Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मांजरेकर स्मिताला बोलत रहाणार
मांजरेकर स्मिताला बोलत रहाणार हे त्यांनी काल स्पष्टच सांगितलं
.
स्मिता कसली गोड, ग्रेसफुल दिसत होती काल त्या गुलाबी साडीत.
सई मलाही जाम बोअर वाटतेय, गेले दोन आठवडे. मागच्या आठवड्यात तर जाम डोक्यात गेली, आधीच्या आठवड्यात भुषण आणि ती मिळून डोक्यात गेले. मात्र गुप्तहेर खुनी टास्क उत्तम केला तिने, सुशांतला पिडायचा टास्क उत्तम केला तिने त्यासाठी शाबासकी.
शेवटी 2-3 ch contestants
शेवटी 2-3 ch contestants राहतील.<< ते कधीतरी राहणारच आहेत ना.
शेवटचे २ आठवडे तसंच असतं ना?
मी हिंदी बिगबॉसचा कुठलाच सीझन पूर्ण पाह्यला नाहीये. शेवटी २-३ च लोक राहणे अपेक्षित असते ना?
गुप्तहेर खुनी टास्क सारखे
गुप्तहेर खुनी टास्क सारखे हवेत टास्कस. बाकी खरंच बोअर होतात.
चौगुलेने खरंच परफेक्ट सांगितलं सुशांतबद्दल, आता हा डूक धरणार, आधी त्यागराजवर धरलाच आहे. स्मिताने कॅप्टनशिपसाठी सुशांतला समर्थन देणं अजिबात पटलं नाही, आवडलं नाही.
स्मि हुषार वगैरे काहि नाहि
स्मि हुषार वगैरे काहि नाहि डंब च आहे ती अन सांगकामी .. खरं तर ते टाईटल तिलाच मिळायला हवं होतं >>> ती हुषार मलाही वाटत नाही पण तिचं हेल्पिंग नेचर वाटतं, सर्वांना मदत करते. केस कापून वगैरे देते. सई तिला चिडवायला चाललेली पण पुष्करच म्हणाला माझेही केस कापले आणि एरवी तिला सतत बोलणारे म मां पण म्हणाले हेल्पफुल आणि सांगकाम्या वेगळं, त्याअर्थी ती सर्वांची कामं करते, जे आपल्याला दीड तासात दाखवत नसतील पण मांजरेकर यांना माहीती असणार नाहीतर त्यांनी चान्स सोडला नसता, स्मिताला कात्रीत पकडण्याचा.
भुषण आहे सांगकाम्या जास्त पण पुष्की फक्त सईचा सांगकाम्या असावा.
शेवटी २-३ च लोक राहणे
शेवटी २-३ च लोक राहणे अपेक्षित असते ना? >>> मलाही आठवत नाहीये, पहीले दोन किंवा तीन बघितलेत. पाच असावेत शेवटी असं वाटतं किंवा तीन.
बाकी काहीही असो, स्मिता
बाकी काहीही असो, स्मिता अतीप्रचंड सुंदर दिसत होती काल. एकदम रापचिक. जुईसुद्धा मस्त दिसली काल. सर्व स्पर्धकांत सगल्यात जास्त खराब प्रतिमा तिची झालीये हे तिला बाहेर आल्यावर कळलं असेल. सुरेरा टीमला सपोर्ट करणं ही तिची सगळ्यात मोठी चूक. शेवटी जेव्हा तिचा एव्ही दाखवला ममांनी तेव्हा तिला बहुतेक कळलं असावं, आपण किती वाईट प्रकारे उघडे पडलो आहोत लोकांपुढे ते. तिच्या कंपूमधल्या लोकांनासुद्धा तिला सपोर्ट करावं वाटलं नाही आणि ममांनी सुद्धा तिच्याबद्दल अक्षरशः एकही चांगला शब्द उच्चारला नाही याचे तिला वाईट नक्कीच वाटले असावे.
