बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच हाती आलेल्या खात्रीलायक सूत्रानुसार मेघा धाडे ने किंवा तिचा कुटुंबियांनि PRO हायर केला आहे. फॅन क्लब बनवणे , ट्विटर वर ट्रेंड बनवणे , फेसबुकवर हॅश टॅग ट्रेंड करणे , शिल्पा शिंदे तत्सम सेलिब्रिटीकडून मेघाला सपोर्ट स्टेटमेंट येणे वगैरे ती कंपनी मॅनेज करत आहे.
<<
Lol अहो शाहिर, सगळ्यांनीच हायर केलय पीआर , सगळेच करतात !
पुष्करचे पीआर पहाणारे आधीपासूनच पुष्करपेक्षा गंडलेत, आधीपासून मेघा विरुध्द काहीतरी पोस्ट करत रहायचे ,एकदा चुकून फारच काहीतरी हेटफुल पोस्ट केलं तेही जेंव्हा ऑनस्क्रीन यांच्या घट्ट मैत्रीची उदाहरणं दिली जाय्ची त्या वेळी, ट्विटरवर जोड्यांचे हार वाहिले गेले त्याला तेंव्ह्स, मग बहुदा डिलिट केले ते ट्विट .
स्मिताचे पी आर बेस्ट आहे, न्युट्रल आणि ऑल स्मार्ट्ली स्पॉन्सर्ड , तिचे सगळे आउटफिट्स, नाइटसुट्स, टॉप टु टो अ‍ॅक्सेस्स्रीज स्पॉन्सर्ड फॉर एव्हरी एपिसोड !
सोशल मिडीयावर सर्वात जास्त फॉलोअर्स सुध्द्दा स्मितालाच आहेत म्हणजे कितीतरी पटींने जास्तं इतरांपेक्षा.

स्मिताचे फोटो पण ग्रेसफुल असतात. मी फेसबुक वरचं बघितलं आहे, ट्विटर मी नाही वापरत.

जुईच जाईल असं वाटतंय, म्हणून म मां तिच्या बाजूने बोलले, तिला ओरडले नाहीत. सुशांतला वाचवलं असेल, कॅप्टन करुन अजून एक आठवडा तरी आत्ता जीवदान. राजेशला काढलं तेव्हा बहुतेक जुई लास्ट होती. दोन विक दिले तिला जास्त.

अरेरे बिचारी मेघा!! सै चे तिने किती लाड पुरवले होते आणि आज असे ऐकावे लागले.
मागे रेशम म्हटली होती कि मी जे काय करायचे ते प्रेमाने आणि गोड बोलून करेन. तसे ती करते आहे पुष्की आणि सै ला बरोबर बाजूला केले.

@दक्षिणा
३ री वाईल्ड कार्ड एंट्री समाविष्ट करा लेखात.

टॉप ५ मध्ये पाच पाच रेशम एकमेकींशी लठ्ठालठ्ठी करताना ड्वाल्यापुढे आल्या आणि ड्वाले पानावले. Rofl
कहर आहे हे

आऊ म्हणाल्या ते खरंय, रेशमी सुशांत यांचा खरा ग्रुप झाला आणि जे उरले सुरले होते ते एकत्र झाले त्याला दुसरा ग्रुप म्हणतात. त्यांच्यात खरंच युनिटी नाहीये. पुष्करचं स्पष्टीकरण काही पटलं नाही. अशा backstab करणाऱ्या मित्रांपेक्षा शत्रू बरे . मांजरेकरांनी तरी बर्याच हिंट्स दिल्या सई , पुष्करला . But they have already lost the trust of audience.मेघा मित्र मित्र करत मागे पडेल, त्यापेक्षा ते एलिमिनेटे झालेले बरे.

