बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता पाहिला कालचा भाग! बापरे बाप किती खुनशी आहे रेशम!! आणि मेघा अतिशय संयमित, शांत आणि elegant.. अतिशय गोड आहे ती. सईला किती छान समजवत होती ती आणि तिचा रुसवा काढायचा असफल प्रयत्न करत होती. पण तिने अजून जोर लावायला पाहिजे होता तिला समजवण्याचा, असं मला वाटलं.
मेघा नॉमिनेट झाल्यावर आउ आणि पुष्करवर चिडली होती की तुम्ही तुमच्या मतावर का ठाम नाही राहीला. हीच बाई काल सईच्या बाबतीत मात्र स्वतःच्या मतावर ठाम नाही राहिली. याला तुम्ही संयमित, शांत, elegant आणि गोड म्हणता का?

नवीन Submitted by योगी९००

>>>>>>>>

बर...

अहो ते प्रतिस्पर्ध्याच्या बाबतीत आहे... डिबेट मध्ये ति अतिशय संयमित, शांत आणि elegant.. अतिशय गोड आहेच..
पण मित्रांवर रागावने वा चिडणे हे हक्कने आलेच... त्यात वावग काय आहे. . उगाच काही पण आपल...

आस्तादचं रडवण्यासाठीचं टार्गेट चुकलं. सई/आऊ/ सुशांत गेला बाजार जुई हे लगेच वितळले असते.
हर्षदा कित्ती घाण ओरडली सईला.

I was hoping Jui and Sushant's elimination before Rajesh but looks like Big boss wants them !
I think Usha Nadkarni' s turn next !

मेघा सई आणि पुष्करवर नॉमिनेट झाली म्हणून चिडली नाहीये. तुम्ही तिचे मुद्दे लक्षात घेतले तर कळेल ती किती व्यवस्थित विचार करते. रेशम आणि ती या दोघींच्यात रेशमची वागणूक चांगली म्हणून तिला सेफ केलं या कारणाचा तिला राग आलाय आणि तो बरोबरच आहे.

खरंतर रेशमला मेघानं सांगायला हवं होतं की तुला तू शेवटपर्यंत जाणार इतका कॉन्फिडन्स आहे तर मग तूच हो नॉमिनेट.

रेशम मेघामुळे भयंकरच इन्सेक्युअर आहे हे दरवेळी दिसतं. रेशम मेघाला म्हणाली की तू माझ्याबद्दल मागे बोलतेस. मी बोलत नाही असं. मी म्हणे चर्चा करते......... भयंकर विनोदी वाक्य होतं ते. शिवाय कधीही जाओ, पण बाहेर जाताना म्हणे रेशम डिग्निटीनंच जाणार आहे. बाई, उरलेय का ते बघा ना आधी.

आज बोलता बोलता मेघा म्हणाली की रेशम आणि राजेश बाथरूममध्ये (तिथे कॅमेरा नसल्याने एकांत मिळतो म्हणून) एकत्र जात होते. हे असं असेल तर त्या प्लॅटॉनिक प्रेमाचं काय झालं?

अस्ताद खुनी आहे हे देखिल मेघाच्या लगेच लक्षात आलं. अस्तादला काही केल्या टास्क जमेना.

रड्याला सन्मानपूर्वक बाहेरचा रस्ता दाखवा आता या आठवड्यात.

मी मेघा आणि सईकरता वोट करणार.

मोरपंखिस Biggrin आता ट्रुथ टेबलचे उरलेले ३ कॉलम खालील प्रमाणे.

मेघा शत्रूवर चिडली आणि मित्रांशी संयमित वागली --> मगं!बरोबरच आहे. तिला कळतं बरोबर!
मेघा शत्रूवर चिडली आणि मित्रांवरही चिडली --> ती स्वत: साठी खेळत्येय. फक्त तिला गेम समजला आहे. तिला कळतं बरोबर!
मेघा शत्रूवर आणि मित्रांवरही चिडली नाही --> सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: ... मेघाला सगळं कळतच Proud

मामी तुझं वोटिंग घेणार नाहीयेत Wink . बंद आहेत voting lines.

या आठवड्यात नो एलिमिनेशन असं दिसतंय. ऋतुजा गेली म्हणून असेल.

