बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०० कॅमेरासमोर तो असे खोटे बोलत असेल तर त्याच्यासारखा मुर्ख तोच असेल.

पुष्करच्या वेळी तो खोटेच बोलला. त्याने पुष्करच्या बोलण्याला दुजोरा दिला होता पण ममांपुढे खोटे बोलला.

ज्या पद्धतीने सुशांतला कॅप्टनपदासाठी मते पडली त्यावरुन आपल्या लोकशाहीची अवस्था अगदी ठळक अंडरलाईन होते..

जे लोक मुर्खासारखे सतत वागतात तेच उमेदवार म्हणुन पुढे येतात..

त्या लोकांनी एखाद कार्य जरी नजरेत भरण्याइतपत केलं तरी त्या कार्याची री एका समर्थकाने ओढली कि सगळेच हो हो म्हणत तेच पालुपद लावतात..

लोकं कितीही हा जास्त योग्य आहे असं म्हणत असली तरी वेळेवर जाऊन तिथे मत देताना #$%@ आणि दादागिरी, गुंडगिरी, असभ्य वागणुक असणार्‍याच मुर्खाला निवडुन आणणार..

'त्याने जे काही केलं ते मला आवडलं नाही' अस म्हणुन कितीही कुणी त्रागा करुन घेतला तरी सरतेशेवटी तोच उमेदवार किती योग्य आहे असं समर्थक म्हणणार..

अन सरतेशेवटी बुद्धीवादी लोकं जाऊदे आपल्याला काय फरक पडतो म्हणतं बरेचदा मतदान दिवसाच्या सुट्टीचा फायदा घेऊन आपापली पिकनिक अन चर्चा करत दिवस घालवणार..

जुई गेली.

पुष्कर सेफ, सुधारावे. सारखं सई च्या च आगे मागे करू नये. उगा मेघाविरुद्ध बोलू नये. स्मिता खरंच helping nature ची आहे. पुष्की ची प्रतिमा मात्र सई चा नोकर अशी झालीय.

किरकिरी गेली, बरं झालं. सई ने सुधार करावा स्वतः त नाहीतर तीही लवकर किरकिरी म्हणून ओळखली जाईल.

जुईला खूप फॅन फाॅलाॅईंग आहे त्यामुळे ती जाणार नाही असं सगळ्याच व्हिलन मंडळींना वाटत होतं. तसं त्यांना राजेशबद्दल पण वाटत होतं हा मोठाच योगायोग.

नेक्स्ट..... अखिल महाराष्ट्राचे रडके लाडके नेते एक्झिट घेणार का? त्यांना पण फॅफाॅ भरपूर आहे असं त्यांचंच मत आहे.

रड्या ओरड्या कॅप्टन झालाय म्हणून सेफ. आरडा ओरडा, माज पण खूप आहे त्याला. तो सेफ असला तरी वोटिंग कमी होतं त्यालाही याची जाणीव करून दिली म मानी.

तो सेफ असला तरी फक्त यावेळी सेफ होता ना? पुढच्या नामांकनात तो येईल तेव्हा सेफ नसणार ना? कि त्यातून त्याला वगळणार?

तो सेफ असला तरी फक्त यावेळी सेफ होता ना? पुढच्या नामांकनात तो येईल तेव्हा सेफ नसणार ना? कि त्यातून त्याला वगळणार? >>> ह्यावेळी सेफ झाला वोटिंग मध्ये. पुढच्यावेळी कॅप्टन म्हणून nominate होणार नाही तो.

शिवाय, जिथे मॅजॉरिटी सदस्य आहेत त्या गृपला धरून राहिलेय. पण तिथेही ती हिरोगिरी न करता एका बाजूला शांत बसून असते. मध्यंतरी ती मेघाच्या गृपबरोबर खेळली तेव्हा 'निगेटिविटी जाणवली' असं बोलली होती ते नेमक्या कोणत्या गृपबद्दल ते कळलं नव्हतं नीटसं. पण बहुतेक ते मेघाच्या गृपबद्दल असेल. मला वाटतं तिला सई आवडत नाही.>>>> स्मिता म्हणाली पहिल्यांदा समाधान वाटलं task खेळण्यात जेव्हा तिने मेघाला समर्थन दिलं कॅप्टन्सी task मध्ये. स्वतः च्या grp मध्ये हे समाधान मिळाले नाही, नावे ठेवतात पण असं म्हणून स्मिता परत जुन्या grp ला जॉईन का झाली हा प्रश्न पडलाय मला बहुतेक तिला फक्त मेघा आवडते, सई आणि पुष्करशी पटत नाही तिचे म्हणून असावं.

