Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162
या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे
"शर्मिष्ठा राऊत"
'नन्दकिशोर चौघुले'
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो हा टास्क आवडला मला. यात
हो हा टास्क आवडला मला. यात टीम अशा काही नाहीयेत, इन्डिव्हिजुअल गेम दिसतोय. पण यातून नॉमिनेशन वर कसा परिणाम होणार कळले नाही. सामान्य जनता जे आहेत ते खून झाला की नॉमिनेट होणार का? आस्ताद फार ऑब्व्हियस खेळत आहे. सुशांत सहज ओळखेल तो खुनी आहे असे वाटते , की झाला मग कॅप्टन आणि सेफ!!
फोटो लपवणे, जेवण भरवून घेणे, खारट जेवण देणे हे सहज करण्यासारखं होतं. ते रडवणे आणि किस करायला लावणे हे उलट सगळ्यात अवघड आहे, ते का आधी करायला गेला आस्त्या?!! स्मिता, जुई यांपैकी कुणाला तरी खुनी बनवायला हवं होतं. हार्मलेस फेस असलेले किलर्स. सई डिटेक्टिव हवी होती.
सई अतिशय मस्तं मुद्देसूद बोलते बिग बॉसशी आणि वीकेन्डच्या डावात म.मांशी सुध्दा , फार हुषार आणि क्लिअर आहे ती. >>> +१११ फार बरोब्बर बोलते ती. मेघाला चटकन मुद्देसूद नाही बोलता आले रेशम समोर पण सई ने मुद्दे छान मांडले. हखालाही भाषा नीट वापर वगैरे सांगितल्यावर तिने लगेच उलट उत्तर दिले.
बहुतेक सगळयांनी एकमत आणि बहुमत यात गोंधळ केला. जर एकमत नाहीच झाले तर काय करायचे हे कुणालाच माहित नव्ह्ते. तसे झाले तर दोघेही नॉमिनेट होतात (होत असतील तर) हे कळले असते तर लोकांनी स्ट्रॅटेजी बदलली असती.
ऋतुजाची ती नेमप्लेट आहे की
ऋतुजाची ती नेमप्लेट आहे की काढली? >>> आहे अजुन... त्यामुळे होप्स आहेत परतीचे
>>रे आणि हखा ला भांडायला कोणी
>>रे आणि हखा ला भांडायला कोणी तरी तोंडफट बाई पाहिजे.
करेक्ट! म्हणूनच ठेवतील तीघींना टी आर पी साठी.
सगळेच पुष्कर सारखे फेयर गेम खेळत बसले तर घराची आदर्श शाळा होईल पण रेटींंग्स ची मात्रं घसरगुंडी होईल..
योग तुझी पोस्ट आवडली मागच्या
योग तुझी पोस्ट आवडली मागच्या पानावरची. फारच अॅनालिटिकल आहे
>>पण यातून नॉमिनेशन वर कसा
>>पण यातून नॉमिनेशन वर कसा परिणाम होणार कळले नाही. सामान्य जनता जे आहेत ते खून झाला की नॉमिनेट होणार का?
खून झालेले नॉमिनेशन साठी पात्र ठरू शकतात एव्हडेच बि बॉ च्या नियमात ऐकल्याचे आठवते.
>>आस्ताद फार ऑब्व्हियस खेळत आहे. सुशांत सहज ओळखेल तो खुनी आहे असे वाटते , की झाला मग कॅप्टन आणि सेफ!!
करेक्ट! हेराने खूनी शोधला की हेर सेफ.. थोडक्यात बि बॉ ने मुद्दामून आस्ताद, सुशांत, व स्मिता या तीघांना एकमेकाविरुध्द ऊभे केले आहे.. कारण हेर जिंकला तर खूनी नॉमिनेशन साठी पात्र किंवा व्हाईस व्हर्सा.
>>बहुतेक सगळयांनी एकमत आणि बहुमत यात गोंधळ केला. जर एकमत नाहीच झाले तर काय करायचे हे कुणालाच माहित नव्ह्ते. तसे झाले तर दोघेही नॉमिनेट होतात (होत असतील तर) हे कळले असते तर लोकांनी स्ट्रॅटेजी बदलली असती.