बब्बो! इथे त्याखानं सांगितलेला किस्सा ऐकून धक्काच बसलाय. >>> अरेरे टू मच.>>>
काय बोलले त्याखा नक्की ?? आम्हां वूटलेस लोकांनाही कळू दे ना Happy
बाकी कसा ही असो, त्याखाचे रॅप साँग्स भारी असतात. कालचं "... माझ्यावर भरोसा नाय काय " पण आवडलं.

इक्वेशन्स अचानकच बदलायला लागली आहेत. काल सई-रेशम चं संभाषण दाखवलं त्यात चक्क रेशम आवडली !

तो नंदकिशोर आजच्या भागात सुशांत कोण आहे ? माफिया वगैरे आहे का? असं बोलताना दाखवलाय.
हखा आली आणि राजेशला बाहेर काढून गेली, तसा हा सुशांत च्या मागावर आलाय का !

शर्मिष्ठा आणि मेघा / सई + पुष्कर असे उपग्रुप पडणार . जुई नंतर आऊचा नंबर लागणार .

ऋतुजा हे बघत असेल तर तिला पुष्कर आणि सई बद्दल कळले असेल ती मेघा शर्मिष्ठा जॉईन करेल .

त्याखाचा अजून काही अंदाज येईना . फार काळ टिकेल असे वाटत नाही.

त्याखा ची काय भानगड आहे? काय बोलला तो ते लिहा की . नुस्तएच काय बाबौ म्हणता. वूट च्या लिन्क्स नाही चालत इथे.
आज सई ला आणि पुष्कर ला बोलणी बसली बरे झाले. आस्ताद ला कुणीच वोट केले नाही कॅप्टन म्हणून!
जुईने काय बडबड केली त्यात एवढे टाळ्या वाजवण्यासारखे काय होते ? नेहमीचीच होती की कुरकूर.
मला सगळ्यात सई चे कपडे आणि जुलरी आवडते नेहमी. आजचा पण ड्रेस मस्त होता.

अच्छा ओके.

पहिला किस्सा : नाव न घेताही त्याखा सांगतोय की ज्यांच्या वडिलांच्या नावाचं हॉस्पिटल आहे त्यातल्या २ नंबरच्या भगिनी. त्याखा त्यांच्याबरोबर कोणत्यातरी एका बाहेरगावच्या गाण्याच्या कार्यक्रमात गायक म्हणून सहभागी होता. तर प्रोग्रॅम सुरू होण्याआधी त्या हटूनच बसल्या की अ‍ॅडव्हान्स (५० लाख ) दिलात पण उरलेले पैसे जोवर देत नाही तोवर कार्यक्रम सुरू करणार नाही. संयोजक म्हणत होते की जी कॅश जमलीये तिचा हिशोब करून तुम्हाला मध्यंतरापर्यंत पैसे देतोच. पण या ऐकेचनात. शेवटी संयोजकांनी उर्वरीत म्हणजे २५ लाख आणून दिले आणि कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपल्यावर म्युझिशियन्स वगैरे गेले. या ताई पण कार मध्ये बसून त्यांच्या करता बुक केलेल्या पंचतारांकित हॉटेलात जायला निघाल्या. त्या कारमध्ये बसल्यावर शेवटी त्याखानं धीर केला आणि त्यांच्याकडे आपले पैसे मागितले. तर त्या म्हणे " अर्रेच्चा, तुमचे पैसे राहिले का? पण नेमकी मी पर्स विसरले." त्याखा शेवटी म्हणाला की पण आत्ताच मिळाले होते ना. तर म्हणाल्या हो पण ते मुनिमजी घेऊन गेले. त्याखा म्हणे असे कोणी मुनिमजी दिसले तर नाहीत. "मग कधी मिळतील?" " असं कर दोन दिवसांनी मी मुंबईला जाईन तेव्हा तू मला फोन कर आणि घरी येऊन पैसे घेऊन जा."