काल ममां नी विशेष लोकांची विशेष शाळा घेतली.. एकदम जबरी! सगळेच सिक्सर.. आणि मेघा, सई, पुष्कर ला अक्षरशः एक्स्पोज केले..
खरा गेम आता सुरू होणार.
ममां: आपापले मित्र तपासून बघा... एकदम यॉर्कर पडला मेघा कं वर..!
रेशम ने पुन्हा एक्दा ज्या प्रकारे सर्व आठवडा, परिस्थिती व विकांत चे डाव हाताळले- hats off!
जुई जायला नको होती.. पण जाता जाता ज्या प्रकारे दिलेल्या संधीचा ऊपयोग करून (रेशम ची शिकवणी!) स्वताची बाजू मांडली (कुठलिही सभ्यतेची पातळी न सोडता) व सई चा खरा चेहेरा सर्वांसमोर आणला ते ऐकून ममा देखिल एक्दम क्लीन बोल्ड झाले.
असो. जुई खूप छान खेळायची.. त्यापेक्षा त्या ऊध्दट व डोक्यात हवा गेलेल्या सई ला काढले असते तर बरे झाले असते. शेवटी सगळा शो स्क्रिप्टेड आहेच त्यामूळे विशेष काही फरक पडेल असेही नाही.
तरी आता लवकर त्यागी, चौगुले, शरा या असल्या चणे दाणे कं ला बाहेर करून कुणितरी डॅशिंग मुलगी व मुलगा आणावा.. आता सगळेच प्रेडिक्टेबल आहेत.. काहितरी नविन हवे.

बरं झालं जुई गेली. तिच्या ग्रुप मधलेही तिला रडकीच म्हणत होते. तिच्या गुडबाय विडिओ मध्ये वीट फेकताना दाखवलेच तिला.
रेशम आज सोबर दिसत होती. सुशांतच्या डोळ्यात बर्याच दिवसांनी पाणी बघितलं Happy पण त्याची दादागिरी जोक म्हणूनच घेतली मांजरेकरांनी. माझी फेवरेट मेघाच! फक्त मित्र मित्र करू नये आता तिने.
आऊंना बोलायला का देतात , प्रत्येक गोष्ट किती पाल्हाळ लावून सांगत बसतात. एका वाक्यात उत्तरे द्या च्या जागी संदर्भासहित स्पष्टीकरण असतं , बोर होतं ते.

आऊ सांगत बसल्या की म मां काही बोलत नाहीत, स्मिता सांगायला लागली की हो किंवा नाही सांग ओरडतात. भुषण ला पण ओरडले.

त्यागराजचा किस्सा आशा भोसलेंविषयी आहे. आशाताई आणि एकूण मंगेशकर कुटूंबिय अशा स्वार्थीपणाविषयी प्रसिद्ध आहे. दादा कोंडकेंनी "एकटा जीव" या पुस्तकात ह्या सगळ्यांचे असले किस्से पुढे आणले आहेत. (त्यांनी त्यात लता मंगेशकरांनी जयप्रभा स्टुडीओ वरून भालजी पेंढारकरांना कसे छळले ते लिहीले आहे). मला तरी पुर्ण किस्सा खरा असावा असे वाटते.

दुसरा किस्सा जर फडके पिता-पुत्रांविषयी असेल तर थोडा धक्काच बसला. ते असे वागत असतील असे वाटत नाही. कदाचित एखाद्या प्रसंगी ते असे वागले असतील.

रेशमच्या चेहऱ्यावर सकाळी मूळाव्याधाचा त्रास झाला असले भाव का असतात ?
ती बाई कधीही चार्मिंग वाटली नाही.
जुई ही अप्पलपोटी आणि स्वार्थी आहे. तिची स्वतः सोडून कोणाशीही attachment नव्हती.
किशोर चौगुलेने सुशांतला आरसा दाखवला .

