बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह! मग या टास्क मध्ये जिंकलेल्यांच्या तोंडाला पाने पुसणार का? त्यांना तर काल सांगत होते की जिंकलात तर कॅप्टन्शिप साठी उमेदवार असाल म्हणून. >> काय की!

कोण आहे शर्मिष्ठा?
कायमची कॅप्टन म्हणजे कधी बाहेर जाणारच नाही का? बिबॉला काहीही झेपत नाहीये याची पावती का ? रा ला परत आणला, अद्वातद्वा बोलणारी हखा आणली पण तरी ओपिनिअन स्क्यु होत नाहीये. बि बॉ कोण जिंकणार याचं अ‍ॅग्रीमेंट करतात का काय कोण जाणे!

बड्डे गर्ल खूप सुंदर दिसत होती. तिला माफक मेकअप छान दिसतो. उगाच एरवी फासत असते.

आमची स्मिता कित्ती हुशार Wink bb ने task द्यायच्या आधीपासूनच मेघा खुनी आहे गृहीत धरलं तिने. आस्तादने चौकशीत तिला दोन मिनिटांत उल्लू बनवलं Lol

पण छान ग्रेसफुल गुप्तहेर दिसत होती स्मिता.

सई छान खेळली. रेशम आणि हर्षदाचा खून मस्त होता, बाकी इझी होते.

ओह ती जुयेरेगा मधली आणि चि. व चि. सौ कां मधली बहीण!!!! बाप रे भयाण डोक्यात जाणारे प्रकरण आहे! हखा आणि ती ! काय शोधल्यात नुस्त्या!! Uhoh
कायमची कॅप्टन नसेल. मला वाटते १-२ आठवडे करतील. तसेही हखा ला पण २ आठवडे दिलीच त्यांनी इम्म्युनिटी.

सुशांत गुप्तहेर म्हणून लाडका सर्व खुन्यांचा.

मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता.

मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता.>> +१
होतकरु खुनी आस्ताद याचा मुडदे पाडण्याचा वेग पाहता बिबाॅ ला वाटलं की हे एकट्याचं काम नाही. हा अजून ४-५ दिवस निवांत खून करत राहिल. अनायसे मेघाचा वाढदिवस असल्याने तिला पाठवलं मदतनीस म्हणून. ती तर सिरियल किलरच निघाली! सटासट मुडदे पाडले. ते ही एकदम बाल भी काटे और पता भी नहीं चला स्टाइल मधे !
सईची मोंजोलिका आणि भूषण चे माकडचाळे मजेशीर . स्वत:हून अडकला भूषण त्यामुळे.

सारखं सिनियर सिनियर करते ना.. म्हणून बहुतेक मेघा आऊंच्या आधी हर्षदाच्याच पाया पडली Wink

कालच्या एपिसोडनंतर सेकंडहँड मोबाईलचं मार्केट एकदम डाऊन झालंय. लोकं घाबरतायत - न जाणो आपण निवडलेला मोबाईल नेमका आधी अस्तादनं वापरलेला असेल तर?

आस्ताद सगळी जबाबदारी मेघावर सोपवून रिकामा झाला. फक्त हे सोपे आहे ते सोपे आहे अशा कॉमेंट्स देत होता. मेघाने वाढदिवशी सटासट खून पाडले.
स्मिताचे संकेताने खून आणि सांकेतिक पद्धतीने खून यात बहुदा गफलत झाली . बाकी सगळ्यांचा आवडता गुप्तहेर सुशाच होता. स्मिता खरच क्यूट आहे.

मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता.>> +१
अणि विशेष म्हणजे groupism ला chance नाही... Individually खेळा अणि बुद्धी वापरा...

कालचा एपिसोड बघून मला असे वाटले की ह्यांची भांडणे स्क्रिप्टेड असावीत. काल जेव्हा मेघाचा केक आला तेव्हा रेशमकडे बघत होते मी. तिच्या चेहर्‍यावर राग वगैरे अजिबात नव्हता. अगदी नॉर्मल दिसत होती. बोलणंही अगदी व्यवस्थित होतं. आदल्या दिवशी एखाद्या व्यक्तीबद्दल इतका राग बोलून दाखवलात तरी दुसर्‍या दिवशी इतकी नॉर्मली वागू शकतो एखादा माणूस???

टास्क चांगला खेळला जातोय. खुनी तर जबरदस्तच आहेत. पण कॅप्टनशिपच्या दावेदारीसाठी केवळ गुप्तहेरच असू शकतात ना. आणि गुप्तहेर तर अतीप्रचंड गंडलेत. दोघांना आजिबातच अंदाज नाहीये येत खून कसे झाले याचा. दोघेही जर फेल गेले तर कशाला द्यायची त्यांना कॅप्टनशिपची उमेदवारी?
रा
ही शरा अचानक उगवल्यामुळे सगळी समिकरणे पुन्हा बदलणार आहेत.

बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत शरा च कॅप्टन असणार आहे म्हणे. आता हे कसं काय जमवणार देव जाणे. नाहीतर बिग बॉसला लक्षात आलंच असेल की सुशांत आणि स्मिता या दोघांकडेही काही पुरावे नाहीयेत. त्यामुळे ते काही कॅप्टनपदाचे दावेदार ठरणार नाहीत.

गुप्तहेर प्रचंड गंडलेले होते. सर्व सामान्य नागरिकांना (अर्थात खुनीसकट) एका रूममध्ये कोंडले असते किंवा एकत्र ठेऊन बारकाईने लक्ष दिले असते तर कोणाचा खुनच नसता झाला. शिवाय खुनीने प्रयत्न केला असता तर पकडलादेखील असता.

