सिंहगडवर (व इतर गडांवर सुद्धा?) मांसाहारास बंदी कशासाठी?

Submitted by इनामदार on 1 June, 2018 - 13:28

काही दिवसांपूर्वी सिंहगडवर गेलो होतो. यापूर्वी काही वर्षांपूर्वी गेलो होतो तेंव्हा तिथे परिस्थिती वेगळी होती. आता खूप सकारात्मक बदल झाले आहेत. स्वच्छता, डागडुजी, रस्ते वगैरे. बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर एका गोष्टीचे कोडे उलगडले नाही. गडावर पूर्वी मांसाहारी जेवण मिळायचे ते आता बंद केले आहे. मद्यपान बंदी एकवेळ समजू शकतो. आपल्याकडे बरेचसे पब्लिक दारू पिली कि आरडाओरडा, शिवीगाळी, बाटल्या फोडणे तसेच अन्य घृणास्पद कृत्ये करतात ज्याचा इतर पर्यटकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष त्रास होऊ शकतो.

पण मांसाहाराने काय घोडे मारले आहे? त्यावर बंदी कशासाठी? कचरा म्हणावा तर तो अन्य खाण्यापिण्याने पण होतोच आहे गडावर. मांसाहाराने थोडा अधिक होईल इतकेच. तिथे मी विचारणा केली असता "गडाचे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून" वगैरे उत्तरे मिळाली. अरे म्हणजे इतिहासातील ज्या वीर पुरुष व पराक्रमी योद्धा असलेल्या महान विभूतींमुळे हा गड पवित्र स्थान बनले आहे ते लोक मांसाहार करत नव्हते शाकाहारी होते असे म्हणावयाचे आहे का? नरवीर तानाजी मालुसरे असोत वा खुद्द शिवछत्रपती असोत. पराक्रमी योद्धे होते. मांसाहार तर करतच होते. मग तिथे येणाऱ्यानी मांसाहार केला तर पावित्र्य बिघडण्याचे काय कारण? थोडीतरी तर्कसंगती आहे का ह्या बंदीला? नक्की कोण आहेत या बंदिमागे?

थोडा मागोवा घेतला तेंव्हा लक्षात आले एक "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" म्हणून आहे (जसे काय गड किल्ले म्हणजे सरकारची नव्हे तर यांचीच मक्तेदारी) त्यांनी हि बंदीची मागणी व नंतर अंमलबजावणी केली आहे. काही बातम्यांमधून लक्षात आले कि सरकारी यंत्रणा नव्हे तर या संघटनेचे लोकच गुंडगिरी करून मांसाहार करू देत नाहीत. अजून थोडे खोलात जाऊन पाहिले असता लक्षात आले कि हि संघटना म्हणजे देशातील कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे पिल्ले आहे हे जाणवले (त्यांच्या फेसबुक पेज व इतर माहितीवरून). गड किल्ल्यांची निगा राखण्यासाठी खरे तर सरकारी यंत्रणा आहे. गड किल्ले कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. तरीदेखील गडांवर या खाजगी संघटनेचे वर्चस्व आहे!

काही जण मांसाहार बंदीसाठी वनखात्याच्या नियमाचा आधार घेताना दिसतात. म्हणे वनक्षेत्रात मांसाहार वर्ज्य आहे. अरे पण तसे असेल तर मग इतकी वर्षे वनखात्याने हे सुरु ठेवूच कसे दिले असते?

आणि मग सगळी मेख लक्षात आली.

मांसाहाराचे वावडे ना राजाला होते ना मावळ्यांना. मांसाहार न करणारे आहेत ठराविक हिंदुत्ववादी. त्यांना आवडत नाही म्हणून त्यांनी तो "अपवित्र" ठरवून त्यास गडांवर बंदी घातली असे समजायला बक्कळ वाव आहे. म्हणजे सरळ सरळ धार्मिक दहशत. बाकी काही नाही. (शिवाय याचा साईड इफेक्ट म्हणून "राजांना मांसाहार वर्ज्य होता म्हणूनच आजही गडांवर मांसाहारास बंदी आहे" असे अजून पाच पन्नास वर्षांनी कोणतरी एखादा भुक्कड कवी/शाहीर लिहून जाऊ शकतो हा भाग वेगळाच).

कुणाची काय काय मते आहेत यावर?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांसाहारच का, बर्याच बाबतीत हीच 'आंधळं दळतं आणी कुत्रं पीठ खातं' अशी अवस्था आहे. Unauthorized पार्किंग शुल्क गोळा करणारे, कुठलाही नियम / कायदा नसताना सार्वजनिक ठिकाणी खाण्या-पिण्यावर बंधनं आणणारे, मनाला येतील ती कागदपत्रं मागून, ती नसताना चिरीमिरी उकळणारे - सगळे एकाच माळेचे मणी. तपशिलात फरक असला तरी तत्व तेच आहे.

