आयपीएल-११ (२०१८)

Submitted by स्वरुप on 6 April, 2018 - 02:23

उद्यापासून आयपीएलचा ११ वा सीझन सुरु होतोय
या सीझनच्या आधी मेगा ऑक्शन झाल्याने बहुतेक संघांचा मेकओव्हर झालाय..... कोण नक्की कोणाकडून खेळतय हे अजुनही बऱ्याच जणांचे कंफ्युजन आहे!
RR आणि CSK परत आलेत.... पुणे आणि गुजरात बाहेर गेलेत.... रहाणे, कार्तिक, अश्विन यांचे पूर्णवेळ कॅप्ट्न म्हणून पदार्पण असेल..... SRH सोडले तर बाकी सर्व संघांचे कॅप्ट्न भारतीय आहेत.... स्पर्धा सुरु होण्याआधीच काही स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर गेलेत.... सोनी ऐवजी स्टारस्पोर्ट्स आलेय.... आयपीएलमध्ये पहील्यांदाच DRS येतेय

सालाबादप्रमाणे धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-११ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फेफ, माझी मागच्या पानावरची २४ एप्रिलची पोस्ट वाच (वाचली नसलीस तर)..... दिल्लीच्या संघामध्ये सगळे आलबेल नाही हे त्यांच्या मॅचेस, डगाउटमधले चेहरे बघितलेस तर लगेचच कळत होते!
त्या पोस्टमध्ये अय्यरच्या ज्या मुलाखतीचा उल्लेख आहे ती पण मिळाली तर वाच!
अश्यावेळी पॉंटींगबाबाने पंतऐवजी अय्यरची निवड केली ते अपेक्षितच होते!

मुंबई चा कोच जयवर्धनेची मुलाखत वाचली. त्यात त्याने पांड्याच्या बॅटींग वर IPL च्या आधी काम करण्यात आले असे म्हटलय. पांड्या नेहमीसारखा समोर स्पिनर आला कि आफ्रिदी अंगात आल्यासारखे का करत नाहीये ह्याचे कारण कळले. ह्या कामाची खरच गरज होती का ? त्याच्या uncomplicated approach मधे काय problem होता नक्की राव ? He was quick footed, always reached to the pitch for clean hit.

पांड्या (हार्दिक - धाकटी पाती) चा जो खेळ मी पाहिलाय, त्यात तो स्पिनर्स समोर फारसा खंबीर कधीच नाही वाटला. त्याच्या स्ट्रीट स्मार्ट अ‍ॅप्रोच मुळे काही वेळा खेळून गेलाय तो, पण जनरली चाचपडत खेळतोय असच फीलिंग यायचं. अर्थात, ती माझी तक्रार हल्ली बर्याच बॅट्समेन बद्दल आहे. पांड्या आवडतो मला, पण अजुन वर्क इन प्रोग्रेस आहे..

आज एबी जबरी खेळला. मला वाटतं, तो मोमेंटम गेल्यामुळे आऊट झाला. ब्राव्हो च्या एका ओव्हरमधे एकदम पारडंच फिरलं. तरी मनदीप आणी ग्रँडहोम चांगले सावरताहेत. कोहली चा पवन नेगी वरचा विश्वास अनाकलनीय आहे.

वॉशिंग्टन सुंदर ने मात्र खुप इंप्रेस केलय - त्याला मिळालेल्या थोड्या इंटरनॅशनल मॅचेस मधे, डोमेस्टीक मधे आणी आता आयपीएल मधे, खुप 'हुशार' खेळाडू वाटतो. म्हणजे, पांड्या ने जे करावं असं वाटतं, ते तो ऑलरेडी करतोय.

परत एकदा: नेगी ने स्पोर्ट्स कोट्यातून एखादी नोकरी मिळवून ती करावी. क्रिकेट उसके बस की बात नही है!