त्याखा म्हणे त्यांना त्यांच्या पेडररोडवरच्या घरात त्यानं रस्त्यासमोरच्या पब्लिक बूथवरून फोन केला की जेणे करून ये म्हटलं की दीड मिनिटात घरी जाऊन पैसे पदरात पाडून घ्यायचे. त्यांना कारणं द्यायला वेळ द्यायचाच नाही. फोन आदिनाथनं घेतला (हे नाव त्याखानं घेतलं) आणि आपली ओळख देऊन (आदिनाथ त्याखा ओळखत होता) २ नंबरची आत्या आहे का असं विचारलं. आदिनाथ म्हणाला हो, आहे की. बसलीये. त्याखानं तिला फोन द्यायला सांगितला. आदिनाथ गेला "आत्या... तुला फोन आहे" म्हणत . मध्ये काही वेळ तसाच गेला आणि आदिनाथ परत फोनवर येऊन म्हणाला की "अरे ती नाहीये. " "तू आत्ता म्हणालास आहे म्हणून" "नाही, असं मला वाटलं की ती आहे म्हणून पण ती नाहीये" "माझ्यासाठी काही निरोप?" "तसाही काही नाहीये." "बरं मग ते मुनिमजी येणार होते .... " " कोण मुनिमजी?" " बरं मग सांग त्यांना की माझा फोन आला होता." असं म्हणून त्याखानं फोन ठेवला. मनात म्हणाला की अरे मी छोटा कलाकार, माझे छोटे पैसे तुम्ही ठेवताय.

त्याखा म्हणाला की मी मग म्हणे मलाच धीर झाला नाही पुन्हा पैसे मागायला फोन करायचा. इतके मोठे लोकं आहेत, त्यांना आपण कसा काय चारचारदा फोन करायचा. म्हटलं जाऊ दे, तुम्ही एंजॉय करा ते पैसे.

दुसरा किस्सा एक आद्यग्रंथ गीतस्वरूपात गाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पितापुत्रांचा असावा. ९९.९९% तेच वाटतायत. कारण त्यातले वडिल आता नाहीयेत पण पुत्र अजूनही हे कार्यक्रम करतात.

किस्सा असा की ते दोघेही खूप कंजूष आहेत. आणि त्यांच्या कार्यक्रमांना जाताना गाडी लंचकरता न थांबवता, हातात दहीभाताची छोट्या पिशव्यांतनं बांधलेली पाकिटं देतात. ७-८ जणांसाठी एक मध्यम डबा भरून दहीभात आणतात. मुंबई ते सातारा कार्यक्रमासाठी जाताना जे असंख्य टोलनाके लागतात त्यावेळी नेमकी यांना डुलकी लागते आणि टोल गाडीतल्या इतरांना भरावा लागतो.

त्यागराजने हे किस्से सांगून बराच पंगा घेतलाय असं काही वाटत नाही. त्या गानक्षेत्रात महान असलेल्या कुटुंबाची सद्दी संपलीये. आता म्युझिक क्षेत्रात जे आहेत त्यांनाही असा अनुभव आला असेल कदाचित. त्याखाला कल्पना असेलच की नक्की काय बोलतोय तो. आणि या निमित्तानं त्यांनी जर त्याचे पैसे दिले तर उत्तमच होईल.

पण कमाल आहे.

त्या कुटुंबाने अतिशय टोकाची वाईट परिस्थिती बघितली आहे, बऱ्याचशा वाईट अनुभवानमुळे असा कटुपणा, पराकोटीचा व्यावहारिकपणा, सावधपणा(स्वार्थीपणा?) आला असेल कदाचित. पण तुम्ही तुमच्या पैश्याबद्दल जर इतके सतर्क असाल तर बाकिच्यांना देण्याबद्दलही असलं पाहिजे.

