयलेट मधेच सूचली असणार बघ ... Rofl

"...जब ओखली मे सर दिया तो मूसल से क्या डरना ...."

~ क्या बात है ! मझा आ गया, वर्षू...! मस्तच.

आपल्या मराठीत 'मेलं कोंबडं आगीला भीत नाही....' ची आठवण झाली. बाकी चायनीज कल्पकतेला दाद द्यावी तितकी कमीच म्हणा. खर्‍या अर्थाने 'मॉडर्न' म्हटले पाहिजे. उद्या तिथे 'मॉडर्न क्रीमेटोरिअम रेस्टॉरंट' निघाले तरी आश्चर्य वाटायला नको....तिथे गेल्यावर मेनू कार्ड घेऊन येणारा वेटर म्हणजे हाडाचे सापळेच असतील....अन् डिशमध्ये मुंडकीच.

बाकी वर्णन आणि सारे फोटो नंबरी आल्येत.

अशोक पाटील

Biggrin

अचरट थीमचं खतरा रेस्टॉरेंट! Happy

एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही. Lol

<<<एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही. >>> +१

कल्पक्तेला दाद....
इथे शेयर केल्याबद्दल धन्यवाद..

ईईइइइइइइइइइइइ!!!

एरवी टीव्हीसमोर बसून खात असताना टीव्हीवर टॉयलेट्क्लीनरची जाहिरात आली तर हातातला घास खावासा वाटत नाही.>>>> +१ मी आणि माझा भाउ ती अमन वर्माची अ‍ॅड लागली की उठून आधी चॅनल
बदलायचो, त्यात वेळेवर रिमोट सापडला नाही तर टीव्हीवरचे कवर खाली सरकवायचो Lol

अयाईईईईईई.. ईथे प्रयत्न करुनही मला खायला जमणार नाही... मला माझी मानसिकता बदलावी लागेल >>> +१

Pages