अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> बोकलत, धागा 'मनोरंजन'मधे आहे. छान विरंगुळा चाललाय येथे. चालूद्या की. उगाच भांडण नको बुवा. गुढकथा वाचतो, मित्रांच्या कंपुत अशा >> गप्पा ऐकतो तेव्हा चविने ऐकतोच ना? तसेच वाचा किंवा लिहा. हवे तर छान विनोदी प्रतिसाद द्या. धाग्याची गम्मत वाढवा
जरुर वाचा. वाचयला एखादा भय चित्रपट पाहल्यासारखी मजा येते. फ़क्त ही भुत डोक्यात जावु देवु नका. काही प्रतिक्रिया वाचुन हीच चिंता वाटते. काही लोक ह्या कथा फ़ारच seriously घेतांना दिसतात. ह्या कथेंमधली पात्र खोटी नसावीत. बहुतेकदा ही मनोरुग्न असतात. भूत ही नेहमी मनानी कमजोर मनसांना भेटतात कारण ती बहुतेक त्यांच्या मनातच राहतात. अश्या कथा खर्‍या मानुन त्यांना हव्या त्या वैद्यकीय मदतीपासुन वंचीत रहायला लागु नये. तेव्हा मधे काही विनोअद आलेतर चालु द्या.

<<< काही लोक ह्या कथा फ़ारच seriously घेतांना दिसतात.. भूत ही नेहमी मनानी कमजोर मनसांना भेटतात >>>

अहो आपण कोणत्या दशकात राहता? नाही म्हणजे हि सगळी फिलोसोफी जनतेला माहित होऊन बरीच दशके झाली म्हणून विचारलं. इथे कोणीही या कथान सिरीयसली घेत नाही. रोजचे ऑफिसचे आणि आयुष्यातील ताणताणाव पुढे असल्या गोष्टी सिरीयसली घ्यायला वेळ आहे का कुणाला आजकाल? आजकाल उलट असे किस्से ऐकायला मिळत नाहीत आणि लहानपणीची ती मजा राहिली नाही. ते थ्रील पुन्हा अनुभवायला येतो इथे निदान मी तरी. पण इथे सुद्धा जोक चालू झाले तर काय मजा. ज्यांना पटत नाही आणि मनोरुग्ण होण्याची भीती वाटते अशांना धाग्यापासून दूर राहण्याची मुभा आहे. नको तो मस्करीचा सूर लावून इतरांची मजा का घालवता?

कॉनजुरिंग सारखे चित्रपट निघतात आणि गाजतात कारण त्यात विषयाचे गांभिर्य जपलेले असते. याचा अर्थ चित्रपट काढणारे त्यावर विश्वास ठेवतात किंवा मनाने कमजोर येडे असतात असे तुम्हाला वाटते का? भितीरस चा जरा अभ्यास करा. फालतू थिल्लर जोक मारले असते तर कोणी कुत्रे सुद्धा व्विचारले नसते त्या चित्रपटाला.

>> कॉनजुरिंग सारखे चित्रपट निघतात आणि गाजतात कारण त्यात विषयाचे गांभिर्य जपलेले असते
हा गंभीर विषय आहे? काहीही न वाचता काय लिहीतात ही लोक? कुत्र काय, भितीरस काय ...

अनिष्का यांच्याशी सहमत....

ज्यांनी आत्तापर्यंत (मी सुद्धा) येथे स्वतःचे किंवा दुसर्‍यांचे अनुभव लिहीले ते काहीतरी गांभिर्य ठेवून लिहीले. मी येथे सिरीयसली वाचायला येतो. उगाच कोणाची चेष्टा करायला नाही. भले यातले काही अमानविय अनुभव मला पटलेले नाहीत तरी मी कोणाची आणि भुतांची चेष्टा केलेली नाही.

मी इथे फक्त लिहितो, कर्ण पिशाचासारखा तुमच्या कानात येऊन सांगत नाही. त्यामुळे ज्यांना नसतील वाचायचे त्याने वाचू नयेत. पण माझे थरारक आणि सत्य घटनांवर आधारित किस्से येत राहणार.

बरोबर आहे तुमच बोकलत तुम्हि फक्त लिहिता

आपण जसे बकिचे अनुभव सिरिअसलि वाचतो तसे बोकलत यान्चे अनुभव (थरारक आणि सत्य घटनांवर आधारित किस्से) सिरिअसलि इग्नोर करा आणि कहिहि प्रतिसाद देउ नका प्रोब्लेम सोल्व.