रेशमाच्या ग्रुपमध्ये सगळे नंदी बैल आहेत त्यामुळे एकत्र वोट देतात किंवा टार्गेट करतात. मेसपु ग्रुपमध्ये स्वतंत्र अस्तित्व दाखवण्याच्या नादात सगळे वेगळे खेळतात .

बाकी महेश मांजरेकर किंवा कलर्स चे फंडे काहीतरी विचित्र आहेत . बायस्ड वाटत आहे

योग, प्रतिसाद आवडला... लिहित जा ईथे , तुमच्या आधिच्या कमेंट्स पण आवडायच्या कारण त्या बायस्ड वाटत नाहित, फक्त मे अन सैच्या फेवर मधे लिहील्यासारख्या

तुम्हाला कुणाला आता त्याच त्याच प्रकारच्या बिंडोक टास्कसचा कंटाळा आलाय का?
तो एक खून करायचा टास्क मस्त होता. बाकी सगळे झटापटीचेच.
हा आत्ताचा आठवडा मी वूट पळवत पळवत पाह्यले एपि.
काहीतरी ब्रिलियंट टास्क हवा बा आता.

बाकी वाइल्ड कार्ड एण्ट्र्या पुरे की आता. किती वर्ष चालवणारेत बि बॉ?

खरय.. सिरेलीत पाणी ओततत तसच हि वाईल्ड कार्ड एंट्री..
बरं झालं जुई गेली.. जातानाहि तिचं टार्गेट शेवटी सईच... यावरुन कळतं किती जळत होती ती सईला.
स्मि हुषार वगैरे काहि नाहि डंब च आहे ती अन सांगकामी .. खरं तर ते टाईटल तिलाच मिळायला हवं होतं

अरे जर त्यांनी wild card entries आणल्या नाहीत तर शेवटी 2-3 ch contestants राहतील... मग ते किती बोअर होईल... प्रेक्षकांना predict करता येऊ नये म्हणून आणत असतील

काल अपेक्षेप्रमाणे किरकिरी जुई बाहेर गेली...
त्याच प्रमाणे सई-पुष्कर दोघे ग्रील झाले. दोघांचा गेम सुधारावा या दृष्टीने ते योग्यच होतं.
सईला तू सेफ आहेस सांगताच पुष्करची रिअ‍ॅक्शन मस्त होती... Happy
रेशम मधे बरेच सुखावह बदल दिसले या आठवड्यात..
येणारा आठवडा जरा वेगळा असावा अशी अपेक्षा. ते कुठल्या कुठल्या प्रॉडक्टस् च्या प्रमोशनशी संबंधित टास्क कसे बरोब्बर हाणामारी न होता पार पडतात, तसेच इतर टास्क पण आयोजित करा की... (त्यातही परवा सईच्या चेहर्‍यावर चिखल, माती लावायच्या टास्क मधे सुशांत ने माती खाल्लीच. )

रेशमच्या चेहऱ्यावर सकाळी मूळाव्याधाचा त्रास झाला असले भाव का असतात ? >>>
:आउ मोड ऑनः
होत असेल खरंच त्रास त्या बयेला. आपण कशाला उगीच खोलात शिरावं. दिवस भर सारख्या कॉफ्या न चहा ढोसत राहते, सोफा न गादीवर लोळत पडते... काम शून्य, मग काय होणार दुसरं..
:आउ मोड ऑफ:
आणि रेशम मुड ऑफ !