इतकं नेगी पुराण लिहिल्यावर कोहली ने त्यालाच पहिली ओव्हर दिली. माझं त्या असा मी असामी मधल्या बेमट्याच्या वडिलांसारखं झालं - अरे अरे अरे, हा नारद की काय - वशाडी वो रे त्यांस! Happy

तरी आज कुठेतरी आरसीबी जिंकावी असं वाटतय. एबी नी फार कष्ट घेतले आहेत आणी विको चा पडलेला चेहरा अगदी पहावत नाही. त्या मानानं, धोनी चा 'आनंद-दु:ख, कसंही असलं तरी असाच असलेला' चेहरा बघणं सोपं आहे.

ताहीर ने नरेन कडून शांत कसे रहावे हे शिकायला पाहीजे.. अतिखुळचटपणा असे नाव त्याच्या सेलिब्रेशनला शोभून दिसते.

दत्तू, ताहीर जरी द. अफ्रिकेकेडून खेळत असला, तरी मुळ पाकिस्तानचा आहे. शेवटी वळचणीचं पाणी ...

आरसीबी हातातली मॅच घालवणार बहुतेक. धोनी आणी रायडू जबरदस्त खेळून र्हैले नं भौ!

त्यात तो स्पिनर्स समोर फारसा खंबीर कधीच नाही वाटला.>> मला त्याचा approach आवडतो. स्पिनर समोर लागणारे टेक्निक असणारे खेळाडू मूळात कमी उरलेत आत्ताशी पण पांड्या slog sweep नावाचा अतरंगी प्रकार न वापरता बॉल ला टप्प्यावर भिडतो हे जास्त आवडते. त्याच्या approach मधे बदल करायची गरज नव्हती. तो गेल्या सीजन मधे जास्त धावा काढऊन गेला होता.

धोनी एकदम पेटून खेळतोय सध्या. शेवटची सिक्स जबरदस्त होती. अ‍ॅण्दर सन ऐवजी कोहल ने स्वतः टाकली असती ओव्हर तरी बरी टाकली असती. रायडू ओपेन काय करायला लागला नि सुटलाय.

कोहली च्या कॅप्टन्सी मधे lack of imagination जाणवतं. शेवटच्या ओव्हर च्या आधीच हा अंदाज आला होता की ती ओव्हर अँडरसन टाकणार आहे. सुंदर ची एक ओव्हर महाग होती, पण तरी त्याला खुबीनं अधे-मधे वापरायला हवं होतं.

कोहली मुर्ख आहे आता म्हणता येईल
उमेशला 30 यार्डाच्या आत ठेऊन चुक केली तो थर्ड मॅनचा फिल्डर आहे. कॅच सोडली मॅच फिरली.. उमेशला शेवटच्या ओव्हरसाठी ठेवायला हवे होते.. नेगी व सुंदर ची ओवर 13-14 च्या आत संपवून टाकली पाहीजे होती

कोहली चुकांपासून शिकत नाही म्हणून हारतात

धोनी द बॉस !
कोणाला मारायचे आणि कोणाला किती ईज्जत द्यायची याचे गणित त्याचे पक्के असते.
शेवटच्या 4-5 ओवरला 12-13 चा रनरेट हवाय किंवा शेवटच्या एकदोन ओवर्सना 16-18 पर्यंत गेलाय. अश्या स्थितीमध्ये जर धोनी उभा असेल तर बॅटींग करणारा संघ फेव्हरेट असतो आणि समोरचे वाचायला बघतात. धोनीला समोर बघूनच कित्येक बॉलर चळाचळा कापून वाईड बॉल टाकतात. आणि ईथेच तो अर्धे युद्ध जिंकतो. जगभरात ईतके हिटर आहेत. मात्र मी स्वत: स्ट्राईक घेत सहा बॉल खेळलो की तीन बॉल पार पोचवणार हा विश्वास फक्त धोनीकडेच.