मि तर त्यान्चे सगळे अनुभव फक्त पहिल्या ३ओळि वाचुन सोडुन दिलेले आहेत सोप्प आहे करुन बघा ऊगाच सुन्दर धाग्याची मज्जा नको जायला

बोकलत, धागा 'मनोरंजन'मधे आहे. छान विरंगुळा चाललाय येथे. चालूद्या की. उगाच भांडण नको बुवा. गुढकथा वाचतो, मित्रांच्या कंपुत अशा गप्पा ऐकतो तेव्हा चविने ऐकतोच ना? तसेच वाचा किंवा लिहा. हवे तर छान विनोदी प्रतिसाद द्या. धाग्याची गम्मत वाढवा. >+९९९९९९९

मी मायबोलीवर खूप कमी येते पण अमानवीय धाग्यावरच्या पोष्टी दिसल्या कि वाचतेच. बोकलत यांच्या पोस्ट्स वाचुन मला हि वाटले कि चांगल्या धाग्याची वाट लावली. अनिश्का, सोडून दे ग .

अरे अरे...एकच शांत, भांडणं नसणारा धागा. होता त्याची पण वाट लावु नका यार..
मागेच कोणीतरी म्हणाले पण होते की हा धागा वाचायला बरं वाटतं...बाहेरच्या गदारोळापासुन शांत आहे....वगैरे..
मला ईथले अनुभव वाचायला आवडतं . ईतके प्रतिसाद पाहुन वाटलं की काही तरी मस्त वाचायला मिळेल..पण असो..

मागेच कोणीतरी म्हणाले पण होते की हा धागा वाचायला बरं वाटतं...बाहेरच्या गदारोळापासुन शांत आहे....वगैरे..>> त्यामुळेच भूतबाधा झाली या धाग्याला Happy

हो न... जाऊदे आपण सर्वांनी आपापले अनुभव टाकूया सो कॉल्ड काका मामांचे आणि वाचून ते एन्जॉय पण करूया. जे इग्नोर करायचंय ते इग्नोर करूया.

2005 मध्ये माझे बाबा वारले. अपघात किंवा घातपात ( युनियन लीडर असल्याने ही शक्यता जास्त )
ते गेल्यानंतर एके रात्री साडे अकरा पावणे बारा च्या दरम्यान किचन ची लाईट चालू झाली. मॉम गाढ झोपेत होती... माझा मोबाईल वर टिपी चालू होता. मला वाटलं भाऊ बाथरूम ला गेला असेल. बराच वेळ झाला तरी हा बाहेर येईना म्हणून मी बेड खाली उतरले तर भाऊ पायाखाली च झोपलेला.
मग लाईट कोणी लावली...... मी मम्मी ला उठवून जास्तीत जास्त नॉर्मल होत विचारलं," तू लाईट चालू केली का??"
मला माहित होतं तिने नव्हतीच केली. मग मी सर्व लाईट ऑफ केल्या आणि झोपलो. परत एक तासाने किचन ची लाईट चालू झाली .... आता मात्र मी आणि मॉम खूपती खुप घाबरलो.
मी तिला सांगायचा प्रयत्न केला की अग आपोआप होऊ शकते लाईट चालू.... पण ती फार घाबरलेली. आणि मी पण.
हे बाबा गेल्यानंतर 20 एक दिवसात च झालं आणि या आधी असं केव्हा झालं नव्हतं. म्हणून घाबरायला झालेलं तेव्हा...आता आठवून हसायला येतं

Ghosts:

They get stronger when people get disturbed. They worship evil, they create riots, make people fight, they destroy anything that humans find enjoyable. Sometimes they show as if they are fun, but their motive is to destroy your soul.
Feed them and they grow stronger.. Ignore them and they perish out of their own frustration.

Use these guidelines and stay away when you see one, or else they will make u one.
Happy