आऊ डोक्यात चाललीये आजकाल. अक्षरशः काहीही उपयोग नाही, खोटं रडणं, रिलेव्हंट राहण्यासाठी रेसु ग्रुपला खोटा सपोर्ट दाखवणं आणि खर्याच्या बाजूने स्टँड न घेणं यामुळे ती एक गूड फॉर नथिंग कंटेस्टंट ठरली आहे. आधी आरती, नम्तर ऋतुजा आता शर्मिष्ठा असं कुणाला तरी हाताशी धरून फालतू बिचिंग करायचं एवढंच सध्या तरी चालू आहे. बाकी, शर्मिष्ठा भारी आहे माणूस म्हणून. त्याखा, किशोर, ऋतुजा आली तर ती आणि शर्मिष्ठा असा तिसरा कोन मस्त होईल. मग जरा रंगतदार होईल स्पर्धा. सध्या नुसती नुराकुश्ती चालल्यागत वाटते आहे.
मांज्या काल बोलला पुष्करला
मांज्या काल बोलला पुष्करला ज्यूस भरव. चांगला दोन तीन वेळा हे वाक्य बोलला. शिक्षणाला शिव्या देऊन 'शिक्षणाच्या आयचा घो' पिक्चर काढला की हे असं होतं.
@दक्षिणा
@दक्षिणा
३ री वाईल्ड कार्ड एंट्री समाविष्ट करा लेखात. >> हो करते.
मी शनी रवी हा धागा वाचू शकले नाही.
* या वीकेन्डच्या वार मध्ये
* या वीकेन्डच्या वार मध्ये जुई गेल्याने अपरंपार आनंद झाला आहे मला. आता सुशांत कधी जातोय याची वाट पाहतेय.
* मेघा निळ्या ड्रेस मध्ये सुंदर दिसत होती. अॅक्सेसरीज लहान मुली सारख्या होत्या पण खूप शोभून दिसत होत्या.
* स्मिता साडीत सुंदर दिसलीच त्यापेक्षा परवा तिने तो जिन्स वर एक लाँग टॉप घातला होता त्यात पोट दिसतं होतं. जाम सेक्सी दिसली त्यात.
* आऊ एकदम बेक्कार, आपण बोललेलं केलेलं काही मान्यच करत नाही.
* सुशांतने अप्रत्यक्षपणे पुष्करला जी धमकी दिली त्याची ममांनी जाहीर दखल घ्यायला हवी होती.
* स्मिताची शाळा सतत घेतली जाते त्यामुळे महेश काही बोलायला लागला की ही अजून गोन्धळते.
* रेशमची कलमकारी साडी सुरेख होती, ती आता खरंच खूप आवडायला लागली आहे. राजेश असताना तिच्यावर त्याच्या गुंडगिरीची सावली पडल्यासारखी वाटून तिचा चांगुलपणा झाकोळून जायचा.
* सुशांत आणि भूषण ही दोनच (बेकार) माणसे आता घराबाहेर गेली की हेल्दी कॉम्पिटिशन सुरू होईल. (नन्दकिशोर चौघुलेला मी खिसगणतित पण धरू इच्छित नाही. मला तो माणूस अतिशय बेरकी वाटतो.
* त्याखाने सांगितलेला पहिला किस्सा खरा असण्याची दाट शक्यता आहे. पिता पुत्रांबद्दलचा किस्सा पण खरा असू शकतो कारण आस्तादने पण दुजोरा दिला. मला व्यक्तिश: ते पिता पुत्र बिल्कूल आवडत नसल्याने. काहीच फरक पडला नाही.
एकूण हिंदी बिबॉ बरंच प्रेडिक्टेबल होतं.
