अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही सिअ‍ॅटल मधे असताना एका त्विन बन्गलो सारख्या घरात शिफ्ट रहायचा विचार करत होतो. (इथे धागाही आहे त्यावर प्रश्न विचा रण्यासाठी काढलेला)
मला घर खूप आवडलेले. गेटेड कम्युनिटी होती. एका अमेरिकन बाईच घर होत, ती वकील होती.
आम्ही सगळ पेपरवर्क सुरु केल ( इन्डिपेन्डट असल्याने तिने जास्त थरो चेकिन्ग केल).
मी जाम खूष हो ते. पण...
पण रात्री १२ ते एक च्या दरम्यान मला दचकून जाग आली. आ पण जाउ नये, असे ती व्र फीलिन्ग होत जाग होताना. धड्धड वगैरे होतीच सोबतीला.
मला घ र इतक आवडलेल की मी तिकडे दुर्लक्ष केल.. पुढच्या स्टेप्स करत राहिले पेपर्वर्क मधल्या. (त्यात काहीच ऑड नव्हत. सगळ रेग्युलर वाटत होत).
तर रोज रात्री मला त्याच वेळेस जाग यायला लागली. जाग आली की फिलीन्ग तेच, शिफ्ट नको व्हायला.
फायनली एके दिवशी ठरवल की एनफ इज एनफ.
नाही सान्गितल्यावर ती बाई वैतागली, जे तिच्यादृष्टीने बरोबर होत.

ना ही ठरवल्यावर १-२ आथवड्याने आमचे एक ओळ kखीचे कपल भेटले. ते ही घर बघत होते. आ म्ही ते घर घेतोय, त्याना मा हित होते.
क्रम शः

नानबा मग पुढे काय झालं. तुम्हाला फक्त जाग यायची ?? की बाकी काही त्रास झाला??? नवीन घर मिळालं का लगेच??

.त्यानी विचारले कुठपर्यन्त आलेय. आम्ही सान्गितले की आम्ही शिफ्ट झालो नाही.
ते पटकन म्हणाले, बर झाल. आ म्हाला ते घर बरोबर वाटल नाही. विचित्र फील आला त्या घरात, तुम्हाला इतक आवडलय तर सान्गायच कस! म्हणून बो लल नाही.
आम्ही शॉक्ड. नन्तरही कित्येक महिने ते घर तसेच होते, त्या कम्युनिटीतली अनेक घरे जाहिरातीत आली आणि गेली.

सांगते? बापरे! नानबा या नावावरून मला वाटले तुम्हाला पिळदार मिशा असतील. आमच्याकडे एक नानबा आहे, त्याला आहेत. Lol
(गमतीने घ्या बर्का)

शाली - लोल. माझ्या नॉर्मल नावावरूनही लोकाना मी मुलगाच वाटते भेटेपर्यन्त! सो मला सवय आहे ह्या प्रकाराची :ड
माझे आजोबा मला नानबा म्हणायचे... Happy

सांगते? बापरे! नानबा या नावावरून मला वाटले तुम्हाला पिळदार मिशा असतील. आमच्याकडे एक नानबा आहे, त्याला आहेत.>>> अर्र्र Lol
किस्से भारी चाललेत

ओ नानबा अर्धवट राहिलेली कथा पूर्ण करा तुमची. मी थांबलोय त्यासाठी, तुम्ही टाकल्यावर लगेच मी माझी कथा टाकणार आहे.