मला वाटत सईला मॅनिप्युलेट सगळ्यात सोप आहे सगळ्याना, जरा सिम्पथी दिली की पाघळली, रेशमने ह्याआधीही हा गेम खेळुन बघितलाय आणि इट वर्क्ड फॉर हर, सई-मेघा ग्रुप मधे लुपहोल्स आहेत आणि ते आता सगळ्याना कळलेय
आज ममानी सगळ वदवुन घेतल सगळ्याकडुन ते स्वतः कमिच बोलत होते त्यामानाने , ममाचा ड्रेस हॉरिबल होता एक्दम खडकी-दापोडि

मामी, वरच्या पहिल्या २ ज्ञानवर्धक पोस्टींकरता धन्यवाद Happy
तिसर्‍या संपूर्ण पोस्टला मम !

काल पुष्कीने बॅकस्टॅबींगचे टाय्टल स्वतःकडे घेतल्याने आस्ताद दु:खी झाला आणि शेवटी जुईबद्दल बिचिंग करून त्याने ते टाय्टल थोडे फार स्वतःकडेही मेन्टेन केले Proud
वीकेंडचा डाव मधे सई आणि पुष्करचा राग आलाच पण आउ नेहमीप्रमाणे सर्वात मोठी बिचिंग क्वीन !
एरवी क्लिअर आणि नेमकं बोलणार्या सईला आज प्रथमच मेघाबद्दल जाब विचारल्यावर स्वतःचे पॉइंट्स बोलता येत नवह्ते, पुष्करचा चेहरा चोरी पकडली गेल्यासारखा होता आणि आऊ तिच्याच निर्लज्ज ट्रॅकवर .. मेघाचे जाउदे तिला ठेव नावं , ती आहेच किरकिरी , मी नाही , मला का नावं ठेवलीस एवढ्याव्हच पडलं होतं आउला.
आउ-सई पुष्कीपेक्षा आज जुईची बडबड सुध्दा बरी वाटली.
म.मा सुशनतवर ओरडायची हिंमत नाही म्हणून ती एनर्जी स्मिता- त्यागराजसारख्या निरुपद्रवी लोकांवर काढण्यात घालवतात.
आजही सुशान्तची दादागिरी जोक मारून हस्स्ण्यावर नेली.
बाकी महेश सर आप्ल्या काही कॉमेंट्स वाचतात नक्की, सांगत होते आउंना कि तू इनॅक्टिव्ह आहेस, फटकळ बोलायचं शस्त्र सुध्दा वापरत नाहीयेस.
आजच्या वीकेंडच्या डावानंतर काय नवीन गृप्स पडतात बघायला हवं , म.मां नी जणु आदेशच दिलाय मेघाला कि आता नवे फ्रेंड्स बनव, ती हिंट राजकारणी सुशान्तने ऐकून तिला सम्जावायलाही गेला !

हल्ली एपिसोड बघणं सोडून दिलंच आहे. तुमच्या सगळ्यांच्या कमेंटी वाचून अगदीच काही तरी बोर चालू आहे फीलिंग येतय.
तीन महिन्यात सगळ्यांना बाहेर काढून सीझन संपवायचाय ना? अर्धे दिवस तर झाले, पण घरातील लोकसंख्या काही कमी व्ह्यायची चिन्ह नाहीत. उलट वाढतेच आहे.
हार्ड स्टॉप असेल ना ? का नसतो? वेडे होतील लोकं जर खरच कनफाईन्ड स्पेस मध्ये बाहेरचं काहीही एक्स्पोजर मिळत नसेल तर.

डिजे तुझ्या या वरच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन. मस्त आणि नेमकं लिहिलंयस.

सई आणि पुष्कीनं मेघाशी पंगा घेतला तर ते लगेच बाहेर जातील.

या सर्व गदारोळात स्मिता खूपच चतुराईनं खेळतेय आणि ती मेघापेक्षाही जास्त अभ्यास करून आणि एक वेगळीच स्ट्रॅटेजी ठरवून आलीये. काल ममा म्हणाले देखिल की स्मिताचं जाऊ दे, ती कन्फ्युज्ड असल्याचं नाटक करतेय. अगदी सुरवातीला एकदा स्मिता स्वतः कॅमेरात बघून बोलली होती की "या लोकांना वाटतंय मी ला ला लँड मध्ये राहते, पण तसं नाहीये."