आजच्या घडीला माझा पसंतीक्रम:
आजच्या घडीला माझा पसंतीक्रम:
*मेघा (ती चांगलीच खेळतीय.... ग्रूपशी लॉयल आहे.... प्रचंड काम करते.... फारशी चुकलेली नाही अजुनतरी)
*सई (दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत पहील्या नंबरावर होती.... टास्क आणि नेमके, मुद्देसूद बोलणे ही तिची स्ट्रेंथ आहे पण गेले दोन आठवडे नको तिथे नको ते पचकतीय.... इझीली मेन्युपलेट होतेय)
*शरा (मेघाशी जुळणारी विचारसरणी.... सई वेळीच लायनीवर आली नाही तर शरा तिची जागा घेउ शकते टीम मेघा मध्ये)
*रेशम (प्रचंड सुधारणा)
*भूषण (त्याचे ॲनालिसिस चांगले असते.... कुणाला मुद्दामहून न दुखावता त्याला जे म्हणायचे असते ते तो बरोबर म्हणतो... एखाद्याला नॉमिनेट करताना किंवा एखादे टायटल देताना तो जो विचार मांडतो तो बऱ्याचदा खरच चांगला असतो)
*स्मिता (टास्कमास्टर आहे पण किती तो गोंधळ घालते आपला मुद्दा मांडताना.... No clear stand at all)
*सुशांत आणि आस्ताद (एकाला झाका आणि दुसऱ्याला काढा... दोघेही सारखेच आहेत... कमालीचे अनप्रेडिक्टेबल.... जरा बरे आहेत असे वाटायला लागतात तोपर्यंत काहितरी व्हिलनगिरी करतातच)
*पुष्की (पक्का बोटचेपा आणि स्वार्थी आहे.... अरे ज्या ग्रूपमध्ये आहेस त्यांच्याशी जरातरी लॉयल रहा.... मेघाबद्दल इतके बिचींग करुन मेघा आणि सईमध्ये एकीची निवड करायची वेळ आली तेंव्हा याने मेघाला निवडले... न जाणो फिजीकल टास्क असेल तर कशाला उगीच सईला घ्या.... This is Pushkar!)
*त्याखा (का कुणास ठाऊक पण नाहीच आवडत तो)
*किशोर चौगुले (हा माणूस कायम टाकून आल्यासारखा का बोलतो? वावरतोही तसाच.... फारसा कुणात जेल होत नाही.... सुशांतवर हल्ला करुन लाईमलाइट घेतलाय आत्ता स्वताकडे पण नंतर स्मितासारखी माती खाल्ली नाही म्हणजे मिळवली)
*आउ (रेशमने काल एकदम परफेक्ट मत दिल आउना अपात्र म्हणताना.... अहो तुम्ही ज्याच्यासाठी आलाय ते करा ना.... म्हणजे ललिता पवारला आशा काळेंचा रोल शोभतो का?)
मला आस्ताद सुशांतपेक्षा जरा
मला आस्ताद सुशांतपेक्षा जरा बरा वाटतो. सुशांत फारचं gone case आहे, त्याला म मां फेवर करतात. दादागिरीचं कौतुक केलं. स्मिता तर डोक्यावर पडलीय, एवढं होऊन त्याला समर्थन देतेय.
मेघाबद्दल इतके बिचींग करुन
मेघाबद्दल इतके बिचींग करुन मेघा आणि सईमध्ये एकीची निवड करायची वेळ आली तेंव्हा याने मेघाला निवडले... न जाणो फिजीकल टास्क असेल तर कशाला उगीच सईला घ्या.... This is Pushkar!)
*त्याखा (का कुणास ठाऊक पण नाहीच आवडत तो) >>> परिमार्जन करायचा प्रयत्न असणार पण योग्य निर्णय. तो मेघाबद्दल सईकडे बोलला आणि सईचा सांगकाम्या पदवी मिळाली म्हणून सावध पाऊल टाकलं त्याने.
आणि एक गोष्ट मला नक्कीच खटकली
आणि एक गोष्ट मला नक्कीच खटकली की आस्ताद चं मराठी उत्तम आहे त्यातून तो पुण्याचा आहे या दोन गोष्टी त्याला गर्विष्ठ किंवा अतिशहाणं ठरवू शकत नाहीत. आताच्या काळात अशी भाषा ऐकायची सवय नसल्याने बातम्या ऐकतोय असं वाटतं असं म्हणाला तो चौघुले, इतका डोक्यात गेला ना.