सूचना: ही कथा बोकलत याने लिहिले, त्यामुळे ज्यांना वाचायची नाही त्यांनी इथेच थांबावे. कथा वाचून उलट सुलट प्रश्न विचारून आणि भांडण तंटे करून धागा मलीन करू नये ही विनंती.
ही कमी थरारक पण सत्यघटना मी लहान असताना माझ्यासोबत घडलेली आहे.घाई गडबडीत लिहिले जरा सांभाळून घ्या.
तर मी त्यावेळी लहान होतो म्हणजे बघा २-३ मध्ये असेन. आमच्या बाजूला पप्या राहायचा तो माझ्याच वयाचा होता. एके दिवशी मी त्याच्याकडे बुद्धिबळ खेळायला गेलो होतो. पप्या सगळ्या विषयात ढ होता. सगळ्या विषयात नापास व्हायचा फक्त हिंदी पिक्चर बघून हिंदीच्या विषयात कसाबसा काठावर पास व्हायचा.पप्याकडे बुद्धी न्हवती पण बळाचा वापर करून तो बुद्धिबळ बऱ्यापैकी खेळायचा. तर त्या दिवशी त्याची आजी चहासोबत म्हस्का खारी खात होती. आमचा डाव अर्ध्यावर आला तोच पप्याच्या आजीने किंचाळी मारली. पप्याच्या आजीला हृदयविकाराच्या झटक्याने मरण आलं. या घटनेनंतर साधारण दहा पंधरा दिवस उलटून गेले. एक दिवस मी शाळेतून घरी आलो तेव्हा देवळासमोर एकच गर्दी जमली होती. गावातला तात्या पप्याच्या वाड्याजवळून जात होता तेव्हा त्याला पप्याची म्हातारी दिसली होती. तात्या खूप घाबरला होता. या घटनेनंतर गावात एकच गोंधळ सुरु झाला. रोज कोणाला ना पप्याची आजी दिसायची. पप्याचा वाडा गावातला एक सुनसान कोपरा बनून गेला. आता गावाला या संकटातून बाहेर काढायची जबाबदारी माझी होती किंबहुना ते माझं कर्तव्यच होतं. एके दिवशी दुपारी सगळे झोपलेले असताना मी डब्बा घेऊन घराबाहेर पडलो. माझी पावलं थेट पप्याच्या वाड्याकडे वळली. पप्याच्या वाड्यात पाऊल टाकला तसं पप्याची आजी माझ्यापुढ्यात हजर. तिच्या डोळ्यातील अपेक्षा आणि केविलवाणा भाव पाहून मला कसतरीच झालं. मी घरून आणलेला डब्बा तिच्यासमोर उघडला, त्यामध्ये दोन म्हस्का खारी होत्या. त्या पाहून आजीचे डोळे पाणावले. मला जवळ बोलावलं आणि माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवत बोलली हीच एक शेवटची इच्छा राहिली होती ती आज तू पूर्ण केलीस. मला पण गहिवरून आलं, मी पाया पडायला वाकणार तोच माझे खांदे पकडून बोलली अरे आम्ही भूतं आहोत आमचे पाय उलटे असतात. थांब मी पाठमोरी होते मग तू पाया पड.ती वळल्यावर मी पाया पडलो वर पुन्हा उठतोय तर आजी न्हवती. त्यानंतर ती कोणालाच नाही दिसली.

बोकलत, म्हस्का खारी नाय ओ. मस्का खारी. आजीने दोन खार्‍या पण नेल्या का सोबत ? का सुक्याच खाल्ल्या? चहा पण नेला होता का?

मी पाया पडायला वाकणार तोच माझे खांदे पकडून बोलली अरे आम्ही भूतं आहोत आमचे पाय उलटे असतात. थांब मी पाठमोरी होते मग तू पाया पड>>>> Rofl Rofl Rofl

इतक्या पोस्ट्स पाहिल्यावर वाटले चला भरपूर थरारक अनुभव वाचायला मिळणार तर घमासान मिळाले

>> @अनिश्का... भारीच अनुभव...लिहित रहा किस्से

>>> @बोकलत... छान लिहिता तुम्ही पण धागा चुकलासी ...विनोदाच्या धाग्यावर चांगले प्रतिसाद येतील तुम्हाला..

ek shanka.hoti...sukya maska khari khawun jar bhootala gas zale astil tar te paya padtana pay sulat disayla ulat /Pathmore rahne jara riski prakaran hoyil na !!

Amanviy. apanvayu *

pay sulat disayla ulat /Pathmore rahne jara riski prakaran hoyil na !!