स्मिता आणि काळा मोती, कॅमेरा ..... कठीण आहे त्या बाईचं. बिचारी. तरीही आवडते मला. >>> हो गं हो, मम पण task असेल तेव्हा ती आत्तापर्यंत कमी नाही पडली. बिग बॉस पण तिला dumb समजतात. गोड आहे पण ती.

आस्तादला जमत नाहीये विशेष. उद्या बघूया. सोपं जमलं. पुष्कर आज आस्ताद acting करतोय, चोर तोच आहे हे ओळखण्यात बिझी होता, त्यात स्वत:च्या बेडकडे फिरकलाही नाही त्यामुळे अलगद त्याचाच गेम झाला. बिचारा soft target ठरला. तो खूनपण इझी होता त्यामुळे आस्तादने पण सहज केला. पुष्करच्या बिचाऱ्याच्या अजूनही लक्षात आले नसेल की काय झालं ते Lol

हर्षदा कित्ती घाण ओरडली सईला. >>> का पण सईचं काही चुकलं असं वाटत नाहीये उलट तिने बरोबर अंदाज केला, म मां आणि हर्षदा शाळेवरून.

हर्षदा इतकं सगळं वाचून आलीय, तरी मूर्खपणा करतेय. पब्लिकच्या मनातून पार उतरली आहे.

सई मेघाला अति attitude दाखवतेय पण मेघा बरोबर समजावतेय. हीच मूर्खपणा करतेय, हिची ऑफर स्वीकारली असती रेशमने तर राजेश आत असता.

मेघाला रडविणे सोपे होते. नॉमीनेशनचा विषय काढून आणि सई का बोलत नाही असे म्हणून मेघाची बडबड सुरु केली असती तर त्याभरात तिने दोन टिपे गाळली असती आणि तिचा मुडदा पडला असता. भुषनला काहीतरी नौटंकी करायला लावून बक्षिस म्हणून त्याची पपी घेऊन स्मिताला तसे करायला सांगून भूषनला टपकवता आला असता. रेला दोन घास भरवून आता तू मला घास भरव म्हटले तर लगेच ती भरवेल आणि तिचा पत्ता कट होईल. खारट जेवण कोणालाही देऊन उडवता येईल. Happy

पुष्करचा खून कसा झाला ते कळणारच नाही कोणाला. मुळात त्याचा फोटो गायब झालाय ते कळले तरी खूप आहे.

बाय द वे हर्षदा एवढी सईला का बोलली, मधलं थोडं missed, म्हणजे आधी सई सुरुवातीला बोलत होती ते ऐकलं ते बरोबर वाटलं मग जरा मला किचनमध्ये जायला लागलं.

आस्तादचा बड्डे जोरात झाला. मेघाचा कसा नाही केला. केक नसेल आला घरून पण बिग बॉस ने शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. पेजवर काल तिचा बड्डे आहे असं टाकलं होतं.

नाही कळले पण वाईट शब्द होता का तो, बघेन शॉट voot वर. ती एकदम ओरडायला लागली असं वाटलं म्हणून आले किचनमधून धावत Lol

>>आता ट्रुथ टेबलचे उरलेले ३ कॉलम खालील प्रमाणे.
>>मेघा शत्रूवर चिडली आणि मित्रांशी संयमित वागली --> मगं!बरोबरच आहे. तिला कळतं बरोबर!
>>मेघा शत्रूवर चिडली आणि मित्रांवरही चिडली --> ती स्वत: साठी खेळत्येय. फक्त तिला गेम समजला आहे. तिला कळतं बरोबर!
>>मेघा शत्रूवर आणि मित्रांवरही चिडली नाही --> सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो: ... मेघाला सगळं कळतच Proud

म हा न...! Rofl
ईथे रे रा वर इतकी पाने खर्ची पडली पण मेघा व ट्रूथ टेबल चं इतकं चपखल विश्लेषण तीन ओळीत हे केवळ भीषण भालो.
असो, त्यात हेही अ‍ॅड करता येईल का:
मेघाला सगळं कळतच हे आता सगळ्यांनाच कळतं.. अगदी स्मिता ला सुध्दा. Wink