तोंडावर पाणी फेकणे , भरवणे, मीठ टाकणे, फोटो चोरणे सोपे होते , अजुन काहीतरी चॅलेंजिंग संकेत हवे होते पण अर्थात अस्तादला तेही नाही जमलं, मीठ भसाभसा ओतलं पण नीट मिक्स सुध्दा नाही केलं, मेघा जॉइन झाल्यावर निश्चिन्त झाला !
वर शहाणा मेघाला म्हणे आउ किंवा सईला भरव, बरं झालं तिनी रेशम गृपला टारगेट केले.
मेघाने पटापट पाडले मुडदे Proud

<बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत शरा च कॅप्टन असणार आहे म्हणे. >
हे कुठे कळले?

Submitted by अन्जू on 24 May, 2018 - 00:21
मला हा task खूप आवडला. मारामारी नाही, आरडाओरडा नाही, दादागिरी नाही. छान होता. >>>>+१११११११११११११११

मॅचमुळे कालचा भाग तुकड्यातुकड्यात बघितला.... मेघाने केलेले खून बघायला मिळाले नाहीत!
दिसत मात्र छान होती ती.... रादर काल सगळेच सोबर दिसत होते!
चक्क रेशमसुद्धा सौम्य दिसत होती!

मेघा अन पुष्करने कालच ओळखलं होतं आस्ताद खुनी आहे ते.. मेघालाच कळल्यामुळे बिबॉ ने तिलाच खुनी बनवलं पण मस्त टास्क केला तिने.. अन ती स्मिता काल आस्तादचा एकदाहि संशय घेतला नाहि अन मेघा च्या मागे लागली होती.. ती इतक सांगतेय तर म्हणे खोटं बोलतेय..मस्त मेघाने खुन पाडले सटासट Happy

मेघाने पटापट पाडले मुडदे >>>> तिने मस्त फायदा उचलला तिच्या बडेचा, नाहीतर कशाला ह खा ने खाल्ले असते तिच्या हातून अन तिला भरविले असते. पाणी उडविणे फोटो लपविणे मीठ जेवणात घालणे त्या मानाने सोपेच होते

मेघा स्मार्ट खेळली. आस्त्या हतबल झाला होता. तसा त्याच्यावर लोकांचा संशय असल्याचा फायदाही मेघाला झाला. तिच्यापासून दूर नाही पळाले कोणी. तिने बरोबर चुन चुन के लोकांना टार्गेट केले !
आडो - अगदी अगदी, मीही नोटिस केले की काय प्रेमात बोलत होती रेशम मेघाशी. काही झालेच नाही अशा छापात. तेवढेच नाही तर तिला म्हणे आज नको तू काम करू म्हणुन स्वयंपाक वगैरे स्वतः अंगावर घेतला! एकेकांची स्टॅटर्जी Happy
काल मजा आली पण. भूषण चे माकडचाळे बघून हसू येत होतं. लोक कोणीही जवळ आले की जे टरकत होते ते बघून आणि खून कसे होतील याचे एकेक तर्क ऐकून पण फार हसायला येत होतं. फ्लश ला हात लावला तर खून होईल का, म्हणून मेघा ग्लव्ज घेऊन बाथरूम मधे गेली Happy सईने मधेच आस्ताद इकडे येऊन गेलाय या भितीपायी स्कर्ट पण स्मिताकडून घालून घेतला Lol
आता हे खून झालेले लोक सरसकट नॉमिनेट होणार असतील तर मज्जा च आहे. स्मिता सोडून सगळेच नॉमिनेटेड म्हणजे!!

टास्क बर्‍यापैकी सोपे होते.. आस्ताद डबल गेम खेळत होता.मेघा विषयी चक्क सुशांत ला हिंट पण देत होता..
स्मिता ने मस्त सांगितले की संशयीताची (आस्ताद) देहबोली, नजर, बोलण्याची पध्दत या सर्वावरून देखिल अनुमान काढता येऊ शकते. फक्त पुरावा म्हणून आज काय सादर करते काय माहित?
सुशांत मात्र गंडलेला वाटला.. सगळे त्यालाच खूनी समजत होते. Wink बघू आज काय पुरावे देतो?
असो. सर्वांनी टास्क चांगला एंजॉय केला.. घरात जरा तरी खेळीमेळीचे वातावरण बघायला मिळाले त्या निमित्ताने.
वोटींग लाईन्स बंद असल्ल्याने बहुतेक या आठवड्यात नो एलिमीनेशन्स..

>>कोण ही शर्मिष्ठा राऊत???

तिला सगळ्यात पहील्यांदा मन उधाण वाऱ्याचे मधल्या नीरजा च्या रोल मध्ये बघितल्याचे आठवतेय!
ती आणि गौरीमध्ये एकाच हिरोसाठी टशन होती

>>>>कोण ही शर्मिष्ठा राऊत???
जी कोण आहे... तीला डायरेक्ट आल्या आल्या अनिश्चीत काळ कॅप्टन म्हणजे ईतर स्पर्धकांना विशेषतः मेघा, सई, रेशम, हर्षा जबरीच टशन आहे..
बि बॉ काड्या नव्हे मशाली पेटवायच्या मार्गावर दिसताहेत.
बहुतेक जुई चे 'छुई मुई' व्हायचे दिवस जवळ आलेत..

सुशांतने स्मिताला इकडे तिकडे हात लावल्याने ती चिडली आहे. माफी मागण्याऐवजी तिलाच आणखी टशन देत लक्षात ठेवेन लक्षात ठेवेन वगैरे बोलतोय तो. मूर्ख मेघा त्याची रदबदली करतेय..

Pages