मला वाटते या बाब्तीत बी बॉ ने मुद्दामून संदीग्धता ठेवली आहे.. if everything is black and white then there won't be much controversy... बहूमत वा एकमत यात देखिल वाद रंगला आहे. बी बॉ ला विचारले सुशांत व आस्ताद ने की एकमत नसेल तर बहूमताने निर्णय घेता येईल का? यावर त्यांचे काहीच ऊत्तर आले नाही...
पंचायतीचा सर्वानुमते निर्णय आहे हे सांगताना सुशांत बाकी सारांश चांगला करतो.
रच्याकने: आस्ताद ला काय खूनाचे टास्क दिले आहेत जरा कुणी परत पोस्टेल का ईथे?
या खून टास्कमध्ये मात्र सुशांत व स्मिता ला कॅमेरा देऊन बी बॉ ने खूनी ओळखण्याचे काम थोडे सोपे केले आहे. पण त्यातही खून झालेल्या व्यक्तीने ईतरांशी चर्चा करणे व खूनी कोण याबाबत आपले मत देणे हे चालेल का असे काही ठोस नियमात दिलेले नाही..
असो.
>>योग तुझी पोस्ट आवडली
>>योग तुझी पोस्ट आवडली मागच्या पानावरची. फारच अॅनालिटिकल आहे Happy
C management- can't help!
स्मिताको मत बोलो कलरके उपरसे,
स्मिताको मत बोलो कलरके उपरसे, मला सुशांतला दिला मणी तेव्हाही काळा वाटला आणि तिचाही, मी म्हणालेही की निळा रंग कुठे हा सुशांतच्या वेळी आणि मग प्रकाश पाडला स्मितावेळी तेव्हा नेव्ही ब्लू असावा अशी शंका आली. मै भी स्मिता जैसी किंवा माझ्या tv ने मला हे रंग दाखवले
आस्तादने मेघाचा फॅमिली फोटो
आस्तादने मेघाचा फॅमिली फोटो गायब करायला पाहिजे होता.. पहिला धोका तिथेच टाळला असता. कारण रे-गॅंग एवढी स्मार्ट नाही. त्यांना अजून संशय येत नाहीये आस्तादचा.. मेघा पुष्करनी लगेच ओळखलं.
किस साठी पुष्करला पकडायला पाहिजे होतं.
आस्ताद खुनी म्हणून अजूनतरी
आस्ताद खुनी म्हणून अजूनतरी नीट नाही खेळला, एकदम सोपं करू शकला.
सुशांतने पण ओळखलं ना खुनी कोण
सुशांतने पण ओळखलं ना खुनी कोण, पुष्कर त्याला म्हणाला की acting करतोय तेव्हा.
हो बिबॉला त्याला कॉल करुन
हो बिबॉला त्याला कॉल करुन सांगावे लागले कि लोकांमधे रहा म्हणजे तुझ्यावर संशय नाही येणार, काम सोपे होईल.
आस्ताद ला काय खूनाचे टास्क दिले आहेत जरा कुणी परत पोस्टेल का ईथे?
१. एकाला रडवायचे आहे.
२. स्मिताला एका पुरुष सदस्याला पप्पी द्यायला लावणे.
३. एका सदस्याला खारट जेवण खायला भाग पाडायचे आहे.
४. घास भरविणे आणि भरवून घेणे.
५. एका सदस्याचा फोटो चोरणे.
मेघा खूप डाऊन झालेली, मनाला
मेघा खूप डाऊन झालेली, मनाला फार लागलेलं पण पुढे पाय घट्ट रोवून उभी राहिली. हा तिचा नक्कीच चांगला गुण आहे, फोकस्ड आहे ती. पण नॉमिनेशनला कायम घाबरते, यावेळी तिचे मुद्दे योग्य होते, पण एरवीही ती घाबरते. त्यामुळे वर कोणीतरी लिहिल्याप्रमाणे हे मात्र तिला माहिती नाही, बाहेर फुल टू पब्लिक सपोर्ट तिला आहे, हे तिच्या लक्षात नाही आले, सईला बाहेरचा माहोल पूर्ण लक्षात आलाय पण सई फार attitude दाखवतेय तिला.