नमस्कार,
मी अनामिका,
मला तसा लेखनाचा अनुभव नाही, पण मी मायबोलीची नियमित वाचक आहे .
मला आलेले काही अमानवीय अनुभव मला सांगायचे आहेत.
ही घटना मी काॅलेज मध्ये असताना घडली, घर लांब आणि पूर्ण वेळ काॅलेज असल्याने मी हाॅसटेल मध्ये रहात होते, माझी खोली तिसऱ्या मजल्यावर होती. आमची खोली बरीच मोठी होती. व आम्ही चार मुली ती शेयर करायचो. माझ्या रुम मेटस आणी माझे काॅलेज वेगवेगळे होते, तेंव्हा आमच्या कडे मोबाईल नव्हते . एक दिवस तया तीघीही अचानक घरी गेल्या. मी हाॅसटेल ला संध्याकाळी पोहोचले तेव्हा मला वाॅचमनने सांगितले.
माझ्या मजल्यावर बहुतेक खोल्या बंद होत. रात्री झोपताना मी दारे खिडक्या नीट बंद केले व झोपले. मध्ये च रात्री मला जाग आली. मला तोंडावरून पांघरुण घेऊन झोपायची सवय आहे. पांघरुण पायाकडून ओढले गेलयाने मला जाग आली, पण मी डोळे न उघडता परत वर ओढून घेतले, परत तोच प्रकार घडला, अन् पांघरुण परत खेचले जावू लागले, मी आता टक्क जागी होते पण घाबरुन डोळे न उघडताच परत एकदा पांघरुण जोरात वर खेचले . एवढया त बाहेर दोन तीन कुत्रे तार स्वरात रडायला लागले. मला दरदरून घाम फुटला, पण मी शेवट पर्यंत डोळे उघडले नाही , जर काय दिसले असते तर ... सकाळ पर्यंत राम नाम घेत होते. कधी एकदा सकाळ होते असे झाले होते. सकाळी पक्षांचे किलबिलाट ऐकले तेव्हा डोळे उघडले. माझ्या रुम मेटस दुपारी आल्या . त्यावेळापासुन मला परत तिथे कधी एकटे रहायला लागले नाही. अजून दोन वर्षे तिथे च राहिले. पण परत असा प्रकार घडला नाही.

अनामिका कोणी मस्करी तर करत नव्हतं??? बाकी ते कुत्रे ओरडण्याचा अनुभव आहे मला ही...माझ्या वडिलांचा अपघात झाला याचा फोन आम्हाला 2 ला आला रात्री. मी डोंबिवली ला राहत असे. तेव्हा कोणाच्या गाड्या वगैरे ही नव्हत्या. ट्रेन्स बंद. सकाळी काहीतरी साडेतीन 4 ची पहिली ट्रेन.
आम्ही न्यूज ऐकून अटर मोस्ट टेन्शन मध्ये. झोप तर लागत नव्हती. भाऊ लहान होता 7 वि की 8 वित. तो झोपलेला. मी आणि मम्मी ने ती रात्र कशी काढली ते देव जाणे. आणि तो फोन आल्यापासून जे कुत्रे रडायला चालू झालेले की बस्स....... आजही कुत्रा असा रडायला लागला किंवा अम्ब्युलन्स चा आवाज आला की मला धडकी भरते...

प्रतिसादाबद्ल धन्यवाद अनिष्का,
मी खोलीत एकटीच होते, व आत मधून मी कडी लावली होती. दुसऱ्या दिवशी मी होस्टेलला चवकशी केली होती, तेव्हा मला समजले की तिन्ही मजले रिकामे होते. तळतळमजल्यावर एका च खोलीत एक मुलगी होती तया रात्री. आधी माहित असतं तर तिला तरी सोबत बोलावलं असत.

भयंकर अनुभव अनामिका....पूर्ण बिल्डिंग रिकामी असताना मला असा अनुभव आला असता तर मला हार्ट अटॅक च आला असता Sad

हो उमानु तो भयंकर अनुभव होता. तिथे पुन्हा काही घडले नाही, पण ही नुसतीच सुरूवात होती का? माझ्या बरोबर अजून खूप घटना घडल्या.

