बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या आठवड्यात दोन लोक बाहेर गेल्यामुळे बहुतेक हा नो एलिमिनेशन वीक असेल... पण या वेळची नॉमिनेशन्स पुढच्या आठवड्यातही कायम राहतील.... आणि पुढच्या आठवड्यात या वेळचे नॉमिनेटेड लोक आणि पुढच्या आठवड्यातील नॉमिनेशन्स मिळून आख्खे घरच नॉमिनेटेड असेल बहुतेक Wink

सुशांतचा जनसंपर्क (फॅन फॉलोइंग नाही) आस्तादपेक्षा जास्त असावा.... त्यामुळे आस्तादचा नंबर लागू शकतो!

रेशम काही इतक्यात जात नाही.... आणि मेघाही नाही!

जनतेचे votes गृहीत धरले इमानदारीत तर मेघा फायनलला असणार आणि जिंकेल ती असं वातावरण दिसतंय सोशल मीडियात. मला पुष्कर जिंकलेला आवडेल पण पुष्कर फायनलला जाईल की नाही काय माहिती.

>>सई बालिशपणे मेघा आणि पुष्करवर रागवली आहे नॉमिनेट झाली म्हणून, अरे त्यांचा काय दोष? Uhoh तिच्या स्वतःत इतक्या गोष्टी कमी आहेत त्याचा विचार करायला हवा होता ना? बिग बॉस च्या घरात काहीही शेकू शकतं तुमच्यावर.

मित्रांनी तिच्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत मग वाईट तर वाटणारच ना!
आणि मनात ठेउन कुढत बसण्यापेक्षा express केलेले काय वाईट आहे?
मला तर ते खुप नॅचरल वाटले
खुप गोष्टी तिच्या बाजूने आणि स्मिताविरुद्ध बोलता येण्यासारख्या होत्या.... आमचे मत सईला आहे पण बहुमताने निर्णय घ्यायचा असेल तर आपण सईला नॉमिनेट करुया.... हा स्टॅंडही पटण्यासारखा होता पण या दोघांनी सपशेल शरणागतीच पत्करली!
तिच्यासाठी आणा रे कुणीतरी स्वप्नातला राजकुमार वगैरे!

सई चं कसं आहे, मागच्या विक मध्ये तिची ऑफर रेशमने स्वीकारली असती तर ती रेशमताई, रेशमताई करत बसली असती. आता रेशमला पण चुटपूट लागली असेल पण बरं झालं, नाहीतर राजेश घरात असता.

सुशांत कुठल्या पार्टीशी संबंधित आहे का? राजकारणात जाणार असे ऐकलेले. तसे असेल तर त्या पार्टीचे कार्यकर्ते bulk voting करत असतील त्याला वाचवायला.

या दोघांनी सपशेल शरणागतीच पत्करली! >> Uhoh
नाही बरं का, मेघा आणि पुष्करने बर्‍यापैकी लावून धरले होते, पण बाकी लोक सई च्या विरूद्ध होते म्हणून त्या दोघांचे काही चालले नाही. (७ विरूद्ध २)

अरेरे आस्ताद नको, सुश्याला जाऊ द्या घरी. आस्ताद ने स्पीच मस्त दिले काल.
रेशम ने काहीच्या काही थयथयाट केला.
पुन्हा ते राजेश शी नुस्ती शुद्ध मैत्रीच आहे क्रॅप. चिखलफेक केली म्हणे! काहीही. डिनायल का काय हे?!
तिने हर्षदाबद्दल पण आस्ताद सोबत बसली असताना बिचिंग केलं. आउट ऑफ कन्ट्रोल झाली आहे ती.
मेघाने तिथल्या इथे उत्तरं द्यायला हवी होती असे वाटले.
आता परत वाइल्ड कार्ड मधे बाई च येतेय? का? का??

Task आहे काहीतरी. आस्ताद गेम खेळतोय.>>> हो.. मर्डर मिस्टरीचा टास्क आहे.. सांकेतिक खून करायचे आहेत

हो.. मर्डर मिस्टरीचा टास्क आहे.. सांकेतिक खून करायचे आहेत >> तुम्हा लोकांना हे आधीच कस्काय कळतं? Uhoh ती हर्षदा येणार होती तेव्हा पण मी विचार करून थकले म्हटलं कोण असेल, तर इथे लोकांनी तिचे फोटो पण टाकले.