उमेशचा कोटा आधीच संपवून कोहलीने calculated risk घेतलेली.... त्यावेळी त्याला वाटले नसेल की ही मॅच शेवटच्या ओव्हर्सपर्यंत जाईल..... रायडू-धोनी लवकर आउट झाले असते तर उमेशला आधी वापरण्याला लोकांनी मास्टरस्ट्रोक वगैरे म्हंटले असते..... Captain is as good as his team हे परत एकदा अधोरेखित होतय!

धोनीचे पोस्ट मॅच स्पीच बघायला मला आवडते...... He keeps it simple!

"अश्या स्थितीमध्ये जर धोनी उभा असेल तर बॅटींग करणारा संघ फेव्हरेट असतो आणि समोरचे वाचायला बघतात. धोनीला समोर बघूनच कित्येक बॉलर चळाचळा कापून वाईड बॉल टाकतात." - पाचएक वर्षापूर्वी होती ही परिस्थिती. आता दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, ही फेज चालू आहे, असं वाटतं.

आज पांडे बहुदा, 'आजचा दिवस माझा' म्हणेल. दोन कॅचेस सुटले आहेत त्याचे. युवराज बाहेर म्हणजे पंजाब ची weak link बाहेर. ही जखमी वाघांची टीम सगळ्यांचे अंदाज चुकवेल बहुदा.

हैद्राबाद इज डुइंग इट अगेन. कुठलाही स्कोअर आमचे येथे डिफेंड करून मिळेल अशी त्यांची टॅगलाईन असावी.

मी आता गुण तक्ता पाहिला. कमाल आहे कि तळाचे तीन सपॅरिटीदोन-तीनेक मॅचेस सलग जिंकले तर फटकन पॅरिटी येईल. होऊन जाउ दे नाहितर नुसते बोअर होईल.

आता दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, ही फेज चालू आहे
>>>

थोड्यावेळापूर्वीच मी अमिताभच्या धाग्यावर त्याच्या वयासंदर्भात धोनीचे उदाहरण देत एक पोस्ट टाकलीय ती आठवली Happy

>>कुठलाही स्कोअर आमचे येथे डिफेंड करून मिळेल अशी त्यांची टॅगलाईन
ॲक्चुअली!..... आणि भुवी नसताना ही करामत चालू आहे!
विल्यमसन ॲज अ कॅप्टन इतका छा गया है की आता कुणी वॉर्नरच नावसुद्धा काढत नाहीये!

>>मी आता गुण तक्ता पाहिला. कमाल आहे कि तळाचे तीन सपॅरिटीदोन-तीनेक मॅचेस सलग जिंकले तर फटकन पॅरिटी येईल. होऊन जाउ दे नाहितर नुसते बोअर होईल.

मलातर वाटत की प्ले-ऑफ चे संघ पॉइंटसवर न ठरवता नेट रनरेटवर ठरवले पाहिजेत.... That reflects true performance!

रोहित चांगला खेळला तर तर तसं का महटलं जात नाही इथं ! त्याच्या आक्रमक खेळातील नजाकत ही एक दुर्मीळ मेजवानीच आहे. त्याच्या अपयशाचीच चर्चा अधिक !!

आज राजस्थान वि. हैद्राबाद पाहिली. खरं सांगायचं तर हैद्राबाद ची बॉलिंग अशी काही आऊट ऑफ धिस वर्ल्ड वगैरे नाहीये. राजस्थान मिडिऑकर खेळताहेत ते जाऊ दे. पण कौल, थंपी, संदीप शर्मा वगैरे खास आयपीएल स्टार्स आहेत. रशीद खान ला सुद्धा वेगळ्या प्लॅटफॉर्म वर बघून मत बनवायला आवडेल. नाहीतर सुनिल नरैन, सॅम्युअल बद्री असे टी-२० लीग्ज स्पेशलिस्ट कमी नाहीयेत.

भाऊ, तुम्हाला ह्या धाग्यावर पाहून छान वाटलं. तुमच्या व्यंगचित्रांशिवाय आयपीएल ची चर्चा रंगत नाही.