खूनी ओलखला तरी पुरावे द्यावे
खूनी ओळखला तरी पुरावे द्यावे लागतील ना. म्हणून कॅमेरा दिलाय त्यांना.
पुष्करचा खून झाला हे सांगितले तेव्हा तो मेघा बरोबर स्वच्छतागृहात खूनी कोण यावर चर्चा करत होता. तेव्हा स्मिताने मेघाचा फोटो काढला. तिथून तो लगेच बाहेर बागेत गेला. त्यामुळे त्याचा फोटो गायब झालाय हे सुद्धा कोणाला कळण्याची शक्यता नाही. बाहेर आल्यावर सुशांत त्याच्या अंगावर काही खूणा आहेत का ते चेक करत होता पण चौकशी करताना नाही दिसला.
गुप्तहेराचा खून करायला मनाई आहे ना? म्हणून सु ला रडवता नाही येणार.
तेव्हा स्मिताने मेघाचा फोटो
तेव्हा स्मिताने मेघाचा फोटो काढला. >>> हो का, हे हुकलं माझं मग आहे की नाही आमची स्मिता हुशार
.
आता ह्यावेळी एलिमिनेशन नाही,
आता ह्यावेळी एलिमिनेशन नाही, नाहीतर सुशांत गेला असता. रेशम, सुशांत आणि जुई, कडू पहिले आता बाहेर पडायला हवेत एकापाठोपाठ.
तो नमूद केलेल्या जागी जात
तो नमूद केलेल्या जागी जात असताना मागे ती मेघाचा फोटो काढत होती आणि मेघा फोटोसाठी पोझ देत होती.
ओहह मग काय उपयोग.
ओहह मग काय उपयोग.
पु स मे गटाला आपल्या मतावर
पु स मे गटाला आपल्या मतावर ठाम राहता नाही आले. मे ने अभ्यास केलाय तर तिला कळायला हवे कि रुतुजा बाहेर पडल्यामुळे एलिमीनेशन होणार नाही आणि एकमत जाहीर केले नाही तर दोघेही नॉमीनेट होतील. यावेळेस कोणीही बाहेर जाणार नाही तर होऊ दे दोघांना नॉमीनेट.
राहता राहिला सईच्या बातीत मुद्दा....कि ती कामे करत नाही. त्यांनी ते लगेच मान्य केले. तेव्हा बोलले असते कि तिचे काम दुसरे कोणीतरी करते मग काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही करु नका तिची कामे मग ती आपोआप करेल. तसेच काम होते आहे कोणाचे काही अडून राहत नाही.
श्या यांना भांडताच येत नाही!!!
मेघा काल सईसाठी गाण गात होती,
मेघा काल सईसाठी गाण गात होती, ' हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा, सोड ना अबोला.'
स्मिताने भुषणला पप्पी दयायला big boss ने सान्गितल. टरकी आहे मेल big boss.
is फाटयावर मारणे not a nice word? हखाने हा शब्दप्रयोग माबोवर वाचला होता वाटत. आधी तिच्या प्रिय मैत्रिणीला रे ला शब्दान्चा वापर नीट कर सान्ग म्हणाव.
आस्ताद ने स्मिताला पप्पी दयायला सान्गितल तर रेशम विचारत होती, 'मी देऊ का पप्पी भुषणला?'
अजून एक मुद्दा पोलाईटनेस
अजून एक मुद्दा पोलाईटनेस स्मिता कडे आहे, सईकडे नाही हेही पुष्कर मेघाने मान्य केलं.
सई मोलकरीण म्हणाली स्मिताला, स्वतः दुसऱ्याला कामे सांगते तेव्हा ते नोकर होतात का तिचे. स्मिताचं हेल्पिंग नेचर आहे म्हणून ती काय मोलकरीण ठरते का.