जर ती इतकी शातीर खिलाडी असेल तर हॅट्स ऑफ टु हर! ग्रेट प्ले.

ती अशीच येडी आहे समजून कोणी तिला कॉम्पिटिशन म्हणून गृहित धरत नाहीये आणि ती लाईम लाईटमध्ये किंवा कोणाच्या रडार वर येत नाही. बरं टास्कम्ध्ये ती एकदम जबरदस्त काम करते. दिसायला सुंदर, उत्तम बॉडी, खेळाडू ... हे तिचे प्लस पॉइंट्स आहेत.

शिवाय, जिथे मॅजॉरिटी सदस्य आहेत त्या गृपला धरून राहिलेय. पण तिथेही ती हिरोगिरी न करता एका बाजूला शांत बसून असते. मध्यंतरी ती मेघाच्या गृपबरोबर खेळली तेव्हा 'निगेटिविटी जाणवली' असं बोलली होती ते नेमक्या कोणत्या गृपबद्दल ते कळलं नव्हतं नीटसं. पण बहुतेक ते मेघाच्या गृपबद्दल असेल. मला वाटतं तिला सई आवडत नाही.

इतक्या चतुराईनं ती खेळली तर ती फायनल पर्यंत जाऊ शकते.

सर्व गदारोळात स्मिता खूपच चतुराईनं खेळतेय आणि ती मेघापेक्षाही जास्त अभ्यास करून आणि एक वेगळीच स्ट्रॅटेजी ठरवून आलीये. काल ममा म्हणाले देखिल की स्मिताचं जाऊ दे, ती कन्फ्युज्ड असल्याचं नाटक करतेय. अगदी सुरवातीला एकदा स्मिता स्वतः कॅमेरात बघून बोलली होती की "या लोकांना वाटतंय मी ला ला लँड मध्ये राहते, पण तसं नाहीये."
जर ती इतकी शातीर खिलाडी असेल तर हॅट्स ऑफ टु हर! ग्रेट प्ले.
<<
तसं असेल तर मजा येइल, स्मिता चूकीच्या लोकांमधे असली तरी आवडते , ती सगळ्यांना मात देऊन पुढे गेली तर बघायला इंटरेस्टींग होईल नक्की !
थँक्स मामी.

अगदी!
अतिशय बावळट स्ट्रॅटेजी घेऊन आलेल्या , स्वतःचा फर्म स्टँड घेऊ न शकणार्या , कायम बिचकत बोलणार्या , मैत्री तोडून बॅकस्टॅबिंग करणार्या डिसलॉयल काँटेस्टन्टला पब्लिक आणि हाउसमेट्स दोघसंनी हाकललेले बरे !
याच्यापेक्षा डायरेक्ट पंगा घेणारे आस्ताद सुशान्त परवडले !

काल पुष्कीने बॅकस्टॅबींगचे टाय्टल स्वतःकडे घेतल्याने आस्ताद दु:खी झाला आणि शेवटी जुईबद्दल बिचिंग करून त्याने ते टाय्टल थोडे फार स्वतःकडेही मेन्टेन केले Proud
वीकेंडचा डाव मधे सई आणि पुष्करचा राग आलाच पण आउ नेहमीप्रमाणे सर्वात मोठी बिचिंग क्वीन !
एरवी क्लिअर आणि नेमकं बोलणार्या सईला आज प्रथमच मेघाबद्दल जाब विचारल्यावर स्वतःचे पॉइंट्स बोलता येत नवह्ते, पुष्करचा चेहरा चोरी पकडली गेल्यासारखा होता आणि आऊ तिच्याच निर्लज्ज ट्रॅकवर .. मेघाचे जाउदे तिला ठेव नावं , ती आहेच किरकिरी , मी नाही , मला का नावं ठेवलीस एवढ्याव्हच पडलं होतं आउला.
आउ-सई पुष्कीपेक्षा आज जुईची बडबड सुध्दा बरी वाटली.>>>अगदी माझ्या मनातलं लिहिलंय

