बिग बॉस - मराठी - १

Submitted by दक्षिणा on 16 May, 2018 - 06:51

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162

या घरात अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले, वाईल्ड कार्ड एन्ट्रिज झाल्या, अनेकजण आले, अनेक गेले... तर.....

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
उषा नाडकर्णी
पुष्कर जोग
सई लोकुर
भूषण कडू
मेघा धाडे
And Last But Not The Least My favorite
THE अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_4.jpg

"शर्मिष्ठा राऊत"

sharmishtha-raut.jpg

'नन्दकिशोर चौघुले'
resizemode-4MT-image.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेव्हा स्मिताने मेघाचा फोटो काढला. >>> हो का, हे हुकलं माझं मग आहे की नाही आमची स्मिता हुशार Wink .
Submitted by अन्जू
>>>>>

अरे मी पण मीसल बहुतेक.. केव्हा काढला फोटो... की चुकुन प्लॅश उडाला असेल स्मिताच्या हातुन.. Happy

पण मेघा आणि पुशकी याना खरच मानल पाहिजे... त्यानी पहील्या काही वेळातच बरोबर ओळखल अस्तादच...

मला तरी वाटते आस्ताद ने चांगला प्रयत्न केला. हाय रीस्क हाय रिवार्ड अ‍ॅप्रोच ने बहुतेक त्याने स्मिता, ह खा, जुई यांना रडवण्याचा प्रयत्न केला.
मेघा रडली तर तीला सहज रडवू शकलो त्यामूळे स्पर्धक म्हणून भारी ठरतो.
हखा ला रडवून तीचा खून झाला की ती नॉमीनेशन मध्ये आली तर ही कटकट घालवायची एक संधी
जुई असेही असून काही फरक पडत नाही... त्यामूळे स्वतःला वाचवायचे तर टास्क मार्फत असं जुई चं नॉमीनेशन करून घ्यायचं
बहुदा असा त्याचा विचार असावा.. पण मिंया अ‍ॅक्टींग व ड्रामॅटीक व्हॅल्यू प्रकट करण्यात कमी पडले आणि आधीच असेही टफ असलेल्या मेघा आणि हखा नी काही भिक घातली नाही. त्यामूळे टास्क फसला..
[राजेश चे नाव घेऊन रेशम ला सहज रडवू शकला असता... पण तसे केले नाही.. त्याबद्दल आस्ताद चे कौतूक. बर्‍या पैकी गृप लॉयल्टी ठेवून आहे तो.]
पुष्कर ला मात्र कळणार नाही नेमके त्याचा खून कसा झाला..! बिचारा. हुषार विद्यार्थी ,पण पेपर देण्या आधीच त्याचे आय डी कार्ड कुणितरी चोरल्या सारखी अवस्था झाली त्याची.. Happy

राहिले तीन टास्कः मीठ, जेवण आणि पप्पी..
मीठ प्रकरण तसे सोपे आहे करायला. जेवण प्रकरण मात्र अवघड आहे.. असे अचानक जेवायला घालणे व कुणाकडून घालून घेणे याने १००% संशय येणार. पप्पी प्रकरण घडवून आणता येईल पण डायरेक्ट आव्हान न देता काही कारणाने जर पप्पी दे पारू ला नाच गाणे झाले तर. मेघाच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने त्याने स्मिता कडून हे करवून घेता येऊ शकते.. म्हणजे मौका भी दसतूर भी... पण बघुयात काय करतो.

कंफेशन रूम मध्ये खूनी होण्याच्या फुशारक्या तर मारून आलाय पण 'स्टॅटर्जी' Wink जमत नाहीये... दक्षिणा तू जा बरे मदत करायला.

मेघा रडली तर तीला सहज रडवू शकलो त्यामूळे स्पर्धक म्हणून भारी ठरतो.
हखा ला रडवून तीचा खून झाला की ती नॉमीनेशन मध्ये आली तर ही कटकट घालवायची एक संधी
जुई असेही असून काही फरक पडत नाही... त्यामूळे स्वतःला वाचवायचे तर टास्क मार्फत असं जुई चं नॉमीनेशन करून घ्यायचं
बहुदा असा त्याचा विचार असावा.. >>>>>>> Biggrin Biggrin Biggrin

अस्तादची इतका विचार करायची कुवत असती तर त्यानं या तीन हुशार आणि चाणाक्ष बायकांना सिलेक्ट केलंच नसतं.

काय ते स्टॅटर्जी ! चॅटर्जी सारखं वाटत ऐकायला Biggrin
अस्तादला कोणालातरी भरवायचय आणि भरवूनही घ्ययचय ना ? आधी भरवायचं , मग भरवताना हात भयंकर भाजवून घ्ययाचा काहीतरी उकळतं सांडून !