अरे XXXX आता अशी भाषा ऐकायला नाही मिळत तर घे ना ऐकून, शिक ना थोडं. मातृभाषा आहे आपली. नीट बोलता नको येऊ दे, समोरचा बोलतो ते नीट ऐकून तर घ्या. संस्कृतात तर नाही बोलत ना? शुद्ध मराठीच बोलतो. त्यासाठी त्याने किती वर्ष मेहनत घेतली असेल त्याचं कौतुक नाहीच
दक्षे मम ह्या पोस्टसाठी.
दक्षे मम ह्या पोस्टसाठी. माझ्या हेच मनात आले काल.
>>अरे XXXX आता अशी भाषा
>>अरे XXXX आता अशी भाषा ऐकायला नाही मिळत तर घे ना ऐकून, शिक ना थोडं.
चौघुले महाशय तुझ्या गल्लीतील झेब्रा क्रॉसिंग वर सापडले तरी बहुतेक आडवा करशील.. 

शांत गदाधारी दक्षिणा.. !
पण ते भाषेबद्दल लिहीलेलं पटलं. अर्थात चौघुले सारख्या पब्लिक कडून काही वेगळे अपेक्षित नाहीये. ममा म्हणले 'ज्युस भरव' तेव्हा माझ्याही गळ्यात घास अडकला.
बाकी ईथला लाँग टाईम पुष्कर फॅन क्लब एका आठवड्यात पुष्कर हेट क्लब झालेला दिसतोय.. ये तो होना ही था. नंबर एकचा बाईल्या आहे. हा भुंगा आता कुठल्या फुलावर बसणार?
दक्षिणा सहमत... तुमची अशुद्ध
दक्षिणा सहमत... तुमची(म्हणजे जे नाव ठेवतात ते) अशुद्ध असेल तर तुमची सुधारा ना... अरे शुद्ध बोलण्याला काय नाव ठेवतात...
योग मी अजूनही पु fan क्लबात
माझ्याकडून एक संधी दिली मी सुधारायची त्याला
.
>>माझ्याकडून एक संधी दिली मी
>>माझ्याकडून एक संधी दिली मी सुधारायची त्याला Wink .
छान! छान.!
पुष्कर हा एकत्रीत पंखा क्लब मधील एक पाते होता.. या एकत्रीत पंख्याची मोटर म्हणजे मेघा. हे पातं जरासं काय ऊलट्या दिशेने (किंवा स्वताच्या वेगळ्या दिशेने) फिरू बघत होतं तर मेघा पासून तमाम पंखे क्ल्ब आता त्याच्याकडे पाते नाही तर पातक म्हणून पाहत आहेत. बहुतेक काही दिवसात ही सर्व पाती एकमेकाच्या विरुध्द दिशेने फिरतील याची व्यवस्था काल ममां नी करून ठेवली आहे.
असो.
खरे आहे. शुद्ध मराठी ही
खरे आहे. शुद्ध मराठी ही हेटाळणीची गोष्ट आहे? तेवढ्यासाठी आस्ताद आवडला होता मला सगळ्यात आधी.
)काल ममा म्हणे त्यात जिंकलेल्यांना माझ्यातर्फे (?)बक्षिस. म्हणाजे काय ते त्यांनाच ठाऊक. नुस्ता अंदाज करायचा तर रेशम ची टीम जिंकेल असे वाटतेय
रेशम, सई, आस्ताद, आऊ आणि कोण भूषण आहे बहुतेक. त्यांचं स्किट नक्कीच बेटर असावे असे वाटते.
ते क्राउन्स वगैरेही बाकी सगळे स्पोर्टिंगली घेत होते पण आउला काय एवढा त्रास होतो काही कळत नाही. मधल्या ब्रेक्स मधे साई-पुष्की -मेघाचा पॅचअप झाला की काय ऑलरेडी? दिसला तर नाही पण सगळे एकमेकशी नॉर्मल होते काल. मला वाटत होते आता मेघाचा रुसून बसायचा गेम असणार. एकंदरीत या वीक मधे सई-पुष्कीला जरा धक्के मिळाले ते बरे झाले. ममां सुशांत ला तुझं खेळणं आणि भांडण या आठवड्यात प्रेक्षकांना आवडले असे म्हणाला?!! का?? त्याला पब्लिक ने घातलेल्या शिव्या ममांनी खाऊन टाकल्या का ?