आमचा सहा जणांचा ग्रुप होता, आणि आम्ही एक एसाइनमेंट करायला आमचे काॅलेजचे एक सर होते त्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडे संगणक होता, सहा जणांच काम होईपर्यंत रात्रीचे साडे आठ वाजले. सगळे आप आपल्या बाइक ने निघाले, मी एकाला मला हाॅसटेलला सोडायला सांगितले, आम्ही शेवटी निघालो. सरांच्या काॅलनीमधुन निघून माझ्या होस्टेलवर जातांना वाटेत दाट झाडी आहे, मागे बसलेल्या मुळे माझे आजूबाजूला लक्ष होते. रात्रीचे नऊ वाजले असतील, उजव्या बाजूला झाडांच्या गर्दीत एका झाडावर माझे लक्ष गेले, झाडाची एक मोठी फांदी निखारयासारखी लालबुंद होती. मला वाटलं विजेची तार लागली असेल झाडाला, आणी फांदी पेटत असेल. दुसर्‍या दिवशी भर दुपारी तिथे एक चक्कर मारली, निदान काळे कोळसे तरी दिसतील या आशेने. पण ते झाड जशास तसे होते, जळालेल्या काहीही खुणा नव्व्हत्या .

मी एका पि म्पळाच्या पारावर एकाची वाट पहात बसलेले. साधारणतः दुपारी १२ ची वेळ. वेळ होता म्हणून मोबाईल मधे फो टोज काढले झाडाचे. नन्तर पाहिले तर मधे मधे तुम्ही म्हणताय तसे निखार्‍यासारखे - लाल, काही निळ्या रन्गाचे पण प्र काशमान असे आकार आलेत.
प्रकाश सावलीमुळे ऑप्टिकल इल्युजन अ सू शकेल? का... अजून काही?

गेल्या मे महिन्यातली गोष्ट. आधी मी नोकरीच्या निमित्ताने अंबरनाथला माझ्या चुलत बहिणीकडे राहात होते. जवळजवळ वर्षभर तिथे राहीले होते. पुन्हा घरी शिफ्ट झाले म्हणून काही राहीलेलं सामान आणायला पुन्हा अंबरनाथला गेले होते. एक रात्र मुक्काम होता. पुन्हा सकाळी घरी यायला निघणार होते. रात्री जेवणाच्या आधी सगळं सामान वगैरे भरुन बॅग तयार होती. जेवणं आटपली आणि थोड्या गप्पांनंतर झोपायला गेले. त्यांची एक छोटी खोली आहे ज्यात एका कोपर्यात देवघर आहे. मी आधीही तिथेच झोपत असे. त्या रात्री साडे अकराच्या आसपास आम्ही झोपलो. दिवसभर प्रवासाने दमल्याने मला झोप लगेच लागली. पण रात्री कधीतरी अचानक जाग आली आणि कुणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबत असल्यासारखं वाटलं. डोळे उघडता येत नव्हते. तोंडातून आवाज निघत नव्हता. मी झोपेत नव्हते हे मला जाणवत होतं. पण पूर्णपणे जमीनीला खिळल्यासारखी अवस्था झाली होती. मनातल्या मनात मारुती स्तोत्र म्हणायचा प्रयत्न केला. पण दोन-तीन श्लोकांनंतर काही आठवेच ना. फॅन चालू होता तरीही घामाने पुर्ण भिजले होते मी. ही अवस्था जवळजवळ दहा-पंधरा मिनिटे चालली. नंतर कसेबसे डोळे उघडले. आणि आसपास काहीतरी विचित्र असल्याचं सतत जाणवत होतं. तरीही हाक मारुन ताईला उठवायचं काही ध्यानात येईना. मोबाईल बघितला तर तीन वाजून गेले होते. उजाडायला बराच वेळ होता. गप्प पडून राहीले. नंतर डोळे उघडे ठेवायची भिती वाटू लागली. सतत काहीतरी भितीदायक दिसेल असंच वाटायला लागलं. म्हणून डोळे बंद केले. झोप तर लागली नाहीच पण सकाळ होईपर्यंत सतत बांगड्या किणकिणल्याचा आवाज येत राहीला. घरात कुणीच काचेच्या बांगड्या घालत नाही. तरीही. एकदाचे पाच वाजले आणि ताई ऊठून मला जागं करायला आली. निघायचं होतं मला. पण तिला किंवा घरात इतर कुणाला सांगता आलं नाही की रात्री काय झालं. तशीच चुपचाप ऊठून घरी आले.
वर्षभर मी त्याच घरात त्याच खोलीत राहीले होते पण कधीही असा काही अनुभव आला नव्हता.
माझा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता आणि नाहीये.पण हा प्रकार उभ्या जन्मात विसरता येणं शक्य नाही.