मांसाहारबंदी मुळे का काय ते नक्की नाही सांगता येणार पण सिन्ह्गड गेल्या काही वर्षात जरा बऱ्या परिस्थितीत आलाय.
आधी फारच कचरा असायचा

पर्यटक पण आता बरेच सजग झालेत

आपल्या धर्मात कडे आधी मान्साहार (अगदी बिफ पण) चालत होता ना... , मग हे स्तोम नन्तर घुसडले गेले. कधी हा बदल झाला ?

@इनामदार,

तुम्ही मांसाहार करायला सिहंगडावर जाता ?
त्यापेक्षा उच्चप्रतिचे मांसाहारी जेवण मिळण्याची अनेक ठिकाणे पुण्यात आहेत, तिथे जाऊन खा की हवे तेवढे चिकन/मटन.
----
मासांहार करणार्‍यांमुळे गडाची कशी दुर्दशा होते हे पाहायचे असेल तर एकदा विशाळगडाला भेट द्या.

खाण्याच्या पदार्थांत मक्याच्या कणसांमुळे जास्तीत जास्त कचरा निर्माण होतो असे माझे निरीक्षण आहे. दुसरा क्रमांक द्रोण, पत्रावळी, प्लास्टिक थाळ्या , थर्मकोल पेले यांमुळे होतो. मक्याच्या कणसावर अनेक थरांचे आच्छादन असते. शिवाय संरक्षक तंतूही असतात. खाद्य असा दाण्यांचा थर अगदी छोटा असतो. त्याच्या आतला मोठा भाग अखाद्य असतो. एक कणीस सोलून खाल्ले तर ढीगभर कचरा निर्माण होतो. एका कोंबडीचा इतका कचरा होत नाही.
मांसाहाराला कुठेही बंदी असू नये असे अगदी स्पष्ट मत आहे. फक्त स्वच्छता मात्र कसोशीने पाळलीच पाहिजे. आणि कुठल्याही वस्तूचे ' पावित्र्य ' जपणे हा प्रकार फार वाढत चालला आहे. टो डोक्यात जातो. अनेक गडकिल्ल्यांवर मेटकऱ्यांची राखणदारांची जुनी वसती असते. ते सर्व मुळापासून मिश्राहारी असतात. त्यांनी का म्हणून शाकाहारी बनायचे? किंवा एखाद्याने गडावर जाताना अंड्याचे अथवा चिकनचे सॅण्डविच नेले तर अथवा दोन चार अंडी तिथेच उकडून तिथे बनवले तर काय मोठासा पावित्र्यभंग होतो? शेकोटी अथवा विस्तव पेटवण्यास मनाई असणे समजू शकतें. वाऱ्यामुळे आग पसरून वणवा लागण्याचा धोका असतो. पण हा धोका कणीस भाजण्यातही नाही का?
एका छोट्या गटाची जीवनशैली बहुसंख्य लोकांवर लादण्याची ही दडपशाही हाणून पाडली पाहिजे.
फार पूर्वी तर मांसाचा नैवेद्य असे. ऋषीमुनींचे स्वागत उत्तम मांसाने केले जाई. राजेमहारजांच्या स्वयंपाकगृहात अनेक प्रकारची मांसान्ने शिजत.
जास्त कर्मठपणामुळे आणि हडेलहप्पीने धर्माच्या जाचकपणाविरुद्ध असंतोष निर्माण होतो. आणि असा जाच करणारा समाजगट अप्रिय होतों. अनादरास पात्र होतो.

मांसाहार हॉटेलातच का करायचा? जिथे जिथे उघड्यावर शाकाहार होऊ शकतो तिथे मांसाहारही करण्यात कोणतीच हरकत असता नये. स्वच्छता आणि पर्यावरणसुरक्षितता मात्र राखली गेली पाहिजे.
कित्येक लोक सिंहगडावर आवर्जून घट्ट दही आणि पिठले भाकर खातात. त्यावाचून त्यांची गडफेरी पूर्ण होत नाही. तद्वतच एखाद्याने चविष्ट रस्सा किंवा कबाब बनवून दिले आणि ते खाण्यासाठी गडावर लोकांनी रांगा लावल्या तर समानच आहे की. फरक काय?

>>एखाद्याने चविष्ट रस्सा किंवा कबाब बनवून दिले आणि ते खाण्यासाठी गडावर लोकांनी रांगा लावल्या तर समानच आहे की. फरक काय?<<
हीरा, बाकि सगळे मुद्दे पटले, हा वरचा सोडुन. गडांचं (महत्व) अस्तित्व इतिहासातुन स्फुर्ति घेण्याऐवजी एखाद्या खाऊगल्लीत होतंय हे पहाणं अतिशय दयनीय आहे. सिंहगडावर आत्ता होणारी गर्दि केवळ दहि-पिठल्या करता होत असेल तर तेहि चिंतनीय आहे...