ती स्किट ची आयडिया छान आहे. त्या निमित्ताने वेगळे ग्रुप्स एकत्र वावरतील, कदाचित वेगळ्या लोकांन बाँडिंग होऊन काही इक्वेशन्स बदलूही शकतील. ( सई -रेशम मधे बर्यापैकी केमिस्ट्री दिसली परवा
मला काल पिठ, कार्ल्याचा रस टास्कमधे मजा आली
मला वाइल्ड कार्ड वाल्यांचे काही खरे दिसत नाही. त्या खा कधीही उडेल. नंदकिशोर च्या पर्सनॅलिटीवरुन आणि वावरावरून, तसंच त्याने काल पंगा घेतला त्यावरून तो कोणत्याच ग्रुप मधे फिट होईल असे वाटले नाही. शरा चे वाईट वाटते, ती आवडतेय मला पण नॉमिनेशन मधे तिला हलाल करू शकतो कोणीही. इन्क्लुडिंग मेघाचा ग्रुप. आजच्या झलक मधे तसे काहीतरी दिसतेय सुद्धा.
ओह नी चे पोस्ट आत्ता पाहिले. वेलकम नी! घरातल्या कोणाबद्दल अंदरकी खबर माहित असल्यास देत जा हो
हो ते बेस्ट केलं म मां नी.
हो ते बेस्ट केलं म मां नी, योग. आता मजा येईल बघायला.
अजूनही पुष्की पुष्की हे आण, ते आण मग पुष्की सेवेसी हजर की काही बदल होतो बघूया. मेघाची माफी कशी मागतात दोघे ते पण बघूया.
शांत गदाधारी दक्षिणा.. ! Wink
शांत गदाधारी दक्षिणा.. ! Wink चौघुले महाशय तुझ्या गल्लीतील झेब्रा क्रॉसिंग वर सापडले तरी बहुतेक आडवा करशील. >> नक्किच योग.
काहीही करत नाही. मिक्स होत नाही, मनोरंजन मूल्य शून्य, दिसतही चांगला नाही जेणेकरून दिसण्यावर समाधान मानलं असतं. तोंड उघडलं की फक्त अरेरावी ने बोलतो.
तो तसाही माझ्या डोक्यात गेला आहे.
पुष्कर सेफ गेम खेळला काल
पुष्कर सेफ गेम खेळला काल मेघाला सिलेक्ट करुन.. ममांने पितळ उघड केल्यावर आता मेघाचा विश्वास परत जिंकायचा अन सईच्या मागे मागे तो करत नाही हे ठासवून सांगायच म्हणुन त्याने मेघाला सिलेक्ट केलं हे माझं मत आहे..
योग, तुमच्या पोस्ट मधला बाईल्या हा शब्द नाही आवडला.. एखाद्या पोराने त्याच्या मैत्रीणीची नेहमी बाजु घ्यावी म्हणुन त्याला बाईल्या म्हणने मला पटत नाही.. करायला स्मितासुद्धा सर्वांची कामे करते..अगदी भरपूर करते पण त्या कृतीला शब्द नाही कारण मुलींनी कामे करणे हे आपल्या समाजात जस्टिफाईड वाटते अन पोरांनी कामे केली वा फेवर केले तर बाईल्या? याला काही अर्थ नाही..
बाकी मेघा मित्रांच्या बाबतीत अतिशयच लॉयल आहे .. त्या सुशांतने इतके वार केले तरी आपला जुना मिर हे पालुपद सुरुच आणि लगे मैत्रीला जागत समर्थन करणेही चालतच आहे.. इतरांशी कितीही वाजो पण सुशांतला नेहमी फेवर करते..
वूट्च्या ऑल शॉर्ट्स मधे वाटतय कि रुसवा सोडुन परत गेम खेळायला लागलीए ती असे.. ज्या पद्धतीने त्यांच एकमेकांशी बोलणे चालले होते त्यावरुन मेघा रुसवा सोडून गेम खेळायला लागली असे दिसतेय..