असे असू शकते नानबा, प्रकाश सावली मुळे असेल किंवा अमानवीय पण , महत्वाचे नसतील तर डिलीट करून टाका. फक्त रात्रीच नाही तर अशा विचित्र वाटणारया घटना कधी पण घडू शकतात.

चिन्मयी, खतरनाक. तुझे जाणे आवडलेले नसेल बहुतेक. आणि देवघर खोलीत असताना? परत कधी तिथे रहायचा प्रसंग आला काय ?

>> कान्होबाच्या मंदिरासमोर एक व्यक्ती घोड्यावर बसलेली होती. संपुर्ण पांढरा शुभ्र पोषाख. घोडाही पांढरा.

कोल्हापूर जवळच्या ज्योतिबा बाबत सुद्धा असेच वर्णन सांगितले जाते. कोणत्या एका ठराविक पौर्णिमेला रात्री देव घोड्यावरून रिंगण घालत असतो. काहींनी पाहिले सुद्धा आहे म्हणे. सकाळी मंदिराभोवती एका मोठ्या परीघावर घोड्याच्या टापा आणि तोंडाचा फेस आढळून येतो वगैरे.

>> आपोआप होऊ शकते लाईट चालू.... पण ती फार घाबरलेली. आणि मी पण. हे बाबा गेल्यानंतर 20 एक दिवसात च झालं आणि या आधी असं केव्हा झालं नव्हतं. म्हणून घाबरायला झालेलं तेव्हा...

गूढच आहे. पण...

>> आता आठवून हसायला येतं

का? तुम्हाला कळले का आपोआप का चलू होत होती लाईट?

नानबा, पिंपळाची कोवळी पाने लाल रंगाची असतात त्यावर उन्हाचे कवडसे आणि चमकल्यामुळे वेगवेगळे आकार दिसतील फोटोत. पिंपळपाने त्यांच्या आकार आणि हलकेपणामुळे खूप सळसळतात त्यामुळेही फोटोत ऑप्टिकल illusions दिसू शकतात.

मला कामाच्या निमित्ताने पुन्हा शहरात रहावं लागलं, आमच्याच एका नातेवाईकांचा एक बंगला आहे तिथे मी शिफ्ट झाले. बंगला जुनाच होता, पण नातेवाईकांनी स्वस्तात मिळाला म्हणून घेतलेला. डागडुजी वगैरे केली असल्याने छान वाटला . जागा नवीनच असल्याने आईबाबा पण सोबतीला आले. आम्ही खालच्या मजल्यावर राहत होतो. आईबाबा बाजूच्या खोलीत आणि मी एका बाजूच्या . आधी थोडे दिवस बरे गेले, मी नेहमी प्रमाणे लाइट चालू ठेउन झोपत असे. नंतर थोड्याच दिवसांनी मला रात्री कसल्या कसल्या वासाने जाग यायला लागली. आधी वाटले स्वप्न पडून जाग आली असेल, पण सपनातला वास जागेपणी चांगला वीस -पंचवीस मिनिटे टिकून असायचा. अगदी रोज नाही तर अधूनमधून. कधी भाकरीचा, कधी अत्तर, कधी सिगरेट तर कधी अतिशय दुर्गंधी. शेजारी पाजारींचे बंगले बरीच जागा सोडून आहेत, आणि प्रत्येक बंगल्याला कंपाऊंड आहे. आणि रात्री दोन वाजता कोण असले उद्योग करील? आणि समजा केलेच तर ते वास माझ्या बंद खोलीत येणे महा कठीण. मी हया सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून झोपत असे. मला रात्री काही तरी वाचत झोपायला आवडते. मग ते पुस्तक बेडवर ठेवून झोपते. त्या रात्री मी एक दिवाळी अंक वाचत होते, श्री स्वामी समर्थांचे मुखपृष्ठ होते, नेहमी प्रमाणे लाईट चालू होता, दोन अडीचच्या दरम्यान मला जाग आली. डोळ्ळ्चया कोपर्‍यातून बघितले तर माझ्या बेडच्या उजव्या बाजूला कोपर्‍यात एक बाई उभी होती. आणि ती अगदी वाकून वाकून श्री स्वामी समर्थांचया फोटो कडे बघत होती. लाईट चालू असल्याने मला ती दिसली. सावळी, बरयापैकी उंच, लाल लुगडं नेसलेली, कासोटा घालून, पदर डोक्यावर व मोठे पैशाएवढे लाल कुंकू कपाळावर. माझा भितीने जीव जायची पाळी आली, घशाला कोरड पडली. आवाज फुटेना. मी घामाच्या धारांनी चिंब. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ जप सुरु केला. तरी तीचे उभी असलेल्या कोपर्‍यातून वाकून श्री स्वामी समर्थांना निरखणे चालूच होते, मला वाटतं त्यांच्या भितीनेच ती माझ्या जवळ आली नसणार. थोड्या वेळाने ती हवेत विरून गेली. सकाळ होईपर्यंत मी घाबरुन नामस्मरण करत होते. व अजिबात झोपले नाही, ती परत आली असती तर?