हर्षदाला घराबाहेर काढायला हवं
हर्षदाला घराबाहेर काढायला हवं आहे. तिला पण पब्लिक सपोर्ट नाही आहे त्यामुळे तिचा फाजिल आत्मविश्वास लवकरच मावळेल असं वाटतंय.
येस.. हखा ला काढा बाहेर.
येस.. हखा ला काढा बाहेर. नॉमीनेत झाली की होईल बाहेर.
हर्षदाचं काय झालंय, रेशमच्या
हर्षदाचं काय झालंय, रेशमच्या मनात स्थान मिळवायचं आहे परत त्यासाठी उगाच कारण नसताना सईला बोलतेय पण मूर्ख एवढी की गेम खेळायला आली असशील तर बाहेर तुझीच प्रतिमा बिघडतेय, हे सोशल मिडिया कमेंटवरून लक्षात यायला हवं होतं तिला (मीन्स आताच्या नाही आधीवरून असं होऊ शकते हा अंदाज असायला हवा तिला असं म्हणायचं आहे). ही हर्षदा असं वागत राहिली तर रेशम, सुशांतच्या आधी पब्लिक हिला बाहेरचा रस्ता दाखवेल.
रे आणि हखा ला भांडायला कोणी
रे आणि हखा ला भांडायला कोणी तरी तोंडफट बाई पाहिजे. >>> म्हणूनच तर शर्मिष्ठा राऊत येतेय ना.
आस्ताद येडाच आहे. पहिला खून जाहिर झाल्या झाल्या लगेच गार्डन मध्ये आला सफरचन्द खात खात. त्याला वाटत असेल आपण किती शातिर खूनी आहोत. आपण पुष्करचा खून केलाय हे कोणालाच कळले नाही.
तुनळी एक लिन्क सान्गतेय की आज रे चा खून होणारे. दुसरी लिन्क मेघाचा बड्डे सेलिब्रेट करताना दाखवली आहे.
आणायच तर पोरगा आणा एखादा
आणायच तर पोरगा आणा एखादा चिकना नॉन मराठी ! >>> म्हणजे रिषी सक्सेना.
यायला हवेत ना, बरेच जण तयार
यायला हवेत ना, बरेच जण तयार नसतात यायला.
राऊतबाई का येतायेत, मला आवडत नाहीत त्या.
काल चार आठवड्यानंतरहि स्मिता
काल चार आठवड्यानंतरहि स्मिता नर्वस आणि प्रचंड दडपणाखाली आहे हे जाणवतं. अंधारात निळ्याचा काळा एकवेळ ठिक आहे पण कॅमेरा कसा ऑपरेट करायचा यातहि तीचा गोंधळ झाला.
"खुनी कोण" या टास्कमधे खरा खुनी करमचंदची किट्टी पण ओळखु शकेल अशी परिस्थिती आहे. सगळे सामान्य नागरिक आणि डिटेक्टिव मस्त हात-पाय सोडुन आराम करतायत आणि खुनी धावपळ करतोय. श्रेक मधला डाँकि "पिक मी, पिक मी" म्हणंत उड्या मारतो तसा. सुशांतने आस्ताद खुनी आहे असं बोलुन दखवलं, स्मिताला हि क्ल्पना आली असेलच. आस्तादने बिग्बॉसच्या समोर चॅलेंजिंग रोल मिळाला तर उत्तमरित्या पार पाडेन, अशा फुशारक्या मारलेल्या पण एकंदरीत त्याचा अप्रोच बघता वर लिहिल्या प्रमाणे त्याचा पोपट झालेला आहे...