हीरा च्या मुद्द्याशी सहमत.
गडावर किंवा कुठेही मांसाहार्/शाकाहार काहीही करायला हरकत नाही. स्वच्छतेचे कडक नियम असावे, ते पाळलेले बघायला माणसं असावी आणि कचरा होईल असे पदार्थ (लेज पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, बिस्किट पुडे) गडावर विकू नये आणि खालून नेऊ देऊ नये.

(मागच्या सुट्टीत भीमाशंकर च्या सुंदर जंगलात सुंदर धबधब्यावर खाली गेलो होतो उतरुन. तिथे बीयर च्या फुटलेल्या बाटल्या, एक डायपर आणी भरपूर लेज आणी फ्रुटी ची पाकिटं होती. एक छोटी काच पायाला लागली. आम्ही त्यातल्या त्यात अगदीच डोळ्याला बघवत नव्हतं म्हणून लेज कुरकुरे इ. एका पिशवीत भरले. काचा भरता आल्या नाहीत पण शार्प तुकडे बाजूला केले.
हे पदार्थ विकत घ्यायचे, वजन सहन करुन धबधबा उतरुन खाली जायचे कष्ट लोक घेतात. पण खाऊन झाल्यावर हा कचरा किमान एकत्र एका पिशवीत सोडून जावा इतकेही भान ठेवत नाहीत.)
पिक्चर मधला सनी देवल किंवा कोणीतरी स्वतः व्हिलन कडून जाताना मागे बॉम्ब टाकून आगीचा लोळ निर्माण करुन पुढे निघून येतो(पोस्टर मोमेंट) तसे हे लोक स्वतः मजा करुन झाल्यावर त्या जागी असंख्य लेज, कुरकुरे, पाण्याच्या बाटल्या, फ्रुटी आणि बीयर च्या बाटल्यारुपी आग सोडून प्लेस अन युजेबल करुन जातात.

राज, तीनचारशे वर्षांपूर्वीचे प्रत्येक स्मारक हे एक पर्यटनस्थळच असते. तिथे फारसे कोणी स्फूर्तीच्या अपेक्षेने जात नसते. चर्चेस किंवा समाधीस्थळ अथवा मंदिर असेल तर गाभाऱ्यात अथवा अगदी निकटच्या जागेत शांततेने दर्शन घेतले जात असते. बाकी रक्त उसळणे वगैरे क्रोध आणि वीरश्री हे शांत रसामध्ये बसत नाहीत. मावळ्यांचा आणि भोंसल्यांचा इतिहास हा आपल्याला काळानुसार जवळचा आहे . इतिहासात राष्ट्रकूट, सातवाहन, वाकाटक, गुप्त , मौर्य, कुशाण वगैरे वंशांमध्ये अत्यंत पराक्रमी , दिग्विजयी, शककर्ते सम्राट होऊन गेले, पण काळाच्या अंतरामुळे त्यांच्या स्मारकस्थळी आपण सद्गदित होत नाही. ती स्मारके आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी पर्यटनस्थळेच असतात. निकटच्या स्मृतींत भाव गुंतलेला असतो. आईवडिलांकरिता आपण जितके गहिवरतो, तितके आजीआजोबांसाठी गहिवरत नाही हा साधा अनुभव आहे.

काही वर्षापूर्वी सिंहगडवर गेलो असता अर्धा गड चढल्यावर प्रत्येक १० फुटावर "साहेब भाकरी/भजी/ताक हवी का?" हे प्रश्न विचारून काव आणला होता. पदोपदी असले खाण्याचा आग्रह करणारे लोक पाहून ह्या गडाचा जास्त पावित्र्यभंग होत असावा असे वाटते. सिंहगड बघताना शिवाजी, तानाजी, राजाराम ह्यांच्या आठवणी याव्यात का माशांना हाकलावे तसे ह्या ताक्/भाकरी वाल्या लोकांना हाकलत गड बघायचा?

एकंदरीत शिवाजी हा महाराष्ट्राचा महंमद करण्याचा जोरदार प्रयत्न चालू आहे असे दिसते. मुसलमान जसे महंमदाचा अपमान झाल्याची पुसट शंकाही आली तरी हिंसाचार, आगलावेपणा करतात तसेच इथेही होते. नुसते शिवाजी म्हटले तरी तो अपमान असतो. शिवराय , छत्रपती शिवाजीमहाराज नाहीतर शिवछत्रपती म्हणायचे. चुकूनही टीका करायची नाही. त्यात जातीची समीकरणे घुसवलेली. एक सहजपणे सर्वमान्य, आदरणीय असणारे व्यक्तिमत्व हायजॅक करून वेगवेगळ्या प्रकारे दादागिरी करण्याचे नवनवे मार्ग निघत आहेत.