रेशमला 'मेघा कशी अयोग्य आहे' हे सान्गायच होत, स्वतःचा पर्सनल स्कोर सेटल कर तिच्याशी' अस सान्गितल नव्हत. मेघाला nominate करायच सोडून स्वतःच दुख्ख उगाळत बसली हि बाई.

तिची मेघाच्या छोटया कपडयान्बद्दल कमेण्ट पटली नाही. ति स्वतः सुद्दा असे कपडे घालते. तिची प्रिय मैत्रीण हर्षदा एन्ट्रीच्या वेळी काय घालून आली होती? तिच्या ग्रुपमधल्या स्मिता, जुई ( कधी कधी) सुद्दा असले कपडे घालतात तेव्हा तो adult show नाही होत वाटत? रेशम Entertainment industry त असुन सुद्दा तिचे विचार बुरसटलेले आहेत. दुट्प्पी कुठली?

काल राजेशची abp माझा वर मुलाखत पाहिली. त्याला विचारल, घरी आल्यावर प्रथम तु काय केल? राजेश: बायकोला मिठी मारली. Proud

पुन्हा wild card ची सन्धी मिळाली तर नक्कीच परत येईल. पण यावेळी वेगळी strategy घेऊन मी परत येईन असेही म्हणाला तो ( काही गरज नाही परत यायची. Angry )

वारा फिरेल तिकडे पाठ फिरवणारी एक जात असते ती म्हणजे राजेश.
बिबॉच्या घरात रेशम समोर बाकी काही दिसत नव्हते त्याला, एकांतवासात पोरी आणि बायको आठवल्या, बिबॉकडे परतला तर पुन्हा रेशम चे गाणे, आता बाहेर गेला तर बायको. बरंय! Uhoh

मित्रांनी तिच्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत मग वाईट तर वाटणारच ना!
आणि मनात ठेउन कुढत बसण्यापेक्षा express केलेले काय वाईट आहे?
मला तर ते खुप नॅचरल वाटले >>>>> आता ती चिडून रेशमच्या ग्रुपला जाऊन नाही मिळाली म्हणजे मिळवल. वाटल्यास तिने individually खेळाव.

आस्ताद जाणार नाही. बि बॉ च्या घरात लग्न लावून देतील त्यांचे. >>>> स्वप्नाली सुद्दा येणार आहे का बि बॉ मध्ये? Uhoh

काय ग दक्षे, खर खर सान्ग हा, त्या सायली च्या नावाने तु तर नाही ना फोन केलेला? Wink

>>जाणार का आस्ताद ???<<

त्या बातमीवरुन तरी ती नौटंकि वाटतेय. आस्तादने गर्ल्फ्रेंडचं नांव जाहिर केलं म्हणुन तीचं ताबडतोब लग्न लावुन देत आहेत. Lol बिग्बॉस टीमच्या क्रियेटिव आय्डियाज संपल्या काय?..

तरीहि सध्याचं नॉमिनेटेड पूल पहाता आस्ताद खतरेमे है. सई, रेशम, सुशांत, आउ यांच्यासमोर तो कदाचित टिकणार नाहि...

कालच्या नॉमिनेशन टास्कमध्ये रेशम कंप्लिटली डिस्ट्रॉय्ड मेघा. बिग्बॉस डेफिनिटली म्हणत असेल - धिस इज व्हाट आयॅम टॉकिंग अबौट... Happy

हो.. मर्डर मिस्टरीचा टास्क आहे.. सांकेतिक खून करायचे आहेत >>>> आधीच फिजिकल टास्कसच्या नावाने दोन तीन जणान्चे सान्केतिक खून पाडले आहेत ते काय कमी होत का म्हणून हे नवीन!

ऋतुजा परत यायला हवी यार.