रोहित शर्मा च्या खेळी च्या प्रश्नावर माझ्यापुरतं उत्तर त्याची inconsistency इतकच आहे. त्याच्याच बाबतीत नाही, कुठल्याही once every 8 - 10 innings मधे परफॉर्म करणार्या खेळाडूंविषयी हेच आहे. बाकी स्पेसिफिक सांगायचं तर, मी कालची मॅच पाहिली नाही. त्यामुळे त्या इनिंग बद्दल पास.

ऋन्मेष, तुझी धोनी ची तेंडुलकर शी तुलना करणारी पोस्ट वाचली. त्या तुलनेच्या बाबतीत मी फारसं काही बोलत नाही. एक खेळाडू म्हणून तेंडुलकर चा आवाका खूप मोठा होता त्यामुळे ती तुलना अयोग्य वाटते. बाकी कुणी कधी रिटायर व्हावं वगैरे सोशल मेडिया वरच्या मतांना काही अर्थ नसतो. त्याच्या खेळींचा त्याच्या टीम्स ना कन्सिस्टंटली उपयोग होत रहावा ही सदिच्छा.

या वीकेंडला काही न काही कारणाने मॅचेस फारश्या पाहता आल्या नाहीत
राजस्थान मागची मॅच अनपेक्षित रित्या जिंकल्यामुळे या मॅचमध्ये माती खाणार हे अपेक्षितच होते!
हैद्राबादसारख्या संघाविरुद्ध एक पक्का बॅट्समन कमी करुन त्याच्याऐवजी बॉलर घेण्याचे डावपेच काही कळले नाहीत!

आज आता चेन्नई वि. दिल्ली
अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघ मागची मॅच एकदम भारी खेळला पण आज सामना धोनीच्या चेन्नईशी आहे!

चेन्नई आजची मॅच सहज जिंकेल असे वाटतय!

आता दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, ही फेज चालू आहे, असं वाटतं. > दिव्याचा सध्या वणवा झालाय का रे ? Wink

त्याच्या आक्रमक खेळातील नजाकत ही एक दुर्मीळ मेजवानीच आहे. >> हे मान्य आहे भाऊ पण सात मधल्या दोन सामन्यांमधेच ती दिसली आहे हा (फे फे चा) प्रश्न आहे. रोहित एवढाच सूर्य कुमार यादव नि पृथ्वी शॉ चा खेळ नजाकतदार वाटतोय सध्या.

हैद्राबाद ची बॉलिंग अशी काही आऊट ऑफ धिस वर्ल्ड वगैरे नाहीये. >> नशिब माझ्या मताशी सहमत असणारा अजून एक कोणी तरी आहे. रशिद खान च्या लौकिकाला घाबरून सध्या जे खेळणे सुरू आहे त्यामूळे अधिक प्रेशर घेऊन खेळताना सामने हरताहेत असे वाटते. पांड्याने ती ओव्हर मेडन खेळून काढली तेंव्हा त्यावर शिक्कामोर्तब झाले होते. कौल मात्र खरच अपेक्षेपेक्षा चांगली बॉलिंग करतोय. हे लाँग टर्म राहते का हे मह्त्वाचे. गेल्या वर्षीही मधे असाच चांगला खेळला होता.

RCB ची गम्मत वाटली, नेमका एक कॅच सुटला तोच महागात पडला. कोहली ने घेतलेला कॅच priceless होता.

आता उद्या बघू काय करतात शर्माजी!

रच्याकने त्या 'शर्माजी' वरुन आठवले..... मघाशी स्टार स्पोर्ट्सचे हिंदी समालोचक म्हणत होते की कल कोईभी जिते कोईभी हारे लेकीन शर्माजी बहोत खुष होंगे क्यों की..... या तो लडका जीतेगा या दामाद!
एकदम दर्जा कॉमेंट्री Wink

Pages