मांसाहारावर बंदी, दारूवर बंदी हे ह्याचेच परिणाम आहेत. कुण्या चतुर माणसाने म्हसोबा वा वेताळ असा कुठलासा जालिम, अनार्य देव स्थापन केला तर त्याला बळी देण्याकरता मांसाहाराला परवानगी द्यावी लागेल!

नुसते शिवाजी म्हटले तरी तो अपमान असतो. शिवराय , छत्रपती शिवाजीमहाराज नाहीतर शिवछत्रपती म्हणायचे. चुकूनही टीका करायची नाही. त्यात जातीची समीकरणे घुसवलेली. एक सहजपणे सर्वमान्य, आदरणीय असणारे व्यक्तिमत्व हायजॅक करून वेगवेगळ्या प्रकारे दादागिरी करण्याचे नवनवे मार्ग निघत आहेत. <<<<

छे छे, भलतेच? असे कधी होते का? असे फक्त ठराविक जण करतात असे अनेक धाग्यांवर आणि ह्या धाग्यातही सांगितलेले आहे की?

========

सिंहगडावर मांसाहाराबरोबर चोरून मद्यपानाचे प्रकार प्रचंड वाढले व केवळ मद्यपान आणि मांसाहारासाठी मुद्दाम जाणार्‍यांचे प्रमाण अमाप वाढले म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता हे माझे अल्पसे ज्ञान आहे. मायबोलीवरील आनंदयात्रींना अधिक माहीत असेल. हे मद्यपान थांबवण्याच्या अनेक उपायांपैकी एक म्हणजे पार्टीतील सामीष आहाराची मजाच रद्द करण्यात आली असावी.

एखाददिवस व गडावर वगैरे गेल्यानंतर मांसाहाराशिवाय जगताच येत नाही अशी वेळ माणसावर आली असेल असे वाटत नाही.

>>एखाददिवस व गडावर वगैरे गेल्यानंतर मांसाहाराशिवाय जगताच येत नाही अशी वेळ माणसावर आली असेल असे वाटत नाही.
दुसरी बाजू अशी की एखाद्या माणसाने चिकन सँडविच सिंहगडावर विकले वा विकत घेतले आणि खाल्ले तर त्याने तानाजींचा वा शिवाजीचा वा राजारामांचा आत्मा तळमळेल आणि लगेच त्या गडाचे पावित्र्य भंग होईल असे वाटत नाही.
ज्याला असे वाटते की मांसाहार म्हणजे शिवरायांचा अपमान त्याने गडाकिल्ल्यावर जाताना मांसाहार जरूर सोडावा. त्याला कुणाची हरकत असणार आहे? पण कायदा हातात घेऊन, आक्रमक संघटना बांधून तमाम मांसेच्छू मुसाफिरांना धारेवर धरणे साफ चूक आहे. सार्वजनिक स्थळी कुणी काय खावे ह्याचा निर्णय घेणारे हे कोण टिक्कोजीराव?

Submitted by shendenaxatra on 3 June, 2018 - 00:54<<<<

बहुधा तुम्ही प्रतिसाद संपादीत केलात व केला असलात तर ते आवडले.

पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही गडावर अशी यंत्रणा अस्तित्वात नाही जी हे सिद्ध करेल की वाहनाने किंवा गड चढून गडावर आलेला मांसाहार करून आलेला आहे. त्यामुळे चिकन सॅन्डविचेस विकली अथवा खरेदी केली गेली तर गड इतके प्रचंड असतात की कोणाला पत्ताही लागणार नाही. प्रश्न मांसाहार गडावर बनवण्याचा आहे, मांसाहार करण्याचा नाही.

>>>> पण कायदा हातात घेऊन, आक्रमक संघटना बांधून तमाम मांसेच्छू मुसाफिरांना धारेवर धरणे साफ चूक आहे. सार्वजनिक स्थळी कुणी काय खावे ह्याचा निर्णय घेणारे हे कोण टिक्कोजीराव?<<<<