मेघाचा आउटबर्स्ट हे तिचं खरं रुप आहे. ओढुन-ताणुन आणलेली मचुरिटी कशी गळुन पडते, याचं एक चांगलं उदाहरण. क्रायसिस सिच्युएशन्मध्ये तुम्ही स्वतःला कसं कॅरी करु शकता हा महत्वाचा गुण बिग्बॉसच्या घरात पडताळला जातो. आजच्या तारखेला घरात १२-१३ लोकं आहेत. ग्रुपिझम निषिद्ध असला तरी या स्टेजला तुम्ही स्वतःच्या ताकदिवर टिकुन राहु शकत नाहि. यु गॉट टु बी इदर इन ऑर आउट ऑफ ए पर्टिकुलर ग्रुप. सोलो गेम्प्लॅन्स सुरुवातीला चालत नाहित; ग्रुपमधे राहुन इंडिविज्युली शाइन होणाराच पुढे जातो. थत्तेंचं उदाहरण फार जुनं नाहि...
हखा आल्यापासून पुष्कर, सई
हखा आल्यापासून पुष्कर, सई आणि मेघाची एकसारखी मुस्कटदाबी सुरू आहे. काहीही झालं की बोलण्यापासून ते कपड्यापर्यंत कोणतंही कारण काढून हर्षदा या तिघांना बोलतेय.
रेशम मात्र पादली तरी... "किती सुवासिक पादलीस" म्हणायला ही हखा कमी नाही करणार
>>१. एकाला रडवायचे आहे.
>>१. एकाला रडवायचे आहे.
२. स्मिताला एका पुरुष सदस्याला पप्पी द्यायला लावणे.
३. एका सदस्याला खारट जेवण खायला भाग पाडायचे आहे.
४. घास भरविणे आणि भरवून घेणे.
५. एका सदस्याचा फोटो चोरणे.
@sonalisl
धन्स!
मर्डर मिस्ट्री खेळाबाबात अजून काही क्लॅरिफिकेशन्सः
सदस्य (नागरीक):
ज्याचा खून झाला आहे तो सदस्य आपल्या खूनाबद्दल ची चर्चा दोन पैकी एका आवडत्या गुप्त हेरा बरोबर करू शकतो. या सदस्याला बाहेर गार्डन एरीयात पडून रहायचे व फक्त ऊकडलेले पदार्थ खायचे आहेत.
खून झालेला सदस्य नॉमिनेट होऊ शकतो/परिणाम नॉमिनेशन वर होऊ शकतो.
हेरः
एका हेराने दुसर्या गुप्त हेरा विरुध्द खेळायचे आहे.. म्हणजे दुसर्या हेराशी संगनमत करता येणार नाही.
हेर फक्त दहाच फोटो काढू शकतो.
खून झालेल्याला चौकशी कक्षात (कॅप्टन रूम) मध्ये आणता येणार नाही.
हेर यशस्वी झाले तर कॅप्टन चे ऊमेदवार ठरणार. [नाही झाले तरी मुद्दामून त्यांचे नॉमिनेशन होणार नाही..]
खूनी:
गुप्त हेरा चा खून करता येऊ शकत नाही
१. कुणाला तरी एका सदस्याला रडवायचे आहे.
2. कुणाला तरी जेवण भरवणे आणि त्या व्यक्तीकडून जेवण भरवून घेणे.
3. कुणाच्या तरी कुटूंबाचा फोटो लपवणे.
४. स्मिता ला घरतील कुठल्याही पुरूष सदस्याच्या गालावर कीस करायला तयार करणे [म्हणजे प्रत्यक्ष कीस घ्यायलाच पाहीजे असा अर्थ निघत नाही..?]
५. कूणाला तरी खारट जेवण जेवायला लावणे
खूनी यशस्वी झाला तर कॅप्ट्न प्रक्रीयेत ऊमेदवार ठरणार. शिवाय पुढील आठवड्यातील नॉमिनेशन मधून ईम्न्यून.
आस्त्या गंडणार. सर्व टास्क्स
आस्त्या गंडणार. सर्व टास्क्स पूर्ण करणे त्याला जमणार नाही. गुप्तहेर दोघेही गंडके. त्यांना खुनी शोधायला जमणार नाही. म्हणजे ज्यांचा खुन झालाय त्यांचा बळी विनाकारण.
Pages