किरकीरी जुई वॅ वॅ करत बोलते तेव्हा म्युट च करते tv। तिचा आवाज अंगावर येतो अगदी। चौगुले मुळे सुशांत बाहेर गेला तर मज्जा येईल। सई सगळ्यात सुंदर दिसत होती आज आणि मेघा पण। मेघा चे ड्रेसेस ग्लॅमरस असतात आणि ती छान कॅरी करते नेहमी। पुष्कर छान दिसत होता पण गोंधळलेला होता।

काल मांजा आजिबात आवडला नाही. पुष्करने बोललेलं दिसलं त्याला, त्याच्यावरून पु-सैची घेतली पण सुशांतने पुष्करला मागून जी धमकी दिली- त्याला सांग, घरी बायको-छोटी मुलगी वगैरे आहेत, तिच्यावर मौन??
ह्या विधानापेक्षा मोठी गुंडगिरी काय असू शकते. सरळसरळ जिवे मारण्याची धमकी होती ती. सुशांतला पहिल्यापासून फेवर केले जाते आहे हे नक्की.
स्मिताबद्दल, ती शातीर खिलाडी वगैरे आजिबात नाही असे वाटते. मनाने मात्र चांगली आहे ती.

स्मिता सर्व बाजूंनी बेस्ट कंटेस्टंट वाटते मला, हो आता थोडाफार बावळटपणा केल्यासारखं दाखवते ती, पण काही विशेष वाटत नाही तिच्या वेंधळेपणाचं. कधीच कुणाबद्दल बिचिंग करत नाही (ज्याच्यात अनुक्रमे मेघा, उना, सै, जुई, रेशम, सुशांत आणि आस्ताद आघाडीवर आहेत, भूषण देखील करतो पण त्याचं कधी evident होत नाही). मेघा तर शुद्ध मराठीत सर्वात स्वार्थी प्राणी, कायम स्वतःला सेफ करायची भीक मागून, इतरांबद्दल वाईट साईट बोलून वरचढ होत राहिली आहे, बिचिंग मध्ये, नाटकी करण्यामध्ये तिचा हात कुणीही धरू शकत नाही.
स्मिताचा आजवरच्या प्रत्येक टास्कमध्ये सारखा सहभाग. घरच्यांची आठवण वगैरे बोलून कधी सिंपथी घेतली नाहीये, एकदा चक्क तिचा बाप काढला तेव्हा सुद्धा अतिशय स्पोर्टीली घेऊन जागेवर उत्तर दिलं होतं. कधीच पुढे पुढे न करता शांतपणे खेळणारी, आणि बिग बॉस मधली सर्वात निरागस, जिला पाहून फक्त आणि फक्त positive फील होतं अशी, स्मिता... फक्त तिच्यासाठी हा शो बघावासा वाटतो. I am loving her and want her to be the winner.

आणि हो, महेश मांजरेकर मध्ये दम नाहीये, हिम्मत असेल तर सुशांत, उना, रेशम यांच्यावर चिडून दाखव ना. बिचारी माझी स्मिता ऐकून घेते सगळ्यांच म्हणून तिच्यावर डाफरतो पांडू.

हिंदी मध्ये प्रस्थापित कलाकार नसतात गरजू असतात , त्यामुळे सलमान शी पंगा घेतला तर इंडस्ट्रीमध्ये काम मिळणार नाही अशी भीती असते. मांज्या बद्दल तशी भीती नाही . कलर्स हे झी एवढे मोठे प्रॉडक्शन हाउस नाही. त्यामुळे तोही प्रश्न नाही. सो मांज्याला कोणी घाबरत नाही. इथे काम नाहीये पण उगाच माज आहे.