Amanviy. apanvayu *

Submitted by कल्पेशकुमार on 3 August, 2018 - 21:48

सही पकडे है।
Happy

इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला होतो. हे आवर्जुन सांगायचा हेतु हाच की मी जे पाहिले ते ठळकपणे आठवतय आणि त्याची तेंव्हा आणि कधी कधी अजुनही कारणमिमांसा करायचा प्रयत्न करतो. सुट्टीला गावी आलो होतो. मित्र बरेच दिवसांनी भेटले होते त्यामुळे रात्री एक-दिड वाजेपर्यंत गप्पा चालायच्या. घरच्यांना त्रास नको म्हणून व दिवसही उन्हाळ्याचे होते म्हणून सगळे मित्र राममंदिराच्या ओट्यावर झोपायचो. राममंदिराच्या शेजारीच कान्होबाचे मंदिर होते. हा काही देव नव्हता. गावातील विशिष्ट भागाचे रक्षण करणारी एक शक्ती होती. गावातील ठरावीक कुटूंबातील लोकच या मंदिराची देखभाल व दिवाबत्ती करत. गावाशेजारी असलेल्या डोंगरावर याचे मुळ ठाणे होते. गावात अशी वदंता होती की कान्होबा अधून मधून गावात रात्री चक्कर मारतो. मी लहानचा मोठा याच गावात झालो होतो पण कान्होबाला कोणी पाहिल्याचे ऐकले नव्हते. त्यादिवशीही गप्पा मारता मारता आम्ही झोपलो. मला का कोणास ठाऊक झोप येत नव्हती. रात्रीचे अडीच वाजले असावेत. मला काहीतरी जाणवले. मी पडल्या पडल्याच डोळे ऊघडून रस्त्याकडे पाहीले. त्यावेळी स्ट्रिट लाईट म्हणजे आयबिम सारखा लोखंडी खांब असे आणि त्यावर १०० वॅटचा बल्ब असे फक्त. ओटा साधारण साडेचार फुट उंच होता. मी पाहिले कान्होबाच्या मंदिरासमोर एक व्यक्ती घोड्यावर बसलेली होती. संपुर्ण पांढरा शुभ्र पोषाख. घोडाही पांढरा. ती व्यक्ती आणि घोडाही दागीन्यांनी शृंगारलेला होता. शिंदेशाही पगडीसारखी पगडी होती पण वेगळीच. भरदार मिशा. हे मला अगदी स्पष्ट दिसत होते. ती व्यक्ती कान्होबासमोर थोडावेळ थांबली मग सावकाश गावाच्या वेशीच्या दिशेने गेली. हे सर्व क्षणात घडले होते पण मला भिती अजिबात वाटली नव्हती. (मी काही फारसा धाडशी नाही तरीही) मी उशीखालील घड्याळ काढून पाहीले तर सव्वा चार वाजले होते. मला नक्की आठवतेय की त्या व्यक्तीला मी अडीचच्या सुमारास पाहिले होते. सकाळी मी कुणालाही काही न सांगता घरी जावून वडीलांना सर्व सांगितले. त्यांनी गावातील त्या कुटूंबाला सांगितले असावे. दुसऱ्या दिवशी त्या कुटूंबातली वृध्द व्यक्ती घरी आली. तिने मी जे पाहिले त्याचे बारीक वर्णन केले. मी फक्त हो हो करत होतो. मग त्याने माझी पाद्यपुजा केली, माझा उजव्या पायाचा अंगठा दोन्ही डोळ्यांना लावून घेतला आणि गेला. हा प्रसंग झाल्यानंतर मला साधारण पंधरा दिवस फार शांत, समाधानी असल्यासारखे वाटत होते. तशी शांती मी आजवर अनुभवली नाही. मी या प्रसंगाचा कार्यकारण भाव शोधायचा प्रयत्न केला पण मला काहीही उत्तर मिळाले नाही अजुन. ना तशी शांती, ना तसे समाधान मी आजवर अनुभवले.

आता हा किस्सा अमानवीय सदरात मोडतो कि नाही, माहित नाही- मी सातवीत असेन, अचानक रात्र्री बरोबर बारा वाजता अलार्म वाजायला लागला. घरी मी, आई आणि छोटा भाऊच होतो. आम्ही तिघेही जाम टरकलो आणि आवाज कुठून येतोय याचा शोध घेऊ लागलो. तर आवाज येत होता कपाटाच्या ड्रॉवर मधून..ते छोटे, न वापरातले घड्याळ होते. त्याचा सेल बन्द पडून बरेच महिने झाले होते अन कोणि बाराचा अलार्म सेट ही केला नव्हता. दुसर्या दिवशी ते फेकून दिले, सो ते झपाट्लेले होते कि नाही माहित नाही..

शाली गावचा राखणदार असेच असतात वाटतं सर्व गावात.माझ्या पण गावी सेम ..... सफेद कपडे सफेद घोडा. !

अथेना अश्या वेळी जाम टरकते ना.......