रच्याकने: आऊं साठी सई पुष्कर मेघा कुणीच स्टँड घेऊ शकले नाहीत..सई साठी पुष्कर मेघा स्टँड घेऊ शकले नाहीत..मेघा साठी आऊ पुष्कर स्टँड घेऊ शकले नाहीत.. पुष्कर तू तो गया.. अभी भी वक्त है संभल जा दोस्त! सुशांत चा सल्ला जरा मनावर घे नाहीतर पुढील वेळी होणार बली का बकरा.
पुष्कर ला बघितल्यावर ते लग्नात आलेले आहेर व पाकीटे नीट संभाळायला एकदम प्रामाणीक टाईप चे काका वा मामा बसवतात त्याची आठवण होते. आहेर खरे तर नवरा नवरी ला आलेला असतो पण मामा मात्र तो आपल्यालाच आला आहे अशा थाटात संभाळत असतात. मग शेवटी नीट मोजदाद करून, भार हलका झाला की मामा हुश्श करतात.. पण त्यासाठी मामांना काहीच मिळत नसते. पुष्कर चा तसाच कामा पुरता मामा झालेला आहे. आणि बाळ सई च्या बालिशपणापुढे (अ‍ॅटीट्यूड नाही बरे.. तो फक्त रेशम ला असतो ) Wink हतबल झालेला हा मामा आता काय करतो यावर बरेच काही अवलंबून असणारे.

>>ती एकदम ओरडायला लागली असं वाटलं म्हणून आले किचनमधून धावत Lol
अरे बापरे! किचन मधले काही एलिमीनेट झाले नाही ना तेव्हड्यात..? Wink
[हलके घ्या]

>>>हखा छपरी दाजीची जागा घेणार अस दिसतंय.
तसलं काही नाहीये..
हखा ने आल्या आल्या बि बॉ ने देऊ केलेल्या 'फ्री हीट' च्या जोरावर अक्षरशः वाट्टेल तसे फटके मारले.. पण त्या धुंदीत ती हे विसरली की तीच्या फटक्यांमूळे सर्वात जास्त जखमा तीच्याच मैत्रीणीला झाल्या.. म्हणूनच आता मिळेल तेव्हा मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. पण रेशम ची एकंदरीत जडण घडण बघता ती हिशेब चुकता केल्याशिवाय ठेवणार नाही हे नक्की. घरात करते का घरा बाहेर एव्हडाच प्रश्ण आहे.
असो.
स्मिता च्या मणी व कॅमेरा सेशन ने फार करमणूक झाली.. लई ग्वाड मुलगी आहे. बि बॉ, तीला असच विजयी घोषित करून टाका ना.. ती खरच ईतकी साधी आहे, का अंडरप्ले करते, का अ‍ॅक्टींग करते? काही कळत नाही... मेघालाच ठाऊक! Proud

अरे बापरे! किचन मधले काही एलिमीनेट झाले नाही ना तेव्हड्यात..? >>> Lol ग्रेट, नाही नाही. तसं काही झालं तर नवरा म्हणेल तू bb बघण्यातून eliminate हो. अर्थात मी नाही ऐकणार.

हर्षदा जास्त हार्श राजेशला बोलली. हिला बोलताना हिचे चांगले गुण पण एकीकडे सांगत होती. रेशमला असं वाटतंय ही राजेशला बोलल्याने लोकांचा attitude बदलला त्याच्याकडे बघण्याचा आणि म्हणून तो गेला. तरी एकदा जाऊन परत आलाय. तिला बाहेर आल्यावर कळेल की पहिल्यापासून झोडलंय पब्लिकने रे रा ला.

माबो वर येइ पर्यन्त रे.रा.हे दोघे कोणाला खरच आवडतात हे मला माहितच नवह्तं, ते नॉमिनेट झाले कि सगळीकडे जोक्स ययाचे , लोक म्हणायचे यांना त्यांच्या घरचे तरी व्होट्स करतात कि नाही माहित नाही, निगेटिव व्होटींग सिस्टीम ठेवली कि कोण टॉपला जाईल वगैरे लय फनी युटुब व्हिडीओ असतात, त्यांना द्ययाला उत्तर मिळालं मला फायनली Rofl

Pages