हे सार्वजनिक स्थळ असले तरी त्याला ऐतिहासिक वलय आहे. मांसाहाराबरोबर मद्यपान येऊ शकते व येते हे अनुभवल्यानंतर हा उपाय योजण्यात आलेला आहे की येथे मांसाहार बनवलाच जाऊ नये. हात तुटल्यानंतर लढणार्‍या तानाजीने जो कडा यशवंतीला धरून रात्री सर केला होता तो दिवसा उतरण्याचीसुद्धा हिम्मत आज कोणात नाही. अशा ठिकाणी किमान मद्यपान होऊ नये ही 'कोणाचीतरी'इच्छा ही बेसिकली शिवरायांप्रतीच आदर दर्शवते. त्यागाच्या आणि स्वाभिमानाच्या इतिहासाला साडे तीनशे, चारशे वर्षे होत आल्यावर आता मांसाहार मिळणारी थंड हवेची ठिकाणे ही मद्यपींचे अड्डे बनू शकतात हे जाणून हा काही उपटसुंभांनी केलेला हिटलरी नियम आहे म्हणा हवे तर! असलाच शिवाजी महाराजांबद्दल आदर तर किमान असले धागे काढू नयेत. एक दिवस तंगडी तोडता आली नाही की 'ठराविकांवर'ताशेरे झोडण्याची संधी मिळाली इतकी सुमार विचारसरणी आहे ही!

बाकी राजगडचे पद्मावती तळे साफ करणार्‍या आमच्यासारख्यांनी हे तर कधी विचारूच नये की सिंहगडावर मांसाहार मिळणे बंद का झाले असे विचारणार्‍यांनी गडाचे आणि पर्यायाने शिवरायांचे पावित्र्य जपण्यासाठी आजवर काय काय केले.

पु ल देशपांडे उद्यानात उगाचच असलेला कोंडदेवांचा पुतळा मोठ्या सन्मानाने रथातून लाल महालात का नेला ह्या प्रश्नाचा खरा अर्थ लाल महालातील कोंडदेवांचा पुतळा कचर्‍याच्या गाडीतून पु ल देशपांडे उद्यानात नेऊन का भिरकावण्यात आला असा मुळीच नाही, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ज्याच्या नावात सिंह आहे त्या गडावर मांसाहारबंदी... आर्यनी आर्यनी की काय म्हणतात ते हेच का Happy

1) मला तर मंदिरांमध्ये मांसाहारबंदी का असते हा प्रश्नही पडतो.

2) काही लोकं ईतर वारी खातात पण ठराविक सणवारी का खात नाही हा प्रश्नही पडतो.

3) काही लोकं आवडतात ती सारी जनावरे खातात पण काही ठराविक जनावरांना पवित्र वा निषिद्ध समजून का खात नाही हा प्रश्नही पडतो.

आता या प्रश्नांची उत्तरे मी अशी शोधतो.

1) मंदिर ही ठराविक लोकांनी ठराविक संकल्पनांच्या आधारे बनवलेली वास्तू आहे. त्यांचे काही नियम असतील तर ते मी पाळेन अन्यथा त्या जागी जाणारच नाही. त्याने माझे काही अडणार नाही.

2) आणि 3) काय खावे आणि कुठल्या दिवशी खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. भले त्यामागचे लॉजिक मला पटत असो वा नसो जोपर्यंत माझ्यावर ती जबरदस्ती होत नाही तो पर्यंत मला घेणेदेणे नाही.

मुद्द्यात सांगायचे झाल्यास, या समाजात पावित्र्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना भिन्न असतात. ज्या विचारांच्या लोकांचे प्राबल्य ते आपल्या विचारांचा प्रसार करतात किंवा ते विचार ईतरांवर लादायचा प्रयत्न करतात.

सिंहगड हे काही मंदिरासारखे अमुक तमुक विचारांच्या लोकांनी एकत्र येत उभारलेली वास्तू नाही. त्यामुळे तिच्यावर लादलेले पावित्र्याचे वैचारीक एककल्ली निर्बंध मला मान्य नाहीत.

एक सर्वसमावेशकअन्नप्रेमी म्हणून मी या प्रबल बनू पाहत ईतरांवर मांसाहारबंदी लादणारया मांसाहारद्वेष्टी गटाचा निषेध आणि विरोध करतो.

मांसाहारासोबत मद्यपान होते म्हणून मांसाहारावर बंदी?
डायरेक्ट मद्यपानावर बंदी घालू नये असा कायदा आहे काय?
मांसाहार न करणारे लोक मद्यपान करीत नाहीत काय?

<गडांचं (महत्व) अस्तित्व इतिहासातुन स्फुर्ति घेण्याऐवजी एखाद्या खाऊगल्लीत होतंय हे पहाणं अतिशय दयनीय आहे. >
गंगेकिनारी राहणार्‍याला तिचं काय महत्त्व अशी काही म्हण आहे ना?