मामी, थॅन्क्स इथे लिहिल्याबद्दल. त्या खा च्या सांगण्यात कुठेतरी तथ्य असेलाही पण काही तपशील फारच ऑड आहेत. जसे की - त्या खा आणि "त्या गायिका" काय स्ट्रीट अ‍ॅक्टर्स किंवा डोंबारी नाहीत की जमा झालेला गल्ला लगेच वाटून घेतील. तसेच हिशेब, पेमेंट वगैरे खुद्द गायिका बघत असतील की कोणी मॅनेजर, शो चा को ऑर्डिनेटर किंवा सेक्रेटरी बघेल ?आत्ताच तुमचे २५ लाख मिळाले आता त्यातले १०,००० द्यायला काय झाले हे ही पुन्हा एकदा विनोदी आहे. ते २५ लाख काय नोटांच्या गड्ड्या थोडीच असणार, आहेत म्हणून काढून द्यायला. चेक / बँक ट्रासफर ऐकले असेल ना त्यांनी Happy ते गायिका ताईंनी त्यांचा फोन न घेणेही काही विशेष नाही, त्यांना रोज उठून पन्नास लोक चित्रविचित्र कारणासाठी फोन करत असतील तर त्यांनी तो प्रेत्येक कॉल घेणे जरुरी नसावे. त्याखा ला कळायला हवे पेमेंट इ. साठी गायिकेला नव्हे तर मुनिमजी की कोण असेल त्या योग्य माणसाला कॉल करायला हवा ते.

अहो पण त्यांनी एकदा सांगितले कि २ दिवसांनी 'मला' फोन कर तर फोन घ्यायला नको?
मुलगा म्हणतोय कि कोण मुनीमजी? म्हणजे मुनीमजी ही थापच वाटते. त्याखानेही त्या मुनीमजीला कधी पाहिले नाही, नव्हते.
ते २५ लाख काय नोटांच्या गड्ड्या थोडीच असणार>> हो, २५ लाख कॅश होती. ती घेतल्यावरही बाईंनी त्या मोजून होईपर्यंत कार्यक्रम सुरु नाही केला.
जसे त्यांनी पूर्ण पेमेंट मिळेपर्यंत कार्यक्रम सुरु केला नाही तसेच त्याखानेही त्याचे पेमेंट मिळेपर्यंत गायले नसते तर ते चालले असते का?
त्या खा आणि "त्या गायिका" काय स्ट्रीट अ‍ॅक्टर्स किंवा डोंबारी नाहीत की जमा झालेला गल्ला लगेच वाटून घेतील. >>>>त्यांनी नंतर कॉल तर घेतलाच नाही पण पेमेंटही केलेच नाही असे त्याखाने सांगितले.

त्या कुटुंबाने अतिशय टोकाची वाईट परिस्थिती बघितली आहे, बऱ्याचशा वाईट अनुभवानमुळे असा कटुपणा, पराकोटीचा व्यावहारिकपणा, सावधपणा(स्वार्थीपणा?) आला असेल कदाचित. पण तुम्ही तुमच्या पैश्याबद्दल जर इतके सतर्क असाल तर बाकिच्यांना देण्याबद्दलही असलं पाहिजे.>>>+११११

इथे त्याखा फार सत्यवादी असल्याचं गृहीत धरूनच सगळी चर्चा चालूये. कशावरून त्याखा हवा करण्यासाठी, फुटेज खाण्यासाठी थापा मारत नसेल? तसंच असेल असं आतापर्यंतचं वागणं बघून वाटतंय. मंगेशकर कुटुंबिय असंही स्वार्थी म्हणून प्रसिद्धच आहे तेव्हा त्यांच्या नावाने बिलं फाडणं सोपं आहे आणि ते पचतं पण. फडके पितापुत्राबद्दल मला व्यक्तिशः फार आदर वाटतो, त्याखाने असं काय महान काम केलंय की त्याच्या बिचिंगला खरे मानावे?

Pages