माझ्या गावी , आमची घरं जिथे आहेत तिथे ना मागे डोंगर आहेत. आम्ही मुलं मुलं आधी सुट्टीत गावी जायचो तेव्हा दुपारच्या भर उन्हात करवंद वगैरे काढायला डोंगरावर जायचो.
एकदा मी , माझी एक कझिन आणि माझा भाऊ आम्ही साधारण साडेतीन ला निघालो... तेव्हा मोबाईल नव्हते. मला हाताला सतत घड्याळ लावायची सवय होती. सो हातात घड्याळ होतं.
तर आम्ही निघालो. करवंदाच्या जाळ्यांमध्ये घुसून करवंद काढणे, खाणे, मस्करी करणे यात वेळ किती गेला कळलं च नाही... अचानक अंधारून आलं म्हणून मी घड्याळात पाहिलं तर चक्क 7 वाजलेले. मी म्हटलं आपण इथे येऊन 4 तास तर नक्की च नाही झालेत. माझ्या कझिन ने पण घड्याळ येऊन पाहिलं. 7 च वाजलेले. ते लोक माझी मस्करी करायला लागले," तुझं घड्याळ खराब आहे, पैसे च नसशील दिले तू हे घेताना म्हणून अशी काहीही वेळ दाखवतय वगैरे "
मी सांगितलं की असेल तसं ही. कारण आपल्याला इतका वेळ झालाच नाहीय इकडे येऊन. पण मग इतका अंधार का दिसतोय???
यावर त्यांना पण कन्फ्युजन झालं. माझी बहिण बोलली "आपण घरी जाऊया का?? मला भीती वाटतेय"
ती हे बोलत असताना अचानक ठाक ठाक असा जोरात आवाज यायला लागला.
आमच्या इकडे सागाची तस्करी चालते सर्रास. पण हे झाडं तोडण्याची कामं रात्री होतात. कोणाला पत्ता नाही लागत.
आम्ही तिघे आवाजाच्या दिशेने बघायला लागलो. अभि म्हणजे माझा भाऊ बोलला की" हे त्याचं कारणासाठी आले असतील लोकं. चल आपण जाऊ इथून." आम्ही निघालो तसा तो आवाज बंद झाला. आणि विरुद्ध दिशेने सेम आवाज यायला चालू झाला. हा आवाज आधीच्या आवाजपेक्षा मोठा होता.
आता मात्र आम्ही खूप च घाबरलो. आम्ही डोंगरावर अश्या ठिकाणी होतो की जिथे जास्त कोण दुपारच्या तरी वेळेस यायचं नाही. मी दोघांना बोलले की आपण जाऊ इथून. आम्ही भराभर डोंगर उतरायला चालू केला. आणि तो आवाज अजून मोठा मोठा आणि आमच्या जवळ जवळ येत असल्याचा भास होऊ लागला. मी सर्वात मोठी त्यामुळे या दोघांची जबाबदारी पण माझ्यावर...
आम्ही धडपडत कसेतरी खाली पोहोचलो. आणि इतके घाबरलेलो तिघे पण. सुसाट धावत खाली आलो. आणि घर दिसायला लागलं. आणि हळू हळू ऊन पडतंय असं फील झालं. पण आम्ही इतके घाबरलेलो की पळत डायरेक्ट घरी अंगणात येऊन च थांबलो. आणि ऑफकोर्स घरी हे कोणाला सांगायचा प्रश्न च नव्हता कारण आम्ही खोटं बोलून डोंगरावर गेलेलो. चांगले फटके पडले असते.

घरात आल्यावर जरा तिघे सेटल झालो तेव्हा आदु बोलली ,"ताई ऊन आलं" अभि बोलला हो ," धावत येताना लक्षात आलेलं माझ्या" मी घड्याळ पाहिलं तर पावणे पाच वाजलेले.
मग तेव्हा अंधार आणि 7 वाजले असं कसं झालं?????
आणि तो इथून तिथून येणारा आवाज?????
आम्ही खूप घाबरलेलो ...तेव्हापासून असं दुपारी डोंगरावर वगैरे गेलो नाही...

सफेद कपडे>> माझ्या आईला असे पीरबाबा दिसलेले. अर्थात ते घाबरण्यासारखं नव्हतं. आणि तिला नंतर लक्षात आलं कि ते पीरबाबा होते ते. ते आमच्या वाड्याचे राखणदारच होते . वाड्यात बऱ्याच जणांना दिसलेले.

Pages