आज सिंहगड , पर्वती, चतु:शृंगी किंवा मुंबईत कान्हेरी वगैरे ठिकाणी सकाळी सकाळी जी गर्दी असते ती मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी आणि थोड्या व्यायामासाठी. मग बाजूबाजूने देखल्या देवाला दंडवत, आपापल्या ज्ये ना किंवा इतर ट्रेकर ग्रूपबरोबर गप्पटप्पा आणि चहापाणी. तिथे फारसे कोणी कसल्याही स्मृति जागवीत नसते. फारतर एखादा नवयुवा चमू रूटिनप्रमाणे शिवरायांचा जयजयकार जय भवानी जय शिवाजी वगैरे (स्काउटच्या आरोळ्या असतात त्या पद्धतीत मोठमोठ्याने) करतो आणि ताक प्यायला निघून जातो. तळी टाकी साफ करणे हे स्वच्छतेचे काम आहे. शहरातील किंवा गावातील नदी नाले साफ करणे हेही त्याच उच्च दर्जाचे स्वच्छतेचे आणि पर्यावरणसंवर्धनाचे काम आहे. ते करताना आपण खारीचा वाटा उचलतो आहोत या नम्र भावनेने करावे. गळा दाटून येणे कंठ सद्गदित होणे, ऊर अभिमानाने फुलून येणे याचे काय प्रयोजन? मुंबईत वेसावे समुद्रकिनाऱ्यावर अनेक लोक शांतपणे अमर्याद कचरा उचलण्याचे काम करीत आहेत. इतरत्रही अनेक ठिकाणी अशी कामे होत असतील. यात भावनोद्रेक आणण्याचे काय प्रयोजन? असलीच तर कर्तव्यभावना असावी एव्हढेच.

मद्यपान हे फक्त मांसाहाराबरोबरच होते काय? चणेदाणे, काकडीचे काप, चीझ, याबरोबर होत नाही का? मद्यपान करून दंगा करणे हे वाईट. पण ते न करताही अनेक ठिकाणी वादावादी बाचाबाची होत असतेच. यासाठी सक्त टेहळणी आणि शिक्षेची गरज आहे. आणि दीर्घकालीन लोकप्रबोधनाचीसुद्धा.

पुणे विद्यापीठात कुठल्याशा सुवर्ण पदकासाठी आर्हतेमधे शाकाहारी असणे अशी अट ठेवण्यात आली होती. अशी अट असलेले circular प्रसिद्ध झाले, वादळ माजल्यावर हास्यास्पद सारवासारव करण्यात आली.

आय आय टी मधे पण जेवणावळीत आहारावरुन वेगवेगले टेबल/ जागा असा काही वाद सुरु झाला होता.

आता हे वरचे खुसपट...

हा एक ट्रेन्ड दिसतो आहे का ?

वरच्या काही प्रतिक्रियांमधून जे काही मुद्दे उपस्थित झालेत त्यांना उत्तर देणे आवश्यक आहे.

१. सिंहगडावर मांसाहार न मिळाल्याने माझी किंवा इतरांची वैयक्तिक कुचंबणा होते असा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख धाग्यात कुठेही मी केलेला नाही. तरीही काहींनी मला जो मोलाचा सल्ला दिला आहे (कि अन्यत्र चांगले मिळते तिथे जाऊन खा) त्याबद्दल त्यांचे आभार. त्याचबरोबर त्यांना हे सुद्धा सुचवावे वाटते कि कांदाभजी आणि पिठले मिळणारी सुद्धा खूप चांगली ठिकाणे आहेत. तुम्ही लोक सिंहगडावर गेल्यावर ते तरी कशाला खाता? एक दिवस भजी न खाल्ल्याने कोणी मरत नाही. गडावर खाण्यापिण्याला बंदी करायचीच असेल आणि त्यामागे खरंच काही गंभीर कारण असेल तर ती सरसकट हवी इतकेच म्हणणे आहे.

२. मांसाहारामुळे कचरा होतो आणि तो बंद झाल्याने गड स्वच्छ झाला हा सुद्धा अत्यंत बालिश दावा. साफसफाई व डागडुजी तशीही नित्यनियमाने करावीच लागते हे कोणीही सांगू शकेल. खाण्यापिण्याचा त्याच्याशी काय संबंध? जगाच्या पाठीवर पर्यटक जिथे जिथे आहेत तिथे तिथे त्यांना आवडणाऱ्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली गेली आहे. पण त्याचबरोबर स्वच्छता कशी राहील हे सुद्धा पाहिले गेले आहे. बंदी घालणे हा उपाय नव्हे.