दोन वर्षांपूर्वी माझा लांबचा भाऊ रिटायर झाल्यानंतर कोकणात त्यांच्या गावी नवीन घर बांधून राहायला गेला. जमिनीच्या वाटण्या झाल्या तेव्हा स्मशानाजवळचा एक तुकडा, जो दुसरे कोणी घ्यायला तयार नव्हते, तो यांने घेतला आणि रस्त्याला लागून आहे म्हणून हट्टाने तिथेच घर बांधले. पुरोगामी विचारसरणीचा असल्याने वास्तुशांत, सत्यनारायणाची पूजा असं काहीच केलं नाही. वैनी जरी याच्या नास्तिकतेला सरावली असली तरी तिला हे सगळे अजिबात पसंत नव्हते. पण माझ्या भावाने आपलेच म्हणणे रेटून नेले.
आता महिन्या-दोन महिन्यांपूर्वी त्यांना एक विचित्र अनुभव येऊन गेला. माझ्या भावाला एबीपी न्यूज वरचा एक कार्यक्रम बघत रात्री जेवायची सवय होती. अचानक काही दिवसांपूर्वी नेमकं त्यावेळी चॅनेल बंद पडायचा. बाकी चॅनेल चालू पण फक्त हा चॅनेल बंद असं व्हायला लागलं. भाऊ चरफडायचा पण काय करणार शेवटी म्हणून गप्प बसायचा. अचानक वैनीच्या लक्षात आलं एक पूर्ण काळं मांजर रात्री जेवायच्या वेळी दरवाज्याबाहेर बसून एकटक आत बघत राहायचं. त्याच्या दोन्ही डोळ्यांचे रंग वेगवेगळे होते. तिला ते मांजर फार अभद्र वाटलं पण माझ्या भावाचा विश्वास नसल्याने तो उलट ताटातल्या माशाचा काटा त्या मांजराला देऊ करी. तर वैनीच्या लक्षात आलं की या घटना मांजर यायला लागल्या पासून सुरू झाल्यात. शेवटी एके दिवशी तिने अनिरुद्ध स्तोत्र म्हणत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर विकत घेतलेली चप्पल त्या मांजराला फेकून मारली. काय आश्चर्य, तेंव्हापासून चॅनेल कधीच बंद पडला नाही. योगायोगाने भावाला आवडणारा प्रोग्राम पण लागायचा बंद झाला होता.

कालच वैनी माझ्या आईला हा किस्सा रंगवून सांगत होती तेव्हा मी ऐकला आणि आज पटकन येऊन इथे लिहून टाकला.

भारीच किस्से आहेत सगळ्यांचे. अनामिका ती बाई किती वेळ उभी तशी. नन्तर पुढे पण दिसली काय? तुझा बहुतेक मनुष्य गण असावा.

अनामिका , बापरे. वाचूनच तंतरली.
मला एक जूना आयडी 'स्वप्न सुंदरी' ची आठवण झाली.
तिचे पण किस्से असे भारी असायचे.

Pages