>>काल राजेशची abp माझा वर मुलाखत पाहिली. त्याला विचारल, घरी आल्यावर प्रथम तु काय केल? राजेश: बायकोला मिठी मारली. Proud
मस्त.
>>पुन्हा wild card ची सन्धी मिळाली तर नक्कीच परत येईल. पण यावेळी वेगळी strategy घेऊन मी परत येईन असेही म्हणाला तो
आमेन! Happy

काय ग दक्षे, खर खर सान्ग हा, त्या सायली च्या नावाने तु तर नाही ना फोन केलेला? >> सुलू यार मी फोन वर नाही प्रत्यक्ष विचारेन त्याला Proud

पुन्हा wild card ची सन्धी मिळाली तर नक्कीच परत येईल. पण यावेळी वेगळी strategy घेऊन मी परत येईन>>>कशाला ?? Angry तू नकोयास म्हणूनच एलिमिनेट झालास तू ..
एकदा एलिमिनेट झालेल्याना परत घेत नाहीत नं ? अगदी वाइल्ड कार्ड मधून हि ??

अजून कालचा भाग पहिला नाही ,.. मेल्याने लवकर अपलोड नव्हता केला Sad

पुन्हा wild card ची सन्धी मिळाली तर नक्कीच परत येईल. पण यावेळी वेगळी strategy घेऊन मी परत येईन>>>कशाला ?? Angry तू नकोयास म्हणूनच एलिमिनेट झालास तू .. >>>_+++ १११११११११११
एकदा एलिमिनेट झालेल्याना परत घेत नाहीत नं ? अगदी वाइल्ड कार्ड मधून हि ?? >>>> त्या मुलाखत घेणारीने विचारल की तुम्हाला पुन्हा wild card म्हणुन जायला आवडेला का घरात? Angry

मेघा आज कदाचित(?) नॉमिनेट होईल या नुसत्या कल्पनेने देखिल तीच्या बरोबर तीचे पंखे पण भिरभिरलेले दिसतात...
Submitted by योग

>>>>>>>>
कदाचीत मेघा विरोधीना गरगरल्या मुळे असेल.... Lol Lol

मेघा जरी नॉमीनेट झाली तरी तिच फॅन फॉलोइन्ग जबरदस्त आहे..

>>मेघा जरी नॉमीनेट झाली तरी तिच फॅन फॉलोइन्ग जबरदस्त आहे..
अरे वा! मग हे तीला पट्कन सांगा बघू,... ऊगाच एव्हडी स्ट्रेस घेत आहे नॉमिनेशन चा. एव्हडं काय घाबरायचं त्यात? Happy

>>मेघा जरी नॉमीनेट झाली तरी तिच फॅन फॉलोइन्ग जबरदस्त आहे..
अरे वा! मग हे तीला पट्कन सांगा बघू,... ऊगाच एव्हडी स्ट्रेस घेत आहे नॉमिनेशन चा. एव्हडं काय घाबरायचं त्यात?

नवीन Submitted by योग
>>>>>>>

मज्जाच कराता बघा तुमी.. तिला एवढा सपोर्ट आहे कळल्यावर स्ट्रेस घेइल का बर ती, हो की नई....... ह्म... Lol Lol

तुम्ही आपल ताई ला सांगा पाहु उगाच स्ट्रेस घेते.. किती तो बिपी वर खाली झाला असेल...

मला वाटते ती खरी हुषार असेल तर तिला एव्हाना समजले असावे की तिला फॅन फॉलोविंग आहे. सई कशी काल सहज म्हणाली मी सेफ होईन. ममांच्या बोलण्यातून तिने योग्य अर्थ काढले आहेत. तिचे पंचायत च्या वेळेचे स्पीच पण तेच होते. ती रेशम च्या ओवरकॉन्फिडन्स बद्दल ही बोलली, की ममांच्या बोलण्यावरून हिला कळले नाही का की लोकांना तिचे वागणे आवडत नाहीये ते.
आस्ताद ने हुषारीने सुशांत ला नॉमिनेट केले असेल का? कारण आस्ताद आधीच नॉमिनेट झाला होता आणि पुष्कर पण नॉमिनेट झाला असता तर मेघा सई, पुष्की च्या स्पर्धेत आस्ताद च बॉटम ला आला असता. सुशांत ला नॉमिनेट करणे हा स्मार्ट चॉइस होता.

Pages