३. "मांसाहाराबरोबर मद्यपान येऊ शकते व येते हे अनुभवल्यानंतर हा उपाय योजण्यात आलेला आहे" हे विधान म्हणजे थेट मूर्खपणा किंवा खरे कारण लपवण्यासाठी केला गेलेला दांभिकपणा आहे. पुण्यात कावेरी हॉटेल म्हणून शुद्ध मांसाहारी हॉटेल्स आहेत. तिथे शाकाहारी जेवण मिळत नाही. आणि त्याच बरोबर मद्यप्राशनास सक्त मनाई आहे. असे सिंहगडावर का होऊ शकत नाही? मद्यपानामुळे समस्या होत असतील तर केवळ त्यावर बंदी घाला. पण मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन कि मद्यपान करण्यास बंदी घालणे सुद्धा तसे अयोग्यच आहे. मी मद्यपान न करता आणि मांसाहार न खाता तिथे दंगा धुडगूस घातला, कचरा केला, इतरांना त्रास होईल असे वर्तन केले तर चालेल का? म्हणजे मूळ समस्या वेगळीच आहे आणि त्याचे निमित्त करून केले जात असलेले उपाय मात्र भलतेच आहेत. आणि ते अप्रामाणिक हेतूने लादले गेले आहेत व हेच अत्यंत संतापजनक आहे. ते उपाय कसे योग्य आहेत हे सांगण्याकरिता धडपड केली जात आहे यातच सगळे आले. कारण त्या उपायांमागे हेतू शुद्ध नाही, कपटी आणि कारस्थानी आहे. शिवरायांविषयी आणि त्यांच्या मावळ्यांविषयी खरंच आदर असता तर त्यांच्या आवडत्या खाण्यावर त्यांच्याच गडावर अशी बंदी घातली नसती.

५. "शिवाधिन दुर्ग संवर्धन संस्था" आणि त्यांचे समर्थक ह्यांना कुणी अधिकार दिले गडाच्या पावित्र्याविषयी व्याख्या बनवायचे आणि तिथे कोणी काय खायचे आणि काय नाही खायचे हे ठरवायचे? हे कोणत्या कायद्यात बसते? गडावरचे पद्मावती तळे साफ केले, स्वच्छता केली. उत्तम केलेत. शाब्बास! पण म्हणून काय झाले? उद्या मी विधानसभेत झाडू मारला आणि म्हणालो इथले पावित्र्य राखण्यासाठी कुणी कसे वागायचे आणि काय खायचे मी ठरवणार. चालेल का?

४. इतिहास साक्षी आहे. सुरवात अशीच कुठेतरी खुसपट काढून होते. मग एकदा का ते लोकांच्या पचनी पडले आणि काळ गेला मग हळूच बखर/कविता/पोवाडा वगैरे लिहून त्याचे पुराव्यात रुपांतर केले जाते. नंतर तेच ग्राह्य मानले जाते. शिवरायांची आरती वगैरे लिहून ठेवलीच आहे. कालांतराने मंदिरे सुद्धा होतील. आता गडांवर मांसाहार बंदी. असेच सुरु राहिले तर "शिवराय हे मांसाहार करणाऱ्या कुळातील नव्हते" असा इतिहास भविष्यात लिहिला गेला तर नवल वाटू नये.

नवीन Submitted by बेफ़िकीर on 3 June, 2018 - 01:25
<<

बेफिकीर यांच्या या प्रतिसादाशी सहमत !
उगा गडांवर जाऊन बकर्‍या-कोंबड्यांच्या तंगड्या, दारुच्या पेग बरोबर तोडण्या ऐवजी गड-किल्ले संवर्धनला थोडा हातभार लावावा.

इनामदार या आय्डीने कोणाचीही अवहेलना न करता, कुणाप्रतही तुच्छता न दाखवत आणि कुठलेच आव्हान उपदेश न करता अगदी तर्कशुद्ध मुद्देसूद लिहिले आहे.
प्रतिसादाशी सहमत.

राज्याभिषेकाच्या वेळी रोज शाकाहारी जेवून कंटाळलेया हेन्री ऑक्सिंडेनला रोज एक बकरी देण्याचा आदेश शिवाजी महाराजांनी दिला होता.

मूळ समस्या वेगळीच आहे आणि त्याचे निमित्त करून केले जात असलेले उपाय मात्र भलतेच आहेत. आणि ते अप्रामाणिक हेतूने लादले गेले आहेत व हेच अत्यंत संतापजनक आहे. ते उपाय कसे योग्य आहेत हे सांगण्याकरिता धडपड केली जात आहे यातच सगळे आले. कारण त्या उपायांमागे हेतू शुद्ध नाही, कपटी आणि कारस्थानी आहे.

+४२

चिनूक्स,

महाराजांनी आदेश देणे आणि इनामदारांनी तक्रार नोंदवणे ह्यात काहीही फरक नाही

तेव्हा, तुमच्याशी नेहमीप्रमाणे सहमत

=====

ह्या धाग्यावर व्यत्यय इतक्या लवकर का आले बुवा?