जेवणच भरवून घ्यायचे आहे का? नाही तर मेघाला केक भरवून तिच्याकडून केक भरवून घेता येईल की.
एका दगडात दोन पक्षी Proud

>>नाही तर मेघाला केक भरवून तिच्याकडून केक भरवून घेता येईल की.
करेक्ट आहे पण केक हे 'जेवण' म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही बहुतेक.. पदार्थ म्हणून ठीक आहे.

>>अस्तादची इतका विचार करायची कुवत असती तर त्यानं या तीन हुशार आणि चाणाक्ष बायकांना सिलेक्ट केलंच नसतं.
बि बॉ सांगू ईच्छीतात की या बाफ वर आस्ताद बद्दल जास्त क्रिटिसिझम केल्यास धागाकर्ती हा धागा बंद करू शकते. Happy

अस्ताद निघालाय मेघाला रडवायला.... Lol
अरे तिने भल्य भल्यांच्या डोळ्यात पाणी आणलय...

अस्ताद थोडा भिरभिरल्या सारखा वाटतोय टास्क करताना...
त्याने नीट थंड डोक्याने विचार करुन करायला हवा... स्मिता चा टास्क सोडता बाकी प्रत्येक टास्क साठी त्याने योग्य व्यक्ती निवडायला हव्यात..

- पप्पी साठी कडु.
- घास भरवणे साठी नौटंकी जुई
- रडवायला रे किंवा आउ.
- मीठाच जेवण साठी हखा किंवा रे इ...

तशीही ती आयडिया बकवास होती एकदम. स्वप्नालीचं लग्न ठरवताय्त काय ! Lol सिनेमे फार पाहतो वाटते आस्ताद. ती काही कुणी १८ वर्षाची मुलगी आहे का की एकदा लग्न लावून दिले की बॉफ्रे ला विसरून नवर्‍यासोबत जाईल !! कोण विश्वास ठेवेल या थापेवर!

रेशम मात्र पादली तरी... "किती सुवासिक पादलीस" म्हणायला ही हखा कमी नाही करणार Proud
>>> Lol dakshina
Submitted by च्रप्स
>>>>>>>>>>>>>>>>>>>>
हा हा .... Lol Lol

किंवा ह खा म्हणेल कि ते पादन नव्हतच मुळी ...

बि बॉ सांगू ईच्छीतात की या बाफ वर आस्ताद बद्दल जास्त क्रिटिसिझम केल्यास धागाकर्ती हा धागा बंद करू शकते
>>> करू दे.. कोणी ना कोणी उघडेल दुसरा धागा ☺️
आस्तिन का साप आहे.. क्रीटीसीसम होणारच.

पण स्वत बिगबॉसने सांगितलेच आहे ना कि ख़ूनी आस्तादच आहे ते. गुप्तहेरांना ख़ून कसा झाला आहे ते शोधायचे आहे फक्त.

मेघा केक भरवायला आली की म्हणायचं मी केक आजच्या वारी खात नाही. मी तुला पोळी भाजीचा एक घास भरवतो, तु मला भरव.

पण स्वत बिगबॉसने सांगितलेच आहे ना कि ख़ूनी आस्तादच आहे ते.>>> असं सांगीतलं का बिबॉ ने? मिसलं माझं.
बाकी कालची सगळ्यात एंटरटेनिंग स्मिता वाटली. बिबॉ पण भारी फिरकी घेत होते तिची Wink आणि तिने खून झाल्यानंतर मेघाचा फोटो घेण्याचा व त्यातही मेघाने छानपैकी पोज देण्याचा सीन तर जामच भारी होता. Biggrin

परवा सई ने दिलेली फाईट मस्तच... एकटी किल्ला लढवत होती
पुसकी आनी आऊ ने तिला शेवटी भारीस पाडल..नही तर तिने मेघाला नॉमीनेट नसत होउ दिल...

खुनी एकच आहे का? काल रडगाण्यांमुळे जंप करत बघितला.
पप्पी आणि रडणे हे टफ होते. त्यात आऊ, रेषम, सई या सदानकदा बाष्पगदगदीत असल्याने लोकाना का नाही निवडले कोण जाणे! पप्पी आणि रडणे झाले असते तर नंतर खुनी ओळखणे खूप ऑब्युअस असते. थोडं डोकं लावून इनडायरेक्टली कोणाकरवी रडवले पाहिजे. सेंटी मारुन जगासमोर रडवले तर मग समजेलच.
कोणाला तरी जेवण करायला सांगून टिपिकल हिंदी मूव्ही सारखे मीठ आणि साखर डबे बदलून ठेवायचे. Proud पण भारतातली साखरेचे कण वेगळे कळतील.

खुनी एकच आहे का? काल रडगाण्यांमुळे जंप करत बघितला.>>
एक खुनी
२ गुप्तहेर ( एक रडणारा ,दुसरा कन्फ्युज)
बाकी सर्व नागरिक
आस्तादला हा टास्क अजिबातच जमत नाहिये, मेघा-रेशम-सई या तिघिपैकी कुणि हव होत, फिजिकल टास्क जास्त होतात म्हनून हा जन्टल टास्क आणला असावा.