गेली एकदाची जुई , तिच्याच टिममधल्या कोणालाच ती फार आवडत नाही हे अगदीच ओपन्ली समोर आलं आज !
जाता जाता जुईने सईला जी शिक्षा दिली जर वरवर वाटायला सोपी होती, पण आठवडा भर कॉफी प्ययाची नाही हे कॉफी अ‍ॅडीक्ट्सना डोकेदुखी असते, पण तरीही मी जुईच्या जागी असते तर सईला स्वतःला नॉमिनेट करायला लावलं असतं किंवा कोणाला काही व्यसन सोडायचीच शिक्षा द्यायची शिक्षा असेल तर आस्तादला शिक्षा दिली असती कि आठवडाभर सिगारेट ओढायची नाही किंवा तिच्या नावडत्या मेघाला मौन व्रत कसे नाही दिले तिने !
आजचे हायलाइट्सः
*आजच्या एपिसोड मधे अपेक्षा नसताना मि.वाइल्डकार्ड एंट्री चौघुलेंनी सुशान्तशी पंगा घेऊन सिक्सर मारली, जोरदार टाळ्या , काय परफेक्ट अगदी मनातले टोले हाणले त्याला गुंड माफिया म्हणून, बाकी तो स्पर्धक म्हणून ज्यांना तो अपात्रं वाटला त्यालाहीइ व्यवस्थित उत्तर दिलं !
*रेशमने “अपात्र” मधे बरोबर टायटल् दिलं कि घरात रहायला अपात्र आउ का आहेत.
* सगळ्यात रडकी जुई टाय्टल देण्यात मित्रही सामील झाले.
*काल इतक सगळं होऊन मेघा सई पुष्कर दाखवायला का होईना एकत्रं आले, जे मेघा म्हणेल तेच सई पुष्की रिपिट करत होते, तेच व्ह्युज देत होते.
* सई सेफ झाल्यावर मेघाने अगदी करेक्ट बेस्ट फ्रेंड सारखच एक्स्प्रेशन दिलं, कुठेही कटुपणा दाखवला नाही.
* नवीन टास्क टिम्स साठी पुष्कर चुझिंग मेघा ओव्हर सई हे इंटरेस्टींग चाल होती, केवळ मांजरेजर ओरडल्याने कव्हरप करायला किंवा पब्लिक समोर वाईट होऊ नये म्ह्स्णून / मेघाशी पॅचप या हेतुने , तरीही २ मिक्स्ड गृप्स बघायला जरा वेगळं वाटेल !
* तोंडाला पिठ फासलेला अस्तादच अतिशयच भयानक दिसला, सई पुष्कर पेक्षा Biggrin
* सई ज्यांना बोरिंग वाटते त्यांचं जामच आश्चर्यं वाटलं, ती कोणाला आवडो ना आवडो, एंटरटेन करते यात दुमत असेल असं वाटलं नव्हतं !
* कॉलर ऑफ द वीक फारच स्क्रिप्टेड / फेक वाटत होतं .
* आउ वाकडी तोंडं करण्यात आजही बाजी मारून गेल्या.
*मांजरेकर नेहमी प्रमाणे स्मिताला विनाकारण टारगेट करत राहिले Uhoh
* अजुन एक इंटरेस्टींग व्ह्यु ऐकला एका युट्युबर कडून कि म.मां नी फक्त मेघालाच का सांगितलं तिच्या मागे तिचे फ्रेंड्स काय बोलतात ?
आउ मेघाबद्दल बोलतात, आस्ताद जुई बद्दल बोलला, सुशान्त आणि पब्लिक रेशम बद्दल बोलले पण फक्त मेघालाच का सांगितल ?
मेघाला इन फॅक्ट म.मां नी हे सुध्दा सांगितलं कि दुसर्या टिममधले फ्रेंड्स शोध, कारण मेघा सर्वात पॉझिटिव आहे , ती ज्या गृपमधे जाईल तो गृप पॉझिटिव वाटायला लागतो , जे बिग बॉसला हवय.. जे व्हिलन वाटत आहेत ते थोडे बरे वाटायला लागावे म्हणून , इंटरेस्टींग अ‍ॅनालिसिस !
बघुया ही स्ट्रॅटेजी खरच खेळतायेत का बिग बॉस् !
नी,
हो, खरच फार बोअर झालेत टास्क्स !
नेक्स्ट जो म.मां नी स्किट बसावायचा टास्क दिलाय तो बरा असेल असं वाट्तय, बघुया कितपत जमतय या पब्लिकला.

त्यातही परवा सईच्या चेहर्‍यावर चिखल, माती लावायच्या टास्क मधे सुशांत ने माती खाल्लीच. << हा कुठला टास्क?

Pages