@ राजः

सिंहगडावर आत्ता होणारी गर्दि केवळ दहि-पिठल्या करता होत असेल तर तेहि चिंतनीय आहे..
<<
आम्रिविकेत राहून "चिंतनीय" शब्दाचं जे काय केलंय, ते "दैनिय" आहे. Lol
बाकी टोइंग द राईट लाईन करण्याचा नाईलाज समजला. तिकडे तुमच्या गावात बीफबंदी करायचं बगा जरा राजे. देशी गाय अन आम्रिकी गाय अस्ला पुचाट पळपुटेपणा करू नका. हिंदू होंगे तो फार्वर्ड करो. Rofl

बेफिकिर या महान आत्म्याने "एक दिवस बिना नॉनव्हेजचे राहता येत नाही का?" अन "नॉनव्हेज बंद केले कारण नॉनव्हेजशिवाय लोक दारू पीत नाहीत" असल्या पिंका इथे टाकलेल्या पाहून भांबावलोच!

हेच ते आपल्या मायबोलीचे सुप्रसिद्ध पायलट! काय फेकी? मी म्हणतोय ते तुम्ही स्वतःच म्हट्ला आहात की नाही?

Now, to call a Spade, a Spade.

या देशातल्या हिंदूंना सामिष आहार कधीही वर्ज्य नव्हता अन नाही. या देशातल्या जैन नावाच्या एका अल्पसंक्यांक "धर्मा"ला मात्र मांसाहाराचे अत्यंत वावडे. कुठेही (पंचतारांकिताखालील संख्येतले तारे वाल्या) रिसोर्टमधे गेलात, तर बफेत "जैन फूड है क्या जैन फूड?" असे प्रश्न विचारणारी नुकतीच मिसरूड फुटायलेली गुज्जू पोरं अनेकदा दिसतात. माझ्या समोर एका ठिकाणी बिना कांदा लसणाची अंडा भुर्जी एका नमुन्याला जैन फूड म्हणून खपवलेली मी पाहिली आहे. त्याची स्टोरीही आहे, पण ते असो.

तर,

आयायटीच्या कँटीनमधे नॉनव्हेज नको!

अमुक सणाच्या वेळी गावतले सगळे कत्तलखाने बंद ठेवा!

गाय आमची माता, तिला मारून खाऊ नका. (आम्ही जिवंतपणीच आमच्या तान्ह्या भावांच्या तोंडाचं तोडून तिचं दूध ओरबाडून पिऊ, ते वेगळे. त्याबद्दल बोलू नका, कारण मग तुम्ही मुल्ले.)

या अन असल्या आहारशुचितेच्या बिनडोक कन्सेप्ट्सपायी आपण आपल्या पोरांच्या तोंडचं प्रोटीन कसं तोडतो, ही बाब अलाहिदा.

पण तुम्हाला जर तुमच्या आहाराचा प्रकार संकुचित करायचा आहे, तर त्यासाठी इतरांनी त्यांचा चॉईस सोडावा, हा माज कशासाठी?

शिव्हंगडावर जाऊन दारू नॉनव्हेज न खाता परत या. तुमच्यावर काय जबरदस्ती केलिय का कुणी? तिथलं मांसाहार विकणारं घरगुती "हॉटेल" बंद पाडायची काय गरज? काय संबंध?

कचरा होतो, साफसफाई होत नाही म्हणे! तुमच्या घरातलं उरलेलं जेवण गुरांसमोर नेऊन घाला, अन नॉनव्हेजची उरलेली हाडं तिथेच बाजूला फेका. १५ मिन्टात कुत्री मांजरी पक्षी त्या नॉनव्हेजचा फन्ना उडवतात अन उरतं ते सडणारं व्हेज अन्न! कितिंदा पहिलंय हे?

अन महत्वाचे म्हणजे, मी जे माझ्या घरी खातो, तेच मी डब्यात घालून जिथे पिकनिकला/शाळेला/कामाला जाईन तिथे खाईन. त्यात डिक्टेट करायचा कुणाचाही काहीही संबंध नाही. कंपनी कँटीनमधे नॉणव्हेज नको कारण वास येतो, तर तुमच्यासाठी वेगळे बिनवासाचे कँटीन तुमच्या पैशाने बांधून घ्या. जगाच्या टोटल लोकसंख्येत, भारतातल्यासारखे ढोंगी "शुद्ध" शाकाहारी (नॉन व्हेगन्स) अल्पसंख्यांक आहेत.

असो. कितीही लिहिले तरी उजेड पडायची शक्यता नाहीच. तेव्हा, जौद्या.

ऐवजी गड-किल्ले संवर्धनला थोडा हातभार लावावा.
<<
"ऐवजी" काय करावे वाल्यांना एक प्रश्न.

लाल किल्ल्याचं संवर्धन करण्यात तुम्ही अन तुमच्या सुल्तान ए हिंद, शेर ए गुज्जूभईने लावलेला हातभार किती?

Pages