आऊ फार कोत्या मनाची आहे याचा भूषण अन पुढली टिम पुरेपूर फायदा घेणारे असं वाटतय.. भूषण ज्याप्रकारे तिला म्हणत होता कि, 'फारच आऊ आऊ करतात तर आता बघु कोण तुझ्यासाठी नॉमिनेशन सोडतं ते' यावरुन अन नंतरच्या पळापळीत आऊला जागा न मिळाल्यावर तिचे एक्स्प्रेशन पाहुन कळुन येतय सारं..
कोणिही जाताना आऊ रडते. पण
कोणिही जाताना आऊ रडते. पण तिचे रडे तो माणूस स्टुडिओ मध्ये पोहोचे पर्यंत पण टिकत नाही.

सुशांत जुई गेली म्हणून रडतच होता, तोवर आऊ ने तिला हसून हाय पण केले. रडू गायब
पुष्कर हेट क्लब झालेला दिसतोय
पुष्कर हेट क्लब झालेला दिसतोय...
अर्थात..जर तो आता चुकीचं वागत आहे तर त्याला आम्ही आता चुकीचच म्हणणार..ऊगीचच adult,प्रगल्भ, sorted out विचार म्हणत भलावण नाही करणार..
पुष्कर हेट क्लब झालेला दिसतोय
पुष्कर हेट क्लब झालेला दिसतोय...
अर्थात..जर तो आता चुकीचं वागत आहे तर त्याला आम्ही आता चुकीचच म्हणणार..ऊगीचच adult,प्रगल्भ, sorted out विचार म्हणत भलावण नाही करणार. >>> +१
यावेळी उनाने तमाशा केला नाही
यावेळी उनाने तमाशा केला नाही तर बहुतेक तीच बाहेर जाईल. तिथल्या लोकांमधे अदगीच कंटाळा आला तर जाऊन बसते किंवा पेशंट असल्यासारखी बिछान्यावर पडून असते असे म्हणाली ती. बिबॉनी लॉजींग-बोर्डींग नाही उघडले, लवकरच तिला बाहेर पाठवतील.
पुष्कर सेफ गेम खेळला काल मेघाला सिलेक्ट करुन.. ममांने पितळ उघड केल्यावर आता मेघाचा विश्वास परत जिंकायचा अन सईच्या मागे मागे तो करत नाही हे ठासवून सांगायच म्हणुन त्याने मेघाला सिलेक्ट केलं हे माझं मत आहे..>>+१
मेसैपु च्या गटात सतत पु सै चे ऐकतो, सै अन पु मेघाचे ऐकतात, त्या दोघांना अरे तुमचे पण डोके आहे ते वापरा असे बोलून बोलून गट फोडला जातोय. मेघाचे पण चुकते, ती त्यांचे मत ऐकायच्या आधीच त्यांनी काय करायचे ते सांगायला जाते. शेवटी ते दोघेही बोलले की आम्हाला आमचे डोके वापरु दे. त्याऐवजी दुसर्या गटाला त्यांनी मेघा आमची मैत्रिण आहे आणि कोणी कोणाचे ऐकायचे ते आम्ही बघू असे म्हणू शकले नाही.
सुशांत आणि भुषन मधे ममां ने फूट पाडायचा प्रयत्न केला.
ममां ने त्याखा ला सांगितले कि ज्यांना तू सपोर्ट करतोस त्यांना तुझी काही पडलेली नाही.
किचौ म्हणाला होता कि जो गट कमजोर आहे त्याबाजूने मी खेळेन.
पण मेसैपु च्या गटाला नविन आलेल्या लोकांना आपल्याकडे वळवण्यात काहीच रस दिसत नाही. त्यांच्यात्ल्या त्यांच्यातच मीमीतूतू करत बसलेत वेड्यासारखे.
पण मेघाची स्ट्रॅटेजी मोस्टली
पण मेघाची स्ट्रॅटेजी मोस्टली बरोबर असते. ती बरोब्बर सेफ खेळते बुद्धीबळ खेळल्यासारखी.
आणि ती विविध अंगानी विचार करून ठरवते ते बरोबर असतं. पुष्की आणि सई इतके हुशार असते तर कशाला?