ओके.
हो. मेघा-रेशम-सईनी सही केला असता.

आपल्या बड्डे गर्लला किती मस्त गिफ्ट दिली बिग बॉसनं आणि बड्डे गर्लही एकदम छा गयी!

कसले सुमडीत सटासट खून केलेत तिनं. मला भूषणचा खून सगळ्यात जास्त आवडला. इतका सहज आणि स्टाईलमध्ये केला ना. टोटल फिदा मेघावर ! हर्षदाचाही खून भारी स्टाईलिश झाला. मुख्य म्हणजे हर्षदा कालपासून पूर्ण सावध होती आणि पावलोपावली आपण अडकणार नाही याची काळजी घेत होती, तरीही मेघानं तिला हातोहात बनवलं. अतिशय केपेबल आणि एफिशियंट बाई आहे मेघा. कामाचा उरकच दांडगा.

आणि विशेष म्हणजे तिनं सई आणि आउचे खून केले नाहीत. त्यांना जपलं तिनं. त्यामुळे आता नॉमिनेशनमध्ये व्हिलन मंडळींची मांदियाळी जमली आहे.

स्मिता चौकशीच्या वेळी भारी गोड वाटत होती. सतत मेघाला पकडून चौकशी चालली होती तिची.

तो रड्या प्रत्येक खूनी बरोबर लगेच जात होता. वर म्हणे तेच बोलावतायत मला.

भूषणनं सईला पूर्णपणे साईक करून ठेवलं होतं. ते बघताना खूप हसू येत होतं. त्याला भारी भारी कल्पना सुचतात हे खरंय. पार्टी बदलली तर आवडेल मला तो. सईची मंजुलिकापण मस्त होती. आजचा टास्क खरंच खूपच मस्त होता. असे टास्कस द्यायला हवेत. एकदम एंजॉयेबल!

हर्षदाचा खून झाल्याची घोषणा झाली तर तिथे ती यडी रेशम म्हणत होती, मला वाटतंच होतं मेघा आहे म्हणून. उगंच. हिला वाटलं असतं तर नक्की बोललीच असती की. आणि आता उरलेच किती होते, तर्क करायला? किती उड्या मारशील रेशम?

मेघा केक कापत असताना जुई टँव टँव टँव टँव असं मेघाला चिडवत होती. हलकट पणाची कमाल आहे. कोणीतरी, बहुधा हर्षदानं तिला गप्प केलं. म्हणे आज नको.

रच्याकने, दही किती भल्यामोठ्या भांड्यात लावतात ही मंडळी.

त्यामुळे आता नॉमिनेशनमध्ये व्हिलन मंडळींची मांदियाळी जमली आहे. >>> अरे वा वा ये हुई ना बात!! मेघा चांगली खुनी होईल हे इथलं प्रेडिक्शन बरोबर निघालं मग Happy

मेघा केक कापत असताना जुई टँव टँव टँव टँव असं मेघाला चिडवत होती. हलकट पणाची कमाल आहे. कोणीतरी, बहुधा हर्षदानं तिला गप्प केलं. म्हणे आज नको.

नवीन Submitted by मामी
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

महानौटंकी जुई सगळ्यात भंगार पात्र आहे या घरात.. एकदम कुजकी मनोव्रत्ती आहे तिची...
मेघा व सई वर खुपच जळते..

हो आजच्या एपिसोडनंतर उद्याच्या झलकीमध्ये एस. आर. इनिशियल्स लिहिलेल्या बॅगा दाखवल्या. ती डायरेक्ट कॅप्टन बनणार आहे आणि तेही अमर्याद काळापर्यंत. म्हणजे तिला चांगलं पढवून पाठवलं जाणार असेल.

ओह! मग या टास्क मध्ये जिंकलेल्यांच्या तोंडाला पाने पुसणार का? त्यांना तर काल सांगत होते की जिंकलात तर कॅप्टन्शिप साठी उमेदवार असाल म्हणून. कोण आहे ही शर्मिष्ठा? माहित पण नाहीये.
यांना परत एक बाई आणायची का गरज भासली ? पुरुष यायला तयर होईनात वाटतं कुणीच तिथे.

पुरुष यायला तयर होईनात वाटतं कुणीच तिथे. >> त्यांच्या हुषारीचं पितळही घरातल्या इतर पुरुष सदस्यांसारखं उघडं पडेल अशी सार्थ भिती वाटत असेल त्यांना.

ओह! मग या टास्क मध्ये जिंकलेल्यांच्या तोंडाला पाने पुसणार का? त्यांना तर काल सांगत होते की जिंकलात तर कॅप्टन्शिप साठी उमेदवार असाल म्हणून. कोण आहे ही शर्मिष्ठा? माहित पण नाहीये.
<
अगं बघता क्षणी डोक्यात जाणे कॅटॅगरी , जु.ये.रे.गा मधली ललित प्रभाकरची बहिण झालेली ओव्हर अ‍ॅक्टींग बाई !

Pages