मेघा खरोखरी जेन्युइन आहे मैत्री राखण्याच्या बाबतीत.
>>एखाद्या पोराने त्याच्या
>>एखाद्या पोराने त्याच्या मैत्रीणीची नेहमी बाजु घ्यावी म्हणुन त्याला बाईल्या म्हणने मला पटत नाही..
हे तुम्ही काढल्ले अनुमान (तर्क) आहे.
तो बाईल्या आहे याची कारणे वेगळी आहेत.. mostly gyus will understand what I am talking about.
असो.
>>तोवर आऊ ने तिला हसून हाय पण केले. रडू गायब
सर्व पोरांनी ठरवले तर आ ऊ ला एका आठवड्यात आ ऊ ट करू शकतात.. पण संस्कार आडवे येत असावेत. स्वतःचा फक्त गेम खेळायचा तर दुसर्यांच्या मदतीशिवाय खेळता येत नाही.. आणि दुसर्यांबरोबरीने वा त्यांच्यासाठी खेळला तर स्वतःचे नुकसान होते खेरीज ग्रूपिझम चा आरोप लागतोच अशा कात्रीत सगळे जण सापडले आहेत. आ ऊ मात्र मस्तपैकी दोन्हीकडून फायदा घेते. आणि सेफ रहाते.
तिथल्या स्पर्धकांना सांगा रे (नाना परिंदा मोडः)
धंदे मे (टास्क) कोई किसी का भाई बेहेन या दोस्त नही होता..
या घरात जिंकण्यासाठी फक्त दोनच व्यक्ती खेळत आहेत from day one: मेघा (स्वबळावर) आणि आ ऊ (दुसर्यांच्या गुड विल वर). यांना टशन देऊ शकणारी तिसरी म्हणजे रेशम. तीच्या अनुभवापूढे व डिप्लोमसी पुढे खरे तर ईतर सगळे बच्चे आहेत. पण ती तितका किलर गेम खेळत नाही. I have feeling she will slowly and very subtly control all the dynamics in this house with her diplomacy and abiity to stay calm. The way she has made bridge with Sai and was giving her comfy talk.. in business books this is perfect diplomacy to win by getting ur direct threat and strongest opponents to slowly mould and mend to your ways. The only way to do this is by cajoling their Ego but staying firm with your position and assuring support wth their weakness thus making them feel more vulnerable and dependant on you.
In case anyone missed: Mahesh said Well Played Resham. There was lot of read bewteeen the lines there! watch out] राजेश गेल्यापासून सडनली रेश्म कुणाच्याच हिट लिस्ट वर विशेष नाहीये..
For me top 3 contestant at this stage are: Megha, Resham, Astad
बाकी सगळ्यांची नुसतीच सर्कस सुरू आहे.
योग, तुमच्या पोस्ट मधला
योग, तुमच्या पोस्ट मधला बाईल्या हा शब्द नाही आवडला.. एखाद्या पोराने त्याच्या मैत्रीणीची नेहमी बाजु घ्यावी म्हणुन त्याला बाईल्या म्हणने मला पटत नाही.. करायला स्मितासुद्धा सर्वांची कामे करते..अगदी भरपूर करते पण त्या कृतीला शब्द नाही कारण मुलींनी कामे करणे हे आपल्या समाजात जस्टिफाईड वाटते अन पोरांनी कामे केली वा फेवर केले तर बाईल्या? याला काही अर्थ नाही..
Submitted by टीना on 4 June, 2018
>>>>>>>>>>>>>
टीना... सहमत तुमच्या मताशी...
नंबर एकचा बाईल्या आहे. हा
नंबर एकचा बाईल्या आहे. हा भुंगा आता कुठल्या फुलावर बसणार?
Submitted by योग on 4 June, 2018
>>>>>>>>>>>>>
आपणच मागे कुठे तरी मांडलेल आठवत की वैयक्तीक स्वरूपाच्या पोस्ट्स व नकारात्मक सोयीस्कर प्रतिक्रीया पाहून आश्चर्य वाटते इ.
व इथे नेमके तेच होताना दिसत आहे...
Pages